Shrddha Adane

Fantasy Others

3  

Shrddha Adane

Fantasy Others

मी तुझाचं बाबा बोलतोय...

मी तुझाचं बाबा बोलतोय...

4 mins
160


प्रिय बाळ,                                                                                                                                                                                            आज पञ


लिहीण्यास कारण म्हणजे की मला तुझी खूप खूप आठवण येऊ लागली...बाळा आज तुझी आठवण येत असतांनी मी तुला भेटायला येऊ शकत नाही.....खरचं मनापासून sorry बाळा..............😔🥺😔.       


बाळा तु जन्म घेतलास आणि आमच्या घराला चौहीकडे प्रकाश दिलास तु....पण कुणाची एवढया चांगल्या घराला दृष्ट लागली की कुणास ठाऊक.....बाळा तु पाच वर्षाची असतांना मला आणि तुला सोडून तुझी आई गेली......मग माझ्या पंखामध्ये बळचं राहीलं नाही, जगण्याची उमेद नकोशी झाली होती......पण बाळा मी राञभर विचार केला....मी ही तुला सोडून गेलो तर....माझी क्युटीशी राजकुमारी रस्त्यावर पडली असती. मी असा विचारचं कसा करु शकतो. माझं बाळ असतांनाही, म्हणून मी स्वतालाचं दोष देत होतो.....आणि मग मी न खचता नविन संघर्ष घेतला. आणि जगण्याची फक्त बाळा तुझ्यामूळेचं उमेद धरली...आणि फक्त बाळा तुझ्यासाठीचं दिवसाची राञ करु लागलो आणि राञीचा दिवस करु लागलो.... फक्त बाळा तुझ्यासाठीचं राञनं दिवस जिवाचं रान करून कष्ट घेऊ लागलो..........................🤞🤞🤞🤞      


बाळा तु शाळेत जायला लागलीस माझ्या हृदयातून, माझ्या काळजातून मोती फुलून आलेत....बाळा रोज मी तुला सकाळी सातला उठवायचो, तुला डब्बा करून द्यायचो, तुला अंघोळीला पाणी टाकायचो, तुझ्या वाकड्या-तिकड्या मला जमेन तशा दोन वेण्या घालून द्यायचो...आणि साडे आठ वाजता तुला शाळेत नेऊन सोडायचो............🏫👈                     

                                             

बाळा तु मला शाळेच्या गेट मधून रोज म्हणायचीस "बाबा लवकर तु मला घेऊन जायला ये आआआ..........." आणि मी तुला म्हणायचो. "हो बाळा मी लवकर येतो आआआ......" तो पर्यंतर मी कामाला जायचो. आणि चार वाजता शाळेतून घरी घेऊन जायला यायचो, तुला शाळेतून घरी आणल्यावर तुला fresh करत होतो, पाच वाजता तुला बागेत फिरायला न्यायचो, तुझ्या मागे धावत-धावत "एक चिऊचा, एक काऊचा" असं म्हणत-म्हणत तुला घास भरवायचो. आणि आठ ते दहा तुझा अभ्यास घ्यायचो.....आणि दहा वाजता तुला मांडीवर घेऊन थापटत-थापटत " निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडशाला झोप का गं येतं नाही " हे गाणं गुणगुणायचो आणि तु कधी डोळे लावायचीस ते तर मला माहितही व्हायचं नाही....पण गाणं गुणगुणतांनी भिंतीला डोकं टेकून माञ मीचं डोळे लावायचो..........................,😊😍                                        

    

हे आपल्या दोघांच्या जिवनाचं रोजचं वेळापञक होतं... बाळा माझ्याकडून मी जमेन तितकं तुला आईचं आणि बाबाचं प्रेम दिलं.....पण या आपल्या दोघांच्या जिवनात सगळ्यात मोठा आपघात झाला....तु पंधरा वर्षाची असतांनी मी यावर कधी विचारही केला नव्हता. आणि माझ्या मनात कधी असा विचार आलाही नव्हता. तो आपघात म्हणजे आॕफीसच्या घोटाळ्यात माझ्या बॕग मध्ये कोणीतरी दहा कोठी रुपायची रक्कम टाकली आणि माझ्यावर चोरीचा चुकीचा आरोप केला गेला. मी खरचं खूप मनापासून पोलीसांना सांगू लागलो. मी ही कॕश घेतली नाही. माझ्यावर चुकीचा आरोप घेतला चाल्ला पण माझं कुणीचं ऐकून घेतलं नाही................😔🥺🥺😔                                          

                            

आणि बाळा तुझ्यासमोर माझ्या हातात पोलीसांनी मला हातकड्या भांदल्या आणि मला तुझ्यासमोरून घेऊन जाऊ लागले पोलीस स्टेशन मध्ये........ आणि बाळा तु मोठ मोठ्याने रडत ओरडत होतीस. " पोलिस काका please माझ्या बाबाला सोडाणा. माझ्या बाबाने खरचं काहीचं नाही केलं........ " आजूबांजूच्या लोकांना म्हणत होतीस please माझ्या बाबाला धरा ना आणि नंतर तुझही कोणीचं ऐकेनास झालं. नंतर तुचं ओरडून म्हणलीस "बाबा आआआ थांब ना रे तु" पण तो पर्यंतर मी पोलीसांच्या गाडीत बसलो होतो.... आणि तशाचं माझ्या हातकडी बांदलेल्या हाताने मी तुला गाडीच्या काचेतून बाय केलं..................👋👋                                    

                          

आणि तु ही मला बाय करत रडत-रडत म्हणालीस बाबा स्वताची काळजी घे आआआ...........तुझी काळजी घ्यायला मी तिथे नसणार आहे. तु हा हृदयस्पर्शी माझ्यासाठी सल्ला दिलास. मी तुझा ऐकूनही घेतला पण माझा सल्ला तु ऐकून घेई पर्यंतर गाडी खूप पुढे निघून गेली होती. बाळा माझा तुझ्यासाठी सल्ला होता की. बाळा मला न्याय मिळणारचं फक्त मी घरी येई पर्यंतर तु आशेने, आतुरतेने तुझ्या बाबाची वाट बघ..............😔🥺😔                                             


बाळा मी तुझ्याजवळून निघून गेल्यावर मला पोलीस स्टेशन मध्ये नेवून खूप मारल.पोलीसांना खूप म्हणत होतो. एकदाचं मला आणि माझ्या बाळाला भेटू द्या, निदान तिच्या तोडांवरून हात फिरवून तिची पप्पी तरी घेऊ द्या,. पण माझे मनातून उमजणारे शब्द पोलीसांनाही भावले नाही. बाळा तसाचं मी तुझ्या आठवणीत जेल मध्ये जगत होतो. मग तीन वर्षानीं चोरी कोनी केली याचा निकाल लागला. आणि मला कोर्टाने न्याय मिळाला म्हणून घोषीत केलं. आणि जेल मधून माझी सुटका केली.................🤘🤟                                         

   

जसं पिंजऱ्यात असणाऱ्या पक्ष्याला सोडल्या जातं आणि काहीचं न विचार करता. तो पक्षी उंचावर आकाश भरारी घेतो आणि आकाशातून धपकन खाली पडतो. तसचं मग माझ्या आयुष्यात झालं बाळा. बाळ मी जेल मधून सुटल्या-सुटल्या मी काहीचं विचार केला नाही. केस सुटली म्हणून साईन सुध्दा केली नाही. तसाचं मी आपल्या घराच्या वाटेने तुला भेटायला धावत सुटलो. कसा तरी आपल्या घरा पर्यंतर आलो आणि अंगणात पाय टाकला. मग माझा आनंद गगणात मावेनासा झाला..... मी दरवाज्या जवळ आलो आणि मग मी दरवाजा खूप वाजवला पण कोणीचं दरवाजा उगडतचं नव्हतं..............😔😔                                                      

  

म्हणून मी दरवाजा तोडला तर मला तुझे पाय खाली लोबंलेले दिसलेत. मग माझी वरी पाहण्याची हिम्मतचं झाली नाही. तशीचं बाळा मी तुझ्या पायाला धरून घट्ट मिठी मारली आणि तुझ्या पायावर माझं डोकं ठेवून मी तुझ्या पाया मध्येचं माझा अखेरचा श्वास सोडला.......................👃💨💨💨          

मी तुझाचं बाबा बोलतोय स्वर्गातून


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy