Shrddha Adane

Romance Others

3  

Shrddha Adane

Romance Others

आठवणीतील प्रवास

आठवणीतील प्रवास

2 mins
176


              प्रवास कसाही झाला तरी तो आठवणीतचं ठेवावा लागत आहे. कळत-नकळत काही क्षणांचा किंवा काही दिवसांचा झाला तरी आठवणींच्या पुढे काही उरतचं नाहीये. फक्त आत्ता आठवण! आठवण! आठवण! एवढंच उरलय........


               कधी रोमांचकारी घडलेल्या गोष्टी प्रत्येक्षात न उतरता आठवणीतचं उतरत आहे. आणि त्यालाही अगदी मनापासून हे सगळं प्रत्येक्षात उतरायचं आहे. पण आमचा संवाद मात्र message च्या पुढे होताचं नाहीये. बऱ्याचदा तो मला म्हणतोय मला तुला एकदातरी भेटायचंय पण भेटता येत नाहीये. पण सगळा हा आमचा message चा प्रवास आठवणीतचं राहत आहे. स्पर्श मात्र स्वप्नात करावा लागत आहे........


              तो बोलता वेळेस वेड्यासारखं काहीही बोलतो. आणि मला पण वेड लागल्यासारखं भासवतो. पण त्याची ती बोलण्याची भाषा आहे. ती अगदी कोत्याही मुलीला त्याच्या रोमांचकारी स्पर्शात भुरळ पडणारी आहे. एवढं मन काऊन त्याच्या स्पर्शाकडे आकर्षित होत आहे. याचं उत्तर मला मी कितीही विचार केला तरी मला मिळतचं नाहीये............


                पण आमचा message चा प्रवास झाला की मन मात्र त्याच्या आठवणीत गुंतत जात आहे. मी त्याला पाहिलेलंही नाही, मी त्याचा अजून एकदाही आवाज ऐकलेला नाही. पण त्याच्या सोबत प्रवास करतांनी मात्र आयुष्य खूप चांगलं वाटत आहे. पण थोडा त्रास पण होत आहे मला फक्त त्याची आठवण आल्यावर.......... बऱ्याचदा डोळ्यातून अश्रू कोसळतात त्याच्या आठवणीने पण त्याला नाही मी राडलेली आवडत त्या मुळे डोळ्यातून बाहेर आलेले आश्रू डोळ्यातचं दाटून घ्यावे लागतात...............


                 आज मी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी रडले असते तर.... तो माझे डोळे पुसत-पुसत मला त्याने त्याच्या घट्ट मिठीत घेतलं असतं आणि त्याच्याचं संगीतमय हृदयाचे ठोके ऐकत-ऐकत त्याच्याचं मिठीत मी विसावा घेतला असता.........


                 बऱ्याचं वेळेस वाटतं त्याच्या जवळ बसावं त्याच्या नयनात निरागस डोळ्यांनी पाहावं. हवं तर तुम्ही या सगळ्या गोष्टीचं आकर्षणही समजू शकता. पण त्याला जेव्हढी भेटण्याची ओढ लागलेली आहे, तेव्हढीचं त्याच्यापेक्षाही जास्त त्याच्या स्पर्शाची आस लागलेली आहे...............


                 कधीतरी त्याच्या खूप जवळ जावं वाटतं पण तो मलाचं म्हणतो " जास्त आकर्षण करू नकोस एकदा ओढ लागली की ती जाता जात नाही " पण हा आमचा सगळा प्रवास meesage मध्येचं होत आहे. आणि त्याची आठवण येताचं message मध्ये जे काही प्रवास झालेला आहे. त्याला पुन्हा एकदा नव्याने मी आठवणीत उजाडा देत आहे......... फक्त आत्ता आमचा उरलाय आठवणीतील प्रवास..........


 एक चुंबन हवं होतं मला,

 तुझ्या पाकळ्यासारख्या ओठांचं

  आठवणीतील प्रवास करता-करताच

  दुसरं चुंबन हवं होतं मला,

  तुझ्या अदाकारीत नक्षत्राच्या मानेवरचं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance