Shrddha Adane

Others

3  

Shrddha Adane

Others

मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि....

मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि....

10 mins
183


सराव पेपर सुरू होते. पहिला मराठीचा पेपर होता. आणि त्याचा नंबर माझ्या बाजूला आला होता. पण मी त्याला पहिल्या दिवशी काहीचं बोलले नाही. कारण तशी वेळचं पडली नव्हती. तो माझ्याचं वर्गातला असून मी त्याला कधी बोललेली पण नव्हते. फक्त त्याचं नावचं माहीत होतं..............

                               दुसऱ्या दिवशी English चा पेपर होता आणि तोचं मला पहिल्यांदा बोलला. " ये अक्षरा याचं मराठीत translation कसं करायचं ......" आलं तेव्हढं मी त्याला सांगितलं...............

                              मग आमचं तसंच बोलणं दोन-तीन दिवस वाढत गेलं. आणि एका दिवशी science चा पेपर होता. मी पेपर लिहिण्यात मग्न झाले होते. त्याने हाक मारली मला. " ये अक्षरा चॉकलेट खायची का? असं म्हणून " मनात तर नव्हतं चॉकलेट घ्यायची पण चॉकलेट साठी नकार दिला तर त्याला तर वाईट वाटेल. म्हणून चॉकलेट चा स्वीकार केला. आणि ती चॉकलेट होती ....... kissmi

                           मग पुन्हा आशे मध्ये दोन दिवस गेलेत. आम्ही बऱ्या पैकी बोलत राहिलोत. आणि तेव्हढ्यात त्याने माझ्यासमोर विषय काढला. " तू कविता खूप छान करतेस " मी त्याला फक्त तेव्हा thanks म्हणाले आणि माझ्याजवळ मी केलेली एक कविता होती.

" भरून येथील डोळे तुझे " ही कविता मी त्याला वाचायला दिली आणि तो मला म्हणाला खूप छान आहे.... मी पुन्हा एकदा त्याला thanks म्हणाले................

                           पण आम्ही बऱ्यापैकी common friend झालो होतोत. सराव पेपर संपायला दोन दिवस राहिले होतेत. पण सराव पेपर संपायच्या आदल्या दिवशी शाळेत आनंद नगरी होती. मग आमची आनंद नगरीत भेट झाली. आणि मी त्याला हसत-हसत विचारलं " ओ पाटील काही आणलं की नाही " तो पण मला हसत-हसत म्हणाला हे सगळं आपलंच आहे घे की काय घ्यायचं तर........................

                              मी बरं म्हणाले आणि त्याच्या जवळून निघून जाऊ लागले. त्याने मला थांबवलं आणि मला म्हणाला " मी तर तुला खायला घेऊन नाही जाऊ शकत. पण तू हे घे पैसे आणि तू पण खा आणि तुझ्या friends ला पण खाऊ घाल........ " पण तेव्हा मी त्याचे पैसे घेतलेत. कारण आम्ही खूप चांगले friend झालो होतोत म्हणून. पैसे घेतलेत म्हणून थोडी सुद्धा मनात विचित्र शंका पण नव्हती. असो................

                              दुसऱ्या दिवशी last भूगोलचा पेपर होता. तो मला म्हणाला. मी एक कविता केली काल, मी त्याला force केला. मला कविता वाचायला दे म्हणून त्याने मला कविता दिली वाचायला. आणि एकदम वरी लिहिलेलं होतं. ( फक्त तुझ्यासाठी..... ) मला हे दिसलं होतं. पण तरीही मी त्याला विचारलं ही कविता कोणासाठी केलीस. तर तो मला म्हणाला. " बघणा थोडं इकडं-तिकडं मग दिसेल तुला ही कविता कोणासाठी केली ती................. "

                    आणि मग पेपर सुटला तेव्हढ्यात त्याने मला थांबवून घेतलं. आणि मला म्हणाला ही घे चॉकलेट मग मी त्याला चढत्या सुरात विचारलं चॉकलेट कसं काय........? तर तो मला लाडावून म्हणाला अगं ताईन काल खूप मोठ्या चॉकलेट आणल्या होत्यात त्याच्यातल्या दोन मी माझ्या लाडक्या मैत्रीनी साठी आणल्यात त्यात माझं काय चुकलं.... तेव्हा मी त्या चॉकलेट घेतल्यात आणि त्याच्या जवळून निघून गेले. त्या चॉकलेट होत्यात किट-कॅट आणि पर्क................

                          मग आमचे दोन-तीन दिवसांनी दहावीचे practical सुरू झाले होते........ तो मला practical सुरू होऊन दोन-तीन झाले होते तरीही तो मला बोलत नव्हता. मग मीचं त्याला बोलले...... का बोलत नाहीस रे मला? तर तो मला म्हणाला " आगं तब्येत बरोबर नाही म्हणून कोणाशीचं जास्त बोललो नाही " मी तेव्हा बरं म्हणून त्याच्या जवळून निघून गेले..............

                         घरी गेले की सतत त्याचाचं विषय डोक्यात येत होता. कळत होतं आत्ता तो माझ्यावर प्रेम करायला लागला म्हणून...... पण मला त्याने प्रपोज जरी केलं तरी मला ठामपणे त्याला नकारचं द्यायचा होता. म्हणून मी त्याच्यासाठी एक letter लिहिलं " कोणीचं कोणाचं नसतं " कारण मला आसं वाटलं तो हे letter वाचून आत्ताचं माझ्यापासून सावध होईल आणि आमच्या दोघांचं नातं फक्त निखळ पाण्यासारखं best friend, close friend मध्ये वाहत राहील.............

                            Practical झाल्याच्या नंतर आठ दिवस मग फक्त आमच्या वर्गाला सुट्टी होती. आणि आठ दिवसा नंतर आमचा sedoff होता शाळेत. तो ही आला होता sendoff ला....... sendoff वगैरे संपला आणि मी त्याला जाता जाता म्हणाले. खाली भेट न तू मला तुझ्याशी थोडं बोलायचं. तर तो ही मला म्हणाला मला पण तुझ्याशी बोलायचं.............

                            मी त्याला बोलायला जातांनी माझ्यासोबत माझी मैत्रीण आली होती. ती असल्यामुळे मी त्याला एका बिनधास्थ मैत्रिणी सारखं काहीतरी बोलायचं म्हणून बोलले. आणि त्याला जे बोलायचं होतं ते मी त्याला बोलूचं दिलं नाही........... कारण माझ्यासोबत माझी मैत्रीण असल्यामुळे आणि मग मी त्याच्याजवळून निघून गेले....................

                         पण घरी गेले की सतत त्याचाचं विषय डोक्यात येत होता. मी पण त्याच्यावर प्रेम करते की काय हा प्रश्न मला पडत होता...... चार दिवसांनी मग आमचे बोर्डाचे पेपर सुरू झालेत. पहिला मराठी चा पेपर होता. तो रोज मला best off luck म्हणायचा. आणि मी पण त्याला रोज best off luck म्हणायचे..............

                           पण एकदा संस्कृत च्या पेपरच्या दिवशी त्याने माझ्या हातात हात देऊन मला best off luck म्हणाला. मी त्याला thank you म्हणत-म्हणत त्याच्या नयनात निरागस डोळ्यांनी पाहत राहिले....... कारण त्याच्या हाताच्या स्पर्शाने मनात एक वेगळीचं felling आली होती....... तिथंचं त्याचं क्षणी मैत्रीचं नातं मैत्रीच्या थोडं पलीकडे गेलं होतं आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे राहिलं होतं......... आणि त्याच्या हातातून हात काढल्यावर पेपर ला बसले होते आणि सतत एकचं गाणं आठवू लागलं....... इरादा पक्का या मराठी चित्रपटातलं............

                  स्पर्शात वारे निळे पिसारे,

                     आभाळ वाहून गेले

               तुझ्यात मी आणि माझ्यात तू ,

          कसे दोघांचे जग हे न्हाले.................

                  पेपर सुटला मी माझं घरी गेले....... घरीही गेल्यावर पण त्याच्या हाताचा स्पर्शचं मला सतत जाणवत होता. पण तरीही मी हा विषय बाजूला ठेऊन पुढच्या पेपरची तयारी करत होते...........

                          दोन दिवसा नंतर शाळेत गेले मी कारण गणिताचा पेपर होता. पेपर सुटला खाली येऊ लागले. तेव्हढ्यात त्याची आणि माझी भेट झाली....... तर मी त्याला अगदी निरागस चेहऱ्यांनी कोमेजून गेलेल्या फुलपाखरासारखं विचारलं. कारण त्या दिवशीचा त्याच्या हाताचा स्पर्श आठवला म्हणून........ मी त्याला म्हणाले की तुला आपल्या relationship बद्धल काय वाटतं. तर त्यानेचं माझ्यावर उलट प्रश्न केला............

                              तूचं पहिल्यांदा सांग तुला काय वाटतं आपल्या relationship बद्धल......... मग माझ्या हृदयाची खूप धडधड वाढली. डोळ्यात एकदम पाणी आलं. पण तसचं मी त्याला सांगितलं. मला आपल्या relationship बद्धल आसं वाटतं की " मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे " तर तो मला म्हणाला. अगदी बरोबर आहे तुझं मग मी त्याच्या जवळून निघून गेले............

                                  पण मी घरी गेले की सतत मला तोचं आठवू लागला. कोणत्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. पण मला त्याच्यासोबत नातं टिकवून ठेवायचं होतं...... फक्त एक माझा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून तो मला पाहिजे होता...............

                                दुसऱ्या दिवशी शाळेत गेले होते आणि गणित part-2 चा पेपर होता. तो मला पेपर सुरू होण्याच्या अगोदर भेटला आणि मला म्हणाला......... पेपर सुटल्यावर मला भेट. मी ok म्हणून त्याच्या जवळून निघून गेले. आणि पेपर सुटल्यावर मी त्याला भेटले....... त्याने मला एक चिठ्ठी दिली होती आणि ती चिठ्ठी घेऊन मी त्याच्या जवळून निघून गेले.............

                                घरी जाई पर्यंतर हृदयाचे ठोके खूप वाढले होते. कारण या चिठ्ठीत एवढं काय लिहिलेलं असेल आसं वाटत होतं.......... घरी गेले पहिल्यांदा चिठ्ठी उघडली तर..... love letter होतं. ती चिठ्ठी पूर्ण वाचली मी आणि त्यात एक वाक्य खूप सुंदर लिहिलेलं होतं. ते वाक्य वाचल्यावर तचकण डोळ्यात पाणी आलं होतं आणि ते वाक्य होतं........ " वाईट वाटून घेऊ नकोस पण मनात होतं तुला एकदातरी सांगायचं तुझ्यावर प्रेम करतो म्हणून...... पण तुझा जर ठामपणे नकार असेल तर त्याचा मी आनंदाने स्विकार करतो............"

                       ते love letter वाचून खूप रडले मी पण चांगलही वाटलं त्याने त्याच्या मनातलं एकदाचं सांगून टाकलं म्हणून...... पण खूप रागही आला होता त्याचा कारण मी त्याच्यासोबत फक्त निखळ मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने हे काय केलं म्हणून.............

                           पण खरंच मनात नव्हतं त्याच्या प्रेमाचा स्विकार करायचा म्हणून...... पण मला त्याला best friend म्हणून पण गमवायचं नव्हतं आणि एक प्रियकर म्हणून पण मला त्याला कधीचं मिळवायचंही नव्हतं...................

                                  दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तो मला best off luck म्हणाला. मनात इच्छा नव्हती त्याला बोलण्याची पण तरीही मी त्याला त्याचे मित्र सोबत असल्यामुळे thank you म्हणून त्याच्या जवळून निघून गेले......... आशे मध्ये आठ दिवस गेले होते. तरीही मी त्याला बोलले नव्हते आणि तो ही मला बोलला नव्हता. पण मीचं ठरवलं होतं. आत्ता त्याला काही जरी झालं तरी last भूगोलच्या पेपर च्या दिवशी बोलायचं म्हणून....... पण भूगोलचा पेपरचं झाला नाही आणि तेव्हढ्यात lockdown लागलं................

                              मग मी स्वतःचं खूप पच्छताप करत बसले होते. आत्ता त्याला कसं भेटायचं कसं बोलायचं...... तेव्हांच दुसऱ्या दिवशी मी त्याला सांगून टाकलं असतं तर...... आज ही वेळचं आली नसती ना माझ्यावर पण मला त्याला हे खरचं सांगायचं होतं. " मला तू एक प्रियकर म्हणून कधीचं नकोयेस पण best friend म्हणून पण मला तुला कधीचं गमवायचं नाहीये....... " त्याची खूप आठवण येऊ लागली. त्याला खूप भेटावसं वाटत होतं....................

                   संपले जरी सारे तरी,

                   आसं कोणती माझ्या उरी

                     सरतांना सरते ही,

                      वेळ का सांग ना

                      तुटतांना तुटतो हा,

                    जीव का सांग ना...........

                           असचं मध्ये एक वर्ष गेलं..... त्याच्या आठवणी मध्ये. एका वर्षा नंतर त्याचाचं मला पहिल्यांदा Instagram ला message आला......... hi कशी आहेस तू......... खूप म्हणजे खूप बरं वाटलं त्याचा हा message वाचून.........

                             मग लगेचं मी त्याला reply दिला... hello तू कसा आहेस.......... पण मी त्याच्या जवळ जे काही आमच्या दोघांमध्ये पहिल्यांदा झालं होतं ते विषयचं काढला नाही. आणि त्याने पण माझ्या जवळ पहिला विषय काढला नाही.............

                           

                           मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा नव्याने आम्ही बोलत होतोत.... खूप छान वाटत होतं त्याला बोलतांनी एक-दीड तास त्याच्या सोबत insta ला chatting केली. त्याला मी ofline जातांनी खूप हळुवार सुरात म्हणाले...... तुला मी खूप-खूप miss केलं रे. तर तो ही मला म्हणाला मी पण तुला खूप miss केलं गं.............

                      पण त्याला बोलता वेळेस एकदम माझ्या मनात काय felling आली की..... मी त्याला directly चं म्हणाले...... मला तुझ्याकडून काहीतरी ऐकायचं त्याला कळालं होतं.... मला काय म्हणायचं ते पण तरीही तो मला परेशान करत होता...... ( तुला काय ऐकायचं म्हणून ) पण मी ofline गेले की बरोबर त्याने I LOVE YOU चा message टाकला....... आणि मग मी त्याला लगेच smile चा emjio send केला..........

                             त्याच्याशी बोलून खूप चांगलं वाटतं होतं. पण तरीही माझं मन एक प्रियकर म्हणून त्याचा स्विकार करतचं नव्हतं...... मध्ये तीन-चार दिवस आशेचं गेलेत. तरीही मला त्याचा message आला नव्हता म्हणून मीचं त्याला Hi चा message केला............ पण तो मला त्या दिवशी खूप मोजक बोलला. Hi जेवण वगैरे झालं का एवढंचं...............

                              मग मीचं त्याला message करत राहिले. पण तो तरीही माझ्याशी मोजकचं बोलत राहिला. मनात राहवलं नाही म्हणून मी त्याला म्हणालेचं तुला बोलतांनी मनात एक वेगळीचं felling यायली....... तुला खरचं खूप miss कारायले. पण तो मला म्हणाला " बरं! मग मी काय करू............."

                                मला वाटलं तो पण मला म्हणेल I MISS YOU 2 पण तो तसं काहीचं मला म्हणाला नाही. तसचं मी त्याच्याशी दोन-तीन दिवस chatting करत राहिले..... पण तरीही तो माझ्याशी नीट बोलतचं नव्हता. मग मी त्याला विचारलचं. का बोलत नाहीयेस रे माझ्याशी नीट. तर तो मला म्हणाला......... मी सगळ्यांशी याचं भाषेत बोलतो.............

                                   त्याची खूप आठवण येऊ लागली म्हणून मी त्याला सहज म्हणाले. तुला घट्ट मिठी मारून खूप राडावसं वाटतंय....... " पण तो मला म्हणाला मग मी काय करू रड रडायचं असेल तर तुला........ " आसं म्हणून तो मला पुन्हा एक म्हणाला तुझ्या मनात माझ्या बद्धल ज्या काही felling असतील त्या सगळ्या काढून टाक........... कारण तुझ्याबद्धल माझ्या मनात आत्ता काहीचं felling नाहीत.......... I DONT LIKE YOU हा message वाचून मी खूप रडले......................

                             आणि तो मग मला त्याच्या प्रियसी बद्धल सांगू लागला...... पण मला वाईट नाही वाटलं त्याच्या प्रियसी बद्धल ऐकतांना...... पण मला सगळ्यात जास्त या गोष्टीचा त्रास झाला होता की तो माझ्यासोबत एवढ्या उद्धट भाषेत का बोलतोय. मी त्याला काही सांगायला गेले तर........ नको सांगू आसं सरळ का म्हणतोय मला....... प्रेम topic सोडून माझ्याशी कोणत्याही topic वर बोल आसं मला का सतत म्हणतोये..................

                                 त्याला माझ्यावर प्रेमचं करायचं नव्हतं तर त्याने मला पहिल्यांदा love letter चं कशाला दिलं.............. त्याला माझ्यासोबत संबंधचं ठेवायचे नव्हते तर मला त्याने पहिल्यांदा message का केला......... आणि मी ofline जाता-जाता म्हणाले होते की मला तुझ्याकडून काहीतरी ऐकायचं तेव्हा तो मला I LOVE YOU का म्हणाला..................

                              मग मी पण मध्ये आठ दिवस जाऊ दिलेत......... आणि मला वाटलं आत्तातरी त्याचं डोकं शांत झालं असेल. म्हणून मी त्याला message केला पण तो माझा messsage बऱ्याचं वेळेस engnor करत राहिला......... मग मी त्याच्या मनासारखं त्याला आवडलं तसं बोलत राहिले. तरीही तो मला माझ्या प्रियेसीचा call यायला आसं म्हणून offline जाऊ लागला....................

                       तरीही मी त्याच्या जवळ हट्ट नाही केला मलाचं बोल म्हणून......... कधी त्याच्यावर चिडले नाही असा का वागतोयेस म्हणून............ कारण मला माहित होतं. तो माझा खूप जवळचा आणि चांगला मित्र आहे म्हणून........ तो मला कधीचं एकटं पडणार नाही. प्रत्येक वेळेस माझ्या आडी आडचणीला साथ देणार.......... आत्तातरी तो मला आसा बोलत असला तरी...... असो...........

                                पण मी एका दिवशी त्याला विचारलचं तू असा का वागतोयेस...... तुझा problem काय आहे. तर तो मला म्हणाला......... " मी सगळ्यांशी असाचं वागतो. तुला बोलावं वाटलं तर तू बोल नसता नको बोलुस तुझी मर्जी..............." तेव्हा हा message वाचून मला आयुष्यातलं काहीतरी गमवल्या सारखं वाटलं. तरीही मी त्याला पुन्हा एकदा विचारलं तू message का delete करतोयस. तर तो मला म्हणाला ( तुला हे बोलायचं होतं का माझ्याशी...............)

                                  तेव्हा त्याचा खूप राग आला होता. आणि मग मी त्याला म्हणालेचं......... " होऊ दे तुझ्याचं मनासारखं, वाग तुला जसं वागायचं तसं " तर तो मला byy म्हणून offline गेला......... आणि परत माझ्याशी online नचं राहिला नाही............

                              पण तो खरचं खूप चांगला आहे. आणि कोणत्याही मुलीला कधीचं धोका देणार नाही...... स्वार्था साठी कधीचं कोणाशी मैत्री करणार नाही मुलगा असो का मुलगी......... पण तो माझ्याशीचं असा का वागतोय त्याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही. आणि कदाचित त्याच्या मनात माझ्या बद्धल काहीतरी चांगली felling असेल.......... म्हणुन तो माझ्याशी असा वागतोय, मला त्याच्या पासून दूर ठेवतोय............

                                    पण आत्ताही माझं मन फुलपाखरासारखं त्याच्याशी पुन्हा एकदा नव्याने मैत्री करण्यासाठी उडतय................                          पण आत्ताही आमची मैत्री निखळ पाण्यासारखी वाहतचं नाहीये............. " मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे........... " असचं होतंय............

                                  

                      उगाचं मन कोणासाठी,

                       असं रडत नाही

                        एकतर्फी प्रेम म्हणून,

                    फरक तुला पडत नाही

                          दुखतोना मन जेव्हा,

                      येते तुझी आठवण

                              तुझ्यात जीव,

                तुझ्या विना काही राहत नाही

                      तुझा हात माझ्या हातात,

                     असाचं घट्ट राहू दे

                       काही नको बोलू फक्त,

              डोळ्यातचं पाहू दे....................


Rate this content
Log in