Laxman shinde

Horror

4.8  

Laxman shinde

Horror

मी अनुभवलेल भूत

मी अनुभवलेल भूत

2 mins
298


मी शेतकरी कुटुंबातील मुलगा, शेतकरी कुटुंब म्हटल की गुर-ढोर, शेळ्या ही त्यांची मालमत्ता, असच आमच्या घरी ही गूर-ढोर, अण शेळ्या होत्याच. बैल आणि गाई रानात असायच्या पण शेळ्या मात्र शेळक्याकडे (शेळक्या म्हणजे त्याकाळी दिवसभर शेळ्या चारुन आणणारा) सोडाव्या लागायच्या. सकाळी सोडायच्या आणि संध्याकाळी घेऊन यायच्या हे काम मात्र शेळी मालकाच असायच.

      शाळेत जाण्या अगोदर शेळ्या सोडायच काम माझ्याकडे असायच. नाही म्हणायची हिंमत नव्हती. मी त्यावेळी जेमतेम १० वर्षाचा असेन. नियमितपणे मला हे काम करावच लागायच.

       आमच्या घरापासून शेळक्याच घर १ कि मी अंतरावर असेल शेळ्यांनी दोन तीन दिवस त्रास दिला पण न॔तर त्यांना त्यात फायदा वाटल्याने घरुन दाव सोडल की पळत सुटायच्या. शेवटी जनावर ही हुशार असतात यावरुन वाटत होत.

        या जाण्या-येण्याच्या वाटेवर मध्यंतरी एक जुनी विहीर होती, चोहोबाजूंनी झाडाझुडपांनी वेढलेली. (अजून ही तसीच आहे) तर या विहीरीत भुत राहत अस सर्वांचा समज होता.आणि या विहीरीच्या अगदी काठावरुनच रस्ता होता. आणि येथूनच मला शेळ्या सोडवण्यासाठी जाव लागायच. शेळ्या घेऊन जाताना शेळ्या तरी स॔गती असायच्या म्हणून भिती कमी वाटायची पण माघारी येताना त्या विहीरीकडे न बघताच सुसाट सुटायचो.

        एक दिवस असाच शेळ्या सोडून घराकडे येत होतो. विहिरीकडे बघण्याची हिंमत नव्हतीच. पण त्या झाडाने वेढलेल्या विहिरीकडे बघावच लागायचं. मी पळत सुटलो होतो पण विहीरीजवळ येताच विहिरीतून 'येऊ का' असा आवाज आल्याचा भास झाला. त्यावेळी असा समज होता की भूत 'येऊ का' म्हणत. माझ्या मनावर हे वाक्य अगदी कोरलेलं होतं आणि या भीतीपोटी मी माझा पळण्याचा वेग वाढवला. विहीरी पासून घर जेमतेम १०० ते १५० मीटर वर होत. घरापर्यंत पोहोचेपर्यंत माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या आणि दरदरून थंडी आणि ताप येऊ लागला. घरच्यांना काय कळंणा काय झालं. म्हणून मला विचारू लागले मी एवढंच सांगितलं की विहिरीतून 'येऊ का' असा आवाज आला. 

        घरच्यांनी समजायचं ते समजल याला भूतबाधा झाली असे समजून त्यांनी माझ्या अंगावरून लिंबू, निवद, हळदीकुंकू उतारा म्हणून टाकला. तरी पण माझ्या अंगातील ताप व थंडी जात नव्हती म्हणून मोठ्या भावाने मला शेवटी दवाखान्यात नेले.

         अजूनही आठवतो तो प्रसंग आणि अजूनही आठवते ती भूत असलेली विहीर.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror