Supriya Lad

Horror Tragedy

4.0  

Supriya Lad

Horror Tragedy

माय घोस्ट गर्लफ्रेंड

माय घोस्ट गर्लफ्रेंड

10 mins
769


भाग 1:

(पुण्याच्या शिवाजीनगर कॉलेजमध्ये आज इंजिनियरींगच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट डे होता. कॉलेज तस उंच भव्य आणि काचेचे होतं या कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी एकतर खूप हुशार किंवा एकतर खूप पैसेवाला असणारा होता. या कॉलेजमध्ये विद्यार्थी खूप वेगवेगळ्या राज्यातून शिक्षणासाठी यायचे. त्यामुळे दुसर्‍या शहरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये हॉस्टेलची सोय केली होती.)

श्रेयस: हॅलो बाबा पोहोचतोच आहे कॉलेज जवळ, नका काळजी करू. (फोनवर)

श्रेयसचे बाबा: हो काळजी घे स्वतःची आणि काही त्रास झाला किंवा काही असेल तर मला फोन कर.

श्रेयस: हो बाबा नक्की तुम्ही स्वतःची आणि आईची काळजी घ्या.

श्रेयसचे बाबा: हो घेतो...आम्ही आणि तुला एवढा खर्च करून तुझ्या हट्टासाठी तुझ्या आवडत्या कॉलेजला ऍडमिशन घेतले हे लक्षात ठेव, पहिल शिक्षण महत्वाचं मग बाकी सगळं.

श्रेयस: हो बाबा मी पोचलो कॉलेजला आता फोन ठेवतो नाही तर पहिल्या दिवशी उशीर होईल.

श्रेयसचे बाबा : बरं

( श्रेयस फोन ठेवून कॉलेजमध्ये प्रवेश करतो तिथे सर्व विद्यार्थी एकदम हाय-क्लास वाले असतात आधीच श्रेयसचा स्वभाव अबोल असतो, तो खूप मोजकंच बोलत असतो व तेही त्याला बोलू वाटणाऱ्या माणसांशी)

श्रेयस : Excuse me! Class no.201 कुठेय? 

 कॉलेजमधला मुलगा: sorry I don't know.

( तिकडच्या मुलांचा स्वभाव बघून श्रेयस अजूनच बावरतो कसा बसा क्लास नंबर 201 शोधतो, आणि बेंचवर जाऊन बसतो सर्वजण आपल्याच धुंदीत असतात श्रेयस मिडल क्लास घरातला असल्याने त्याचे राहणीमान तसंच असतं त्यामुळे त्याच्या बाजुला कोणी बसायला मागत नाही मॅडम येतात लेक्चर सुरु होते, लेक्चर सुरू असताना त्याचं एका मुलीकडे लक्ष जातं आणि तीही श्रेयस प्रमाणे एकटीच बसलेली असते)

श्रेयस: कोण असेल ती मुलगी? बिचारी माझ्यासारखी एकटी बसलेली आहे कदाचित माझ्यासारखीच मिडल क्लास घरातील असेल.

( लेक्चर संपल्यावर श्रेयस त्या मुली जवळ जातो ती एकदम शांत बसलेली असते ती कोणाशीच बोलत नसते)

श्रेयस : हॅलो I am श्रेयस. आणि तुम्ही? 

भाग 2:

(ती मुलगी श्रेयस कडे दोन मिनिट बघतच बसते व थोडी नजर चोरतंच बोलते मी ऋतुजा )

श्रेयस :oh तुमचं नाव ऋतुजा आहे, छान नाव आहे. 

ऋतुजा :हो माझ्या घरच्यांना पण खूप आवडायचं 

श्रेयस :आवडायचं म्हणजे? आता नाही आवडतं का? 

ऋतुजा : तस काही नाही. 

श्रेयस :बरं. मग तुम्ही पुण्यातच राहता का? 

ऋतुजा :हो गेली 3वर्ष तरी पुण्यातच आहे, माझं गाव नाशिक आहे. 

श्रेयस:oh काय सांगता? मी पण नाशिकचा आहे. 

ऋतुजा :ok

श्रेयस :तुम्ही खूप कमी बोलता, मला वाटायचं मीच kami बोलतो पण आज कळलं तस नाही. 

ऋतुजा :नाही मी अशीच आहे पूर्ण ओळख झाल्याशिवाय कोणाशीच बोलत नाही कारण आपल्यासारखे सगळेच नसतात. 

श्रेयस : oh पण जे बोलता ते खूप छान बोलता. 

ऋतुजा :हो सर्व असेच बोलायचे. 

(तेवढ्यात कॉलेज मधून सर्व student हॉस्टेल वर जायला निघतात सगळे श्रेयस कडे बघत असतात )

श्रेयस : इकडंचे सगळेच एकदम हाय क्लास वाले आहेत ना? 

ऋतुजा : हो 

श्रेयस : मिडल क्लास वाल्याकडे असे बघतात कि परग्रहावरून कोणीतरी आल्यासारखं, आता पण कसे बघतात बघा? 

ऋतुजा : हो बघणारच तसे. 

श्रेयस : तुम्ही पण हॉस्टेल मध्ये राहता का? 

ऋतुजा: हो. तुम्ही? 

श्रेयस : हो मी पण, तुमच्याशी भेटून बरं वाटल, नशीब कोणीतरी आपल्यासारख आहे, नाहीतर मला खूप एकट वाटलं असतं 

ऋतुजा: हो चला मी निघते. मलाही छान वाटलं बोलून. कित्येक दिवसांनंतर मी कोणाशी तरी बोलतेय. 

श्रेयस : ok Bye. हो तुम्हला काहीही मदत हवी असेल तर माझ्याशी बोला मित्रच समजा तुमचा. 

ऋतुजा :बरं 

(एवढा बोलून ती निघते आणि श्रेयस तिच्याकडे बघत बसतो )

भाग 3:

 (श्रेयस होस्टेलवर जाऊन फ्रेश होतो व रात्री झोपताना सोशल मीडिया वर तिला शोधण्याचा प्रयत्न करतो.

पण ती त्याला कुठे सापडत नाही शेवटी तो झोपून जातो व सकाळी उठून कॉलेजमध्ये लेक्चरला जातो, लेक्चर संपल्यानंतर तो ऋतुजालाच शोधत असतो.)

 श्रेयस: Hi ऋतुजा 

 ऋतुजा: Hi

श्रेयस: अगं तू सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही आहेस का? 

ऋतुजा: नाही का? 

श्रेयस : तरीच मी तुला काल किती शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलीच नाही.

ऋतुजा: पूर्वी होते सोशल मीडियावर आता नाहीये तसा पण आता उपयोग काय? 

श्रेयस : बरं मग तू कॉन्टॅक्ट कसा करतेस? 

ऋतुजा: हा घे माझा नंबर 81........

श्रेयस: ओके तुला कॉल केला तर चालेल ना असच गप्पा मारायला.

ऋतुजा : नाही मी स्वतःहुन तुला कॉल करेन मला वाटेल तेव्हा...

श्रेयस: बरं चालेल

ऋतुजा: आणि मला लोकांशी बोलण्यापेक्षा स्वतःशी बोलायला आवडतं.

श्रेयस: म्हणजे? 

ऋतुजा: मी रोज डायरी देते ती लिहिताना दिवसभरातील प्रत्येक घटना स्वतःहून पुन्हा अनुभवते.

श्रेयस: मस्तच!

(अशाप्रकारे श्रेयस आणि ऋतुजा ची मैत्री वाढत जाते व त्यांच्या फोनवर रात्रीच बोलण कॉलेजमधल भेटण वाढायला लागतं हळूहळू श्रेयसला तिचा स्वभाव तिझ्यात गुंतवायला लागतो मग सेमिस्टर वन जवळ येते, सगळे अभ्यासात बिझी असतात)

 श्रेयस: काय मग झाला का अभ्यास? (फोनवर)

 ऋतुजा: हो कधीपासूनच.

 श्रेयस: व्हा तुम्ही काय हुशार माणसं.

 ऋतुजा: असं काही नाही.

 श्रेयस: मग दिवाळीत घरी जाणार आहे की नाही? 

 ऋतुजा : हो बघू

 श्रेयस: मी तर जाणार आहे मला घरची खूप आठवण येते कधी Exam संपवून घरी जाते असं झालं.

ऋतुजा: मला तर कित्येक वर्षापासून घरी जायचंय.

श्रेयस: म्हणजे? 

ऋतुजा: काही नाही भेटू उद्या बाय.

श्रेयस: बरं बाय.

(एवढंच बोलून दोघे आपले बोलणे संपवतात आणि फोन ठेवतात)


भाग 4:

कॉलेजच्या सेमिस्टर चा शेवटचा पेपर असतो पेपर झाल्यावर ऋतुजा आणि श्रेयस कॉलेज जवळ एकमेकांना भेटतात

श्रेयस : कसा होता मग पेपर? 

ऋतुजा : मस्त.

श्रेयस : मग काय ठरवलं घरी जाणार आहे की नाही दिवाळीच्या सुट्टीत? 

ऋतुजा : हो दोन दिवसानंतर जाईन.

श्रेयस: मी पण दोन दिवसांनी जाणार आहे रागवू नको पण तुझी काही हरकत नसेल तर एक सांगू का? 

ऋतुजा : हो बोल ना.

श्रेयस : तुझी हरकत नसेल तर आपण एकत्र जाऊया. 

ऋतुजा: बरं चालेल.

( दोन दिवसानंतर श्रेयस ऋतुजाची कॉलेज जवळ वाट बघत असतो त्याचा मनात तिच्याविषयी एक वेगळी जवळीक निर्माण झालेली असते त्याच्या भावना त्याला तिच्यापर्यंत पोहोचवायचा असतात म्हणून तो एकत्र प्रवास करण्याचे कारण शोधतो. नॉर्मल ट्रेन तिकीट न मिळाल्याने तो एसी ट्रेनचा कोच बुक करतो. ट्रेन यायला तीस मिनिट असतात तरी ऋतुजा आली नसते शेवटी न राहवून तिला फोन करतो, पण तिचा नंबर तेव्हा अस्तित्वात नाही असं समोरून बाईचा आवाज येतो तो चार-पाच वेळा कॉल करतो तरी तेच घडत, तेवढ्यात ऋतुजा समोर दिसते)

श्रेयस : नशीब आलीस मला वाटलं येतेस की नाही आणि किती कॉल केले तुला तुझा नंबर अस्तित्वात नाही असं कसं काय? 

ऋतुजा : अरे सांगितलं ना तुला फोन नको करू तरी का केलास? आणि माझा नंबर चा जरा प्रॉब्लेम आहे.

श्रेयस :बरं!

( तेवढ्यात ट्रेन येते दोघ ट्रेनमध्ये चढतात त्या दोघांचा एसीचा सेपरेट कोच असतो)

 श्रेयस :चलो फायनली चाललो घरी किती दिवसांनी. 

 ऋतुजा:हम्म (डायरी वाचत)

 श्रेयस: काय हम्म नुसतं तुम्हाला तुमच्या डायरीवर अधिकच प्रेम आहे वाटतं.

 ऋतुजा: हो त्यावरच माझं अस्तित्व आहे किती बरं झालं असतं ना तर डायरीतल्या प्रत्येक आठवणी पुन्हा जगता आल्या असत्या.

 श्रेयस: तुम्ही छान बोलता पण कधीकधी तुमच्या बोलण्याचा लॉजिकच लागत नाही.

 ऋतुजा : जाऊदे

( दोघेही ट्रेनमधून उतरतात, ऋतुजा चे घर स्टेशन जवळच असते श्रेयस तिला आपल्या भावना सांगायचा खूपदा प्रयत्न करतो पण त्याला काही जमत नाही, शेवटी ऋतुजाच घरी येत श्रेयस गेट वर सोडून स्वतःच्या घरी जायला निघतो तेव्हा ऋतुजा त्याला घरी येण्यासाठी आग्रह करते तो नाही नाही करत असतानाही फक्त ऋतुजाचा आग्रहासाठी घरी जातो, दरवाजाजवळ जातो बेल वाजवतो तेव्हा एक वयस्कर बाई दरवाजा उघडते)

वयस्कर बाई : कोण आपण? 


भाग 5:

(दरवाजा उघडल्यावर वयस्कर बाई दरवाजा समोर उभी असते)

श्रेयस: मी ऋतुजा चा मित्र आणि ऋतुजा ही काय? 

(श्रेयस इकडे तिकडे बघतो तर त्याचा आजूबाजूला कोणीच नसतं त्याला दोन मिनिटं काही कळतच नाही नक्की काय घडतय )

 वयस्कर बाई: काय? ऋतुजाचा मित्र हे कस शक्य आहे? 

 श्रेयस : नाही मी तिचा कॉलेजचा जुना मित्र आहे.( घाबरतच बोलतो)

( श्रेयसला काय बोलावं हे कळत नसतं शेवटी त्याला कसंतरी होत असत त्याच डोकं गरगरायला लागतं)

श्रेयस : मला जरा एक ग्लास पाणी मिळेल का? 

वयस्कर बाई : हा या ना आत. बसा.

(वयस्कर बाई पाणी आणायला जाते, श्रेयस सोफ्यावर बसलेला असतो, तेवढ्यात त्याची नजर समोर असलेल्या हार घातलेला फोटोवर जाते, आणि त्याला काय कराव सुचतच नाही, ती समोरची फ्रेम दुसरी तिसरी कोणाची नसून ऋतुजाची असते, तेवढ्यात त्या वयस्कर बाई पाणी घेऊन येतात)

 वयस्कर बाई: हे घ्या पाणी.

श्रेयस:हम्म. ऋतुजाचा फोटो आहे ना हा? हे कधी आणि कसं घडलं? 

वयस्कर बाई: पाच वर्षापूर्वी, आम्ही तिच्या हट्टासाठी शिवाजी कॉलेजला ऍडमिशन घेतले. तिच त्याच कॉलेजला जाऊन इंजिनिअर व्हायचं स्वप्न होत. असेच दिवाळीचे दिवस जवळ आले ती ही कॉलेजमध्ये छान रमली होती. तिने कॉल केला होता की आई मी उद्या घरी येते दिवाळीसाठी आणि त्याच रात्री तिने आत्महत्या केली आणि स्वतःला संपवल(रडत बोलत असते )

श्रेयस : असं का केलं असेल तिने? अशी नव्हती मला तरी वाटत.

वयस्कर बाई : असं काही करूच शकत नाही माझी मुलगी, राकेश पण असच बोलत होता.

श्रेयस : राकेश कोण आता? 

वयस्कर बाई: ऋतुजाच्या जवळचा मित्र कॉलेजचा सर्वात जवळचा, असे झाल्यावर त्याने आम्हाला सर्व सामान त्यानेच आणून दिल, तो कदाचित कॉलेजच्या ट्रस्टी चा मुलगा आहे पण त्याच्याकडे बघून असं वाटत नाही.

( ती वयस्कर बाई बोलत असताना श्रेयसला ऋतुजाच बोलणं आठवत माझं अस्तित्व माझ्या डायरीतच आहे, मी प्रत्येक दिवसाची आठवण त्या डायरीत मांडली आहे)

श्रेयस : बरं मला ऋतुजाची डायरी मिळेल का बघायला.

वयस्कर बाई: हो तिच्या खोलीत असेल त्या वस्तूमध्ये.

श्रेयस :आणि तिचा फोन. 

वयस्कर बाई :नाही मिळाला phone आम्हाला तेव्हा तिचा आणि तिच्या फोनच आम्ही काय करू? आमची मुलगीच आम्हाला सोडून गेली ( रडत रडत बोलते)

(श्रेयस ऋतुजा च्या रूम मध्ये जातो तीच्या खोलीत डायरी असते तिची डायरी श्रेयसला ड्रॉवरमध्ये सापडते श्रेयसला नक्की आपल्या सोबत इतके दिवस काय घडल हे शोधून काढायचं असतं ऋतुजा जर आधीच जिवंत नाही तर ती मलाच का दिसत होती इतके दिवस? तसा माझा तिचा काही संबंध नाही या प्रश्नांचा विचार करत करत श्रेयस रुमच्या बाहेर येतो)

 श्रेयस : मी डायरी घेऊन जातो आणि काही दिवसात परत आणून देतो.

 वयस्कर बाई: बरं चालेल.

( एवढे बोलून श्रेयस डायरी घेऊन घरी जायला निघतो)


भाग 6:

श्रेयस डायरी घेऊन घरी जातो व त्याला आता पर्यंत ऋतुजासोबत घडलेले प्रत्येक क्षण त्याला आठवत असतात, तेव्हा त्याला घडलेल्या सर्व गोष्टी जणू एकाद्या चित्रपटा सारख्या नजरेसमोर उभ्या राहतात. तो ऋतुजाला भेटलेल्या प्रत्येक क्षणापासून आतापर्यंत घडलेल्या गोष्टींचा उलगडा त्याच्या मनात होत असतो ऋतुजाशी वर्गातील एकही जण न बोलणे, श्रेयस ऋतूजाशी बोलत असताना त्याच्याकडे सर्वांनी वेगळ्या नजरेने बघणे, तिच सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह नसणं, तिचं डायरी विषयी वारंवार सांगणे, भविष्या पेक्षा भूतकाळाविषयी बोलणं, लॉजिक नसेलेल बोलणं, तिचा नंबर डायल केल्यावर हा नंबर अस्तित्वात नाही असं सांगणं. अगदी सगळं सगळं त्याला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटायला लागत, एखाद्या स्वप्नातून जाग व्हावं तसा तो ऋतुजाचा घराच्या दारातून जागा झाल्यासारखं त्याला वाटत होत. पण त्याला ऋतुजाच दिसण्या मागचं कारण काही केल्या त्याला कळत नव्हतं शेवटी न राहवून तो ऋतुजाची डायरी वाचायला सुरुवात करतो डायरीचा तो त्या पानावर येतो जिथे ऋतुजाचा कॉलेज ऍडमिशन झालेलं असत.


 (ऋतुजाची डायरी वाचताना)

आज मी खूप हैप्पी आहे आज मला माझ्या आवडत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, आज मला काहीतरी मौल्यवान मिळाल्यासारखा आनंद झाला होता, हळूहळू मी कॉलेजमध्ये रमायला लागले पहिलं थोडा अवघड वाटत होत पण नंतर राकेश च्या मैत्रीमुळे मी अगदी पटकन मिसळून गेले. राकेश खुप चांगला मुलगा आहे आणि त्याच्या स्वभावामुळे मी त्याच्यात गुंतायला लागली त्याच्याशी वाढती जवळीक, रोज भेटण, रात्रीच कॉल वर बोलन सगळं मस्त वाटायला लागलं त्यातच आता सेमिस्टर वन ला सुरवात झाली अभ्यासाच्या दिवसात फुल बिझी झालो. आता पेपर संपत आले शेवटचा फक्त एकच पेपर बाकी होता तो झाल्यावर कधी एकदा आई-बाबांना भेटते असं झालं होतं सकाळी आईला फोन केला आई उद्या येते दिवाळीसाठी मस्त फराळ आणि नाश्ता बनवून ठेव आई पण खुश झाली कॉलेजचा पेपर झाल्यावर मी राकेश ला भेटायला गेले त्याला न सांगताच गेले त्याला सरप्राईज द्यायल. तेवढ्यात कॉलेजच्या मागे मुलीची छेडछाड करताना जबरदस्ती करताना एक मुलगा दिसला मी त्याचा व्हिडिओ शूट केला

आणि माझा फोन मध्ये सेव्ह केला आणि अजून एका ठिकाणी पेनड्राईव्ह मध्ये माझ्या बॅगच्या आतल्या कप्प्यात ठेवला आहे. ह्या गोष्टीची चाहूल त्या मुलाला लागली आहे हे मला माहित आहे. पण ह्या गोष्टी त्याला कळल्यामुळे मी जिवंत राहील का नाही माहित नाही पण माझी डायरी त्याला नक्की शिक्षा मिळवून देईल

( एवढच वाचून श्रेयस डायरी वाचता वाचता थांबतो कारण डायरी वाचून संपलेली असते


भाग 7:

श्रेयस दिवाळीची सुट्टी झाल्यावर कॉलेज ला जायच्या आधी ऋतुजाच्या घरी जातो आणि ऋतुजाच्या बॅग मधला पेनड्राईव्ह स्वतः जवळ घेतो. कॉलेज ला त्याच्या आफ्टर सेमिस्टर ची एक छोटी पार्टी आयोजित केलेली असते. सर्वजण त्या पार्टीच्या परफॉर्न्स च्या तयारीत असतात. पण श्रेयस मात्र त्या पेनड्राईव्ह मध्ये काय असेल ह्याच विचारात असतो. शेवटी तो कॉलेज ला जातो आणि हॉस्टेल वर जाऊन ल्यापटॉप वर पेनड्राईव्ह चेक करतो आणि त्यातला विडिओ सुरु करतो तेव्हा त्या विडिओ मधला मुलगा एका मुलीची छेडछाड करताना जबरदस्ती करताना दिसतो. तो विडिओ बघून लॅपटॉप बंद करतो आणि कॉलेज च्या पार्टीच्या तयारीला जात असतो तेव्हा त्याची नजर कॉलेज मधल्या बॅनर वर जाते तेव्हा त्याला दोन मिनिट स्वतःच्या डोळयांवर विश्वास बसत नाही, तेव्हा तो ही विडिओ आज पार्टीत सगळ्यांसमोर लावायची असा विचार करतो हे सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे असं ठरवतो. संध्याकाळी पार्टीला सगळेच जमलेले असतात सगळे विद्यार्थी आपले आपले परफॉर्मन्स करतात शेवटी श्रेयस चा नंबर येतो. तेव्हा तो सांगतो सत्य हे सगळ्यांसमोर आलाच पाहिजे म्हणून मी एक विडिओ तुमच्यासमोर सादर करतो, ती ऋतुजानी शूट केलेली विडिओ बघून सगळ्यांची नजर खिळून जाते, आणि त्या विडिओ मधला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून पार्टीला आलेले प्रमुख पाहुणे ट्रस्टींचा मुलगा राकेश इनामदार असतो. श्रेयस ने पोलिसांना आधीच बोलावले असते. तेव्हा राकेश घाबरून आपला गुन्हा कबूल करतो, हो मीच मारलंय ऋतुजाला कारण तिला माझ्या मुलींच्या बाबतीतलं वागणं कळलं होत आणि तिच्याकडे माझ्या विरोधात पुरावाही होता. तिला मी पुरावा मागितला तर तिने नकार दिला मी रागाच्या भरात तिला गळा दाबून मारलं आणि सुसाईड दाखवलं, पाप्पा माझे कॉलेज चे ट्रस्टी असल्याने केस क्लोज झाली आणि तिच्या फोन मधील पुरावा डिलिट केला आणि फोन फेकून दिला, तेव्हा श्रेयस बोलला अरे ती तुझ्यावर प्रेम करत होती तू तिच्या प्रेमाला काळिमा फासली एवढ बोलून राकेशला पोलीस घेऊन जातात. तेवढ्यात श्रेयस ला लांबून ऋतुजा गोड स्माईल करून गायब होते तेव्हा श्रेयस मनात बोलतो (आय लव्ह माय घोस्ट गर्लफ्रेंड)

.....समाप्त.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror