माणसातील भुते
माणसातील भुते
वाट चालत जात होतो. एकाला आम्ही सातजण होतो.त्यातच पौर्णिमेची भयाण रात्र होती. भरती समुद्राला खूप होती. लाटांवर लाटा उसळत होत्या.
आम्ही सर्व भरतीमुळे फेकलो जायचो, आत जायचो असं छान सुरू होतं. मज्जा वाटत होती लाटांची, वाऱ्याची, समुद्राच्या गाजची. बाहेर येऊन पुन्हा एकामागून एक आत खेचले गेलो. कोणीतरी ताकतिनं खेचत आहे का ओढत आहे काहीच कळलं नाही. थोड्या वेळात आम्ही सारे एका भयानक जागेत फेकलो गेलो. तिथं मानवी कवट्या, हाड पिंजर, आग आणि असं बरच काही..........
तोंडातून शब्द निघत नव्हता.पाणी असून तोंडाला कोरड पडली. हळूहळू आमच्यातले सर्व गायब होत चालली आणि अंधाऱ्या ठिकाणी फेकली जाऊ लागली. भितीदायक चेहरे, हात पाय असून नसल्यासारखे केस भयानक, उंच उंच वाटत होती.
....................तेवढ्यात आमच्यातल्या एकाच्या मोबाईल वर रेंज आली आणि त्याने सायरेन चा आवाज काढला, खूप पळत पळत आम्ही बाहेर आलो
बाहेर येऊन बघतो तर काय? अरे या जागेत एवढा उजेड? सायरन च्या आवाजामुळे का काय माहित नाही, पण..,..अनेक गाड्या थांबल्या आणि या सर्व गाड्यांमुळे माणसातली भुते पकडली.
.........माणसांचं मासं खाणारी भुतं पकडली, त्यास शिक्षा मिळाली आणि त्यांची रवानगी सुधारगृहातुन समुपदेशक कडे केली आणि तीच माणसातली भुते पुण्यकर्माला लागली.

