STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Horror

3  

Kshitija Kulkarni

Horror

क्रूर मानसिकता

क्रूर मानसिकता

1 min
233

आज बरेच दिवसांनी गावाकड जायचं आणि मनसोक्त राहायचं असं ठरवलं. दुपारी निघायचं अस ठरलं.


  गावातल्या निसर्गाची, माणसांची,असलेल्या नसलेल्या आडनावांची, रात्रीच्या गस्तीची, थंडीतल्या शेकोटीची अश्या बऱ्याच आठवणींची साठवण मनात होती. तसा उशीरच झाला निघायला......... वळण वेडी वाकडी, दाट झाडी, हिरवा निसर्ग, मोकळं आकाश आणि लगेचच दाटून आलेला अंधार यामुळे जीव कंटाळलेला, रस्ता कधी संपतो असं विचारात असतानाच अचानक थोड पोहच्यायच्या अंतरावर दृश्यरुपात पांढरी काहीशी चादर ओढेल्या सारखी कोणीतरी होतं........

उतरणार इतक्यात खूपच भयानक विचित्र किंकाळ्या येऊन, एकाबरोबर अनेकजण बाजूने पळत होते, गायब होत होते, थांबत होते, काचेवर आपटून जात होते. काय करावं आम्हाला काही सुचेना.

  डोळे भयानक, दात काहीच दिसत नव्हते, सावल्यानावर सावल्या पडत होत्या, पळत होत्या.

  इतक्यात माझ्या मुलाला सुचलं म्हणाला.  बाबा मी लोकेशन सुरू करतो इथल्या पोलिस चौकीचा नंबर घेवून आपलं लोकेशन पाठवून त्वरित मदत मागतो.

  हे सर्व होईपर्यंत कुणाच्याच जीवात जीव न्हवता. पोलिस गाडी आल्यावर हुश्श वाटल, आणि आमच्या गाडीच दार उघडलं.

 त्या सर्व पांढऱ्या सावल्या पळताना थांबल्या त्यांच्यावरचा सदरा बाजूस स्त्याच माणसात आल्या आणि गयावया करायला.

  त्यांच्या या कृती मागचं कारण भलतचं होत. जे गावातल मनुष्य पहिल्यांदाच गावात येईल त्याचा बळी द्यायचा म्हणजे गावातली सुखी राहतील असा या मूर्ख पांढऱ्या सदऱ्या मागचा हिशोब होता. 

 अशा क्रूर मानसिकतेमुळे किती बळी गेले असतील ..........

 पण वेळीच सतर्कतेमुळे सारे पकडले आणि गावावरचे संकट टळले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror