STORYMIRROR

Surekha Nandardhane

Tragedy

3  

Surekha Nandardhane

Tragedy

लव्ह बर्ड

लव्ह बर्ड

3 mins
214

  रिना आईशी फोनवर बोलत होती . " आई . मी काय सांगू ग आजकाल शिळ्या कडीला पण उत आलाय ".

माझे सासरे निवृत्त झाल्यापासून दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्या सारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात .आपल्या डोक्यावरचे पिकलेले केस बघून तर वागायचे ना ! एखाद्या तरुण जोडप्यासारखे वागतात ."


      तेवढ्यात रिनाने पाठीमागे बघितले तर तिथे सासूबाई ऊभ्या होत्या . त्यांनी आपल्या सुनेचे बोलणे ऐकले पण त्याकडे दुर्लक्ष करत एकही शब्द न बोलता त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या. थोड्या वेळाने शांतपणे सुनेला रूममध्ये चहा घेऊन गेली .

  " अग सुनबाई चहा घे ".

 रिनाने तोंड मुरकडत त्यांच्या हातून चहा घेतला .

      आपली सुन आपल्याला बघुन तोंड वेडेवाकडे करते व टोमनेही मारते हे त्यांना कळत होते . पण घरात वाद न घालता होईल तितके काम त्या करत . व दुपारी दोघेही गार्डन मध्ये बसून गप्पा करत आपला वेळ घालवत असे .

      "शीतल निवास " असा मोठा बंगला होता अशोकराव व प्रभाताई यांच्या मेहनतीने बांधलेला . घराच्या समोर प्रभाताई ने एक छोटीशी बाग तयार केली . मोगरा .चाफा . गुलाब . जास्वंद अशी कितीतरी फुलझाडे लावली ऐका छोटया टाकीत कमळही फुलले होते .

तसेच स्वयंपाक घरात लागणारी ताजी भाजी कोथिंबीर पुदिना . मेथी स्वतःच्या बागेतली असायची . तिथेच त्यांनी एक झोपाळा बसून घेतला होता .


    ईतके वर्ष कामाच्या गडबडीत अशोक रावांना या बागेचा आनंद घेता नाही आला .

  पण आता मिळालेला सर्व मोकळा वेळ या बागेत झोपाळ्यावर बसून घालवायचे . त्या दोघांना मिळालेले आरामाचे क्षण सोबत घालवायचे होते . घरात सर्व सुविधा होत्या तरीही सुनेला त्यांच वागणं खटकायचं . त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे .

 आयुष्यभर त्यांनी मुलगा नितीन साठी खुप खस्ता खाल्ल्या होत्या त्यामुळे आयुष्याची संध्याकाळ रोज बागेत सोबत घालवायची असे ठरविले.बाग व झोपाळा हटविण्यासाठी एक दिवस रिनाने युक्ती केली . आपण मोठी कार खरेदी करायची असे नितीनला सुचविले .

  कल्पना छान आहे ग . पण गाडी ठेवायला जागा नाही .

  जागा का नाही ! ती बाग आहे ना जिथे आजकाल दोन लव्ह बर्ड बसतात .

   तू जरा जास्तच बोलते म्हणून नितीन रिणावर चिडला . पण याबद्दल आपण बाबांशी बोलू असे ठरविले .


    दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नितीन वडिलांकडे गेला .

   " बाबा मला एक कार घ्यायची आहे ."


 पण बेटा आधी घरी एक गाडी आहे दुसरी गाडी घेतली तर ठेवणार कुठे ?


  बाबा . आई किती दिवस या झाडांची काळजी घेणार त्यापेक्षा ही झाडं तोडून इथे एक गँरेज काढू .

  हे ऐकून प्रभाताईचे डोळे भरून आले . अशोकराव ने रागावर नियंत्रण ठेवत बोलले . मला थोडा वेळ दे मला तुझ्या आईशी बोलावं लागेल .


  " काय बाबा . आईला काय विचारायचे त्यात या बागेचा काय उपयोग . तुम्हाला काही काम नाही दिवसभर इथं झोपाळ्यावर डुलता . आपण म्हातारे झालो चार लोकं काय म्हणतील याचा विचारही करत नाही .

  असं वागायला पटत का तुम्हाला !


 नितीन चे हे बोलणे त्यांच्या मनाला लागले त्यामुळे त्यांच्या घशाखाली दोन घास ही उतरले नाही व दोघांना रात्रभर झोप ही लागली नाही .

   सकाळी उठल्यावर अशोक रावांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले होते . त्यांनी स्वतः स्वयंपाक घरात जाऊन चहा बनविला व उदास असलेल्या प्रभाताईला चहा नेऊन दिला .

  दिवसभर सर्व शांत होते व संध्याकाळी  " घर भाड्याने देणे आहे " असा बोर्ड लावलेला पाहून नितीन चिडला .

   बाबा . हे काय चाललं घर मोठे आहे मान्य आहे पण हे काय ?


   पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफ मधले कुलकर्णी रिटायर्ड होत आहे . तेव्हा ते या घरात राहतील. त्यांनी शांतपणे उत्तर दिले .

  पण कुठे ?


 तुमच्या भागात अशोकरावने उत्तर दिले


 आणि आम्ही !

   तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम बनविले मी ! दोन तीन महिन्यात तुम्ही दुसरा फ्लॅट बघा किंवा कंपनीच्या फ्लॅट मध्ये जा जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल .

     आणि आम्ही दोघं आमच्या वयाच्या लोकांसोबत राहू 

आमचं संपूर्ण आयुष्य तुमची काळजी करण्यात गेलं आणि तुम्ही शहाणपणाचे धडे शिकवू लागले हेच बाकी राहिलं होतं.

  बाबा मला असे म्हणायचे नव्हते .

 नाही बेटा तुमच्या पिढीने आम्हाला व्यवहारिक होण्याचा धडा दिला . आम्ही आम्ही आनंदी असल्याचा तुम्हाला त्रास होतो . पण आमच्या आनंदाच्या हक्काचा कोपरा हिसकवण्याचा अधिकार कोणालाही नाही . 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy