Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Amruta Salunkhe

Inspirational Others


3.7  

Amruta Salunkhe

Inspirational Others


लॉकडाउनमधली काकडी

लॉकडाउनमधली काकडी

2 mins 188 2 mins 188

lockdown मुळे सर्वत्र आठवडी-बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला अक्षरशः सडून जात होता. त्यामुळे आणखी नुकसान नको म्हणून साधारणतः एक २-३ आठवड्यांपूर्वी दारावरती एक छोटासा टेम्पो भरून काकड्या विकायला काही १-२ शेतकरी आले होते. हिरव्यागार मोठ्या-मोठ्या काकड्या बघून अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं होतं. बाबांनी जवळपास ७ ते ८ किलो काकड्या विकत घेतल्याचं मी दारातूनचं पाहिलं. कोवळ्या-लुसलुशीत-हिरव्यागार काकड्या बघून मोह आवरलाच नाही. लगेच थोड्याशा काकड्यांवर तिखट-मीठ भुरभूरुन पोटभर खाल्ल्या.

        

थोड्यावेळाने बाबांना सहज विचारलं - कशी किलो काकडी? बाबा म्हणाले याssss सगळ्याsssssss काकड्या केवळ २० रुपयांच्या. उत्तर ऐकल्यावर सुरुवातीला गोड लागलेली काकडी नंतर मात्र कडू वाटली.


म्हणजे ज्याला आपण "बळीराजा" म्हणतो आज त्यालाच स्वत:च्याचं पोटापाण्यासाठी लोकांच्या दारोदारी जाऊन मालाची विक्री करावी लागतेय. आणि मोबदला किती तर केवळ २० रुपये!!!!!! विचार करण्यासारखी गोष्ट आहे.


आज जो पिकवतोय, तो योग्य मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहे.

आज ज्याच्यामुळे आपल्या नशिबी पोट भरेल एवढे धान्य आहे, त्याच्या नशिबात मात्र उपासमारच आहे.

जमिनीच्या भेगा भरून निघतील ओ मायबाप, पण या  बळीराजाच्या नशिबाला पडलेले तडे कसे आणि कधी भरून निघतील???

आपण bday celebration  वा इतर family function  अगदी मनसोक्त enjoy करत आहोत. (अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.) मात्र बळीराजाची मुलं याहीपेक्षा कमी अपेक्षा ठेवून -- "आज तरी चांगले दिवस येतील, आज तरी पुढ्यातलं ताट भाकरीनं भरून निघेल, आज तरी घरावरचं छप्पर भक्कम होईल, आज तरी..." या आशेने नशीब बदलण्याकडे आस लावून बसले आहेत.


रंतर, आपल्याला आजतागायत जो जगवत आला आहे, तोच आज स्वतःच्या कष्टानं उगवलेलं, "सोनं" अगतिक होऊन कवडीमोल भावानं विकत आहे.


अशावेळी प्रश्न पडतो -- यावर आपण काय करावे??? फार काही नाही. सध्या आपण आपले "bargaining skill" बाजूला ठेवले तर? मला सांगा ----- मॉलमध्ये गेल्यावर आपण करतो का bargaining??? नाही ना???  का तर तिथे म्हणे branded वस्तू असतात. जर तिथे आपण brand बघतो तर मग हीच सवय जर आपण शेतकऱ्यांच्या बाबतीतही दाखवली तर???? जरा त्यांचाही  brand  वाढेल ना, हरकत काय आहे ???

         

लॉकडाउनमधल्या या काकडीने एक प्रश्न चांगलाच उपस्थित केला तो म्हणजे या एवढ्याशा पैशांत त्या शेतकऱ्यांचा बियाणांचा खर्च तरी वसूल झाला असेल का???


आपण धडपडतोय ते आपल्याच घरातून बाहेर पडण्यासाठी, तर शेतकरी धडपडतोय ते आहे तेच घर भक्कम करण्यासाठी.

आपण धडपडतोय ते बाहेर जाऊन hotel's मधील चमचमीत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी, तर शेतकरी धडपडतोय ते आपल्या मुलांच्या ताटातील आणखी एक भाकरीचा तुकडा वाढवण्यासाठी.

सध्या आपण स्वप्न बघतोय ते lockdown नंतर काय-काय करायचं त्याची, पण शेतकरी स्वप्न बघतोय ते अपार कष्टांनी उगवलेल्या सोन्याला कवडीमोल नाही तर चांगला भाव मिळण्याची.

ध्या आपण विचार करतोय ते lockdown नंतर admissions कुठे घ्यायचं, कधी घ्यायचं वगैरे वगैरे, पण शेतकरी विचार करतोय यावेळी काहीही करून मुलांना शाळेत घालायचंच आणि त्यासाठी वाट्टेल तेवढ्या टाचा झिजवून पैसे मिळवायचेच.                          

 

"किती फरक आणि किती अजब आहे ना???" 


आपण -- जिथे lockdown मुळे तरी का होईना पण एकत्र आलेली आपलीच माणसं आपल्यात असूनही, सर्व समाधानयुक्त सुखसोयी असूनही आपल्याला आपल्याच घरातून बाहेर पडावंसं वाटतंय.

तर तिकडे शेतकरी -- जो आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत या जाणिवेने - या कळकळीने - या तळमळीने जीवाची पर्वा न करता थोडंसं सुख आणि थोडंसं समाधान शोधू पाहतोय...


चला तर मग माझ्या विचारशील वाचकहो, एक पाऊल आपण पुढे टाकूया--- "हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे,  माणसाने माणसाशी माणसासम वागणे."


Rate this content
Log in

More marathi story from Amruta Salunkhe

Similar marathi story from Inspirational