Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Amruta Salunkhe

Tragedy

3.5  

Amruta Salunkhe

Tragedy

गुरूपौर्णिमा एकच दिवस???

गुरूपौर्णिमा एकच दिवस???

2 mins
130


         खरंतर, "गुरूपौर्णिमा" हा दिवस केवळ एका    ‍   दिवसापुरता मर्यादित नाही. ९ महिने आईच्या उदरात असताना तिने शिकवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, जन्मल्यानंतर बाबांनी हाताला धरून चालायला शिकवण्यापासून ----- ते ----- स्वत:च्या पायावर उभे करण्यापर्यंत शिकवलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी आणि यामध्ये तेवढिचं किंबहुना त्याहिपेक्षा (1 level up) महत्त्वाची भूमिका निभावणारे आपले शालेय जीवनातले गुरूजन - यांनी शिकवलेल्या उपयुक्त गोष्टी, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला कस तोंड द्यायचं,  कोणती गोष्ट कशी  handle करायची, मग ते अगदी  managing------पासून-----controlling पर्यंतचे ज्ञान या संपूर्ण अमूल्य ठेव्याला शत: शत: नमन🙏.           दुर्दैव म्हणजे " नमन " करण्यासाठी केवळ एकचं दिवस आहे का????  आपल्या प्रत्येक कृतीतून, शब्दातून, वागण्यातून जेव्हा हि शिकवण आणि हे ज्ञान योग्य पद्धतीने प्रत्यक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवस - प्रत्येक क्षण गुरूपौर्णिमा असेल.                              ‍         ज्यादिवशी आई-वडिलांना, गुरूजनांना आपल्या नावाने ओळखले जाईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने त्यांना  "गुरूदक्षिणा मिळाल्याचं आणि आपल्याला गुरूदक्षिणा दिल्याचं समाधान मिळेल".                                माणूस म्हणून आपण ह्रास करत असलेल्या,  पण तरीही त्याचं मानवावर भरभरून प्रेम करणाऱ्या आणि तेवढंच आपल्या उदरातून सर्व काही बहाल करणाऱ्या आणि आपल्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या "निसर्ग गुरूला" हि कोटी कोटी प्रणाम🙏. हाचं निसर्ग गुरू अनेक नैसर्गिक आपत्तीतून उद्दाम मानवाला अजूनही खूप काही शिकवू पाहत आहे, पण मानव मात्र आपल्याचं lifestyle मध्ये व्यस्त आहे🤷.                                                या सर्व वास्तविक गुरूंप्रती आदर आहेचं. पण   वास्तवाचे दर्शन घडवणारा आणखी एक गुरू म्हणजे "परिस्थिती" जी ना कोणत्या पुस्तकातून शिकता येते,, ना कोठे ready made वाचायला मिळते,,,  तर ती बदलत जाणाऱ्या वेळेनुसार अनुभवता येते. यातूनचं आपल्याला आपले कोण? आणि परके कोण? यातील फरक कळतो. संकट आल्यावर ज्याला आपण आपले म्हणतो ते मदतीसाठी धावून येतात की मजा पाहतात याची जाणीव करून देणाऱ्या "परिस्थिती या आभासी गुरूला" विसरून कसे चालेल???                     परिस्थितीला जोड वेळेची. माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक वेळ हि त्याला खूप काही शिकायला भाग पाडतेचं. फक्त गरज असते ती ओळखण्याची.                   गुरू म्हणजे केवळ हाडा-मासाचा माणूसचं नव्हे, तर जिथे प्रत्यक्ष पाहता येत नाही, मात्र विचारांची कक्षा थोडीशी रूंदावली त्या आभासी गुरूची अनुभूती येतेेचं.             तेव्हा,                                          "गुरू या अमृततुल्य विश्वाला कोटी-कोटी प्रणाम"🙏🙏.


Rate this content
Log in

More marathi story from Amruta Salunkhe

Similar marathi story from Tragedy