Amruta Salunkhe

Others

3.6  

Amruta Salunkhe

Others

जगण्याला अर्थ दिला

जगण्याला अर्थ दिला

5 mins
114


         जगातील प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस राबत असते, झटत असते ती “पैशासाठी”. एक दमडी मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करते. आणि हळूहळू सर्व काही साध्य हि करते. मात्र माहित नाही का? कशासाठी?? हाचं पैसा तीचं व्यक्ती अगदी एका दिवसात शून्यावर नेऊन ठेवते!

         

हल्ली लग्नसमारंभ एवढी प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे, की आयुष्यभराची सगळी पूंजी त्या एका दिवसातचं रिकामी केली जाते. पण हा असा थाटमाट, बडेजाव, दिखावा करण्यात अशी कोणती धन्यता वा कोणते समाधान मिळते, हे त्यांनाच ठाऊक!! पण निसर्ग नियमाप्रमाणे ऋतूचक्र बदलतं तशी परिस्थिती आणि वेळही बदलते. जी गोष्ट माणसाला अनेक उपदेश देऊनही समजत नाही, तीचं गोष्ट ‘बदलणारी वेळ आणि परिस्थिती’ मात्र नक्कीचं शिकवते. जे या (लॉकडाऊनने) संचारबंदीने खरे करून दाखवले. बघा ना विचार, करण्यासारखी गोष्ट आहे - जी लग्ननमारंंभ लाखो रुपयांमध्ये होत होती, आज तीचं काही हजारांत पार पाडली जात आहेत. मग हि हजारांपासून----ते----लाखो रूपयांपर्यंतची दरमजल का?? आणि कशासाठी??? केवळ मानसिक समाधान म्हणून जर याचं केविलवाणं उत्तर असेल तर माणूस म्हणून आपण ना श्रेष्ठ ठरतो ना कनिष्ठ. या लॉकडाऊनमुळे एक गोष्ट मात्र अगदीचं उमगली, समारंभ कोणताही असो तो जर आपल्या माणसांसोबत असेल तर तिथे ना थाटमाटाची गरज पडते ना लाखो रुपयांची.

        

एकवेळ हाताशी पैसा कमी असला तरी चालेल, पण पोटाला अन्नाची गरज लागतेचं. खाज उठणाऱ्या हाताला गप्प करता येईल ओsss,,,,,,,,,पण पोटात लागलेल्या वणव्याला भाकरीच्या तुकड्याशिवाय कसे शांत करता येईल??? पण म्हणतात ना, ज्याला सहज अन्न मिळते त्याला अन्नाची किंमत नसते. मात्र लॉकडाऊनमुळे आज तेही कळू लागले आहे.अनेक सणसमारंभ, कार्यक्रमांमध्ये आपण गरजेपेक्षा नेहमी जरा जास्तच अन्न घेतो, माणूसचं तो! आणि तेवढेचं फेकूनही देतो. परंतु, आता संचारबंदीमुळे घरात आहे त्यातचं आपण काटकसर करून भुकेपुरतचं अन्न वापरून दिवस काढतचं आहोत ना? रस्त्यावरच्या, झोपडपट्टीतल्या मुला-बाळांचे भूकेविना, अन्नाविना झालेले हाल पाहिल्यावर कळतं, खरंच आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीत जे आणि जेवढं आहे, तेवढं पुष्कळ आहे.                


लॉकडाऊनपूर्वी अन्नाची आपल्याकडून झालेली नासाडी आणि आता आपल्याकडूनचं होत असलेला गरजेपुरता वापर यातील तफावत पाहिली तर माणूस म्हणून स्वतःची स्वतःलाचं लाज वाटते. आज अन्नधान्यातील प्रत्येक गोष्ट आपण अगदी काळजीपूर्वक विशेषतः जाणीवपूर्वक वापरत आहोत. मात्र हेचं जर आपण आधीपासूनचं केले असते तर,,,,, तर आज दारोदारी अन्नासाठी भटकणाऱ्या रस्त्यावरच्या आणि झोपडपट्टीतल्या लोकांना अन्नासाठी असे वंचित राहावे लागले नसते, नाही का? परंतु, आता या गोष्टीची जाणीव अनेकांना झालीचं असेल. बुद्धीच्या जोरावर जगाला कवेत घेणारा माणूस स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी गावापासून - घरापासून दूर जाऊन स्थिर होत आहे, किंबहुना स्थिरावला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे नजरेच्या पल्याड असणाऱ्या याचं माणसाला पुन्हा एकदा आपल्या घरट्यात आणून सोडले आहे. थोडक्यात काय, तर जिथून प्रवास सुरू केला होता आज तिथेचं आणून सोडले आहे. ‘प्रगती केवळ शहरात राहूनचं केली जातेया कडव्या विचाराला फाटा पडला तो याचं संचारबंदीमुळे. लॉकडाऊनमुळे आज अनेकजण शेतीकडे प्रगतीच्या दृष्टीने, एका नव्या विचाराने पाहत आहेत. लॉकडाऊनपूर्वी जी शेती आपण केवळ photo's च्या माध्यमातून पाहत होतो आज तीचं शेती आपण शेताच्या बांधावरून फेरफटका मारून जवळून अनुभवत आहोत. शहरात झगमगते शहरी जीवन, शहरी lifestyle जरी असली, तरी गावातही प्रगतीचे बीज आहे याची नव्याने जाणीव झाली.

     

* लॉकडाऊनपूर्वी - जिथे आपण लाखात समारंभ करत होतो, आज तिथेचं काही हजारांत पार पाडत आहोत.

     * लॉकडाऊनपूर्वी - जिथे आपण गरजेव्यतिरीक्त चैनीच्या-मौजमजेच्या वस्तूंवर अवाजवी खर्च करत होतो, आज तिथेचं विनाकारण खर्चांना फाटा मारून गरजेच्याचं गोष्टींना प्राधान्य देत आहोत.

    * लॉकडाऊनपूर्वी - जिथे आपण भूकेपेक्षा अधिक अन्न घेऊन “बास झालं आता” असं म्हणून अपव्यय करत होतो, आज तिथेचं पोटाची भूक भागविण्या इतकेचं ताटात अन्न घेत आहोत.

    * लॉकडाऊनपूर्वी - जिथे आपण केवळ एक routine म्हणून दिवस ढकलत होतो, आज तिथेचं प्रत्येक दिवशी काहितरी वेगळं करू पाहत आहोत, जगण्याच्या एकसारख्या साच्याला वेगळा आकार देऊ पाहत आहोत.

   * लॉकडाऊनपूर्वी - जिथे जगणं म्हणजे केवळ एक वलय झालं होतं जे आपणचं आपल्याभोवती निर्माण केलं होतं. मात्र, आज तिथेचं तेचं वलय बाजूला करून प्रत्येकजण जगण्याचा एक वेगळा पैलू शोधत आहे.

लॉकडाऊनने एक मात्र शिकवले,

     

   खरंतर छोट्या छोट्या गोष्टींतून हि समाधान मिळवता येते, ज्यासाठी माणूस रात्रंदिवस धडपडत असतो. स्वत:जवळ महागड्या-शोभेच्या-मौजमजेच्या वस्तू असणे म्हणजे जीवन नव्हे, तर आपल्या लोकांत राहून एकमेकांचं सुखदुःख वाटून घेण्यात जीवन आहे. माणसाला आवश्यक असलेला विकासाचा ठेवा केवळ शहरातचं नाही तर गावांतही आहे, याची खऱ्या अर्थाने समज आली ती या संचारबंदीमुळे. केवळ electronic gadgets मधूनचं आनंद मिळवता येतो असे नाही, तर आपल्या भेटीसाठी आसुसलेल्या आपल्या माणसांसोबत राहून, त्यांच्यासोबत गुजगोष्टी करूनही आनंद मिळवता येतो. आपल्या सोबत असलेल्या आपल्या माणसांना आपल्याजवळ चार शब्द बोलायचे आहेत, व्यक्त व्हायचे आहे याची जाणीव झाली. महत्त्वाचे म्हणजे चार भिंतींच्या आत आपण आपल्या मुलांसोबत एकत्र तर राहत होतो, पण संवाद कमी होता, जो आता हळूहळू वाढत आहे.

    

    या लॉकडाऊनमुळे अन्न, पैसा, रोजीरोटी मिळवण्याचे अनेक मार्ग बंद झाले खरे! पण यातही जमेची बाजू म्हणजे -- माणसाला कळून चुकले आहे, की संचारबंदीपूर्वी श्रद्धा-अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन दगडातल्या मूर्तींवर लाखो-करोडो रूपये दान केले जात होते, आज तेचं टाळेबंद आहेत. “मला हे मिळू देत आणि माझं अमूक एक काम होऊ देत” अशी दया-याचना ज्याच्या पायाजवळ आपण करत होतो, आज तो कर्ताकर्विता गाभाऱ्यात बंदिस्त आहे. बघा ना, संकट येण्याआधी दगडातला देव खुला होता, जो आता बंदिस्त आहे. आणि, लॉकडाऊनपूर्वी जीव वाचवणाऱ्या ज्या हाडा-मासातल्या देवावर आपण हात उचलत होतो, किंबहुना आजही तेचं करत आहोत. आज तेचं रात्रंदिवस एक करून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठीचं झटत आहेत - ते इतर कोणी नाही, तर डॉक्टरचं आहेत.

    

    अनेकदा आपण आपले आदर्श असे ठेवतो ज्यांची social work ची शाळा केवळ त्यांच्या गरजेनुसार-सोयीनुसार प्रसिद्धीसाठीचं कार्यरत असते. जी सध्याच्या परिस्थितीत कोठे गायब झाली आहे, माहित नाही!

    

    या संचारबंदीने - आदर्श असावे, पण कोण? याची चांगलीचं बोलकी उदाहरणे समोर आणली. आज आपल्यासाठी प्रत्येक क्षण जीव मुठीत घेऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत ते डॉक्टर्स, नर्सेस, स्वयंसेवक, आशासेविका, चालक, पोलिस विभाग - ज्यांच्यावर जराही विचार न करता आपण सर्रास हात उचलतो. आपल्याचं काळजीपोटी हातात काठी घेऊन बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसमामांना विसरून कसे चालेल? यांनी काठी उचलली तर तो पब्लिक स्टंट  म्हणून काही सेकंदातचं जाहीर केला जातो. पण ती काठी उचलण्याची वेळ त्यांच्यावर का आली?, याचा मात्र आपण विचारचं करत नाही!

    

   खरंच, या संचारबंदीने जगण्याला खऱ्या अर्थाने अर्थ दिला. देव दगडात नाही, तर २४ तास मदतीसाठी तत्पर असणाऱ्या या सर्व योद्ध्यांत आहे. माणूस म्हणून आपण आता यापुढे तरी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींना किती महत्त्व दिले पाहिजे, याचा पूरेपूर विचार करणे गरजेचे आहे. 

 म्हणूनचं---

       “लॉकडाऊनने जगण्याला अर्थ दिला,

     पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे याचा धडा दिला,

विकास शहरातचं नव्हे,तर गावांतही आहे याचा मार्ग दिला,

 कशास प्राधान्य द्यावे आणि कशास नको याचा मंत्र दिला,

          अवाजवी खर्चांना फाटा दिला,

       सवय आणि काटकसरीचा उपदेश दिला,

   मौजमजेच्या-चैनीच्या वस्तूंना चांगलाचं लगाम दिला,

   उद्दाम माणसाला खऱ्या अर्थाने बचतीचा पाठ दिला,

   खरंच, लॉकडाऊनने जगण्याला खऱ्या अर्थाने अर्थ दिला.”


Rate this content
Log in