Jagruti Nikhare

Classics

3  

Jagruti Nikhare

Classics

ललित

ललित

1 min
186


     आज संध्याकाळी बागेत गेले होते फिरायला! बागेत फिरणे म्हणजे रंगीबेरंगी फुलांचे फुललेले ताटवे, त्यांचे सौंदर्य पहाता, पहाता बागेतील फिरण्यासाठी केलेल्या छोट्या रस्त्यांवरुन फिरणे. खेळणारी बालके,लुटुपुटीची भांडणे,घसरगुंडी,झोका असे बरेच खेळ खेळणारी गोड गोड बाळगोपाळ मंडळी!


      आठवत गेले रम्य बाल्य, ते पाहतांना! असाच झोका खेळत असायचो आम्ही..कधी धपकन पडायचो..लागायचे पण उठून पुन्हा..झोक्यावर बसून धुळीत पावले टेकून झोके घ्यायचे,खूप धुळवड उडायची ..पण झोका उंच उंच झुलायचा.बाल्य संपले मग तारुण्याचा झोका उंच उडू लागला, भविष्याची स्वप्ने रंगवत.उच्च शिक्षण,भरपूर पगाराची नोकरी आणि नंतर आपल्यापेक्षा जास्त शिकलेला किंवा तेवढाच शिकलेला जोडीदार! झोका उंच उंच उडतच गेला. मनाजोगते सर्व कांही मिळत गेले. कधी झोका परिस्थितीच्या कचाट्यात अडकला आणि त्यावरुन आम्ही पडलोही.. खरचटले, खोका पडल्या पण सावरत गेलो आणि पुन्हा त्या उंच झुल्यावर झुलत राहिलो.

सुखाचा हिंदोळा शेवटपर्यंत झुलत राहिलो.पुन्हा न पडण्यासाठी..


Rate this content
Log in

More marathi story from Jagruti Nikhare

Similar marathi story from Classics