Nilesh Bamne

Romance

2  

Nilesh Bamne

Romance

लबाड पुरूष...

लबाड पुरूष...

15 mins
2.2K


प्रतिभा आणि विजयच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यातील संवादही वाढला होता. तो संवाद आता फक्त व्यक्तीगत पातलीपुरता मर्यादीत न राहता सामाजिक जाणिवेपर्यत पोहचला होता. प्रतिभान शेवटी एक दिवस हिंमत करून बरेच दिवस तिच्या मनात घोळणारा प्रश्न विजयला विचारलाच की त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी कोणी भेटलीच नाही ? की तुला प्रेमविवाहच करायचा होता ? की तुझा विवाह्संस्थेवर विश्वासच नाही म्हणून तू आतापर्यत अविवाहीत राहीलास ? त्यावर विजय म्हणाला,’’ मी आता पर्यत अविवाहीत राहण्याच हेच कारण होत की माझा विवाह्संस्थेवर विश्वास नाही. इतर व्यक्तीना जशी विवाह ही त्यांच्या आयुष्यातील महत्वाची आणि अविस्मरणीय घटना वाटते तशी ती मला वाटत नाही. विवाह ही माझी गरज नाहीच ती माझ्या सभोतालच्या समाजान माझ्यावर लादलेली गरज आहे. मी विवाहाकडे जरा जास्तच डोळ्सपणे पाहतो तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे तुझा आणि माझा विवाह झाल्यामुळे माझ्या आयुष्यात फार काही बदल होईल अस मला नाही वाटत ! माझ्या जीवनात मी माझ्या सभोवतालच्या व्यक्तींकडे तटस्थपणे पाहतो आणि स्वतःला त्यांच्यापासून तटस्थ ठेवतो. लग्नानंतर एका स्त्री अथवा पुरूषाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्द‍ल नसलेले प्रेम जाग होत हा निव्वल कल्पनाविलास आहे. शरीर सूख मिळविण्यासाठी अथवा त्यातून मिळणारा आनंद मिळविण्यासाठी केलेली ती क्षणिक तडजोड असते. विजय हे तू आता जे काही म्हणालास ते तू उदाहराणासह स्पष्ट करू शकतोस ? त्यावर विजय म्हणाला,’’ प्रतिभा मी तुझ्याशी विवाह करेन, आपण एकत्र राहू, समाजात तू माझी पत्नी म्हणून अभिमानाने मिरव तुझे सर्व छंद जोपासण्याची मी तुला मुभा देईन, नवरा म्हणून मी तुझ्यावर कोणताच अधिकार गाजविणार नाही. पण ! तुझ्याकडून मला मिलणार शरीरसूख मला नकोय, आपण पती पत्नी असतानाही आपले कधीही शरीरसंबंध येणार नसतील तर फक्त माझ्यावरील प्रेमापोटी तू माझ्याशी लग्न करशिल ? प्रतिभा क्षणभर शांत झाली. प्रतिभा तुला अस तर वाटत नाही ना की मी नपूंसक आहे ? जर तुला अस वाटू शकत असेल तर समाजाला का वाटणार नाही ? म्ह्णून मला माझ्यासाठी नाही तर समाजासाठी विवाह करावा लागेल कदाचित ! विवाह ही माझी गरज नाही. माझ्या आयुष्यात कित्येक सुंदर मुली आल्या होत्या ज्या तुझ्यापेक्षाही सुंदर होत्या पण ! त्यापैकी एकीचाही मी स्वतःहून साधा हातही पकडला नाही. ज्यांच्या आयुष्यात करण्यासारख काही नसत ते प्रेम करतात. आपला वंश चालविण्यासाठी कोणी तरी असाव म्हातारपणी कोणाचा तरी आधार असावा आपल्या आजारपणात आपली काळ्जी वाहणार कोणी तरी असाव हे सर्व विवाहसंस्थेच समर्थन करण्याचे बहाने आहेत. लग्नानंतर पंदरा वर्षात त्याच्या पाच पोरांना जन्माला घालणारी त्यांच्या कुटूबाचा राहाट गाडा चालावा म्हणून घरकाम करून त्याच आणि त्याच्या पोरांच पोट भरणार्‍या बायकोवर तिचा नवरा तिच्या चारित्र्यावरून संशय घेत असेल आणि तिला तिच्याच पैशाची दारू ढोसून गुरांना बदडवतात तस बदडवत असेल त्यांच्या प्रेम विवाहाला अर्थच काय ? प्रेमविवाह करून त्याच्या दोन मुलांना जन्म दिल्यानंतर दहा वर्षांनी एखाद्या स्त्रीच दुसRyaa एखाद्या तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू होत असेल तर त्याला काय म्हणावं ? आज करोडो लोक विवाह करतात ! पण ! विवाह मानतात किती ? या प्रश्नाच उत्तर न शोधलेलच बर ! स्पष्ट सांगायच तर मी तुझ्या आणि तु माझ्या प्रेमात पडाव अस आपल्यात काहीच घडल नाही. आपण एकमेकांकडे आकर्षिताही नाही तर आपण एकमेकांपासून प्रभावित झालोय ! माझ्यामुळे प्रभावित झालेल्या मुलींची संख्या कमीत - कमी हजार असेल माझ्याकडे आकर्षित झालेल्या मुलींची संख्या शंभरच्या आसपास असेल आणि माझ्या प्रेमात पडलेल्या मुलींची संख्या वीस-एक, त्यातील मला आवडणारया दहा – एक आणि जिच्यावर मी प्रेम केल अशी एकच कविता ! कारण तिच्यासाठी मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोल्यवान वेळ खर्च केला. प्रतिभा आता तुला प्रश्न पडला असेल मग! तुझ्यासाठी काय शिल्लक राहीलय ? तुझ्यासाठी शिल्लक राहीलाय माझा प्रकाश, माझा सह्वास, माझे विचार आणि त्या विचारातून मिळणारी प्रेरणा जी तुला असामान्य ठरवेल ! ज्या दिवशी तू माझ्याशी विवाह कराण्याचा निर्णय घेतलास त्याच दिवशी सुरू झाला तुझा प्रवास सामान्यतेकडून असामान्यतेकडे ! प्रतिभा तू स्वतःकडे माझी पत्नी म्हणून पाहू नकोस! स्वतःला ओळख ! स्वतःची ओळ्ख निर्माण करण्याचा प्रयत्न कर स्वतःच अस्तीत्व स्वतःला जाणवू दे ! जगाकडे जगापासून तटस्थ राहून पाहायला शिक ! तस केलस तरच तुला जीवनात कित्येकांना न उलगडलेली कोडी उलगडायला सुरूवात होईल. तू स्त्री आहेस या पेक्षा तू एक जीव आहेस या दृष्टीने पाहायला सुरूवात कर ! तुझ अस्तित्व या जगात किती आहे हे जाणण्याचा प्रयत्न कर! या जगात जन्माला आलेली काही लोक करोडो वर्षे जरी जगली तरी त्यांच्या अस्तित्वाची कोणी दखल घेईलच याची खात्री देता येत नाही. या जगात कही लोक असे ही असतात की ते जन्माला आल्या आल्या त्यांच्या जन्माची दखल जगाला घ्यायला भाग पाडतात. आपल्या लग्नानंतर जर आपल्याला मुल नाही झाली तर ! काही वर्षानी

आपल्याला आपण लग्न करून काही उपयोगच नाही झाला असही वाटायला लागेल. पण ! अस वाटण हाच सर्वात मोठा मुर्खपणा आहे. विवाह हा फक्‍त मुल व्हावीत वंश चालावा म्हणून केला जातो मूत्युनंतर मोक्ष मिळावा म्हणून केला जातो सार थोटांड आहे. माणूस वगळ्ता इतर प्रणी कोठे विवाह करतात? त्यांच्या अस्तित्वावर जगण्यावर कोठे प्रश्न चिन्ह निर्माण झालय ? आता कोणी म्हणेल हाच तर फरक आहे माणसात आणि प्राण्यात! माणूस हा ही शेवटी प्रणीच प्राण्याचा माणूस व्हायला हाजारो वर्षे लागली म्हणुन माणसातील प्रणी संपूर्णपणे नष्ट झालाय तो अधून मधून जागा होतोच की ! उलट बहुदा प्राण्यांमध्ये नसलेले समलिंगी सबंधा सारखे प्रकार फक्त माणसातच आढळ्त असावेत. काही संशोधक याला नैसर्गिक मानतात. निसर्गाकडे फक्त माणसासाठी वेगळे नियम असावेत कदाचित! म्ह्णून माणसांचीच संख्या भरमसाठ वाढली, इतर प्रण्यांची का वाढली नाही ? कारण इतर प्राण्यांची नाडी निसर्गाने स्वतःकडे ठेवली आणि मानवाने निसर्गालाच आपला गुलाम करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे माणसाच जीवन असंतुलीत झाल. जे आता संतुलीत होण केवळ अशक्‍य आहे. या सर्वाला कळत नकळ्त विवाह संस्थाच कारणीभूत आहे. विजयच हे सार तत्वज्ञान प्रतिभाच्या डोक्‍यावरून जात होत पण! त्या क्षणी ते ऐक्ण्या खेरीज तिच्याकडे दूसरा पर्याय नसावा कदाचित!

एके दिवशी नेहमीसारखीच प्रतिभा विजयला भेटायला त्याच्या कार्यालयात गेली. बिनाहाताचा टी शर्ट टाईट फिट जीन्स तोंडाला मेकाप थापलेला गालाला लाळी ओठांना लाल लिपस्टीक, पायात उंच टाचांचे सॅन्डल ! तिचा विजयसह आज देवळात जाण्याचा विचार होता. तिला वाटत होत तिच हे मादक रूप पाहून विजय खूश होईल पण ! झाल उलटच तिच हे ध्यान पाहून विजयच्या रागाचा पारा चढला ,त्याचे डोळेही किंचित लाल झाले. रागाच्या भरात तो तिला म्हणाला,’’तू जशी आलीस्‍ तशीच्या तशी माघारी घरी जा आणि पुन्हा असा पोषाख घालून माझ्या कार्यालयात पाऊल टेवू नकोस तुला काय वाटल तुला या अशा पोषाखात पाहून मी खूश होईन ! गैरसमज आहे तुझा तो आताच दूर कर माझ्या पत्नीन कशा प्रकारचा पोषाख परिधान करायचा हे मीच ठरविणार ! साडी आणि पंजाबी सलवार कमीज या व्यतिरीक्त इतर कोणत्याही प्रकारचे पोषाख तुला परिधान करता येणार नाहीत आणि तेही बिनहाताचे नकोत! स्त्रियांचा पोषाख पाहून सर्वसामान्य तरूण आकर्षित होत असतिल मी नाही ! स्त्रियांचा जन्म फक्त पुरूषांना आकर्षित करण्यासाठी झालाय हे मला मान्यच नाही.स्त्री म्ह्णजे पुरूषांच्या आकर्षणाचा विषय आकर्षणाचा केंद्रबिंदू हे पुरूषांच्या मनावर त्यांच्या लहानपणापासून बिंबवले जाते. नटायला मुरडायला सुंदर दिसायला मुलींना लहानपणापासूनच शिकवल जात. का तर त्या पुरूषांसाठी आकर्षक ठराव्यात! सध्याच्या जाहिरातीत पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच्या सुंदर दिसण्याचा जो भरमसाठ वापर करून घेतला जातो तो यामुळेच! म्हणून कदाचित आजची सुशिक्षीत उच्चशिक्षित स्त्रियाही नटण्या मुरडण्यात रमलेल्या दिसतात. ज्यांच प्रतिनिधीत्व आजच्या वेगवेगळ्या चॅनेलवरच्या डेली सोप दैनदीन मालिका करताना दिसतात. तुझा होणारा नवरा म्हणून मी तू असा पोषाख परीधान केलेला असताना तुझ्यासोबत बाहेर फिरायला येऊ शकत नाही. तुझा फक्त्‍ प्रियकर असतो तर आलोही असतो कदाचित! त्यावर काहीच न बोलता पाणावलेल्या डोळ्यांनी प्रतिभा निघून गेल्यावर विजय स्वतःशिच म्हणाला आमच्या आईला आंम्ही साडी व्यतिरीक्त इतर कोणत्याही पोषाखात कधी पाहिल नाही आमच्या पत्नीतही आंम्हाला आमच्या आईचच प्रतिबिंब पाहायला आवडेल! स्वतःसाठी तर सारेच जगतात खरा माणूस तो जो इतरांसाठी जगतो...इतक्यात विजयचा फोन खणखणला...पलिकडून प्रतिभा म्ह्णाली पोषाखाबाबतच्या तुझ्या अटी मला मान्य नसतील तर...तू काय कराशिल ? त्यावर विजय तिला म्हणाला मी काय करेन हे तुला सांगायची गरज नाही तुला जे वाटतय तेच मी करेन ! त्यावर प्रतिभा कहीच म्हणाली नाही एक दोन तासानंतर सुंदर पंजाबी ड्रेस घालून ती विजयला पुन्हा त्याच्या कार्यालयात भेटायला आली. तिच ते तेंव्हाच सुंदर रूप पाहून विजय मनापासून खूष झाला. काही ही न बोलता तिच्यासह कार्यालयाच्या बाहेर पडला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या साईबाबांच्या मंदिरात गेला साईबाबांच दर्शन वगैरे झाल्यावर ते दोघ तेथेच मंदिरात थोडावेळ शांत बसले. दोघ मंदिरातून बाहेर येताच एका भिकारयाने त्यांच्याकडे भिक्षा मागितली विजयन खिशातील द्हा रूपयाची नोट काढून त्याला दिली त्या भिकारयाने विजय आणि प्रतिभाला आर्शिवाद दिला. विजयच्या या कृतिचा प्रतिभाला राग आला नराहून ती विजयला म्हणाली, स्वतःसाठी एक पैसाही खर्च न करणारा तू त्या भिकारयाला दहा रूपये भिक्षा कशी काय देवू शकतोस? त्यावर विजय म्हणाला,’’ मला जर श्क्य असत तर मी त्याला शभंर रूपये दिले असते. आता विचार कर हे मंदिर येथे नसते आणि या भिकारयाने येथे भिक्षा मागितली असती तर त्याला आता मिळ्तेय तितकी भिक्षा मिळाली असती कदाचित नसती. ही भारतीय संस्कृती आहे जिने सर्वांच्या उदर्निवाहाचा बंदोबस्त करून ठेवला आहे आणि आज आपण त्याच भारतीय संस्कृतीची लक्तरे वेशिला टांगत आहोत.भारतीय संस्कृतीत देशातील वेगवेगळ्या राज्यात तिथल्या वातावरणाप्रमाणे पोषाखात बदल झालेला दिसतो. पाश्चात्यांनी आपल्या देशावर तीनशे वर्षे राज्य केल आणि आता स्वातंत्र्यानंतर पाश्चात्य संस्कृती आपल्यावर राज्य करू पाहतेय ! बाकीच्यांशी मला काही देण घेण नाही मी माझ्यापुरती माझी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणार ! आज संस्कृती जपण्याच दावा आणि ढोंग करणारे असंख्य आहेत प्रत्यक्षात कृती मात्र शून्य !

लग्नानंतर तू मला अरे ! तुरे ! बोललेल मला नाही खपणार ! तू मला आहो जावो म्हणायच ! मला तेच आवडेल ! रोज सकाळी उटल्यावर तुला तुलशीची पुजा करावी लागेल. आपल्या संस्कृतीने सांगितलेले सारे नितीनियम तुला पाळावे लागतील स्वयंपाकासह घरातील सारी कामे तुलाच करावी लागतील. मीसाधी चहाही गरम करून घेणार नाही. तुला नक्की बायको हवी आहे की तुझ्या आज्ञा पालणारी मोलकरीण ! मला मोलकरीण कम बायको हवी. विजय विनोदाने म्हणाला. तुंम्ही मला जशी मी कोणत्याप्रकारचे पोषाख घालावेत या बाबत बंधन घातली आहेत तशीच बंधने तुला घालत जर मी सदरा आणि धोतर परिधानकरायला सांगितला तर तू करशिल ? का नाही कारणार पण ! ते तुला आवडेल असं मला नाही वाटत. पोषाखाच मह्त्व माझ्यासाठी काय ? तू म्हणालीस तर मी लंगोटीवरही राहिण ! मी शरीर आणि पोषाख यांना एकमेकात गुंतवून ठेवण्याच्या पलिकडे गेलोय! पोषाखावरून ज्या माणसांची किंमत ठरते ती सामान्यमाणस असतात आणि ज्यांच्यामुळे पोषाखाला किंमत प्राप्त होते ती असामान्य माणसे असतात. मी माझ आयुष्य सर्वसामान्य माणसांसारख जगलोच नाही.माझ आयुष्य जगण्यातून मला मिळालेल्या अनुभवातून समृध्द झालय! जीवनाशी जगण्याशी समाजाशी निगडीत कोणताही प्रश्न तू विचार ! त्याच समाधानकारक उत्तरदेण्याचा मी प्रयत्न करेन ! तिने लगेच विजयला प्रश्न केला आई आणि वडील यांचा धर्म भिन्न असताना मुलांनी कोणता धर्म पालावा ? त्यावर विजय म्हणाला,’ मुलांनी वडीलांचा धर्म पालावा ! जो धर्म बापाचा तोच धर्म मुलांचा असावा ! प्रतिभान हा प्रश्न विजयला का विचारला हे विजयच्या लक्षात आल होत. तिलाकदाचित अस वाटत होत की विजय या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की तिचे वडील हिंदू आणि आई इसाई आहे. तिन कदाचित विजयमध्ये दडलेला पत्रकार अजून ओळ्खला नव्हता. प्रतिभान विजयला पटकण दुसरा प्रश्न विचारला,’’तू धर्म वगैरे माणतोस ? त्यावर विजय स्पष्टपणे म्हणाला या प्रश्नाच उत्तर देताना बरेचसुशिक्षित लोकही गडबडतात या बाबतीत माझे विचार अगदी स्पष्ट आहेत, ज्या धर्मात माझा जन्म झाला त्या धर्माचा मला अभिमान आहे आणि तो माझ्या जीवनाच्या अंतापर्यत राहील. माझ्या धर्मामुळे माझ्यावर आलेली बंधने मी आयुष्यभर पाळीन ! धर्माबाबत मी कधीच कोणतीच तडजोड करणार नाही. त्यावरप्रतिभा चटकण म्हणाली,’’ मला तर दोन दोन धर्म आहेत ? त्यावर विजय म्ह्णाला तू वडीलांचा धर्म पालावा आणि लग्नानंतर नवर्‍याचा एकाच वोळी दोन दगडावर पाऊल ठेवून चालल की कपालमोक्ष होण ठरलेलच असत मगाशी मी तुला ज्या पोषाखाविषयी सुचना केल्या त्या फक्त माझ्या होणारया बायकोसाठी होत्या.इतरांवर मी माझे विचार लादत नाही. माझ्या कार्यालयातील एखादी तरूणी तसा पोषाख परिधान करून आली तर मी तिच्यावर अजिबात रागावणार नाही. कारण तिच्यावर रागावण्याचा मला हक्कच नाही आणि माझ तिच्यावर रागावण ती सहनही करणार नाही. माझ्यावर लहानपणापासून जे संस्कार झालेत त्यानुसारमाझी एक विशिष्ठ विचारसरणी तयार झाली आहे. माझ्या नजरेत माझ्या पत्नीची एक विशिष्ठ प्रतिमा तयार झाली आहे तिला तडा देणारी स्त्री माझी पत्नी होऊच शकत नाही. त्यावर प्रतिभा चटकाण म्हणाली अजानतेपणी माझ्याकडून तुझ्या त्या प्रतिमेला तडा गेला. तुझ्या नजरेत तुझ्या पत्नीची जशी प्रतिमा आहे तसहोण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन !

प्रतिभा विजयच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत होती. विजय आणि तिच्या भावी संसाराची स्वप्ने रंगवत होती. त्याच स्वप्नांचा एक भाग म्हणून तिन त्यांच्या एका टूमदार घराच स्वप्न पाहील होत. त्याचाच एक भाग म्हणून तीन ते विजयला सांगताच विजय म्हणाला,’’ ते सध्यातरी शक्य नाही आणि भविष्याततरी शक्य होईल याची खात्री नाही देता येणार. पैसा ही माझी सर्वात मोठी गरज पूर्वी होती आता ती तितकीशी राहिली नाही. आता माझ अज्ञान दूर झालय मी जाणूनबुजून माझ्या गरजाना मर्यादा घातल्यात मी श्रीमंतीची स्वप्ने पाह्त नाही तस स्वप्न पाहण्याचा अधिकार माझी पत्नी म्हणून तुलाही असणार नाही. मी माझ आयष्य समाजाच्या सेवेसाठीच खर्च करणार ! तुझ्याबरोबर मी ही गरीबीत पैशाच्या बाबतीत तडजोड करत जीवन जगायच ! मला वाटल होत निदान माझ्यावरील प्रेमासाठी तरी तू सुधारशिल माझ्यासाठी तुझ्या तत्वांशी तडजोड करशिल ! माझ्या गरजा लक्षात घेशिल आणि त्याप्रमाणे निदान भविष्यात तरी जगण्याचा प्रयत्न करशिल आता माझ्या लक्षात येतय

तुझ्यावर प्रेम करणार्‍या तरूणींपासून तू दूर का पळ्त होतास? कोणासमोर आपल प्रेम व्यक्त करण्याची तुझ्यात हींमत नव्ह्ती हे कारण नव्ह्त. कोणाची जबाबदारी घेण्याची ती वाहण्याची तुझी नैतिक तयारीच नव्ह्ती. त्यावर विजय रागावून म्हणाला,’’ हो तुझ बरोबर आहे. तशी जबाबदारी घेण्याची नैतिकता मी दाखवली असती तर आज मी तुझ्यासाठी उपलब्ध नसतो. मी कधीच कोणाचातरी झालो असतो. या स्वार्थी जागात श्रीमंत म्हणून वावरलो असतो. पण ! मी तस केल असत तर मी लेखक नसतो माझे विचार लाखो लोकांनी वाचले नसते माझ्या लाखो तरूणांच्या हृद्यावर राज्य करणारया माझ्या कवितांचा जन्मच झाला नसता.मोठ मोठया साहित्यिकांनी माझ्या लिखाणाची दखल घेतली नसती. माझ्या वाट्याला माझ्या लहानपणी एखाद्या प्राण्यापेक्षाही ह्लक्या दर्जाच जीवन जगन वाट्याला आल होत तेंव्हा वाटायच की सर्व सुखसाधनांनी आपल्या पायाशी लोळ्ण घ्यावं माझ पहील पाऊलही मी त्याच दिशेने टाकल होत. पण! माझ एक एक पाऊला जस जस श्रीमंतीच्या दिशेने पडत होत तसा तसा मी एक-एक मैत्रीच नात गमावत होतो. नंतर मला प्रसिध्दीच वेड लागला त्यातही मी वाह्त गेलो त्यामुळे तुटलेल्या नात्यांचा तर मी हिशोबच मांडला नाही. फक्त कविता माझ्या आयुष्यात आलेली एकमेव तरूणी होती जिला माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणूनच मी स्वतःहून तिच्या प्रेमात पडलो. फक्त तिच्यासाठी मी कोणतीही तडजोड करायला मी तयार होतो.पण! तिच्यासमोर माझी जी प्रतिमा तयार झाली होती. ती अशी नव्ह्ती की तिन माझ्या प्रेमात पडावं. मी जाणून बुजून माझी खरी ओळ्ख तिच्यापासून लपविण्याचा प्रयत्न केला होता. माझी खरी आोळख जर मी तिला दिली असती तर कदाचित तिन माझ्या प्रेमाचा स्विकार केला असता.मला अशा एका तरूणीशी विवाह करायचा होता जिच फक्त माझ्यावर प्रेम असेल माझ्या सभोवतालच कोणतच वलय त्यास कारणीभूत नसाव. माझ्याबद्द्ल सर्व जाणल्यावर माझ्या प्रेमात न पडण केवळ अशक्य माझ्या गरजा लक्षात घे! मी कुडाच्या झोपडीतही आनंदाने राहू शकतो. कोणत्याच सुखसाधनांची मला सवय नाही.मी माझ्या जीभेचे कोणतेच चोचले कधी पुरवत नाही. कपडया-लत्याचही मला फारस आकर्षण नाही. नात्यातही मी वाजवी पेक्षा जास्त गुंतून पडलो नाही. दागदगिण्यांचा मला मोह नाही. अलंकार म्हणून मी माझ्या कमरेलाही साधा दोरा बांधत नाही. माझ हे राहणीमान पाहून एखादा साधू ही लाजेल.माझ्यासबोत संपूर्ण आयुष्य काढलेलेही सोड मला जन्म देणारे माझे आई-बापही मला पूर्णपणे ओळखल्याचा दावा नाही करू शकत. माझ्या आयुष्यात असंख्य गुपिते आहेत जी या जगात माझ्या व्यतिरीक्त कोणालाच माहीत नाहीत. मी जसा आहे तसा होण्यास ती गुपितच कारणीभूत आहेत. तू माझी पत्नी झाल्यानंतर तुलाही ती कळ्णार नाहीत. तुला जर माझ्याकडून माझ्यात काही बदल होण अपेक्षित असेल तर ते होण केवळ अशक्य आहे. तुझ्यासाठी मी माझ्या तत्वाशी तडजोड नाही करु शकत इतक मह्त्वाच स्थान निदान तुझ तरी माझ्या आयुष्यात नही. मग ! मला आपल्या नात्याबद्दल पुन्हा विचार करवा लागेल. कारण मी माझ आयुष्य एखाद्या साध्वी सारख नाही जगू शकणार !आपण नवरा बायको म्हणून

एकत्र न आलेलच योग्य ! बरेच वाद-विवाद तर्क वितर्क झाल्यानंतर शेवटी विजय आणि प्रतिभाने एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. विजयसारख्या तत्वनिष्ठ माणसासोबत सार आयुष्य काढण ही प्रतिभाला एक प्रकारची शिक्षा वाटत होती. विजयवर जीवापाड प्रेम करणारयानी त्यांच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव का ठेवला नाही हे ही प्रतिभाच्या लक्षात आल होत. प्रतिभा विजयच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे त्याला काहीच फरक पडला नव्हता. करण तो स्वतःच आयुष्य स्वतंत्र आयुष्य मानत होता. कोणा दोन व्यक्तींच आयुष्य एकमेकात गुंतवून ते आयुष्यभर जगण त्याला मान्य नव्ह्त. त्याला अशी जोडीदार हवी होती जी म्हणेल आपण दोघ एकत्र असू बरोबर असू पण ! आपल आयुष्य मात्र वेगवेगळ असेल नदीच्या दोन किणारयांसारख जे सतत एकमेकासोबत असतात पण! समांतर जे एकमेकांना छेदत नाहीत पण ! प्रतिभा विजयच्या आयुष्यात मिसळ्ण्याचा प्रयत्न करू पाह्त होती जे विजयला मान्य नव्ह्त. प्रतिभाला वाटल होत विजय तिच्या प्रेमात पडलाय ! पण ! विजय कधीच कोणाच्याच प्रेमात पडूच शकत नव्ह्ता. कोणाच्या प्रेमात पडण्याचा त्याला अधिकारच नव्ह्ता त्याचा जन्म लोकांना त्याच्या प्रेमात पाडण्यासाठी झाला होता.

एक दिवस विजय नेहमीसारखाच बसस्टॉपवर उभा होता .अचानक कोणीतरी त्याच्या खांद्यावर हळूच प्रेमाने हात ठेवला विजयने सहज मागे वळून पाहील. तर कविता होती कविताकडे पाह्त तो गालात गोड ह्सला. कसा आहेस ? मजेत पूर्वीसारखाच ! कविताच्या प्रश्नाला विजयने उत्तर देताच कविता म्हणाली,’’ काही दिवसापूर्वी प्रतिभाच्या लग्नाला गेले होते, तू नाही आलास तुझ्या लाडक्या मैत्रिणीच्या नव्हे प्रेयसीच्या लग्नाला ? विजयच्या जखमांवर कविता मीठ चोळ्त होती त्यामुळे विजय किंचित रागावला आणि रागाच्या भरात तिला म्हणाला लग्न करण्या व्यतिरीक्त तिच्याकडे काही दुसरा पर्याय होता का ?तिच्याकडेच का भारतातील कोणत्याच स्त्री कडे दुसरा पर्याय नसतो ! तुझ्याकडे तरी आहे का ? त्यावर कविताही रागाने म्हणाली,’’ जो पर्याय तुझ्याकडे आहे तोच पर्याय माझ्याकडेही आहे. तुझ्या नजरेत माझी जी प्रतिमा आहे ती तितकीशी चुकीची नाही. पण ! माझ्याबद्द्ल तुला तितकी माहिती नाही जितकी असायला हवी होती. तुला काय वाटत तू माझ्या मागे लागलायस माझी वाट पाह्त तासन – तास बसस्टॉपवर उभा राह्तोस हे माझ्या लक्षात येत नव्ह्त. तुझ्या हातावर तू रोज कोरणारा के म्हणजे कविता होत हे मला माहित नव्ह्त. मला सार कळ्त होत सार माहित होत. तुझ बोलण मला बढाई वाटत होती अस तुला वाटत असल तरी तस नव्ह्त. तुझ्याबद्दल तुझ्या घरच्यांबद्दल जितकी प्रतिभालाही माहिती नव्ह्ती त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माहिती मला होती. तुला जीन्स आणि टी – शर्ट घालणारया मुली आवडत नाहीत. धर्माबाबत तू अत्यंत कट्टर आहेस. भारतीय संस्कृतीचा तुला अभिमान आहे. तुला कोणतही व्यसन नाही. तू शाकाहारी आहेस. शाळेत गणित हा तुझा सर्वात आवडता विषय होता. तू एक चांगला चित्रकार आहेस. तू तुझी पहिली कविता वयाच्या सोळाव्या वर्षी लिहलीस ! तिच्यावर जिच्या तू सर्वात पहिल्यांदा प्रेमात पडलास तिच नाव होत आरती ! निबंध लिह्ण्यात तुझा हातकंडा होता शाळेत असताना तू एकाच विषयावर वेगवेगळे पाच निबंधही लिहले होतेस ! तू भयंकर रागीट आहेस त्यामुळे तुझ्या लहानपणी तू अनेक छोट्यामोठ्या मारामारया केल्या आहेस. तुला पत्ते खेळता येतात ज्यात मेंडीकोटापासून तीनपत्ता पर्यत. तुला गोट्या खेळ्ता येतात पतंग उडविता येते. तुला स्वंयपाकही उत्तम करता येतो अगदी पोळ्याही उत्तम लाटता येतात. तुझ्या आयुष्यातील गुपित कधीच कोणाला कळ्त नाहीत. विवाह्संस्थेवर तुझा अजिबात विश्वास नाही. समाजातील बुरसटलेल्या चाली-रिती परंपरांच्या तू विरोधात आहेस. सार्‍या जगापासून लपलेला तुझा विनोदी स्वभाव ! जो कदाचित प्रतिभालाही माहित नसेल ! तुझ्यातील व्यवसायिक ! जो कधीच कोणाचा हिशोब बाकी ठेवत नाही. तुझा आपमान करणारयाचा आपमान केल्याखेरीज तू स्वस्त बसत नाहीस. तुझ्याकडे असणार्‍या प्रचंड ज्ञानाच तू प्रदर्शन करत नाहीस. तू तुझ्या घरी असताना नेहमी उगडा असतोस ! त्यामागेही एक कारण आहे. तुझ्या घरातील लाईटची फिटींग करण्यापासून घराला रंग काढण्यासारखी कामेही तू करतोस ! आजच्या कळात ज्या परूषाला सर्वगुण संपन्न म्हणता येईल असा तू आहेस पण ! तुझ्यात एकाच दुर्गुण आहे तो म्हणजे तू सौंदर्याच्या प्रेमात पडतोस. मग ते सौंदर्य कशात का असेना ! तु ज्या मुलींच्या प्रेमात पडलास त्यांच्या सौंदर्याने तुला आकर्षित केल होत पण ! तुला त्यांच्या नश्वर देहात रस नव्ह्ता.पावित्र्य अब्रु ही काही फक्त स्त्रियांनी जपायची नसते ती प्रभू रामचंद्रासारखी पुरूषांनीही जपायची असते या मताचा तू ! तू तुझ पावित्र्यही जपलेस आणि मर्यादाही पाळल्यास! तुझ जीवन हे एका तपस्वी माणसाच जीवन आहे. तुला हंव ते ते तू साध्य करून घेऊ शकतोस पण! तू स्वतःच्या गरजाना मर्यादा घातलीस !तुझ्यावर प्रेम असणाऱ्या सर्वांच्या आयुष्याच सोन झाल. त्यांच्या सुखा समाधानासाठी तू नेहमीच देवाकd/i प्रार्थना केलीस. तू सर्वसामान्य माणूस नाहीस हे तुलाही माहीत आहे आणि मलाही ! प्रतिभासह तू जो प्रवास केलास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण होत. तू माझ्या समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला नाहीस त्यामागेही एक कारण असावं ! मला खात्री आहे तू गाढ झोपेत असतानाही मी उटविल आणि म्हटलं चल आताच्या आता तू माझ्याशी लग्न कर तर तू मागचा पुढचा कोणताही विचार न करता लग्नाला उभा राहशील ना ? त्यावर विजयने गालातल्या गालात गोड हसत मानेनच होकार दिला एखाद्या लबाड पुरूषासारखा........Rate this content
Log in

Similar marathi story from Romance