Vinita Kadam

Drama

3  

Vinita Kadam

Drama

क्षितिजा पलीकडले नाते

क्षितिजा पलीकडले नाते

4 mins
669


आता लवकरच नाताळच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. म्हणून मुलांनी बाबांकडे हट्ट केला की या सुट्टीत आपण कुठेतरी फिरायला जाऊ. पण बाबांना ऑफिसमधून सुट्टी मिळणार नव्हती. त्यांना नाही म्हणता येईना. मुलांनी कधी नव्हे ते बाबांना काहीतरी मागितलं होतं. मुलांना बाबा हो म्हणाले. 

    

तसं पाहायला गेलं तर सुधाकर आणि साधना यांना दोनच अपत्य. बंटी आणि बबली. या चौघांना एकमेकांशिवाय जगात दुसरे कुणीच नव्हते. सुधाकर आणि सुधा हे दोघेही अनाथ आश्रमात वाढले होते. त्यामुळे सुधाकर कुटुंबातील प्रत्येक सदस्याची खूप काळजी करत होता. आपल्या बायकोवर आणि मुलांवर खूप प्रेम करत होता. म्हणूनच मुलांनी केलेल्या मागणीवर सुधाशी बोलून पुढचा कार्यक्रम ठरवणार होता. 

   

त्याच रात्री सुधाकर आणि सुधा यांनी मुलांचा हट्ट पुरवायचा असं ठरवलं आणि लगेच कामाला लागले. त्याने ऑफिसमधून खूप प्रयत्नाने ८ दिवसांची सुट्टी काढली. आणि कोकणची छोटी ट्रिप करायची असं ठरवलं. मग काय मुलेही खूप खुश झाली. सगळी योजना आखली. अखेर जायचा दिवस आला. बरोबर लागणारे महत्त्वाचे समान घेऊन रेल्वे स्टेशनवर बरोबर १ तास आधी पोहोचले. ट्रेनही वेळेवर आली. रिझर्व्हेशन असल्यामुळे सर्व आपल्या सीटवर बसले. मुलांसाठी हा प्रवास अनोखा होता.. काय करू अन् काय नको असं त्यांना झालं होतं. त्यांनी धुडगुस घालायला सुरुवात केली. त्यांच्याच कंपार्टमेंटमध्ये शेजारच्या सीटवर आजोबा-आजी होते. ते त्यांच्या गावी निघाले होते. साधारण आजोबा ६५ आणि आणि ६० च्या असाव्यात. सीटवर वर-खाली करता करता बऱ्याच वेळा वयस्कर आजी आजोबांना मुलांचे पाय लागत होते. सुधाकर आणि सुधाच्या लक्षात आले होते. ट्रीपला आलेल्या मुलांना काय सांगायचं होतं? तरीही सुधाने मुलांना जवळ बसवलं आणि त्यांना गोष्ट सांगितली. बैठे खेळ खेळली. नंतर आजी आजोबा झोपून सर्व पाहात होते. ते मनातल्या मनात हसले आणि त्यांनी मुलांना जवळ बोलवून खाऊ दिला. मग नंतर आजी आजोबा आणि मुले यांच्यात गट्टी जमली.

    

कोण कुठे जाणार, किती दिवस, कुठे राहणार? हे सगळं बोलून झालं. एकच कुटुंब असल्यासारखं सगळं अलबेल झालं. गणपतीपुळ्याला सुधाकर कुटुंबासमवेत उतरला आणि तिथेच आजी-आजोबाही उतरले. ते आपल्या घरी गेले आणि सुधाकर हॉटेलवर. संपूर्ण ८ दिवस ट्रिपचा आनंद मनसोक्त मुलांनी लुटला. शेवटचा मुक्काम रत्नागिरी हॉटेलवर होता. मुलेही थकली होती. हॉटेलवर जाऊन आराम करायचा ठरविले. 

    

त्याच दिवशी संध्याकाळी नयनरम्य वातावरणात सगळेच फिरायला जाऊ म्हणून जवळच असलेल्या बागेत निघाले. नेमके बंटीचे लक्ष झाडाखाली असलेल्या बाकावर गेले. त्याने जवळ जाऊन पाहिले. पाहतो तर काय एक वृद्ध जोडपं तिथे बसले होते. त्यांना पाहून बंटी एकदम खुश होऊन "आजोबा! आजी!" असे ओरडला. आजोबा-आजीही खुश झाले मुलांना पाहून. पुन्हा एकदा नियतीनं सर्वांची गाठ घडवून आणली. काही केल्या आजोबा-आजी ऐकेनात. या सर्वांना घरी घेऊन गेले.

    

आजोबांचं घर बऱ्यापैकी मोठं होतं. मुले तर सर्व घरभर पळत होती. खेळत होती. घरासमोर तुळशी वृंदावन होत. घरासमोर छोटी बाग होती. विहीर होती. अगदी कोकणातला संपूर्ण परिसर... केळी, आंबा, फणस, नारळ, चिकू, कोकम सर्व प्रकारची झाडी होती. जवळच समुद्र किनारा. अगदी मनमोहक दृश्य होत ते. स्वतःच्या घरी आल्यावर जसा प्रवासाचा शिण निघून जातो अगदी तसच सुधाकर आणि त्याच्या कुटुंबाला झालं होतं. मूल तर अगदी आपण आपल्याच आजी आजोबांकडे आल्यासारखे रमून गेले.

   

सुधा मुलांना डोळे वटारून असं गोंधळ घालू नका बजावत होती. त्यावर आजोबा म्हणाले, "अगं! नको रागवू त्यांना. जे हवे ते करू दे त्यांना. आज खूप दिवसांनी या घराचं गोकुळ झालेलं बघून आम्हाला आनंद झाला आहे. सारखं वाटायचं की घरात कुणीतरी असावं. आमची विचारपूस करणारं. आमच्या म्हातारपणीचा विरंगुळा आम्हाला हवा होता तो आज मिळाला." आणि आजोबांचे डोळे पाण्याने डबडबले. "म्हणजे? आम्हाला काही समजल नाही." सुधाकर आणि सुधा म्हणाले.

  

 "सांगतो, सर्व सांगतो." आजोबा.

   

"जसे तुम्ही ट्रेनमध्ये आम्हाला सांगितलं की तुम्हाला दुसरे कुणी नातेवाईक नाहीत तसेच आम्हालाही आमच्या दोघांव्यतिरिक्त कुणीही नाही. आमच्या संसारवेलीवर फुल उमलले नाही. आमचा प्रेमविवाह आहे. मूल होत नाही म्हणून तिला सोडून कसा देऊ? समाजात अशा स्त्रीला काय स्थान असतं हे सांगायला नको. म्हणून मीच तिला घेऊन वेगळा संसार थाटला. मूल नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा आयुष्य आनंदात कसं घालवायचं हे शिकलो. आपल्या आयुष्यात काय नाही यापेक्षा काय आहे, तेच जपायचं हे ठरवलं आणि नवीन आयुष्य जगत गेलो."

    

सुधाकर आणि सुधा दोघेही सुन्न होऊन ऐकत होते. काय बोलावे काहीच कळेना. तेव्हा सुधाकर भानावर आला संध्याकाळ झालेली बघून आजोबांना आम्ही येतो, असं सांगून हॉटेलवर जाण्यासाठी घाई करू लागला तेव्हा आजोबांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या इथेच मुक्काम करायला भाग पाडलं. 

    

रात्री जेवताना खूप गप्पा रंगल्या. बोलता बोलता आजोबांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. तेव्हा मात्र सुधाकर गोंधळात पडला. आजोबा म्हणाले. "आम्ही दोघेही अनाथ आहोत आम्हाला कुणीतरी आई - बाबा, आजी - आजोबा म्हणणारं असावं अशी आमची इच्छा आहे. जे सुख आयुष्यभर आम्हाला मिळालं नाही ते दारात असताना मी कसं जाऊ देऊ? आमच्या आयुष्य क्षितिजाला टेकलं आहे. निदान शेवटचे दिवस तरी मूल, सून आणि नातवंडांबरोबर हसत खेळत घालवावे अशी आमची इच्छा आहे.  तुला आई बाबा मिळतील मुलांना आजी आजोबा आणि सूनबाईला सासू-सासरे मिळतील. बस! झाला आपला पूर्ण परिवार. कदाचित असा मोठा परिवार आयुष्याच्या मावळतीला अगदी क्षितिजासमयी भेटणार होता म्हणूनच देवाने तुझी कूस उजवली नाही बरं का? अग त्या देवाचे आभार मान गं. तेव्हा मुलांनो माझ्या पदरात एवढी भिक घाला. नाही म्हणू नका. तुम्ही हो म्हणाला तर मी तुमचा मरेपर्यंत ऋणी राहीन. एक सांगतो की तुझ्या हो म्हणण्याने जगातला सर्वांत श्रीमंत माणूस मीच असेन. अशी सुंदर क्षितिजापलीकडचे नाते मला मिळावे इतकीच अपेक्षा. तुम्ही विचार करा आणि मला सांगा." इतके बोलुन आजी आणि आजोबा अतल्या खोलीत निघून गेले.

    

दुसऱ्या दिवशी सकाळी सुधाकर लवकर उठला. उठायला तो झोपलाच नव्हता. रात्रभर विचार करून त्याच डोकं सुन्न झालं होतं. सकाळी जाताना आजोबांना आपला विचार सांगायचं अस ठरवल. सकाळ होताच मुले जोरात ओरडली. "आजोबा ssssssssssss आजी ssssssssssss!" दोघेही जाऊन त्यांना बिलगली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama