Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vinita Kadam

Inspirational


3.5  

Vinita Kadam

Inspirational


यशवंत हो ..!

यशवंत हो ..!

2 mins 95 2 mins 95

प्रति,

मुख्याध्यापिका,

स्नेहा गुरव ,

मुधोजी हायस्कूल , फलटण

जिल्हा : सातारा

४१५५२३ 


आदरणीय मुख्याध्यापिका,

 साष्टांग दंडवत .


   शाळेतील दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची अविस्मरणीय अशी आठवण असते. शाळेत असताना बागेत स्वच्छंदपणे उडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे आमचं मन असतं. त्या अजाण मनाला संस्कारामार्फत विविधांगी प्रकाराने घडवत असता. एखाद्या स्पर्शाने पाण्यावर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे अपरिचित असे संबंध जुळताना खऱ्या जीवनाला सुरुवात होत असते.


   मॅडम , मी आज आयुष्याच्या एका कठीण वळणावर उभी आहे. माझं मन जरी मला कितीही पुढे ढकलत असलं तरीही मला तुमच्या आशीर्वचनाची गरज आहे त्यासाठी तुमच्या *यशवंत हो* या आशीर्वादाची उणीव भासत आहे. शाळा सोडताना तुमचे चरणस्पर्श करत होते तेव्हा माझे नयनाश्रूंनी तुमचे पाय ओले झाले होते. तेव्हा तुम्ही मला जवळ घेऊन डोक्यावर हात ठेवून *यशवंत हो* असा आशीर्वाद दिला होता. मी एकदम भारावून गेले होते. तो दिवस फक्त माझा होता. त्या आशीर्वादाने माझ्या अंगात नवविधा शक्तींचा संचार झाल्यासारखं वाटलं . तेव्हापासून आज तागायत मला मागे वळून बघायची गरज भासली नाही. 


   प्रत्येकाला आपलं वेगळं विश्व बनवण्याची इच्छा असते. पण त्यासाठी मार्गदर्शन , प्रेम , सहवास अशा माध्यमातून ज्ञान देणाऱ्या खऱ्याखुऱ्या गुरुची आवश्यकता असते. मी स्वत:ला भाग्यवान समजते की तुमच्या रुपात मला तो गुरु भेटला.


   माझ्या जीवनात फारच कमी गोष्टी होत्या. अनाथ असलेल्या कारणाने मला मैत्रिणी जास्त नव्हत्याच. मला कसलीही अपेक्षा नव्हती. अनाथाश्रमातील शाळा , नियमित वाजणारी घंटा , मैदानातील भलं मोठं वडाचं झाड यांच्या आठवणी आजही मनाच्या एका कोपऱ्यात जीवंत आहे. माझ्या आयुष्यात तुमचं स्थान उच्च आहे. तुमच्या कडून एका विद्यार्थ्याला जे मिळायला हवं ते सर्वच मला मिळालं. माझी स्पंदने तुम्ही झालात तसेच माझ्याशी ऋणानुबंध जुळवलेत , माझ्या शब्दांना वेगळा अर्थ दिला , विचारांना गती दिली, गुरु ने शिष्याला द्यावं ते सर्व दिलंत.


   लहानपणापासून मला कशाचीही अपेक्षा नव्हती हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. जेव्हा जसे मिळेल तेव्हा तसं समाधान मानत गेले. लहानपणापासूनच स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची सवय आहे. वाईट परिस्थितीतही अचूक निर्णयाने संकटावर मात केली आहे. तरीही तुमच्या आठवणीची तीव्रता अधिक जाणवत आहे. म्हणूनच सांगावं वाटतं की आपल्यातील आदरभाव , प्रेमळभावना कायम अशाच टिकून राहाव्यात हिच ईश्वरचरणी प्रार्थना ! आपलं गुरु-शिष्याचं नातं असंच समईतल्या ज्योतीप्रमाणे तेवत राहो . नि:शब्द असलं तरीसुद्धा.! 


   आज माझं वास्तव्य मुंबईत आहे. इच्छा असुनही तुमची माझी भेट होणं अशक्य आहे. या मुंबई ने मला बरंच काही दिले आहे. खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं आहे.   

माझा एक संकल्प असेल आणि तो म्हणजे पुढील आयुष्यात मी ही कुणाच्यातरी जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. अनाथ असणाऱ्या मुलांना योग्य मार्गदर्शन , आपुलकी आणि सहवास देऊन हि गुरु-शिष्याची परंपरा आजीवन चालू ठेवणार आहे.


   खंत एकाच गोष्टीची आहे की प्रत्येकाला आयुष्याची ध्येये पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो अगदी माझंही तसंच आहे. आजपर्यंत मी कधीच माझे विचार तुम्हाला बोलून दाखवले नाही. पण आज लेखणीच्या माध्यमातून व्यक्त केले. तुमच्याकडून कोणत्याच उत्तराची अपेक्षा नाही. पण मी जो संकल्पाचा विडा उचलला आहे त्यासाठी फक्त एकदा मनातल्या मनात म्हणा *यशवंत हो*


विनिता कदम

ठाकूर काॅलेज , समता नगर

कांदिवली (पूर्व) मुंबई 


Rate this content
Log in

More marathi story from Vinita Kadam

Similar marathi story from Inspirational