Vilas Kaklij

Tragedy

4.5  

Vilas Kaklij

Tragedy

'कोरोना महामारी व लॉकडाऊन'

'कोरोना महामारी व लॉकडाऊन'

4 mins
332


"काम करित जा हाक मारित जा मदत तयार आहे" या प्रमाणे कामासाठी हाका मारित काम शोधात शहरात पोहचलो काम मिळाले,निवारा शोधता शोधता बारिच महिने गेली ,कधी रेल्वे स्टेशन ,कधी,उघडयावर कधी पुलाखाली ,काम करून पोट भरु लागलो कष्ट करून उघडया गटारि जवळ झोपडी थाटली,अंग टाकण्या पूरत स्वतःच खोपट तेच स्वर्ग वाटू लागल,जवळच्यांची आठवण भासू लागली 'बा' 'नि' निरोप धाडला पोरा गावाकडचा रम्या मेला ,चारपोरी एकीला संभाळ,'बा'चा शाबूत पाळला अन झोपडीत संसार थाटला ,गावाकडची चार,आम्ही चार पोटभरत होतो ,त्यातच झोपडीत राहायला पोटाला, खायला काम जरूरी होत बस 'ना' सोयी 'ना'सुविधा दिवसा फक्त गवंडयाच्या हाताखाली दुसऱ्यांसाठी घर बांधायची त्याकडेबघून रात्री स्वप्न बघायची ,ना कुणाचा "आधार"ना कुणाची मदत दवाखाना लांबूनच बघायचा ,दोनचार दिवस अंगावरताप काढून परत कामावर ठेकेदाराचा शाप घ्यायचा ,रोडच्या लाईटा खाली उजेड घ्यायचा ,बांधकामाच्या नळाखाली आंघोळी उरकायच्या ,दोनच कापड ',कधीकधी कुणाची उष्टी कापड ,अन्न खायच ,कामसंपल कि बिऱ्हाराड जागा मिळल तिथ थाटायच ,त्याच काम संपल कि कोण कुठल कुत्र्या वाणी हाकलायचा ,माणूस असून कुत्र्या वाणी जगायच ,अन स्वतःच्या पोरानाही कूत्री च बनवायच ना 'शाळा' ना 'मळा'आज तर कामवाल्यानी काम बंद केल ,काय तर लॉकडाऊन.

झाल दोनचार दिन उपाशी काढ़ल ,घरात व्हत ते संपल ,इकड तिकड मागू तर बाहेर पडायच नाही ,कधीकधी कुणी खाण वाटायच फोटो काढुन पून्हा नाही दिसायच. हे रोजचच झाल कामावाल्यान निरोप धाडला काम नाही ,पैका नाही तुम्ही घरला जावा ,खिशात नाही, नाव ,ना कागद ,ना आधार मी कोण ? कस जगाव ''देवा" हि कोणती "महामारी "ज्यांच्या घरात खायला ते रहातील ,आमच काय चुकल देवा तुझ काय बिघडवलय ?दुसऱ्यांची घर रंगत आटून उपाशी पोटी बांधली ,अन् तू आम्हांलाच 'बेघर' केल,आता गावाकडच खोपट(घर)तरी आसल? आसरा देण्यासारख ,'बा' तर मेला,घरात बायको आजारी झाली, इतरांना महामारी नको म्हणून नगरपालीकेची गाडी आली अन् घेवून गेली ,आम्हांला ना ठाव ठिकाणा ,दोन दिसानी आम्हांला पण गाडीत कुत्र्या वाणी कोंडल अन एका खोलीत डांबल,तोडांला मुसक,अन खोलीला कडी ,कुत्र्या वाणी लांबूण भाकरी (जेवण) मिळे सकाळी मिळाल तर साच्यंला मिळल याची खात्री नाही.अशी पंधरा दिवस संपल ,बायको गेली महामारीत एवढच सांगीतल. 'बेवारस 'म्हणून "वाटी" लावल, तुझा पत्ताच नव्हता ,ना शेवटच दर्शन ,ना काही, कशी गेली ?,कुठ गेली? काय? सांगू पोराले ,देवा कसा माझा संसार काय केल व्हत मी तुझ वाकड? पंधरा दिसानी तिथून आम्हाला पण हाकल ,जावा तुमच्या घरला? कागद पत्र दाखवा ,गाडी देतो म्हणाले पाच सहा दिवस उपाशी गेली ,गल्लोगल्ली रांगा लावल्या 'ना' कोणाचा आधार,नाही खिशात पैसा ",बा'"म्हणला व्हता पोरा गाव ते गाव असत निदान "मैताला" तरि कुणी असत ध्यानात ठेव,त्याच रात्री 'बा' ध्यानी आला पोराला काखेत घातल अन् अंधाऱ्या रात्री पोलीसांचा मार चुकवण्यासाठी गावचा रस्ता धरला ,मिळल ते खायच ,रणरणत्या उन्हात पायाला फोड आली ,सावलीला झाड मिळेना मिळाल तर पाणी नाही रोज रात्रभर चालायच दिवसा झाडाखाली पड़ायच.. गाव आल कि काही मायबाप खायला दयायचे ,चौकीवर पुलिस मार द्यायचे ,जे सापडायचे त्यानां परत गाडीत घालून माघारी न्यायचे ,देवा तुच सांग दोष कुणाचा ,ज्यांनी धन कमावले ते या धरणी चे "मालक" अन् आम्ही मात्र कुत्री झालो, कुणी केल. जन्माला फक्त माणूस मात्र जिण कुत्र्याच झाल,का ? झोपडीतून गडारीत अन्न दिसायच ,कचराकुडींत इतक अन्न असायच कि कावळी,कुत्री खावून टरार घोरायची अन ,आम्ही माणस कुत्री कडे बघुन उपाशी झोपायचो,पोराला चड्डी,अन,बायकोला लाज झाकायला कपडा घेता येत नव्हता. श्रीमंताच्या घरात कपड़याचे ठीग,चपलांची पोती भगांरवाला घ्यायचा ,आम्ही मात्र अनवाणी जगायच का? देवा,आम्ही काम करतो, कष्ट करतो म्हणून, पोराला पण कुत्र्या वाणी जगवतो,व आम्ही पण, का जगतो? देवा गावाकड माणूस म्हणून जगता येईल, "आपल" घर म्हणून राहाता येईल, म्हणून चालतो आहे, गावचे आपल म्हणून घेतील , कि महामारी आली म्हणून परत कुत्र्या वाणी वागवतील?

तुच सांग देवा ,या माणसाला माणूस म्हणून जगव,शहरात माणूस कुत्र्याला घरात 'माणसा'वाणी जगवतो,व अंगणात माणसाला (नोकर) 'कुत्र्या' वाणी वागवतो,का?,देवा रस्त्याने रात्री अनोळखी कुत्री भेटतात, ती मात्र 'माणसा' वाणी वागतात ,पूलाखाली, झाडाखाली आपले म्हणून आपल्या शेजारी 'आपल्या'सारखे झोपतात,पण देवा सकाळी एखादे ठिकाणी कुत्र्या सारखे हाकलतात,येथे झोपू नका,येथे थांबू नका,रस्त्याने वाटसरूसाठी ही देवा आता इथे जागा राहिली नाही,या महामारीने जागा आहे तेथे माणसे का राहिली नाही? श्रीमंतीने माणूस 'माणूस' राहिला नाही ,त्याला म्हणाव जगात कोणतीही सेवा,काम,पंचताराकिंत हॉटेल ,वा घरात,कुत्री स्वंयपाक करित नाही. माणसाला मायेची उब देण्यासाठी माणसाचा आधार,माणसाचीच माया लागते ,हे फक्त माणूसच जाणू शकतो. देवा आता ,रस्त्यावर माझ्या माणसाला या माणसाणे गाडी खाली चिरडले ,स्वतःच्या घराआधी तुझ्या कडे पोहचले ,खरच मी सुखरूप माझ्या घरी पोहचेल कि नाही आता स्वतःचा स्वतःवर देवा विश्वासच उरला नाही. स्वत:च्याच घरि स्वतःच्या पायाने तरि कुणाच्या आधारा शिवाय पोहण्याची आशा घेवून देवा मी चालतो आहे,चालतो आहे,जीवात जीव असेपर्यत.... देवा मला माणसात माणूस म्हणून या माणसाला जगव , देवा या महामारीत तरि माणसाला माणूस जगण्याची बुध्दि जागृत कर हि "महामारी'' कोरोना रूपी यम पाठून तू या माणसाला त्याची जागा दाखवली का? निर्सगापेक्षा कुणी नाही श्रेष्ठ ,आज मी हतबल झालो देवा माझी मर्यादा ,आवकात दाखवून हया धरती वर मी एक 'क्षुद्र' इतर प्राण्यासारखा मी एक पामर ,काही क्षणाचा पाहुणा,शेवटी एकच आहे घर शेवटी देवाघरी तुच माझ्या देवा,ऐकलत देवा,या अहंकारी मानवास या गरिबांनाही जगवा माणसाप्रमाणे हिच माझी कामना ,एवढ मात्र खर देवा तुझ्याघरी येतांना तरी कुणी अडवणार नाही .याच खात्रीने रस्त्याने चालत आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy