shw2 2

Horror

3  

shw2 2

Horror

कोण?

कोण?

4 mins
777


"आयेगा....आएगा...... आने वाला....... आयेगा....", ती गुणगुणत होती. रात्रीचे अकरा वाजले असतील. आपल्या लांबलचक केसांची वेणी घालण्यात ती गुंग होती. त्या निर्जन रस्त्यावर ती त्या चिंचेच्या झाडाच्या खाली कट्ट्यावर एकटीच बसली होती. लांब सडक पाया पर्यंत लोळणारे केस, काळेभोर गहिरे डोळे, गोरापान रंग, लाल ओठ, डीप गळ्याचा ब्लाऊज घातल्यामुळे गोरीपान पाठ तर उघडी होतीच सोबत पदर थोडा खाली असल्याने ब्लाऊज मधून दोन अर्धचंद्र बाहेर डोकावूं पहात होते. तिच्या गोऱ्यापान कांतीवर ती काळी साडी आणि लाल भडक ब्लाऊज शोभून दिसत होत. डोळ्यात दाट काजळ भरल्यामुळे ते आणखी आकर्षित वाटत होते. बांधा अगदी कमनीय, ना जास्त ना कमी, सर्व जागच्या जागेवर, कोणत्याही पुरुषाला सहज भुरळ पाडेल असा. बराच वेळ आकाशातल्या चंद्राकडे बघत ती कोणाची तरी वाट बघत होती. वेणी पूर्ण झाल्यावर झटक्यात तिने मागे सारली. त्यासोबत कानातील झुमके थोडीफार उडाले, बांगड्यांचा खणखणाट झाला, जरा सावरून बसायला लागली म्हणून पैंजण किणकिण वाजू लागली. तिच्या शरीराच्या हालचालीतून येणारा तो लयबद्ध आवाज शांतता किर्र करत होता. एक पिंगळा तिच्या बाजूला येऊन बसला. तो आपला वेड्या सारखा ओरडत होता. ती त्याला शांत करत होती. त्याच्या पंखावरुन हात फिरवत होती. तो काही केल्या गप्प बसत नव्हता. त्याच्या कर्णकर्कश आवाजचा तिला त्रास होऊ लागला म्हणून ती जोरात खेकसली. सारी झाडी चिरत तो आवाज लांबपर्यंत घुमला. शिकारीला बसलेली वटवाघळे हळूहळू उडू लागली. निशाचर प्राण्यांना कळून चुकले की झाडीत काहीतरी आहे, सर्व प्राणी पक्षांनी आपल्या दिशा बदलल्या. कट्टा रस्त्याला लागूनच होता. जंगलातून जाणारी एक निसरडी वाट होती, मध्येच चिंचेचं झाड होतं. त्या खाली कट्टा ग्रामस्थांनी बनवला होता. इतक्या दाट झाडीत दिवसाही कोणाची यायची हिम्मत होत नव्हती. पण हे धुड जगावेगळं. बराच वेळ वाट बघून कंटाळा आला होता तिला.


आता दुसरं गाणं चालू झालं,"मौसम है अशिकाना, ए दिल कही से उनको धूंड लाना," खरंच तिच्या आवाजात काय जादू होती माहीत नाही. वातावरण कमालीचे बदलू लागले. उडून गेलेले निशाचर आजूबाजूच्या झाडीत जमा होऊ लागले. झाडांची पाने सळसळ करू लागली. मंद मंद वारा सुटला. कसला तरी सुवास येऊ लागला. लांबुनच कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. जरा सावरून ती उभी राहिली. पदर मुद्दाम थोडा खाली पाडत तिने गाडी थांबवली. त्याने गाडीची काच खाली करत तिला विचारलं,"कुठे जायचं आपणाला?", ती लाडात केसांची बट बोटात फिरवत म्हणाली,"जिथे तू नेशील तिथे जायला तयार आहे मी", तिचा इशारा न समजायला तो दुधखुळा नव्हता. आपल्या बाजूच्या सीटवर त्याने तिला बसवलं. गाडी स्टार्ट केली. ती लाडात वेणीला झटके देत होती. ओठावरून जीभ फिरवत होती.

तो "इतक्या रात्रीचं निर्जन रस्त्यावर तुला भीती नाही वाटत का?",

ती," कसली भीती?"

तो," म्हणजे भुतं पिश्शाच वगैरे."

ती," मी स्वतः च आहे तर मला का वाटेल?"

शांतताभंग होईल इतक्या जोरात करकचून त्याने ब्रेक दाबला. ती हसायला लागली. इतक्या थंडीत तो घामाने भिजला होता. तिने नॅपकिन पास केला. तिने कान पकडले आणि म्हणाली," माफ करा मला, पण असं काही नाहीये, हेच काम करून मी माझं भागवते, आता मी मस्करी केली प्लीज सीरियस घेऊ नका", तिचे हे बोल ऐकताना तिच्या काळ्याशार डोळ्यात तो हरवून गेला होता. पण खिडकीच्या बाहेर काहीतरी टकटक आवाज येत होता म्हणून त्याची तांद्री भंग झाली. त्याने बघितलं तर बाहेर पिंगळा होता. तिने त्याला हकललं. ती त्याला घाबरत नव्हती हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं.


त्याने तिला त्याबद्दल विचारलं,"कमाल आहे, तू वेगळीच बाई दिसतेस, ह्या निर्जन रस्त्यावर एकटीच बसतेस काय? पिंगळाला हाकलून लावतेस काय? भीती नाही वाटत का तुला?"

ती बेफिकिरीने म्हणाली," कसली भीती, माणूस घाबरला की परिस्थिती आणखी बिकट होते, जे काम मी करते त्यासाठी भीती नाही तर धाडस हवं आणि ते माझ्यात खूप आहे"


बोलता बोलता त्याने गाडी एका लॉजजवळ थांबवली. दोघे आत गेले. लॉज खूपच प्रशस्त होता. त्याने रिसेप्शनवर जाऊन तिचे आणि त्याचे आईडी जमा केले. पैसे भरले. हॉटेल त्याच्या ओळखीचं होतं म्हणून तिथला स्टाफसुद्धा ओळखीचा होता. त्याने रूमच्या पैश्यासोबतच तिचेही पैसे तेव्हाच तिच्या हातात दिले. आज ती भलतीच खुश होती. रूममध्ये गेल्यागेल्या तिने त्याला मिठी मारली. त्याने तिला अंघोळ करून फ्रेश होऊन यायला सांगितले. ती अंघोळीला गेली. त्याने एक व्हिस्कीची बॉटल मागवली आणि घोट घोट पीत बसला होता. त्याच्या डोळ्यावर धुंदी चढली होती. ती आतून आली. तिच्या ओल्या देहावर पाण्याचे तुषार मोत्याप्रमाणे घरंगळत होते.


तिने केसांचा टॉवेल काढला. लांबलचक केसमधील पाणी घरंगळत जाऊन तिचा ब्लाऊज ओला झाला होता. त्याने क्षणाचाही विलंब ना करता तिला जवळ घेतली. त्याच्या डोळ्यांत पहात ती मदहोश होऊ लागली. त्याच्यात ती पूर्णपणे हरवून गेली. त्याने तिला बाहुपाशात उचलून घेतले आणि बेडवर तो ही तिच्या बाजूला बसून एक जोरदार मिठी मारली. मानेवरचे केस बाजूला सारत एक जोरदार चुंबन त्याने घेतला. तिचे अंगअंग शहारून आले. सोबत तिला एक वेगळीच गुंगी येऊ लागली, हळूहळू डोळे मिटू लागले, कसल्यातरी वेदना होऊ लागल्या, पण मदनाच्या नशेत तिला हे ही कळले नाही की तिचा देह हळूहळू पांढरा फटक पडू लागला होता. अचानक एक गहिरा काळोख, काळाच्या आड नेणारा...


रात्री ३ च्या नंतर...

४-५ लोकांनी खड्डा खणून तो पांढरा फटक मृतदेह त्या खड्ड्यात पुरला...

ठिकाण... तोच निर्जन लॉज...

१५ दिवसांनी पुन्हा त्याच्याबरोबर आणखी एक नवीन मुलगी..!


Rate this content
Log in

More marathi story from shw2 2

Similar marathi story from Horror