kanchan chabukswar

Tragedy

4.2  

kanchan chabukswar

Tragedy

किन्नर

किन्नर

7 mins
2K


प्रत्येक वेळेला जनशताब्दी मध्ये प्रवास करताना टाळ्या वाजवत येणारी नूरबानू आता माझ्या ओळखीची झाली होती.

" क्या मॅडम? ड्युटी पे जा रहे क्या?" परतीच्या प्रवासात मनमाड चढणारी मनमाडला आणि मग पुढे कल्याणला उतरून जाणारी नूरबानू, दिसायला अतिशय सुरेख, पण नशिबाने थट्टा केल्यामुळे, चमकीले कपडे घालून, डोळ्यात सुरमा घालून, गडद लिपस्टिक, गोल गळ्याचा ब्लाऊज, आणि कुठेतरी मिळालेली चमचमणारी साडी, कपाळावर येणारी, मुद्दाम काढलेली केसांची बट, पण त्यांनी कधी गिर्‍हाईकाला हात लावला नाही, कुठल्या लहान मुलाच्या पण गालावर कधी हात फिरवला नाही, दुरूनच, टाळ्या वाजवून ती पैसे गोळा करत असे.

काय माहिती कोणा कोणास ठाऊक? चांगल्या खानदानतली वाटायची.

  औरंगाबाद मुंबई असा माझा दर दोन आठवड्याला प्रवास असायचा, प्रवासाच्या दरम्यान नूरबानू ओळख झाली होती.

 मी तर आता जवळजवळ सहा महिने तिला पाहत होते, ती जवळ आली की मी घेतलेले बटाटे वडे, घरून आणलेला चिवडा, चकल्या, मी न बोलता तिच्या हातावर ठेवत असे. पैसे देऊ केले तर नको म्हणत असे, एकदा डब्यामध्ये गर्दी कमी पाहून ती माझ्याजवळ आली, मला म्हणाले म्हणाली," तुम्ही घरून डबा आणता ना, आठवण ठेवून माझ्यासाठी, किती वर्ष झाले घर सोडून, मला फार माझ्या आईची आठवण येते." डोळ्यात पाणी आले होते.

  मला पण फार गहिवरून आले होते. माणूस होती ना नूरबानू.


   माझ्या लहानपणी माझ्या वर्गात असलेला आनंद मला आठवलं आठवला. सुरेख गोरापान कुरळ्या केसांचा घाऱ्या डोळ्याचा आनंद, जरा वेगळाच होता, हात वर करुन, कंबर हलवत, मधल्या सुट्टी मध्ये नाचत असायचा. काही टारगट मुले मुद्दामच काही भडक गाणी म्हणत त्याला नाचायला प्रवृत्त करतात. मधल्या सुट्टी मध्ये मुलांकडे तसे कोणाचेच लक्ष नसते, हा फायदा घेऊन, सगळी मुले गोल बसत, आणि आणि एखाद्या चित्रपटातले कॅब्रे चे गाणे म्हणत आनंदला नाचायला सांगत.

    त्यांचा फाजील प्रकार पाहून आम्ही मुली मात्र वर्गाच्या बाहेरच पडत असू.

आनंद अभ्यासात चांगला होता, कंप्यूटर मध्ये त्याची फारच गती होती. गणितामध्ये फिजिक्समध्ये, फटाफट गणिते सोडवायचा. पण मग मधल्या सुट्टीत त्याला काय व्हायचं, एकदम तो नाचायला सुरुवात करायचा. त्याची कुरळी केसांची जुल्फे उडवत, भुवया पण उडवायचा. यांचे गाणे आजा आजा मै हू प्यार तेरा, या गाण्यावर अक्षरशहा धिंगाणा- धिंगाणा घालायचा.

इयत्ता सातवी मधली शाळेची ट्रिप तर कायम स्मरणात राहिली. त्यावेळेस ट्रिप काय, म्हणजे दौलताबादचा किल्ला, नाहीतर अजंठा, किंवा वेरूळच्या लेण्या. बाकी काही आम्हाला माहितीच नव्हतं.

  वेरूळच्या लेण्या मध्ये जायचं ठरले. दोन दिवसाची होती सहल. पहिल्या दिवशी दौलताबादचा किल्ला पाहून,

दौलताबाद जवळच्या हॉटेलमध्ये रात्री राहणार होतो, आणि दुसऱ्या दिवशी खुलताबाद वेरूळ असे सगळे बघून आम्ही संध्याकाळी परत येणार होतो.

सातवीच्या चार बसेस गच्च भरल्या होत्या. मुले, मुली आनंदात निघाले.

 सकाळी दहा वाजता किल्ला चढायला सुरुवात केली, भारत मातेच्या देवळामध्ये, सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला. आता वीस विद्यार्थ्यांचे ग्रुप करून प्रत्येकाबरोबर एक शिक्षक आणि एक गाईड असे सगळे किल्ला बघण्यास निघाले. त्या अंधार्‍या रस्त्यामध्ये जेव्हा गाईड माहिती देत होता तेव्हा अचानक आनंद च्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. सगळ्या मुलांना अंधार्‍या बोगद्यातून बाहेर कडून शिक्षकांनी हजेरी घेतली.

आनंदच्या ओठातून रक्त येत होते. शिक्षकांनी त्याला बाजूला घेतले, आणि सावकाश सगळी चौकशी केली. अंधाराचा फायदा घेऊन, कोणीतरी आनंदाचा करकचून मुका घेतला होता. त्याच्या ओठांना अक्षरशहा चावले होते. आनंद भयंकर घाबरलेला होता. पूर्णवेळ आनंद शिक्षकान सोबतच राहिला. कोणाला काहीही न सांगण्याबद्दल बजावून शिक्षकांनी सगळ्या मुलांना दौलताबाद किल्ला फिरवून आणला.

   समोरच्या हॉटेलमध्ये संध्याकाळी कॅम्प फायर होते. मुली आणि मुले, मोठे मोठे गोल करून बसले होते. बरेचसे बैठे खेळ, गाणी, गप्पा भेंडी, भेंड्या अशी मजा चालली होती. मधेच आनंद बाथरूमला जाण्यासाठी म्हणून उठला, शिक्षकांना विचारुन खोलीकडे निघाला, तेवढ्यात अजून चार-पाच मुले कुठली आणि आनंद ला म्हणाली," आम्ही पण येतो." त्याचे वर्गमित्र म्हणून आनंदात यांच्याबरोबर जाऊ दिल.

परत तेच, दहाच मिनिटात, आनंदच्या खोलीतून जोरात किंचाळण्याचा आवाज यायला लागला. शिक्षक धावले, पॅन्ट वरती हात पकडून आनंद गडबडा लोळत होता. ताबडतोब आनंदला औरंगाबादच्या सिविल हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले ते ऐकून यांच्या आईला तर चक्करच आली. आनंद चे वडील पांढरे फटक पडले. आनंद वर बळजबरी झाली होती.

त्याच्या बरोबर केलेल्या चार मित्रांना त्यांच्या पालकांबरोबर घरी पाठवण्यात आले आणि दोन महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आले.

तेव्हापासून आनंद गप्प गप्प राहू लागला, शाळेतून चांगल्या मार्कांनी दहावी तर पास झाला पण त्याच्या नंतर मात्र आनंद बरोबरचा संपर्क तुटला.

कानावर उडत-उडत बातम्या येत होत्या, आनंद नॉर्मल नाही, त्याच्या मनावर प्रचंड आघात झालेला होता. सतत कानावर आलेल्या बातम्यांनुसार आनंद मुलगा असूनही मुलींसारखे वागत होता, आणि शेवटी "त्या" येऊन आनंदला स्वतःबरोबर घेऊन गेल्या.

एवढा हुशार देखणा मुलगा, त्याच्या आयुष्याची वाताहत झाली.

     त्या दिवशीच्या प्रवासात अचानक माझ्या मनात एक कल्पना आली, आमच्या शाळेचा ग्रुप फोटो वरून मी आनंद चा फोटो मोठा करून घेतला आणि नूरबानू च्या हातात दिला. तिला म्हटलं," बघ हा कुठे सापडतो का, तुमच्या जमातीतला आहे."


     नूरबानू हसली, म्हणाली," दिदी जरूर! लेकिन आप मिलके क्या करोगे? हम जैसे लोगोन से आपका क्या काम?"

तरीपण दोन महिन्यानंतर नेहमीप्रमाणे नूरबानू टाळ्या वाजवत आली, माझ्या पाशी येऊन म्हणाली “बाजू की कंपार्टमेंट , नंबर 32."


    ताबडतोब उठून मी बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये गेले, सीट नंबर 32 वर, लाल घागरा आणि चमचमणारे ओढणी घेतलेली, लाल लिपस्टिक लावलेली, डोळ्यात सुरमा, मोठे चमचमणारी बिंदी, कोरलेल्या भुवया, खांद्यापर्यंत असलेले कुरळे केस, हातावर लावलेली मेहंदी, असणारी कोणीतरी बसली होती होती. तिच्या शेजारची सीट रिकामी असल्यामुळे मी तिथे बसले. त्याच्याकडे निरखून पाहत असताना नूरबानू तिथे आली, म्हणाली," ये रेशमी, पेहचान ना?"

माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, आनंदाची रेशमी झालेली होती.

मी हळूवार आवाजात हाक मारली," आनंद "

रेशमी ने ताडकन माझ्याकडे वळून बघितलं, काय नव्हते तिच्या डोळ्यात, लाज, शरम, स्वताची स्वतःबद्दल वाटणारी किळस, करुणा.

तिचे डोळे पाण्याने डबडबून आले.

  आनंद बोलायला तयार नव्हता, पण शेवटी मी त्याला बोलते केले, आपली कहाणी सांगताना, आनंद परत परत रडत होता.

शरीरातले बदल त्याला जाणवत होते, स्वतः मुलगा की मुलगी या संभ्रमात पडला होता. शाळेमध्ये असताना शाळेच्या स्वच्छतागृहात त्याच्या वर्ग मित्रांकडून त्याच्या वरती बऱ्याच वेळेला बळजबरी होत असे. लाजे मुळे कोणापाशी बोलू शकत नसे.

   कॉलेजमध्ये गेल्यावरती त्याच मुलांनी त्याचा पाठलाग केला, तेव्हा नाईलाजास्तव त्यांनी स्वतःचे घर सोडले आणि ह्या लोकांमध्ये तो सामील झाला. इतका हुशार आनंद, आता टाळ्या वाजवत भीक मागत होता. अतिशय लाजिरवाण जगत होता.

     . मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंद ला समजावून सांगितले, "आनंद तुझ्या जो काही बदल झाला तो सगळा नैसर्गिक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये लाज वाटण्याचे काहीच कारण नाही." मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंद ला माझ्याबद्दल विश्वास वाटत होता. मी त्याला म्हटले," हे असले जगण्यापेक्षा तू ऑनलाईन ट्युशन क्लासेस घे. किंवा काहीही कर पण हे असले लाजिरवाण जगू नकोस.

ऑनलाईन क्लास घेत असल्यामुळे तुझं कोणाशी संपर्क येणारच नाही. तुझं गणित, फिजिक्स, कंप्यूटर एवढं चांगलं होतं, यामध्ये अजून अभ्यास कर, करेस्पोंडेन्स ने डिग्री मिळवून स्वतःच्या पायावर उभा राहा. मी तुला मदत करीन. तुझ्या समाजातील हुशार मुलांना देखील तू मार्गदर्शन कर."

माझी कल्पना आनंद ला पटली. नूरबानू माझ्या जवळ आली आणि म्हणाली” मी पण येऊ का?”

   दोघांना घेऊन मी मुंबईच्या माझ्या घरी आले. मनामध्ये संभ्रम होता, काहीतरी करायचं होतं. शेवटी आनंद माझा बालमित्र होता.

पहिल्यांदा दोघांसाठीही व्यवस्थित कपडे खरेदी केले, आणि जवळपास महिनाभर त्यांना घरातच ठेवून कंप्यूटर चे ट्रेनिंग दिले.

आनंद हुशार असल्यामुळे तो पटापट शिकला, त्याने नूरबानू ला पण शिकविले. सुरुवातीला माझ्या हॉस्पिटलमध्ये आनंदला आणि नवीनला मी काम दिले. हळूहळू त्यांचा जम बसला. एसएससी च्या मुलांसाठी आनंदने बरेचसे धडे ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड केल केले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन पद्धतीमुळे कोणाशी संपर्क येतच नसेल त्यामुळे आनंद आहे का रेशम आहे हे कोणाला कळत नसे. सगळं काही

व्यवस्थित चालत असताना देखील, प्रत्येक पंधरा दिवसात आनंद ला रेशम व्हायला वाटे, घागरा घालून, घेऊन नाच करायला त्याला फार आवडे.

आनंदच्या आई-वडिलां ना फोन करून आनंद सापडल्याचे सांगितले. आई-वडिल आधीच घर सोडून आता पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड मध्ये लहानसे घर बांधून राहत होते. आई-वडील येऊन आनंदला आणि नवीन [ नूरबानू] ला घरी घेऊन गेले. नवीन जागा ओळखीचे कोणी नाही यामुळे आनंदला पुष्कळ मोकळीक मिळत होती होती.

   आनंदाने स्वतःचे कम्प्युटर क्लासेस चालु केले, सुरुवातीला फार कमी मुलं येत होती, पण हळूहळू जम बसला. त्याची नाचण्याची इच्छा मधून मधून डोके उफाळून वर काढा काढायची. एकदा मी त्याला सुचवले की माझ्या ओळखीचे कोरिओग्राफर आहेत त्यांच्याबरोबर तू काम कर.

व्यवस्थित रित्या डान्स क्लास मध्ये काम करून स्वतःच्या नाचण्याची हाऊस आनंद भागवू लागला. त्याच्या क्लास मध्ये मुली पण बिनधास्तपणे येत, कारण किन्नर कडून मुलींना तसा काहीच धोका नव्हता. आता आनंद आणि नवीन दोघेजण घर घेऊन एकत्रच राहतात. बाजूच्याच घरात त्यांचे आई-वडील आहेत. त्यांचे भावंडे पण त्यांना विचारायला लागली आहेत. किन्नर होणे हे आपल्या हातात नसते, पण एखादा जर किन्नर असेल तर त्याला जातीबाहेर टाकून त्याच्याकडून लाजिरवाणी काम करून घेण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानाने जगवणे योग्य नाही का?

आनंद आणि नवीन यांनी त्यांच्या सारख्या बऱ्याच मुलांना आपल्या घरामध्ये सामावून घेतले आहे. हरीमने आणि फाल्गुनने तर बँकेकडून लोन घेऊन रिक्षा घेतली आहे. लहान मुलांना शाळेत ने आण करण्याचे काम ते दोघेजण व्यवस्थित करतात.

रहीम आणि राहीने शिलाई मशीन घेऊन कपडे शिवायचे काम चालू केले आहे.

राणी आणि श्यामाने कम्प्युटर टायपिंग करून टायपिंग आणि झेरॉक्स चे मशीन टाकले आहे. आता कोणीही रस्त्यावर भीक मागत नाही, किंवा साध्या वडापावसाठी आपल् शरीर विकत नाहीत. सगळ्यांनी काही ना काही तरी काम शिकून स्वतःच्या पायावर उभे राहणे पसंत केले आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy