खरा मित्र..
खरा मित्र..
अवंतीपूर नगरी- राम व श्याम नावाचे दोन मित्र-जंगलातून प्रवास समोरून येत असलेले अस्वल-श्याम चे झाडावर चढणे राम बेशुद्ध असल्याचे सोंग करून राहतो-अस्वल हुंगून निघून जातो- श्याम झाडावरून खाली उतरतो - अस्वलाने कानात सांगितलेली गोष्ट-संकटकाळी पळून न जाणाराच खरा मित्र - संदेश
अवंतीपूर नावाची एक नगरी होती. अवंतीपूर नगरी खूप मोठी आहे गजबजलेली अशी होती. यात दोन अत्यंत जिवलग मित्र राहत होते. त्यातील एकाचे नाव राम व दुसऱ्याचे नाव श्याम असे होते. राम आणि श्याम एकमेकांचे खूप घानिष्ठ असे मित्र होते.
लहानपणापासूनच राम आणि श्याम ह्यांची मैत्री संपूर्ण अवंतीपूर नगरीमध्ये प्रसिद्ध होती. आता मात्र राम आणि श्याम मोठे झाले होते व त्यांनी दोघांनी मिळून स्वतःचा एक व्यवसायही सुरु केला होता. व्यवसायानिमित्त राम आणि श्याम दोघांनाही ही नगरीबाहेर जा ये करावी लागत असे. ते दोघे असे अनेकदा व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या नगरामध्ये जात असायचे.
असेच एके दिवशी ते दोघे दुसऱ्या नगरात जात होते. जाण्यासाठी जो रस्ता लागला होता तो काहीसा दाट जंगलाचा रस्ता होता. त्या जंगलातून जाताना ते दोघेही काहीसे घाबरले होते. परंतु आपण एकमेकांची साथ आहेच मग कशाला घाबरायचे असे म्हणत ते दोघे त्या जंगलातून वाट काढीत जात होते.
जंगल तसें घनदाट असल्यामुळे तेथे अनेक हिंस्र प्राणी असू शकतात ह्याची पूर्ण कल्पना त्या दोघांनाही ही होती. परंतु कामासाठी जाण्यासाठी त्या जंगलतूनच जाण्यापलीकडे राम आणि श्याम यांच्यासमोर काही पर्याय नव्हता म्हणून ते दोघे काहीसे घाबरतच तेथून चालू लागले.
जंगलातून काही अंतर चालल्यानंतर राम आणि श्याम ह्याच्या समोर एक भला मोठा काळा अस्वल समोर येताना दिसला. इकडे तिकडे पळण्यास काहीही पर्याय त्या दोघांनाही दिसत नव्हता कारण समोर आलेला अस्वल खूपच जवळ आलेला होता. अश्या वेळी राम आणि श्याम दोघेही खूपच घाबरून गेले होते. दोघांनाही आता काय करावे सुचत नव्हते. आजूबाजूला फक्त झाडेच होते आणि अस्वलासमोरून पळण्यासाठी काहीही पर्याय दिसत नव्हता.
आता मात्र आपल्या दोघांचे मरण पक्के आहे असा विचार त्या दोघांच्या ही मनात येत असतानाच अचानक श्यामच्या लक्षात आले की आपण शेजारीच असलेल्या झाडावर चढलो तर कदाचित आपला जीव वाचू शकेल. श्यामच्या हे लक्ष्यात आल्यावर त्याने एका क्षणाचा ही विलंब न करता तो पटापट शेजारीच असलेल्या मोठ्यां झाडावर जाऊन बसला.
राम हे बघतच राहिला की आपला मित्र आपल्याला भयंकर अश्या विक्राळ अस्वलासमोर एकट्याला सोडून झाडावर जाऊन बसला आहे. रामला झाडावर चढता येत नव्हते त्यामुळे तो खालीच उभा राहिला. श्यामाला ही हे चांगले माहित होते की रामला झाडावर चढता येत नाही तरीही त्याने आपल्या मित्राचा एक क्षणही विचार केला नाही आणि आपला जीव वाचविला.
राम समोर आता काहीही पर्याय उरला नव्हता त्यामुळे आता आपले मरण अटळ आहे हे ओळखून त्याने जमिनीवर बेशुद्ध असल्याचे नाटक केले. काही वेळातच अस्वल रामच्या जवळ आले व त्याने रामला थोडा वेळ हुंगले व त्याला काहीही न करता अस्वल शांतपणे निघून गेले. श्याम झाडावर बसून हे सर्व दृश्य बघत होता. जसा अस्वल रामला हुंगून त्याला काहीही इजा न करता तेथून निघून गेला हे बघून त्याला आश्चर्य वाटले व हे दृश्य बघून लगेच श्याम झाडावरून खाली उतरुन रामच्या जवळ जाऊन बघू लागला.
राम जमिनीवर पडून बेशुद्धीचे नाटक करत होता तो ही अस्वल तेथून निघून गेल्यावर लगेच उठून उभा राहतो. श्यामला वाटते की अस्वलाने रामच्या कानात काही तरी सांगितले म्हणून त्याने रामला विचारले की अस्वल तुला काही तरी कानात सांगून गेला आहे ते काय सांगितले?
रामने श्यामकडे बघितले आणि त्याला ते संपूर्ण दृश्य परत आठवले की आपला जिवलग मित्र स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कसा आपल्याला एका अस्वलाच्या स्वाधीन सोडून स्वतः झाडावर जाऊन बसला होता. त्याला श्यामच्या त्या कृत्याबद्दल खूप वाईट वाटते व तो श्यामला बोलतो की अस्वल माझ्या कानात हे सांगून गेला की संकटकाळी जो आपल्याला सोडून पळून न जाणारच आपला खरा मित्र असतो. रामने हे असे बोलल्यावर श्यामला स्वतःची चूक लक्षात आली व त्याने रामची मनापासून माफी मागीतली.
तात्पर्य -संकटात मदत करतो तोच खरा मित्र..
