STORYMIRROR

kanchan chabukswar

Tragedy

2  

kanchan chabukswar

Tragedy

काय म्हणू?

काय म्हणू?

1 min
149

अरे, काय केलेस हे?

कोण म्हणू तुला? मित्र, सखा?

नाती रक्ताचीच असतात का?

प्रवाहात वाहताना आदळलेला एखादा जिवलग होउन जातो, पण म्हणुन काहि प्रत्येकाबरोबर जन्माची गाठ बांधत नाहि कोणी.

अभ्यासासाठी म्हणुन घरी येणारा तू, मी फक्त वर्गमित्र म्हणुनच वागलेरे. तू का बर असा समज केलास?

मला आपल्या गावंढ्या गावात रहायचेच नव्हते , कफल्लक मित्राबरोबर तर नाहिच नाही.

आमच्या घरातल्या पाहुणचाराचा अर्थ तू भलताच का घेतलास? 

तू पण तर माझ्या वडिलांच्या वागणुकिचा डंका पूर्ण गावात वाजवलास, मला माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाने सांगितले. राजु तुझ्याबद्दल काय म्हणाला,” अस्तनीतला साप”

तुला तुझ्या आईकडे बघुन आम्ही सहन करत होतो.

वेळी अवेळी तुझे घरी येणे पण मला आवडत नव्हते, आई म्हणाली,” येवू दे “

उगीच सुतावरुन स्वर्ग गाठलास. आणि आतातर सरळ आत्महत्या।

ए मी जबाबदार नाही. मला काहि माझा चोईस आहे कि नाहि? मला येवढा कमअक्कल, कमकुवत जोडीदार मला नकोच होता, तुला पण तुझ्यासारखी कोणीतरी मिळालाच असती ना रे.

तुझ्या मुर्खपणाला तूच जबाबदार आहेस, हे सगळ्यंना माहित आहे.

पुढच्या जन्मी असं नको वागू.

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy