Nilesh Bamne

Inspirational

3  

Nilesh Bamne

Inspirational

कारखाना...

कारखाना...

15 mins
1.8K


कारखाना...

प्रेम इंडस्ट्रियल इस्टेट ! दोन मजल्याची इमारत , ज्यात प्रत्येक मजल्यावर दहा कारखाने, दोन्ही बाजूला भक्कम जिने, जिन्याला लागून २०६ नंबरचा कारखाना. सकाळी १० ची वेळ त्या कारखान्याचा टाळा उघडण्याचा केविलवाणा प्रयत्न एक सुंदर तरुणी करत होती इतक्यात जिन्यावरून एक साधारणतः अव्यवस्थित असणारा ,ज्याचे केस खांद्यापर्यत वाढलेले, दाढी मिशा गवतासारख्या वाढलेल्या, चेहरा किंचित काळपटसा, मध्यम उंची , पोट वाढलेले आणि अंगावर इस्त्री न केलेले चुरगळलेले कपडे चढवलेला एक पुरुष समोरून येताना दिसला. त्याला पाहताच ती तरुणी त्याच्याकडे पाहून गोड हसली आणि त्याला म्हणाली, प्लिज टाळा उघडून देता का ? माझ्याकडून नाही उघडत ! त्यावर तो काहीच म्हणाला नाही पण त्याने तिच्या हातातून चावी घेतली तेंव्हा त्याच्या हाताचा हलकासा स्पर्श तिच्या नाजूक हाताला झाला. त्याने तो टाळा सहज उगडला त्यावर ती त्याला पुन्हा गोड हसून थॅंक्यु !!! म्हणाली. पण त्यावरही तो काहीच म्हणाला नाही. तिची चावी तिच्या हातात देत तो सरळ पुढे गेला आणि त्याने त्याच्या जवळच्या चावीने त्या मजल्यावरील शेवटचा २०५ नंबरचा कारखाना उघडला. तेव्हाही ती तरुणी बाहेर दारातच उभी होती त्याला पाहत ! ती दरवाजा आत ढकळणार इतक्यात त्या कारखान्यात काम करणारे कामगारही कामावर आले. त्यातील एक कामगार त्या तरुणीला म्हणाला, " विजया मॅडम ! टाळा उघडायला त्रास नाही ना झाला ? त्यावर ती म्हणाली, हो ! त्रास झाला म्हणजे काय ? माझ्याच्याने टाळा उघडतच नव्हता. त्या २०५ मध्ये कोणीतरी कामगार आहे त्यांना सांगितलं त्यांनी उघडला ! इतक्यात त्या कारखान्याचे मालक चव्हाण साहेब तेथे आले त्यांनी हा संवाद ऐकला आणि ते त्या कामगाराला म्हणाले, आजच !आताच ! नवीन टाळा विकत घेऊन ये ! कामाच्या धावपळीत तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळची तीच वेळ विजया कारखान्याचा दरवाजा उघडत असताना तोच माणूस जिना चढून वर आला आणि विजयाला म्हणाला, "चव्हाण साहेबांनी टाळा बदलला वाटतं, त्यावर तिने गालात गोड हसून मानेनेच होकार दिला. तुम्ही येथे नवीन कामाला राहिला आहात का ? त्यावर विजया म्हणाली, "नाही मी त्यांची बहीण आहे विजया चव्हाण ! तरीच चव्हाण साहेब हल्ली आरामात येतात. बरं ! बरं ! म्हणत तो आपल्या कारखान्याच्या दिशेने निघून गेला. बोलण्यावरून तरी विजयाला तो माणूस खूपच साधा - भोळा वाटला.

तो माणूस त्याच्या कारखान्याच्या दिशेने चालत जाताना वाटेतील प्रत्येक जण त्याला " गुड मॉर्निंग" म्हणत होता. विजयाला का कोणास जाणे हे फारच विचित्र वाटले. इतक्यात एक कामगार कामावर आल्यावर तिने त्याला विचारलं त्या २०५ नंबर मध्ये कसला कारखाना आहे ? त्यावर तो म्हणाला, इंजिनीअरिंग !!! तो दिवसही तसाच गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा विजया कारखाना उघडून दरवाज्यात उभी होती इतक्यात तो माणूस समोरून जिने चढत वर आला. त्याला पाहताच ती हसून त्याला "गुड मॉर्निंग " म्हणाली, त्यावर तो तिला म्हणाला , "शुभ सकाळ ! " त्यामुळे विजयाही पुन्हा त्याला "शुभ सकाळ !" म्हणाली . आता मात्र विजयाला तो माणूस किंचित विचित्र वाटला कारण तिच्या उभ्या आयुष्यात तिला "शुभ सकाळ" म्हणणारा हा पहिलाच होता. ती "शुभ सकाळ" म्हणत स्वतःशीच हसत होती इतक्यात तिचा भाऊ कारखान्यात येताच ती त्याला म्हणाली, शुभ सकाळ ! रमेश दादा ! त्यावर तोही तिला निर्विकारपणे " शुभ सकाळ " म्हणाला हे मात्र विजयाला अधिकच विचित्र वाटलं ! कामाला सुरुवात झाल्यावर रमेश कारखान्यातील एका कामगाराला म्हणाला, २० ५ मधे जा आणि नितेश सरांना;" मी एक डिजाईन मेल केलेय ती जरा बघायला सांग ! " असेच दोन - चार दिवस गेल्यावर एका सकाळी विजया दारात उभी असताना तो माणूस समोरून आला , तो फोनवर चक्क इंग्रजीत बोलत होता...तेंव्हा विजया त्याला शुभ सकाळ ! म्हणाली पण तो तसाच मोबाईलवर बोलत पुढे गेला आणि बोलणं संपल्यावर परत माघारी फिरला आणि तिला म्हणाला, सॉरी ! सॉरी !! मगाशी मी मोबाईलवर बोलत होतो म्हणून तुमच्या "शुभ सकाळ" ला रिप्लाय नाही दिला. आता तर तो माणूस विजयाला आणखी विचित्र वाटू लागला होता. इतक्यात रमेश तिथे आला तो त्याला शुभ सकाळ म्हणाला आणि त्याच्या केबिन मध्ये गेला...विजयाने स्वतःलाच प्रश्न विचारला हा माणूस नक्की काय प्रकार आहे ? बोलणं संपल्यावर रमेश त्याला पुन्हा दारापर्यत सोडायला आला. न राहून विजयाने रमेशला प्रश्न केला ? हा माणूस नक्की काय प्रकार आहे ? त्यावर रमेश तिला हसून म्हणाला , हा माणूस कळायला एखाद्याला आयुष्यही कमी पडेल. जाऊदे ! तुला नाही कळणार !!

आता मात्र विजयाच्या डोक्यात तो माणूस भिनायला लागला होता ती स्वतःशीच विचार करत होती या सामान्य माणसाचे ! साऱ्यांना काय ते इतके कौतुक ?

त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या सुट्टीत बाहेर शतपावली करत - करत विजया गाला नं. २०५ पर्यत पोहचली त्या गळ्याचा दरवाजा उघडाच होता तेथे तो माणूस मळकटलेले कपडे घालून मिलिंग मशीनवर काम करत होता. त्या कारखान्यात पाच - सात मशीन होत्या पण तो आणि आणखी एक माणूस असे दोघेच काम करत होते. आता विजयाला कळून चुकलं होतं की तो या कारखान्यात काम करणारा एक सामान्य मशिनिस्ट आहे. ती तशीच माघारी आली आणि तिचा संगणक सुरू केला तर तो सुरूच होत नव्हता म्हणून तिने रमेशला सांगितले असता त्याने एका कामगाराला सांगून नितेशसाहेबांना बोलावून घेतले तर तोच माणूस त्याच मलक्या कपड्यात तेथे आला आणि त्याने काय झालं ? असं विचारलं त्यावर रमेश त्याला म्हणाला, " हा संगणक बंद पडलाय! बघ जरा त्याला काय झालंय ? हे ऐकून विजयाला तर त्याच्या समोर हात जोडावेसे वाटत होते पण त्याने हात लावताच पुढच्या मिनिटाला संगणक सुरू झालेले होता. हा विजयासाठी एक सुखद धक्का होता. इतक्यात चहा वाला चहा घेऊन आला त्यानेही कोणी काही न बोलताही नितेश साहेब ! म्हणत चहाचा कप त्याच्या हातात दिला. चहा पिता - पिता विजयाने सहज नितेशला प्रश्न विचारला , " काय झालं होतं कॉम्प्युटरला ? त्यावर तो म्हणाला , "काही नाही रॅमचा प्रॉब्लेम होता. त्यावर विजया त्याला थँक्स म्हणल्यावर तो तिला म्हणाला, त्याची काही गरज नाही हे माझ्या घरचच काम आहे ! त्यावर रमेश हसत त्याला म्हणाला, " तू ही आमच्या घरचाच आहेस की. नितेश निघून गेल्यावर विजया स्वतःशीच म्हणाली , हा माणूस दिसतो भोळसट पण खूप कामाचा असावा नाहीतर माझा दादा त्याला घरचाच का म्हणेल ? त्यांनतर विजयाने नितेेशला गुड मॉर्निंग आणि त्याने तिला शुभ सकाळ ! म्हणणे रोजचेच झाले एक दिवस विजया तिच्या कारखान्याची चावी घरीच विसरली त्यामुळे ती रमेश चावी घेऊन येण्याची वाट पाहत कारखान्याच्या बाहेरच उभी होती तितक्यात नितेश समोरून आला आणि त्याने चौकशी केली आणि तो विजयाला त्याच्या कारखान्यात घेऊन गेला तिला बसायला खुर्ची वगैरे दिली गप्पा मारता - मारता तिला कळले की नितेश त्या कारखान्यातील कामगार नसून मालक आहे. त्याने तयार केलेल्या वस्तू ती कुतूहलाने पाहत होती. विजयाने सहज त्याला प्रश्न केला , तुम्ही इंजिनीरिंगच काम करणारा कारखाना का काढलात ? त्यावर विजय तिला हसून म्हणाला , मला नवनिर्मिती करायला आवडते आणि यंत्रांचं म्हणाल तर माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मला घाम गाळायला आवडतो खुर्ची गरम करण्यापेक्षा ! याचा अर्थ खुर्ची गरम करणारे काम करत नाहीत अस नाही म्हणायचं मला पण ते नवनिर्मिती नाही करत , माझा आणि संगणकाचा सबंध आला तो ही नवनिर्मितीसाठीच आणि मी त्याच्याकडेही एक यंत्र म्हणूनच पाहतो. तो माझ्या जगण्याचा भाग वगैरे नाही , तिने लगेच पुढचा प्रश्न केला , तुमचं लग्न झालंय का ? त्यावर नितेश म्हणाला , नाही ! म्हणजे मला लग्न या गोष्टीतच कधी फार रस नाही वाटला. त्यावर विजया हळूच उपहासाने म्हणाली , रस नाही वाटला की कोणी कधी भेटलीच नाही ? त्यावर नितेश म्हणाला , हो ! कदाचित !! भेटलीच नाही !!! पुढे संवाद होणारच होता इतक्यात रमेश चावी घेऊन आल्यावर ती निघून गेली.

त्यानंतर काही दिवसांनी नितेश समोरून येताना दिसताच विजया त्याला म्हणाली, काल जर मी माझ्या मैत्रिणीसोबत कवि संमेलनाला आले नसते तर तुम्ही कवी आहात हे मला कधी कळलेच नसते , किती छान कविता लिहिता तुम्ही ! माझी मैत्रीण तुमची खूप स्तुती करत होती तिने मला तुमचा प्रकाशित झालेला कवितासंग्रह दाखवला त्यातील कविता खुपच छान आहेत, मला एक कॉपी द्याल का ? त्यावर नितेश म्हणाला, नक्कीच ! का नाही ? आणि तो निघून गेला. कालच्या कविसंमेलनात नितेशला भेटण्यासाठी आतुर असलेल्या आणि त्याच्या जवळ घुटमलणाऱ्या, त्याच्या सोबत सेल्फी काढणाऱ्या तरुणी विजयाला अजूनही डोळ्यासमोर दिसत होत्या . ती स्वतःशीच म्हणाली, " आजच्या तरुणींना कवी हे असेच वेड्यासारखे दिसणारे आवडत असावेत. रमेश आल्यावर विजयाने त्याला प्रश्न केला," दादा तू मला सांगितले नाहीस नितेश साहेब कवी आहेत म्हणून ? काल मी मैत्रिणीसोबत ज्या कवि संमेलनाला गेले होते तेथे ते कविता सादर करायला आले होते. त्यावर रमेश म्हणाला, मला वाटलं तुला माहीत असेल हे ! आपल्या घरात तुझ्या वाहिनीकडे त्याची बरीच पुस्तके आहेत. त्यावर विजया काहीच म्हणाली नाही , त्या दुपारी ती शतपावली करत त्याच्या कारखान्यात गेली तर नितेश पोळी - भाजी खात होता त्याने विजयला औपचारिकता म्हणून जेवणाचे आमंत्रण दिले असता ती म्हणाली, आज बुधवार आहे आणि तुम्ही पालेभाजी खाता ? त्यावर तो म्हणाला, हो ! मी शाकाहारी आहे ना ! त्यावर विजया म्हणाली , डबा कोण तयार करतो ? त्यावर नितेश म्हणाला, माझी आई नाहीतर बहीण दोघीही नसतील तर मी स्वतः पण शेजारणीला बोलवत नाही !! त्यावर हसत विजया म्हणाली तुम्हाला सुरणाची भाजी आवडते वाटतं ? त्यावर नितेश म्हणाला , हो ! मी सुरणाची भाजी औषध म्हणूनही खातो ! मग विषय बदलून विजया म्हणाली , एखादी नवीन कविता लिहिली की नाही ? त्यावर तो म्हणाला, हो लिहिली ना ! तुझा व्हाट्स अँप चा नंबर दे रात्री पाठवतो ! तिने नंबर एका कागदावर लिहून दिला. त्यांनतर त्यांच्यातील संवाद बऱ्यापैकी रंगू लागला . आता मात्र नितेश हा विजयाच्या अभ्यासाचा विषय झाला होता.

एक दिवस विजयाच्या कारखान्यातील एक मशिन बंद पडली असता रमेशने नितेशला बोलावून घेतले त्याने ती मशीन खोलून काही तासात दुरुस्त करून दिली आणि तो निघत असताना रमेश त्याला म्हणाला," उद्या माझ्या वाढदिवसाची पार्टी आहे तू यायचं आहेस ! मी व्हाट्स अँप केलाय तुला !! पार्टीत विजया नितेश येण्याची अतुरतेने वाट पहात होती इतक्यात तिला समोरून एक राजबिंडा माणूस येताना दिसला. त्याच्या सोबत एक अतिशय सुंदर तरुणी होती आणि तो हातात फुलगुच्छ घेऊन सुटाबुटात चकाचक होऊन आला होता. तो समोरून येताना दिसताच रमेश आणि तिची वहिनी त्याला नितेश अशी हाक मारत सामोरी गेले तेव्हा कोठे विजयाने त्याला ओळखले. नितेश सोबत आलेल्या तरुणीने तिच्या वहिनीला आलिंगन दिले विजया लांबूनच हे सारे पहात होती कारण नितेशचे हे बदललेले रूप ती पहिल्यांदाच पहात होती. एखाद्या चित्रपटातील नायक शोभावा असा दिसत होता तो. तरी रमेशने हाक मारल्यामुळे ती पुढे गेली असता तिची वहिनी तिला म्हणाली , हा माझा मित्र नितेश जाधव ! कवी, लेखक , पत्रकार आणि बरंच काही, ही त्याची बहीण नीलम ! विजयाने पुढे जाऊन निलमला हाय! केलं आणि तिला घेऊन आत गेली. त्या पार्टीत आलेले बहुतेक लोक नितेशला ओळखत होते आणि त्याच्यासोबत सेल्फी काढत होते. विजयाने न राहून नीलमला प्रश्न केला , "तुझा दादा इतका सुंदर दिसतो तरी संन्याशी होऊन का राहत होता इतके दिवस ? " त्यावर नीलम म्हणाली, तो असाच आहे बाह्य गोष्टींचा आता त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही ! तो लग्न का करत नाही ? त्यावर नीलम म्हणाली , " मी नाही विचारलं कधी पण तो नाही करत म्हणजे तस न करण्याच नक्कीच त्याच्याकडे काहीतरी ठोस कारण असेल. तुझ्या दादा - वहिनीची ओळख त्यानेच करून दिली. त्यानंतर उपस्थित लोकांनी खूप आग्रह केल्यावर नितेशने त्याच्या काही कविता वाचल्या. पार्टी रंगल्यावर विजया नितेशला एकटीच भेटली असता त्याला स्वतःचे कान पकडत सॉरी ! म्हणाली , त्यावर नितेश हसला असता ती म्हणाली, किती भेटल्या होत्या ? त्यावर तो म्हणाला, बारा ! त्यावर विजया हसून म्हणाली , म्हणजे आता एक तप संपल ! त्यावर विजय हसून म्हणाला आकाशातील चंद्र आणि मी सारखाच आहे डागाळलेला ! पण त्या मात्र चांदण्या होत्या चमचमणाऱ्या, तू ही एक चांदणीच आहेस ! त्यावर विजया म्हणाली पण मी रोहिणी आहे ! त्यावर स्वतःला सावरत विजय म्हणाला, नको होऊस तू रोहिणी तुला चंद्राची वेदना नाही सहन होणार ! त्यावर विजया त्याला विनोद समजून हसली खरी ! पण विजय मात्र हलवा झाला. विजयाने विषय बदलत नितेशला प्रश्न विचारला, नीलम म्हणत होती तुम्ही उत्तम चित्रकारही आहात ? मग चित्रकार का नाही झालात ? त्यातही नवनिर्मिती असते ? त्यावर विजय म्हणाला, चित्रात जग बदलण्याची ताकद तितकी नसते जितकी शब्दात असते म्हणून ! तुम्हाला तर सारंच उत्तम येत , दिसायलाही बरे आहात म्हणजे आज बरे दिसताय ! असे असतानाही त्या बारा जनीपैकी एकही तुमच्यासोबत लग्न करायला तयार झाली नाही ? त्या बाराजणी काय तुम्हाला हवा घालायच्या की तुमच्या कवितांवर टाळ्या वाजवायच्या ? त्यावर नितेश म्हणाला, त्या माझ्यावर प्रेमच करायच्या पण मी लबाड होतो , माझी स्वप्ने मोठी होती, त्या स्वप्नामागे मी वेडा होतो कारण तेव्हा माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारे सारेच माझ्याकडे होते, आताही आहे पण नाही तो पूर्वीचा आत्म विश्वास आणि ते सुंदर शरीर जे पाहून तरुणी माझ्या प्रेमात पडायच्या, आता तर मी पळत असतो त्यांच्यापासून दूर, म्हणूनच राहतो मी सन्याशासारखा पण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस म्हणून चकाचक होऊन आलो कारण त्याच्याइतका प्रिय मला या जगात कोणीच नाही . माझा आता तुला जो सुंदर चेहरा दिसतोय तो ही डागाळला होता काही दिवसपूर्वी ! माझे शरीर तर आताही डागाळलेले आहे. मी किती विचित्र मनस्थितीत जीवन जगत आहे याची तू कल्पनाही नाही करू शकत. मला माझ्या यशाच्या दिशेने गरुडझेप घ्यायची होती पण विधात्याने माझे पंख छाटले. ज्याच्या प्रत्येक मिनिटाला किंमत मिळू शकते असा मी आता फक्त दिवस ढकळतोय आज हे सारं ऐकताना विजया अक्षरशः पुतळा झाली. ती काहीतरी बोलणार इतक्यात नीलम तेथे आली आणि त्याला कोणाला तरी भेटायला घेऊन गेली.

त्या दिवशी तो संवाद अर्धवट राहिला पण विजयाच्या मनातून काही केल्या तो संवाद पुसला जात नव्हता. नितेश बद्दल विचार करून ती अधिक अस्वस्थ होत होती. आता तिला नितेशची काळजी वाटू लागली होती. पण नितेशच्या बोलण्याचा उलगडा काही केल्या तिला होत नव्हता. त्या रात्री तिला काही केल्या झोप येत नव्हती म्हणून तिने पुस्तकाच्या कपाटातील तिच्या वहिनीची पुस्तके चाळली त्यात तिला नितेशची बरीच पुस्तके सापडली. नितेशने सर्वच प्रकारचं साहित्य हातातलं होतं अनेक वर्तमानपत्रात त्याचे लेख प्रकाशित झालेले होते. इतकी प्रसिद्धी हातात असतानाही नितेश आज अंधारात का चाचपडतोय ? या प्रश्नाचं उत्तर आता ती शोधणारच होती कारण ती नितेशच्या प्रेमात पडली होती.

दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या सुट्टीत ती नितेशच्या कारखान्यात गेली आणि त्याला म्हणाली, नितेशसाहेब तुम्ही डबा आणला का आज त्यावर नितेश नाही म्हणताच ती म्हणाली , मी ही नाही आणला आपण जवळच्या हॉटेलात जाऊ या का जेवायला ? त्यावर नितेश ठीक आहे ! म्हणाला. दोघे जवळच्याच एका हॉटेलात जेवायला गेले विजयने त्याच्यासाठी शाकाहारी आणि विजयासाठी मांसाहारी जेवण मागवले त्यावर विजया म्हणाली , मी तुमच्यासमोर बसून मांसाहार केलेला चालेल तुम्हांला ? त्यावर नितेश म्हणालो, हो का नाही चालणार ? मी जन्मजात शाकाहारी नाही ? आणि आमच्या घरातील अर्धी लोक मांसाहारी आहेत . आणि मला याची सवय आहे. आहाराचा सबंध मी श्रद्धेशी लावत नाही. मी इतरांना मांसाहार शिजवूनही देऊ शकतो. इतकंच काय मी दारु पित नाही पण दारू पिणाऱ्यांसोबत बसायला माझी काही हरकत नसते कारण दारू प्यायल्यावर पिणारे खरं बोलतात. माझे कित्येक गुपित गुपितच राहिले कारण मी दारू पित नाही. नीलम काय करते ? त्यावर तो एम. ए . करते म्हणाला. त्यावर मी येणार आहे एक दिवस तुमच्या घरी नीलमला भेटायला वहिणीसोबत ! बरं ! मला एक सांगा दादा ! तुमचा मित्र तरी तुम्ही एकमेकांना साहेब का म्हणता ? त्यावर नितेश हसून म्हणाला , कारण आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो ! त्याची मला आणि माझी त्याला सर्व गुपिते माहीत आहेत पण ती कधीच इकडून तिकडे झाली नाहीत. तुम्ही लग्न न करण्या मागचं कारण त्याला माहित आहे का ? त्यावर नितेश हो ! म्हणजे काय ? म्हणाला. आता जर कोणी तुमच्या प्रेमात पडली आणि ती म्हणाली की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे तर ? त्यावर नितेश विजयला म्हणाला, तो तिचा आत्मघात ठरेल कारण आज तिला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही ! त्यावर विजया चटकन म्हणाली, प्रेम तरी आहे ना ? तेंव्हा मात्र नितेश शांत झाला. दोघे जेवण झाल्यावर थंडा पिऊन निघाले . हॉटेलचं बिल नितेशनेच दिले. चालता - चालता विजया म्हणाली , तुमचं लेखन क्षेत्रात खूपच नावं आहे इतके प्रसिद्धीच्या झोतात असताना अचानक तुम्ही या सगळ्यांपासून दूर का गेलात ? त्यावर नितेश म्हणाला , सांगतो ! पाच वर्षपूर्वी माझ्या शरीरावर अचानक लाल चट्टे आले आणि त्यातून त्वचेच्या खपल्या येऊ लागल्या त्यावर कोणत्याच औषधाचा काही उपयोग होत नव्हता शेवटी लक्षात आले की मला सोरायसिस हा असाध्य आजार झाला आहे तो नियंत्रित ठेवता येतो पण पूर्ण बरा होईल याची खात्री आज कोणालाच देता येत नाही कारण तात्पुरता तो बरा झाला तरी पुन्हा डोकं वर काढतो. त्याचा आयुष्यावर काही परिणाम होत नाही, तो संसर्गजन्यही नाही पण माझा चेहराही त्याने ग्रासला होता. ज्या चेहऱ्याच्या कित्येक तरुणी प्रेमात पडायच्या तो चेहरा विद्रुप झाला होता. चेहराच काय माझं बलदंड आकर्षक शरीरही विद्रुप झालं होतं. लेखन क्षेत्रातून मी चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकायचा विचार करत होतो तेव्हा ! पण नियतीने डाव साधला आणि मला प्रसिद्धीपासून दूर राहणं भाग पडलं आणि हळू - हळू माझा जगण्यातला रस कमी झाला मी सगळंच टाळू लागलो फक्त उदरनिर्वाह करण्यासाठी हे काम करत राहिलो, यंत्रात जीव रमवू लागलो, खरं म्हणजे आता मीच एक यंत्र झालो आहे . गेली तीन चार वर्षें औषधे घेतल्या नंतर आता कोठे मला माझा हरवलेला चेहरा परत मिळायला लागला पण तोही किती दिवस साथ देईल याची खात्री नाही. ज्या दिसण्याच्या अहंकारात मी कित्येकांचा विचार केला नाही. देवाने माझ्याकडून तेच हिरावून घेतलं कदाचित मी चुकलोय कोणाच्यातरी बाबतीत , त्याचीच ही शिक्षा आहे. अजूनही माझं शरीर डागाळलेलच आहे. तू ही माझ्या चेहऱ्याच्या मोहात पडली असशील नाही ? त्यावर विजया म्हणाली," समजा सहा - सात वर्षांपूर्वी आपली अशीच भेट झाली असती आणि आपल्यात प्रेम होऊन आपल लग्न झालं असत आणि त्यांनतर एक दोन वर्षानी तुम्हाला हा आजार झालाच असता तेंव्हा मी तुम्हाला सोडलं असतं का ? नक्कीच नसतं सोडलं ! मी तुमचा सुंदर चेहरा पाहण्यापूर्वीच तुमच्यात असणाऱ्या कलागुणांच्या आणि तुमच्या स्वभावाच्या प्रेमात पडले होते. आता तर मी तुमच्यासाठी वेडी झाली आहे . मला तुमच्यासोबत तुमच्या प्रसिद्धीचा उपभोग घ्यायचा आहे. तुम्हाला अंधारातून पुन्हा प्रकाशात आणायचे आहे . मी बोलले याविषयी दादाशी , वाहिनीशी आणि घरच्यांशी त्यांची काहीच हरकत नाही आपल्या प्रेमाला ! नीलमनेही मला तुमच्याबद्दल सारेच सांगितले आणि हो ! मी एक डॉक्टर आहे हे तुम्हाला माहीत नाही ! त्यावर नितेश आश्चर्याने तिच्याकडे पाहताच ती म्हणाली , मी पुढच्या शिक्षणासाठी माझ्या काकांकडे होते म्हणून आपली कधीच भेट नव्हती झाली. पण मी शाळेत असताना आपली भेट झाली होती . तुम्ही दादा सोबत एकदा आमच्या घरी आला होतात तेव्हा मला एक गणपतीचं सुंदर चित्र काढून दिलं होतं तेंव्हाच मी तुमच्यातील चित्रकाराच्या प्रेमात पडले होते. माझ्या आयुष्यात आजूबाजूला खूप पुरुष होते पण मला त्याच्याबद्दल कधीच काही वाटलं नाही पण त्यादिवशी चावी देताना तुमच्या हाताचा स्पर्श झाला तो स्पर्श मला खूप वेगळा वाटला ! पण तेव्हा मी तुम्हाला ओळखलेच नाही. मग ! आपली ओळख झाली आणि मी नव्याने तुमच्या प्रेमात पडले. तुमच्या त्या बारा जणींचा शोधही घेतला मी ! त्या आजही तुमच्या संपर्कात आहेत खूप आदर आहे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल ! त्यांच्या नजरेत तुम्ही एक साधू आहात ! तुमचा जगण्यासाठीचा संघर्ष मला नीलमने आणि वहिनीने सांगीतला. तो पाहता तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून जगण्यासाठी तुमचा जन्म झालेलाच नाही हे न कळण्याइतकी मी मूर्ख नाही. तुमच्याकडे माझ्यासाठी वेगळा वेळ नाही पण तो काढण्याची गरज नाही कारण मी तुमच्याशी एकरूप होऊन राहीन. त्यावर नितेश म्हणाला , मी माझी स्वप्ने जगेन पण तुझ्या स्वप्नांच्या आड कधीच येणार नाही ! तू माझ्यावरील प्रेमापोटी माझ्याशी लग्न करण्याचा कदाचित आत्मघातकी ठरणारा निर्णय घेतलाच आहेस म्हणून तुला एक गुपित सांगतो मी तेंव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो जेंव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं आणि त्यामुळेच माझ्या प्रत्येक कथेतील नायिकेच नाव आजही विजया आहे...त्यावर विजया म्हणाली, तुम्हाला खरचं वाटलं का की मला तुमच्याबद्दल काहीच माहीत नव्हत ? त्यादिवशी कविसंमेलनाला माझी मैत्रीण मला घेऊन आली नव्हती मी तिला घेऊन आले होते. वहिनीने ती जाहिरात पाहून तुम्हाला फोन केला होता तो मी ऐकला होता म्हणूनच मी तेथे आले पण मला तुमचा चेहरा आठवत नव्हता तुम्ही फक्त नावाने माझ्या लक्षात होतात. मी शिक्षणासाठी जरी बाहेर गेले तरी तुमच्यापासून दूर नव्हते कारण वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात, कित्येक वेबसाईटवर आणि फेसबुकवर मी तुमचे साहित्य वाचत होते ते आवडल्यावर बऱ्याचदा तुम्हाला फोनही केले होते पण तुम्ही फार बोलला नाहीत. तुमचं दिसणं माझ्यासाठी गौण होत, तुमच्यातील गुणांवर मी भाळले होते. पण अचानक तुम्ही प्रसिद्धीपासून दूर झालात त्याचे कारण मला कळत नव्हते. म्हणून मी मुंबईला आल्यावर आडून - आडून वहिनीला विचारलं तेव्हा तिने सांगितलं मला तुमचा कारखाना रमेश दादाच्या कारखान्याच्या जवळच आहे हे कळल्यामुळेच मी दादाला कारखान्यात येण्याचा आग्रह केला आणि पहिल्याच दिवशी आपली भेट झाली. पण तेव्हा मी तुम्हाला ओळखले नाही. तुमच्याकडे काय आहे आणि काय नाही हे जगाला माहीत नसेल कदाचित ! पण मला चांगलं माहीत आहे. आपल्या दोघांची गरज ती काय ? फक्त प्रेम ! ते आपण दोघे एकमेकांना भरभरून देऊ शकतो. सोनं चिखलात पडलं म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तसच तुमचं शरीर जरी आज डागाळलेले असलं तरी बुद्धीची चकाकी कमी झालेली नाही. माझा, स्वतःचा आणि जगाचा विचार नका करु तुम्ही फक्त देण्याचं व्रत घेतलं होतं ! ते पूर्ण करत रहा ! मी तुझ्या सोबत आहे आयुष्यभर ! प्रेम काय कोणीही कोणावर करत ! प्रेमात त्याग करायला यायला हवा ! पण माझी साथ तुम्हाला मान्य आहे ना ? त्यावर नितेश म्हणाला, म्हणजे काय ? आता माझं जगणं सोप्प होईल तू माझ्या आयुष्याला आणि माझ्या लिखाणाला मिळालेली संजीवनी आहेस...इतिहास याची नक्कीच नोंद घेईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational