Navanath Repe

Tragedy

1.0  

Navanath Repe

Tragedy

कांदा कांदा ओ जरा थांबा थांबा

कांदा कांदा ओ जरा थांबा थांबा

4 mins
1.6K


आजपर्यत कांद्याने डोळ्यात अश्रू आणले हे ऐकले होते मात्र आज या कांद्याने अनेकांची घरे उध्दवस्त तर अनेकांना अनाथ केले हे ऐकून मनाला धक्काच बसतो.

आज रात्र - दिवस शेतात राबणारा शेतकरी दान्या दान्याला मौताल होतोय अन् त्याच्या जिवावर जगणारी दलालं मात्र लठ्ठ होत आहेत ही निर्माण झालेली दरी कोणाच्याच डोळ्याला का दिसत नाही हा प्रश्न पडतो.

शेतक-याला सरकारकडून खूप अपेक्षा नसतात मात्र त्याच्या असणा-या अपेक्षा सत्ताधिश यांच्याकडून पुर्ण झाल्या नाहीतर तो नविन सरकारकडून अपेक्षा पुर्ण होतील याच अपेक्षेने आजपर्यत जगतो आहे. परंतू सरकार कोणतेही असो शेतक-यांची अवस्था ही पुर्वीपेक्षा जास्त दयनिय होते हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही.

युतीचे सत्तधिश बोलतात की , 'आघाडी सरकारने साठ वर्ष काय केलं, त्यांना आता उत्तर दिल पाहिजे, की त्यांनी काहीच केलं नाही म्हणुन तर सत्ता परिवर्तन झालं'. फक्त सत्ता हस्तांतरित होते पण शेती आणि शेतीशी निगडीत ध्येयधोरणे ही जुनीच असतात हे आमच्या बळीराजाला समजत नाही. आता आम्हाला ठरवावे लागेल की, 'विचारांची सत्ता आणायची की, सत्तेचा विचार आणायचा' आम्ही सत्तेचा विचार आणतो तो विचार आमचाच घात करतोय. त्यासाठी येणा-या काळात आपल्या विचाराची सत्ता आणावी लागेल. तेव्हा आतापासून आपल्या विचारांची सत्ता आणायची असेल तर आधी आपल्या विचारांची माणसं तयार करावी लागतील ही काळाची गरज आहे. आमचा बळीराजा हा आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या 'जाती - धर्माचा' किंवा सोय-या संबंधातील व्यक्तीला निवडूण देतो. त्यामुळे घराणेशाही शिवाय राजकारणात इतर कोणच उतरत नाही. त्यामुळे राजकारणात घराणेशाही ही डुकरीणीच्या पैदाइशीप्रमाणे वाढत चालली आहे. आपण 'जातीचा - धर्माचा' निवडूण दिलेला पुढारी जेव्हा आमच्या बळीराजाच्या डोक्यावर वामनासारखा पाय देतो तेव्हा मात्र आमचा आजचा शेतकरी पाताळात जाण्याऐवजी तो विषप्राशन किंवा गळफास घेऊन आत्महत्या करतो.

काल परवाच नाशिक जिल्ह्यात २४ तासात दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जाचा वाढता डोंगर , दररोज कोसळणारे शेतमालांचे दर तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि त्यातच बाजारभावाच्या प्रतिक्षेत शेतात साठवलेल्या कांद्याला फुटलेले कोंब पाहून नैराश्याच्या खाईत लोटल्या गेलेल्या ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर यांनी कांद्याच्या ढिगा-यावरच विष प्राशन करून आत्महत्या केली. तसेच पडते भाव, कर्जाची चिंता यामुळे वसंत बंकट सोनवणे , शिवाजी निंबा कापडणीस यांनी विष प्राशन करून तर तरूण शेतकरी चेतन केदा बच्छाव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यापुर्वीही लातूर जिल्ह्यात ग्यानबा लक्ष्मण निकम , वैजेनाथ रावसाहेब शिंदे यांनी स्वतः ला संपवले तर एकीकडे कुंभमेळ्यामध्ये उघड्या नागड्यांना स्नान घालण्यासाठी हे शासन कोट्यावधी रूपयांची तरतुद करून शासनाच्या पैशांची उधळपट्टी करते, काहींना पाच हजार रूपये पेंन्शन देण्याचा निर्णय ही या सरकारने घेतला तेव्हा मात्र आमचा रोज आत्महत्या करणारा शेतकरी या वामनी पुत्रांना का आठवत नाही हा प्रश्न पडतो.

'जो 'भगवान' का सौदा करते हैं , वो 'इंसान' की कीमत क्या जाने.? , जो 'धान' की कीमत न जान सके , वो 'जान' की कीमत क्या जाने..?'

पंढरपुरमध्ये पक्षप्रमुखांची प्रंचंड मोठी सभा झाली त्यावेळी ते शेतक-यांना 'पहले मंदिर फिर सरकार' सांगते होते तर बळीराजा 'कांदा... कांदा...म्हणून टाहो फोडत होता त्यावेळी पुढारी त्यांना जरा थांबा... थांबा...' म्हणत होते.

शेतकरी ज्यावेळी त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरतो त्यावळी त्यांच्यावर लाठीचार्ज किंवा बंदुकीच्या फैरी झाडून त्याची गळचेपी अथवा त्याला ठार करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा म्हणावेसे लागते.

"अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले खुले शिपाई, निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या, अन् सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही".

तरीही गावातील शेतकरी वामणांच्या वंशजाकडे म्हणजे सरकारला आणि त्यांच्या राजकीय पुढा-यांना सतत एकच मागणी करतो ती म्हणजे 'ईडा पिढा टळू दे ... आणि बळीचे राज्य येऊ दे !'

शेतक-यांना जे पाहिजेच नाही ते सरकारकडून मिळते. कोणता शेतकरी अथवा तरुण रस्त्यावर उतरला होता का ? आम्हाला रेल्वे स्टेशन , महामंडळाच्या बस मध्ये मोफत वायफाय सुविधा पुरवा ? मग का ? अशा सुविधा दिल्या जातात. जे पाहिजे ते मागूनही मिळत नाही तर जे पाहीजे नाही ते न मागताही सरकार पुरवते , यालाच अच्छे दिन म्हणायचे का ? हा प्रश्न पडतो. दुष्काळामुळे शेतक-यांचा कापुस वाळून गेला आहे मात्र आमच्या युवकांचे नेते असलेले राजकारणी त्यांची शहरी अक्कल पाजळताना म्हणतात की, कापूस किती सुकला आहे त्यावेळी त्यांच्या बौध्दिकतेवरच प्रश्न निर्माण होतो. ज्या लोकांना शेतीच काहीच माहीत नाही अशा लोकांच्या हाती सत्तेची सुत्र दिली जातात. त्यावेळी 'कावळ्याच्या हातात दिला दरबार अन् त्याने विष्ठेनं केला बरबाद' असेच म्हणावे लागेल.

सरकार मध्ये वामनाचे व वामणी विचारांचे वंशज बसले आहेत तोपर्यत या शेतक-याला त्यांच्या बळीच राज्य येण अशक्यं आहे. सरकारला शेतक-यांच्या व जनावरांच्या चारा छावणीच्या प्रश्नापेक्षा लावणी चा प्रश्न म्हत्वाचा वाटतो म्हणून तर लावणी (डान्सबार) चालवायला परवानगी मिळते. आता सरकारने लावणी न देता छावणी चालू करण्यासाठी स्वतःची झोपलेली यंत्रणा जागी करून चारा छावणी चालु केली पाहीजे.

आपल्या जातिपातीचे म्हणून निवडून दिलेल्या राजकीय प्रतिनिधींना 'शेतक-यांच्या कष्टाची किंमत असती तर ... बैलाने तुंप पिले असते , शेतक-याने सुखाने भाकरी खाल्ली असती, अन् शेठजीने खाल्ला असता कडबा !' हे सत्य कोणीलाही नाकारता येत नाही.

येणा-या काळात हेच राजकारणातील सत्ताधिश व विरोधक मतांची भिक (जोगवा) मागत व थापा मारत फिरतील त्यावेळी मात्र आम्ही आपलं डोकं आपल्याच धडावर ठेवून त्यांच्या भुलथापांना बळी न पडता मतदान योग्य व लायक उमेदवाला देऊन खरोखरच आपल्या विचारांची सत्ता आणण्यासाठी थोडासा प्रयत्न केला तर नक्कीच ही घराणेशाही संपले व कोणच आपण कांदा ... कांदा... म्हणतेवेळी जरा थांबा म्हणणार नाही हे मात्र नक्की.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy