Rani More

Romance

3  

Rani More

Romance

काळीज माझं तू.

काळीज माझं तू.

4 mins
8.8K


Hiiiiii

कॉल का नाही घेत तू

                           7.00

            Hiiiiiiiiii

                            7.50

           बिझी हो क्या

                           8.05

"कुठे आहेस ग तू, जिव कासाविस झालाय माझा."

                          8.15

"ठीक आहेस न तू,ऑनलाइन नाही, रिंग येतेय कॉल का नाही रिसीव करत प्लीज ये,कसं सांगू तुला माझी अवस्था."

                            8.20                 हेलो.....                  8.25

पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्याप्रमाणे तो येऱ्याझाऱ्या घालत होता. त्याला काहीच सुचेना. काय झालं असेल? आपलं काही चुकलं का?  त्याने पुन्हा पुन्हा व्हाट्सअप ओपन करून चॅट चेक केलं. सगळं रोजच्या प्रमाणे होतं.

डोक्यात उलटसुलट विचारांनी थैमान घातलं होतं. सोफ्यावर डोकं ठेकवून त्याने डोळे बंद केले. मिटल्या डोळ्यासमोरही तिचीच विविध रूपं तरळत राहिली.

आता मेसेज च अंतर पाच मिनिट्स वरुन एक मिनिट्स वर आलं होतं.

त्याने टेक्स्ट मेसेज चेक केला तिथेही काहीच नाही.

ह्याआधी कधीच असं झालं नव्हतं. ठरलेल्या वेळी कॉल नसेल जमणार तर दोघ्ंही एकमेकांना कल्पना द्यायचे.

मग आजच.....तीच काही बरंवाईट तर? नाही, नाही तो स्वतःशीच दचकला.

भिंतीवरचं घड्याळात दहा वाजले होते, आणि ह्याच्या चेहऱ्यावर बारा. काय करू आता? नास्तिक असलेला तो देवासमोर हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत ढग जमा झाले होते.

रोज किती बोलतो प्रेम, राजकारण, साहित्य, रेसिपी,

हजारो विषय तास न तास. पण हे असं व्यापून जाणं जाणवलंच नाही कधी.

तो करूण नजरने विघ्नहर्त्याच्या डोळ्यांकडे एकटक पहात राहिला. त्याचे डोळे बरसणार इतक्यात मेसेज चा आवाज़ आला त्याने घारीच्या चपळाईने पहिलं, आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाचा पाऊस बरसू लागला.

 ती:-           Helloooo.......

Extremely sorry

अरे थोडा प्रॉब्लेम झाला पावसामुळे. मी पडले पाय घसरुन.

तो:- अग कुठे? कसं? तू कशी आहेस?

माझी अवस्था कशी सांगू तुला.

ती:-अरे हो, हो. किती काळजी करशील, डोक्याला लागलयं, पण ठीक आहे मी आता. तू एवढी काळजी करत असशील वाटलं नव्हतं, माफ कर मला.

तो:- तू कॉल घे ग आधी मला बोलायचयं तुझ्याशी.

ति आवाज ऐकताच, त्याने गुदमरलेला श्वास सोडला. डोळे पुसले नेहमीप्रमाणे दोघं  बराच वेळ फोनवर बोलत राहिले पण आज विषय फक्त त्या दोघांचा होता. तिचं असणं किती महत्वाचं आहे त्यांच्यासाठी; हे तो तिला सांगत राहिला आणि तिचं मोहरणं त्याला तिच्या हुंकारातून जाणवत राहिलं.

खूप उशिरापर्यन्त बोलून झाल्यावर चार्जिंग संपल्यामुळे त्याला फोन ठेवावा लागला. रात्रभर तो तिचाच विचार करत राहिला. कधी जाणवली नव्हती ती इतकी ठळकपणे, तिचं आयुष्यात असणं जणु रूटीन झालं होतं.

त्याला आठवत राहिलं आपलं खूप प्रेम होतं....नाही.... आहे...खूप प्रेम आहे तिच्यावर पण तिला सांगीतलचं नाही कधी.

जपत राहिलो एकमेकांना सुंदर मैत्रीच्या गोफात. खरच किती समजून घेतो प्रत्येकवेळी.

ते काही नाही आता व्यक्त व्हायचंच. उद्याच्.

तिला मोगरा खूप आवडतो आणि

 अचानक मोगऱ्याच्या सुगंध दरवळला. त्याला हसू आलं आपण खूपच जास्त वेडे झालोय.

पैंजणांचा आवाज. त्याने डोळे बंद केले. आणि त्याच्या कपाळावर उष्ण स्पर्श जाणवला. त्याने डोळे चोळून पाहिलं. तू? त्याचा विश्वासच बसेना. त्याच्या आवडीची हिरवीगार साडी केसात गजरा आणि त्याला भुरळ पाडणारी नाकातली नथ. मराठमोळी त्याची स्वप्नसुंदरी  मंद हसत उभी होती.

त्याने तिला हात लावून पहिला ती खरच आली होती त्याच्या मनातली उलाघाल जणू उमजली होती तिला. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आयुष्यभर साथ देशील ना मला.

      ती मंद हसत राहिली. त्याला जणु मिठीत चांदणं उतरल्याचा भास होत होता. तो रात्रभर तिला सगळं सांगत राहिला.

त्याचा सगळ्या चुका कबूल करत राहिला. ती कशी त्याला पहिल्या नजरेत आवडली होती, पण परिस्थितिमुळे तो हतबल होता. पण आता तो सगळी कसर भरून काढणार होता. ती आता कायमची आपली आहे ही कल्पनाच त्याला सुखावत होती.

किती दिवस झुरले होते. किती रात्री सरल्या होत्या ह्या क्षणासाठी. ह्या मिठीसाठी.

तो सुखस्वप्नात असतानाच अचानक खिडकीचा दरवाजा आपटला आणि त्याला जाग आली. हवेचा प्रचंड झोत खिड़कीतून आत आला.बाहेर कड़कन वीज चमकली.

त्याने बाजूला पहिलं, ती नव्हती.

कुस्करलेली मोगरयाची फुलं बेडवर पसरली होती.

एवढ्या रात्री। अश्या वातावरणात ही  गेली की काय?

बाहेर कुत्रे भूंकल्याचा आवाज आला. त्याचा अंगावर सरसरुन काटा आला.

त्याने टीशर्ट घातला, बाइकची चावी घेतली नि सुसाट वेगाने तो गर्ल्स हॉस्टेल कडे निघाला.

आभाळ भरून आलं होतं. विजा चमकत होत्या. पण त्याला कसलीच पर्वा नव्हती.

तो वाऱ्याच्या वेगाने निघाला होता.

घोंगावणारा वारा, मुसळधार पाऊस, विजा कसलीच फिकिर न करता तो देहभान विसरून रस्ता कापत होता.

तो होस्टेलवर पोहचला गेटवरच गुरख्यानी त्याला अडवलं. त्याने ति सुखरूप पोचली का चौकशी केली.

तिचं नाव ऐकताच गुरखा अविश्वासने पाहू लागला.

 "क्या मजाक करते हो शाबजी आप पुलिसवाले हो क्या? तहकिकात करने आये हो क्या? इनका तो अक्सिडेंट हो गया. पैर फिसलकर गिर गयी सीढीयों से, सिर में बड़ी चोट थी. पूरी खोपड़ी फट गयी. डॉक्टर भी कुछ न कर सके, हम बस इतनाही जानते है।"

तो सुन्न झाला. पुन्हा एकदा उशीर झाला होता. पण मग ते मेसेज. तो कॉल. तो मोगरा. तो सुगंध. ते तिचं येणं.

त्याला तिचं बोलणं आठवलं.

त्याने विचारलं होतं,

"प्रेम म्हणजे नक्की काय ग?"

"व्यक्तिनुसार बदलते रे प्रेमाची व्याख्या, पण माझ्या मते प्रेम म्हणजे निरपेक्ष भावना. कोणतीही अपेक्षा नसलेली सुखदुःखात आठवणारी, दोन अआत्म्याचे मीलन. आयुष्यभर सोबत रहाणं इतकेच मर्यादित नसतं प्रेम तर शेवट पर्यन्त मनात रहाणं असतं प्रेम. शरीर नश्वर असतं पण प्रेम अमर असतं, जे ती व्यक्ति जवळ् नसतानाही अनुभवता येतं."

पाऊस थांबला होता. आकाश स्वच्छ झालं होतं.

गुरख्याने जागरणासाठी रेडिओ लावला होता.

 वाऱ्यावर् गाण्याचे सूर लहरत होते...

"तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा...."

मोगऱ्याच्या मंद सुवास दरवळला.

आणि त्याला जाणवलं. ती आहे. आपल्या सोबत. नाही, नाही. आपल्या आत, एकरूप झालीय. आपल्या शरीरात. आपल्या हदयात. कायमची.

त्याने वर पाहिलं भर पावसाळ्यातही त्याला पहाटेची शुक्राची चांदणी दिसली.तिला आवड़णारी. आणि  चांदणी आडून ती त्याच्याकडे पहात हसत होती.

तो नेहमी तिला मस्करीत म्हणायचा.

काळीज माझं तू. आज मात्र तेच खरचं झालं होतं.

 

               


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance