काकांचे भूत
काकांचे भूत
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे .मी बारा तेरा वर्षाची असेल तेव्हाची ही गोष्ट .
माझा स्वभाव खूपच बोलका . म्हणून मी सर्वांशी गप्पा मारत असे .
रांगोळी काढण्याचा मला खूप भारी छंद होता . सण उत्सव असला किंवा नसला
तरी मी न चुकता दर संध्याकाळी सात वाजता रांगोळी काढत असे .
मी काढलेली रांगोळी सगळ्यांना आवडत असेल की नाही कोणास ठाऊक . पण सर्व म्हणायचे की तू खूप छान रांगोळी काढतेस .
आणि मी ही हा माझा छंद कधी सोडला नाही .
असेच मी नेहमीप्रमाणे रांगोळी काढत होती .
तेव्हा रांगोळी काढत असताना एक काका आले . व मला म्हणाले .
खूप छान रांगोळी काढतेस बेटा तू .
मला खूप आनंद वाटला .
कारण ते काका माझ्यासाठी अनोळखी होते .
.नवीनच असल्यामुळे मी त्यांना विचारले .
काका नवीन आलेत का तुम्ही इथे राहायला .
काका म्हणाले हो .
तितक्यात त्यांची बायको (काकी) त्यांना पाहण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या .
काकांनी काकी सोबत माझी ओळख करून दिली . आम्ही हसलो गप्पा मारल्या .
दोघेही
स्वभावाने खूपच प्रेमळ होते .
त्यांना दोन मुलं होती . ते दादा म्हणजे
(त्यांची मोठी मुले) रोज रात्री अकरा वाजता कामावरून घरी येत असत .
तोपर्यंत काकी एकट्याच घरी असायच्या .
आणि काका दररोज सात वाजता घरी यायचे .
माझ्या रांगोळी काढण्याची वेळ व काकांच्या येण्याची वेळ एकच होती .
काका कामावरून आल्यावर रोजच माझ्या रांगोळीची स्तुती करत असे .
थोड्या महिन्यानंतर काका पाच दहा मिनिटे थांबून माझ्याशी गप्पा ही करत असे .
एक-दोन वेळा काकींनी मला घरी बोलवले होते मी त्यांच्या घरी ही गेली .
काका कामाला गेल्या वर काकी घरात एकट्याच असायच्या . काकी बिल्डिंग मध्ये राहत होत्या. नि आमचं चाळीतील घर.
कधी कधी काकाला यायला उशीर झाला .
तर काकी आमच्या अंगणात काकाची वाट पाहत असायच्या . त्या वेळेत
माझ्या आईच्या व काकीच्या गप्पा व्हायच्या .
परंतु त्यावेळेस मी खेळण्यांमध्ये व्यस्तअसायची .
पाच सहा महिन्यांचीच ओळख असलेली माझी . काका - काकी सोबतची.
पुढे
उन्हाळी सुट्टीत मी गावाला गेली होती .
मी गावावरून आली तेव्हा मला कळलं कि ते काका वारले म्हणून .
माझं स्वभाव खूपच भित्रा प्रत्येक गोष्टीची मला भीती वाटायची .
आणि त्यात भुताच्या गोष्टींचीही तर खूपच .
ते काका वारले हे कळल्यापासून मी बाहेर सात वाजता रांगोळी काढण्याचेही सोडून दिलं .
माझ्या अश्या स्वभावाला माझी आई माझ्यावर फार चिडत असे .व म्हणायची कसं व्हायचं ग तुझं
इतकी घाबरून नाही चालत .
पण मला माझ्या मनात नेहमी एक भीती असायची .
काका वारल्यामुळे काकी व त्या काकांच्या मुलांनी रूम बदली केली
कारण काकी दिवसभर एकट्याच असायच्या म्हणून . मग ते लोक दुसऱ्या गावात कोणीतरी नातेवाईकांच्या जवळ राहायला गेले .
पाच सहा वर्षानंतर एके दिवशी संध्याकाळी
आमच्या गावात एका बारशाचा प्रोग्राम होता .
माझ्या आईने मला सोनाराच्या दुकानात नेले .
माझी आई सोनाराच्या दुकानात चांदीची साखळी पाहत होती .
मला त्यात फारसा इंटरेस्ट नसल्यामुळे मी आईच्या बाजूला उभी होती .
पाऊस खूप जोराचा होत होता.
अचानक माझं लक्ष बाजूला एका बाजूला दोन असलेल्या व्यक्तींकडे गेले .
माझ्या बाजूला एक मुलगा उभा होता आणि त्यांच्या बाजूला काका .
काकांना बघून मला दरदरून घाम सुटला .
हात पाय थरथरू लागले . मी माझ्या आईचा हात गच्च पकडला.छातीची धडधड तर इतकी वाढली होती की असं वाटलं होतं .
आता या क्षणाला माझा जीव जाईल .
माझ्या आईला हा काही प्रकार कळला नव्हता .
माझ्या आईला हा खूप विचित्र प्रकार वाटला .
माझी आई मला सांगू लागली .
असं काय करत आहेस तू?
आपण सोनाराच्या दुकानात उभ्या आहोत .
तु माझा हात दाबू नकोस .
त्यांना काहीतरी वेगळं वाटेल .
सोनार विचारू लागला काय झालं . पण मला काही बोलवत नव्हतं .
पण मी कसंतरी आईला त्या काकांच्या चेहऱ्याकडे वळवलं .
आईने त्या काकाकडे पाहिलं .तितक्यात जोराची वीज कडकडली .
आणि लाईट गेली .
आता तर माझी इतकी घाबरगुंडी उडाली का वाटलं मेलीच मी आता . सुदैवाने लगेचच लाईट आली .
माझ्या आईने त्या मी समजत असलेल्या काकाशी बोलणं सुरू केलं .
हात वाऱ्यांनीच फक्त बरे आहेत का विचारलं .
हा सगळा काय प्रकार आहे मला कळत नव्हतं
मग माझी आई का भुताची बोलत आहे हे मला कोडे कळत नव्हतं .
मी त्या काकांकडे नाईलाजाने पुन्हा हळच पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर कोड सारखे डाग होते . ( सफेद - )
काही कळत नसतानाच .
मी मनात मनाशीच ठरवून टाकलं .
काकांना जाळल असेल तेव्हा ते पूर्ण जळले नसावे . म्हणून ते असे अर्धवट भाजलेले दिसत आहेत .
ते काका निघून गेले त्यांच्यासोबत असलेला
माणूसही .
मी मार खाता खाता वाचले .
माझी आई माझ्याकडे रागाने एक टक पाहत होती . .मला म्हणाली तू घरी चल तुला बरोबर करते .
आधीच त्या काकांना पाहून मी घाबरली होती त्यात आई असं काय मला करणार होती मला काहीच कल्पना येत नव्हती .
घरी आल्यावर हा माझ्या आईने हा सर्व प्रकार वडिलांना सांगितला . आई आणि वडील दोघेही माझ्यावर खूप चिडले होते .
आता मला राहवले नाही रडता रडतात मी चिडून बोलली म्हणाली ते काका होते .
तेव्हा आई माझ्याजवळ आली व मला म्हणाली जे वारले ते काका होते आणि .ज्यांना तू आज पाहिले ते त्यांचे जुळे भाऊ होते . . ( बरं झाल आई ने हे मला माहित नसलेले खरं सांगितल नाही तर मी आयुष्यभर भुत पाहिल्याचं सर्वांना सांगत बसली असती )

