STORYMIRROR

Rashi Raut

Children Stories

3  

Rashi Raut

Children Stories

मराठीचे महत्त्व सांगणारी आई

मराठीचे महत्त्व सांगणारी आई

4 mins
304

"आई' ए आई काय करतेस गं " मला तुझी मदत हवी आहे. सांग ना करशील ना. तू मला मदत.. गौरव मराठी भाषा लेखनाची स्पर्धा आहे .लिवा साहित्य समिती;तर्फे ही स्पर्धा गेल्या वर्षीही आयोजित केली होती. मराठी भाषा दिवस म्हणून. ताईने त्या स्पर्धेत भाग घेतला होता. किती ग सगळ्यांनी तिचे कौतुक केले आणि किती सुंदर बक्षीस ही तिला मिळाली...

    

 नाही हा आता मलाही स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे .मी आजच पाहिलं .,यावर्षी ती स्पर्धा आहे तर मला त्यात भाग घ्यायचा आहे आणि मलाही बक्षिस हवं आहे..


निर्वी ,निर्वी .,किती हा वंगाळ पणा तुझा .." छे बाबा मला मुळीच तुझ असं वागणं आवडत नाही". असं लगेच का भाग घेऊन कोणी पारितोषिक देत का यालाच म्हणतात "उतावळा नवरा आणि डोक्याला बाशिंग"

 मग काय करू मी ,आई तूच सांग ना .उदास होऊन निर्विने आईला विचारले.. 


उन्हाळी सुट्टीत म्हणून मी तुला सांगत असते.आपलं मराठी साहित्य फार अमाप आहे. त्याचा अभ्यास कर. तुला शुद्ध बोलताही येईल. नि लिहिताही येईल..

निर्वी इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलगी. घरची परिस्थिती हालाखीची. इंग्रजी माध्यमाची शाळा परवडणारी नाही ,म्हणून तिला पुन्हा मराठी शाळेत घातलं होतं .त्यामुळे निर्वी अभ्यासात जरा कच्चीच होती..


एकाएकी रागावून झाल्यावर आईने वही पेन्सिल हाती घेऊन निर्विला जवळ घेतलं. व म्हणाली, निर्वी कवितेला सुरुवात करण्याआधी तू एक मुख्य विषय घे .तुला नक्की काय लिहायचे आहे. तसे स्पष्ट लिहायला बरं पडेल .आणि मी तुला काही आधी मराठी बद्दल काही माहिती सांगते ती ,तू नीट ऐकून घे. समजून घे .व नंतर तुझ्या भाषेत ती रचना नीट मांड.कळलं का?

 "हो ".निर्विने मानेने होकार दिला..


आईने निर्वीला थोडक्यातच ,

पण छान अशी माहिती सांगितली." आपला भारत देश". महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषेचे महत्व इ. माहिती तिला दिली .,आईला दोरीवर कपडे वाळत घालायचे होते.

 आई म्हणाली ,तू लिह.तोपर्यंत मी येते जाऊन.


आई येईपर्यंत निर्वि ने पाच-सहा ओळी लिहिल्या .आणि गड जिंकल्यासारखा आनंद तिला झाला .तिचा हा पहिलाच प्रयत्न नसला .,तरी तिच्यासाठी तिने हे लिहलेले तिला खूप महत्त्वाचे वाटले.

तिने तिच्या आईसमोर कागद धरला .आणि भुवया उंच करत म्हणाली. "हे पहा ! किती छान लिहिल आहे मी.

 

सारे जहाँ से अच्छा जहाँन

माझा भारत देश सगळ्यात महान

चाहे कितना भी मचाओ शोर

आमची मराठी भाषाच आहे थोर

लळा लाविते आम्हास त्याची ओढ

अभिमान बाळग! 

आणि मराठीतच बोल.   


आई काही बोलण्या आधीच निर्वीचे बोलणे पुन्हा सुरू झाले. आई मस्तच आहे.ना हे एकच नंबर ना..

आईने तिच्याकडे पाहत 'कपाळावर हात मारला' "अगं निर्वी " ए ढमे. मराठी राजभाषा दिन आहे .मराठी भाषेचा गौरव करायचा.तो ही तुला करता येत नाही.. आजच्या या मुला मुलींना ना फक्त इंग्रजी हिंदी डायलॉग मारायची सवय झाली आहे.,आपल्या मराठी मातृभाषेचे कौतुक करताना कशाला हवी ती हिंदी.

 निर्वी हे बघ .आपण महाराष्ट्रात राहतो. तर आपल्याला मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा .नको ते फक्त बक्षिस नि पारितोषिकांसाठी असे लिहिणे योग्य नाही.


बघ ताईने गेल्यावर्षी जेव्हा या स्पर्धेत भाग घेतला होता .तेव्हा तिने मराठी भाषेवर आपल् किती प्रेम आहे हे व्यक्त केलं होतं. त्यातून मराठी भाषेने आजवर तिला किती छान शिकवलं. छान घडवलं .त्याची ती किती ऋणी आहे ,हे तिने दाखवून दिले त्यातून. आणि एक तू आहेस फक्त पारितोषिकांसाठी असे हे करते. निर्वी ,हो बाजूला मला नाही काही तुला मदत वगैरे करायचे आहे .असं म्हणून आई स्वयंपाक घरात निघून गेली.


निर्विने आईचे रागावलेले हे रूप पहिल्यांदाच पाहिले नव्हते . तिची आई नेहमीच मराठीचे कौतुक करतअसे.पण का कुणास ठाऊक! निर्वी मनावर घेत नसायची.आईचे हे आजचे बोलणे तिच्या मनावर कोरले गेले. तिला मनापासून वाटलं की आई सांगते तेच खरं आहे ती खोलवर विचार करू लागली.


दुपारची वेळ होती . नीर्वी ला आज अन्न गोड लागेना. ती बेचैन झाली . तिच्या मनातून काही शब्द तिच्या विचारांशी खेळू लागले. पटकन तिच्या मनात एक विचार येऊन गेला." खरंच का मराठी भाषा माझ्यावर रागावली तर नसेल ना ! निर्वी स्वतःशीच पुटपुटली .नाही ,नाही असं नाही होऊ शकत. नि खरंच रागावली जरी असेल. तरी मनवेन मी तिला. ते ही निस्वार्थी मनाने.


 मग काय पुढे? निर्वीने क्षणाचा विलंब न करता लिहायला सुरुवात केली. मध्ये मध्ये चुकत होते शब्द .पण निर्वी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होती.


शेवटी निर्वी ने कविता पूर्ण केली.

  कवितेचे नाव- माझी मराठी.

रुसलेल्या मराठीला

मनवते मी

बरेच प्रयत्न केले

तरीही रागवले ती..


खरं आहे तुझं 

राग तुला आला

मराठी माणूस 

अजून जागा का 

नाही झाला.


बरोबर आहे तुझं

तू शिकवण दिली मोठी

जमत नाही तरी

इंग्रजी बोलतो खरी खोटी.


चूक तुझी नाही

चुकलो आहे आम्ही

मातृभाषा मराठी बोलायला

कमीपणा समजलो आम्ही.


रुसले आज शब्द 

पुढे बोलवत नाही मला

क्षमा कर ग तू

या मराठी माणसाला.


तुझा गौरव करताना

नको कसली लाच

अभिमान आहे तुझा

सन्मानाने सांगतो आज..


कावियत्री - निर्वी पाटील. इ.७वी

(छोटा गट)


निर्विला आता मनापासून आनंद झाला.तिला आता ही लिहिलेली कविता आईला दाखवण्याची घाई झाली होती .पण आई बाजूच्या काकी कडे साडीला फॉल लावायला बसली होती . निर्वी ने बराच प्रयत्न केला. पण तिची हिम्मत झाली नाही .आईला कविता दाखवण्याची. कागद टेबलावर ठेवून निर्वी झोपी गेली.


संध्याकाळी जेव्हा तिला जाग आली .तेव्हा तिची आई तिला समोर उभी दिसली .हातात एक पुष्पगुच्छ घेऊन. ताईने निर्वीसाठी तिची आवडती मिठाई आणली होती .बराच हट्ट करत असताना ही बाबांनी तिला बार्बीची कंपास आणली नव्हती .पण आईने आज गुपचूप बाबांना तिच्यासाठी आणायला सांगितली होती.

इतकं सर्व पाहून तिला खूप आनंद झाला.. आई काय ग .आज माझ इतकं कौतुक .का बरं ! निर्वीला क्षणभर काही सुचेनासे झाले.

 आई म्हणाली.,

माझी निर्वी प्रथम आली आहे. गौरव मराठी स्पर्धेत. ऑ ...करत निर्वी बाबांना म्हणाली अजून मी स्पर्धेत भाग घेतला ही नाही .तुम्हाला दाखवू का मी, माझी कविता लिहकेली ती .नको निर्वी आम्ही पाहिली सर्वांनी. स्पर्धेत तुझा क्रमांक येऊ दे.अथवा नको येऊ दे. पण तु मराठी भाषेवर जे आज प्रेम व्यक्त केले ते आमच्यासाठी खूप आहे..


बारा-तेरा वर्षाची असलेली. निर्वी आता बाबांना मोठी वाटू लागली. भावना व्यक्त करणारी निर्वी चे आईला कौतुक वाटले. नि आनंद व्यक्त करताना तर ताईने तिला घट्ट मिठीतच घेतले. निर्वी चे डोळे पाण्याने गच्च भरले होते. ती विजेता झाल्याच्या तिला भास झाला.नि जणू काही आभाळ तिच्या पुढें तिला ठेंगणे वाटू लागले होते....



Rate this content
Log in