Vilas Kaklij

Tragedy

1  

Vilas Kaklij

Tragedy

जीवांचे जीवन

जीवांचे जीवन

2 mins
88


आयुष्यात स्वप्न पाहात जीवनात प्रत्यक्ष साकार होण्यासाठी अनेक पदव्या घेतल्या मात्र नोकरीसाठी त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी "विमा एजन्ट" म्हणून कार्य हाती घेतले लोकांना भविष्याची तरतूद कशी करावी? मुलांचे शिक्षण, लग्नासाठी आर्थिक तरतूद कशी करावी. बचतीचे महत्व विषद करून देणे रोज सायकल, बसने प्रवास करून पाच ते दहा ग्राहकांना माहिती देणे त्यापैकी एखादी व्यक्ती होकार देत परत या अपेक्षा ठेवून परत भेटेन ओळख मैत्रि यावर आठवड्यास एक प्रस्ताव तयार झाल्यावर ऑाफिसला जा कॅश भरा परत पावती ग्राहकाला देणे. त्यातही खासगी विमा कंपन्या व जुने एजन्ट हे प्रोत्साहन देत, एक दोन हप्ते स्वतः भरत. कारण त्यांचे मासिक कमिशन भरपूर होते व त्यामुळे ग्राहक जास्त मिळत मी मात्र त्यात कमी पडत होतो. मात्र प्रयत्न रोज सगळे तत्वज्ञान सारे पॉझिटिव्ह एनर्जी व रात्री पाहिलेले स्वप्न दिवसा साकारण्याचा प्रयत्न करत जीवन जगत होतो. रोज इतरांना आर्थिक व भविष्याचे नियोजन सांगणारा स्वतःच्या जीवनात मात्र "लोका सांगेब ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण." शेवटी स्टेटस, इमेज, यावर व्यवसाय होतो त्यासाठी जुनी मोटारसायकल घेतली. भारी कपडे. चहा टपरीवर घेणे. मात्र अशात घरी बायको. मुले संसाराचा गाडा एक एजन्टचा व्यवसाय चालत होता. काही मित्र, नातेवाईक मंडळी भेटली की त्यांना सहज प्रेमाने चौकशी केली तरी त्यांना हे एजन्ट गळी पडतात त्यामूळे दूर अंतर ठेवून वागत. त्यात ही ''कोरोना महामारी " सर्व भविष्याच्या तयारीसाठी विमा घेत व्यवसाय बरा झाला. मात्र घरी आल्यावर बायको, मुले दूर अंतर ठेवून वागत कारण संपर्क वाढला, प्रवास वाढला. मात्र नातेमधील अंतर वाढले स्वतःचा विमा १! ज्या कंपनीसाठी जीवन धोक्यात घालून जीवन विमा घेत होते त्या कंपनीने मात्र आमचा सामान्य विमा घेतला होता. या महामारीत माझे दोन एजन्ट देवाघरी गेले मात्र त्यांचा जीवन विमा फक्त मेडिकलसाठी गेला व घरचे जीवांचे जीवन जीवन विमा असून गेल्याप्रमाणे झाले. आज मला ही वाटतं जीवांचे जीवन जगवणारा एक एजन्ट  जीवांचेच जीवन जगत 

आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy