हुंड्यांचे दुष्परिणाम
हुंड्यांचे दुष्परिणाम


हुंडा घेऊ नये, देवू नये या संदर्भात अनेक विचारवंतानी आपले विचार मांडले. त्यावर चर्चा होत आहे; पण काही समाजातील विचारवंत विचार मांडतात ते दुसऱ्यांसाठी. आपण त्यात नाही अशी त्यांची भूमिका असते. हुंडा चळवळीतील कार्यकर्ते जेव्हा असे कृत्य करतात तेव्हा समाज त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. हुंडा ही प्रथा कायदयाने बंद आहे ;पण प्रतिष्ठित लोकांनी ती अजून चालू ठेवली आहे. करोडो रुपये खर्च करून समाजाला आदर्श दाखविण्याऐवजी अशी मंडळी प्रतिष्ठेचे प्रदर्शन भरवतात.कायद्यातून पळवाटा काढतात.
त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. हुंड्यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.वधुवरांची पसंती झाली तरी हुंडयामुळे लग्न जमत नाही. ह्या देशामध्ये आजही अशी कुटूंबे आहेत की त्यांना दोन, दोन मुली आहेत. घरची गरीब परिस्थिती आहेत. त्या गरीब मुली शिकतात, नोकरी करतात तरी लपून छपून हुंडा दिला जातो.त्या गरीब मुलींना स्वनिर्णय घेताना आई वडिलांच्या भावनांची कदर करावी लागते. काही आई वडील मजूरीने काम करतात, काहींच्या नोकऱ्या अस्थिर आहेत, ठराविक पगारात काम करतात. त्यांनी मुलींची लग्न कशी करायची हा यक्ष प्रश्न पडतो?
वराकडील मंडळी समजून घेण्याच्या भूमिकेत नसतात. वधूकडील आर्थिक विचारपूस करून लग्नास होकार देतात. गरीब वधू असल्यास तिचे लग्न गरीबी मुळे जमत नाही. वराकडील मागण्या ते पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे गरीब मुलींचे वय वाढते.वाढते वय मुलींच्या लग्नाचा अडथळा समजला जातो. स्री पुरुष समान कायदयाची होळी केली जाते. ग्रामीण भागात तर फार अवघड परिस्थिती आहे. वाढत्या दुष्काळामुळे,कर्जा मुळे मुलींची लग्न होत नाही.
अशा वेळी सर्व प्रतिष्ठित पुढारी एकत्र आले पाहिजे. गरीब व श्रीमंत सर्व एकत्र लग्न करून आदर्श दाखवला पाहिजे. दानशूर समाजसेवकानी गरीब मुलींच्या लग्नसाठी पुढे सरसावले पाहिजे. लग्नाचे हॉल गरीब मुलींच्या लग्नाला विनामूल्य दिले पाहीजे. प्रत्येक मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीनी तेथील स्थानिक जनतेला आर्थिक मदत केली पाहिजे. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधीनी आपल्या मुलांची लग्न सामूहिक विवाह
मेळाव्यात केली पाहिजे. तरच हुंडा ह्या प्रथेला आळा बसेल. वधु वरानी एकमेकांच्या विचारांची कदर करून पसंती केली पाहिजे. कपड्यांची आतशबाजी बंद केली पाहिजे. समाजाच्या चालीरीतीप्रमाणे थोड्या खर्चात लग्नसोहळा साजरा करावा. लग्न कायदेशीर पद्धतीने करून आत्महत्या, जाळुन मारने, शारीरिक, मानसिक छळ करणाराना कठोर शिक्षा करण्यात याव्यात.घटस्फोट होऊ नये या साठी समजोता होणे काळाची गरज आहे.
असे कार्य करणाऱ्यांचा समाजाकडून सत्कार, सन्मान, पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा.