होय,मी बारबाला बोलतेय-भाग२
होय,मी बारबाला बोलतेय-भाग२


लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्याची सुंदर स्वप्न मी बघू लागले;पण तो आनंद माझ्या आयुष्यात नव्हता. ज्याच्या बरोबर मी विश्वासाने लग्न केले होते.प्रेम केले होते तो दगाबाज निघाला. विश्वास घातकी निघाला. वरवरचे प्रेम दाखवून त्याने मला फसविले होते. त्याने माझा मानसिक, शारीरिक छळ सुरू केला. लग्नानंतर तो माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला. माझ्याकडून हव्या त्या पाशवी संभोगाची मागणी करू लागला. मी विरोध करत होते; पण तो मला जनावरासारखे मारू लागला. मला विवस्त्र करून चामडी पट्टयाने मारत होता.दारुच्या नशेत तर तो हैवान बनत होता. मला सिगारेटचे चटके देत होता.
मी बारबाला होते जरूर ;पण मी संसार करायचे ठरविले होते. मी माझ्या आयुष्यात केलेल्या चुकांची स्पष्ट कबूली दिली होती. तरी सुद्धा तो माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. आता मला त्या वैवाहिक जीवनाचा कायमचा त्याग करायचा होता. त्याच्या जवळ राहून माझ्या वाट्याला दुःख आले होते. मी माझा निर्णय पक्का केला आणि तो येण्याच्या आत मी त्याच्यापासून माझ्या जीवाची सुटका करून घेतली. रात्री बारा वाजता घर सोडले. त्या भयान रात्री मी जीवाच्या आकांताने एका खाजगी बसने शहर सोडले. मरणाच्या दाढेतून बाहेर पडल्याने उदर निर्वाहच्या साठी परत दुसऱ्या शहरात मी आश्रय घेतला. तिथे मी एका कंपनीत काम करू लागले. राहण्यासाठी एका झोपड़पट्टीत खोली 2000रुपये भाड्याने घेतली.6000 पगारात मी कसेबसे दिवस काढत होती;पण अचानक कंपनी बंद पडली. माझ्या जगण्याचा आधार तुटला. बरेच दिवस मला काम मिळाले नाही. खोलीचे डिपोसिट संपले होते. उसने पैसे घेतल्यामुळे अंगावर कर्ज झाले होते. शेकड़ा पाच टक्क्याचे पैसे असल्याने व्याजावर व्याज असे चक्रवाढ होऊन दोन लाख कर्ज झाले होते. ज्यांचे घेतले होते ते कधी देणार म्हणून तारीख विचारत होते. पण मी आता हे पैसे कसे द्यायचे म्हणून भयभीत झाले होते. शेवटी मला त्या शहरात कर्ज फेडण्यासाठी पुन्हा बारबाला म्हणून राहवे लागले.
दररोज मला बारमधुन 100रुपये मिळत होते. त्यावर मी खाजगी सावकारांचे कर्ज व्याजासह थोडे, थोडे भरत होते. पण एक दिवस माझ्यासाठी काळा दिवस ठरला. मला बार मधून एका पाशवी वृत्तीच्या माणसाने 1000रुपये देऊन खाजगी त्याच्या राहत्या घरी नेले. तिथे त्याने त्याचे दोन मित्र लपवलेले होते. ज्या माणसाने माझ्याबरोबर संभोग केला त्याने माझे विडियो शूटिंग मला न समजता केले होते. त्याने मला धमकी दिली की माझ्या दोन मित्रांचे कामसुख झाले पाहिजे. मी त्या गोष्टीला विरोध करताच माझी विडिओ शूटिंग दाखवली. मला मजबुरीने त्यांच्या सोबत शरीर संबंध ठेवावे लागले होते. ते पाशवीवृत्तीने माझ्या देहाचा उपभोग घेत होते.सर्व झाल्यानंतर मला माझी उर्वरीत रक्कम दिली नाही.उलट मला हव्या त्या दिवशी धमकी देत होते. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस स्टेशन मध्ये मी त्यांची तक्रार नोंदवली.तक्रारीनुसार त्याना जेलमध्ये बंद केले. पण ते लगेच दोन दिवसात मोठ्या मंत्री साहेबांच्या आशीर्वादाने जामिनावर बाहेर आले. त्यांनी मला जीवे ठार मारण्या साठी चाकूचा बंदोबस्त केला. मी बारच्या बाजूला उभी असताना त्या नराधमानी माझ्यावर चाकूचे वार केले. मी मोठमोठ्याने विव्हळत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मला कोणी तरी वाचवेल असे वाटत होते;पण जमावाने वाचविण्याऎवजी मोबाइलवर शूटिंग करत होते. संघर्ष मरतानाही झाला. आरोपी मोकाट सुटून पळून गेले.