होय,मी बारबाला बोलतेय-आत्मकथा.
होय,मी बारबाला बोलतेय-आत्मकथा.


खरेच मी आज तुमच्यापुढे माझ्या जवानीची कैफियत मांडणार आहे. आज माझे कुटूंब उघड्यावर आहे. त्यांना निटसा निवारा नाही. रोजच्या कमाईवर माझे वृद्ध आई वडील व माझ्या चार बहिनी जगू शकणार नाही. आई बाबाचा रोजचा दवा रोजनदारीच्या पैशात मिळत नाही. त्यांचे हाल मला पहावत नाही. चार बहिनीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून चालू असल्याने मला काहीतरी करावे लागणार होते. मला खूप नातेवाईक आहे; पण त्यांच्याकडे मी कसे पैसे मागणार?आमचे फाटके पांघरून असल्याने आम्हाला कोणी मदत करताना ही असून सुद्धा नाही म्हणायचे. त्यात त्यांचा दोष नव्हता. ते पण फार श्रीमंत नव्हते. पैशासाठी मला अविवाहित राहणे गरजेचे होते. जात, धर्म ,समाज, नातेवाईक ह्यापेक्षा तिला तिचे आई वडील जगवायचे होते.बहीनीना आपल्यासारखे जीवन नको म्हणून शिकवायचे होते. त्यासाठी तिने मुंबई शहराचा आधार घ्यायचे ठरविले;पण अत्यल्प शिक्षण असल्याने ती नेहमीची नोकरी करू शकत नव्हती. तिला तिच्या मोठ्या कुटुंबासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे बारबाला.तिने तसे एका दलाला मार्फत एक लेडीज बार गाठले. तिथे त्या दलालाने तिची ओळख इतर बारबालांसोबत करून दिली. तिची राहण्याची सोय बारमालकाने जवळच असलेल्या एका भाड़ोत्री खोलीत करून दिली.
मूळची उत्तर भारतीय असलेली ती बारबाला बार मध्ये येऊ लागली होती. तिने तिचे स्वतः चे नाव देखील बदललेले होते. कसलही व्यसन नसलेली बारबाला थोड्याच दिवसात व्यसनी झाली. दारू, सिगारेट ओढू लागली. त्याच नशेत ती दारूचा ग्लास वडिलांच्या वयात असलेल्या माणसाला हाताने त्याच्या ग्लासमध्ये ओतावा लागायचा. मुखात दात नसलेला पुरुष वयाच्या साठीत त्या कोवळ्या मुलीच्या ओठात ओठ लावून हवे तसे चुंबन घेत होता. नको तिथे हात लावत होता. हे सर्व झाल्यानंतर तिला 500ची नोट मिळायची. ती घेऊन बारमालकाला द्यावे लागायचे. बारमालक त्यातले त्याचे कमिशन काढून उरलेले तिच्या खात्यावर म्हणजे वहीत लिहून ठेवायचा. रात्री बाराच्या नंतर खूपच रंगत येत होती. हिंदी, मराठी गाणे गायक गायचे. बारबाला त्या ठेक्यावर नाचत असत.१९वर्षाच्या त्या बारबालेला सुद्धा नाचावे लागायचे.ती सुंदर असल्याने तिच्या देह विक्रीची किंमत ठरली जायची. साठी गाठलेले वय वृद्ध सर्वात जास्त बोली लावायचे व मनसोक्त तिच्या देहाची मजा लुटायचे .त्यात काही राजकारणी त्यांचे कार्यकर्ते देखील असायचे.त्या ठिकाणी पैस्यांची उधळपट्टी चालत असे. तिथे नोटांचा खच पडायचा.काळ्या पैस्यावाले, छोटे, मोठे नोकर, अधिकारी असायचे. त्यातून कित्येकांचे संसार उध्वस्त झाले. काहीनी बायकांची हत्या केली. पण यात बारबालांचा दोष काय?तरी त्यांना कधी कधी चेहरा बांधून पोलिस स्टेशन बघावे लागते. कधी, कधी धाड पडणार म्हणून चोरासारखे लपावे लागते.
ती बारबाला त्या पैस्यातून आपला उदरनिर्वाह भागवित होती. आपल्या बहिनींचे शिक्षण करत होती. आता तिच्या बहिनी शिकून नोकरी करत आहेत. बारबालानेे ही परजातीत लग्न केले.आता तिच्या आई वडिलांचा निवारा झाला. समाज बाह्य होवून तिने कुटूंब जगविले होते.ती बहिष्कृत होती ती समाजासाठी;पण कुटुंबासाठी एक आधारवड होती.