STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

4  

Shila Ambhure

Tragedy

हक्क

हक्क

1 min
291

मृत्यूपत्रात नोंदविल्याप्रमाणे स्व. रमेशरावांच्या संपत्तीतील अर्धा हिस्सा त्यांची मुलगी नेहाला मिळणार होती. तिचा तो हक्कच होता म्हणा. आज भाऊबीजेच्या दिवशी दिनेशने मोठ्या अनिच्छेने सर्व कागदपत्रे बहिण नेहाच्या ओवाळणीच्या ताटात ठेवली. तिने अतिशय जड अंतःकरणाने त्याचा स्वीकार केला. मात्र भाऊबीजेला भावाला ओवाळण्याच्या हक्काला ती नेहमीसाठी मुकली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy