गुन्हा ...
गुन्हा ...
मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे व अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचे स्वप्न साकारले होते . राजू हा लहानपणापासून शाळेमध्ये अतिशय हुशार व चाणाक्ष होता . कोणाच्याही अध्यात-मध्यात न पडणारा. सरळ मार्गाने चालणारा राजू .आमच्या कॉम्प्लेक्समध्ये प्रसिद्ध होता . आजूबाजूच्या आणि स्वतःच्या मुलांना राजूची उदाहरणे देऊन समजावून सांगत होते . मात्र त्यामुळे त्यांच्या समवयस्क मुलांमध्ये राजू विषयी सतत तिरस्कार निर्माण होत होता. याची कल्पना राजुला मुळीच नव्हती. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. आणि शहरातच मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तेथे नव नवीन मित्र नवीन वातावरण असल्यामुळे राजुच्या मनात भीती होती. अभ्यासामध्ये पुढे असल्याने लवकरच राजू प्राध्यापकांमध्ये व कॉलेजमध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी इमेज तयार झाली. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये विशेषता मुलींमध्ये त्याच्याविषयी कुतूहल व आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे सतत मुलींचा ग्रुप राजू च्या मागे पुढे फिरत असे व कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात. असाच एक दिवस राजू अभ्यासात मग्न होता. अचानक एक दोन मुलींनी त्याची विकेट घेतली. तरीही राजूने प्रतिउत्तर दिले नाही. शेवटी एका मुलीने त्याची खोड काढली तेव्हा मात्र राजूचा संताप अना वर झाला व त्याने रागाच्या भरात त्या मुलींचा अपमान केला. व कॉलेजच्या आवारातून बाहेर पडला. मात्र मात्र त्या मुलीमध्ये त्याच्याविषयी राग व द्वेष निर्माण झाल्याने आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानीं विविध प्रकारच्या राजूच्या खोड्या करण्यास सुरुवात केली . राजू कॉलेजला सायकलने येत असत तेंव्हा मुद्दाम रस्त्यात उभे राहणे . वाहनाने धक्का देणे . असे प्रकार सुरू झाले .तरीही राजू दुर्लक्ष करीत होता. मात्र एक दिवस मुद्दाम राजूच्या सायकल पुढे त्या मुलींनी सायकली आडव्या घातल्या व त्यांनी खोड काढली . म्हणून आरडाओरडा करू लागल्या. अशा प्रकारच्या घटना घडल्या की काही क्षणांमध्ये मुलांची गर्दी होत असे व इमेज व शायनिंग मारण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी राजुला मारहाण केली. तेंव्हा त्याच्या सायकलची मोडतोड झाली . चष्मा फुटला . कपडे फाटले ; काही टारगट विद्यार्थ्यांनी पोलिसांमध्ये कंप्लिट केली. त्याला दुजोरा त्या मुलींनी लेखी दिल्या कारणाने त्याला पोलीसांनी पकडून नेले.
तेव्हा मात्र राजू मनाने उदास झाला. त्याला वाटले ऐवढे प्रामाणिकपणे वागून सुद्धा या टारगट मुलींच्या सवयीमुळे त्याच्या मनावर परिणाम झाला . दुसऱ्या दिवशी त्याच्या काही मित्रांनी , प्राध्यापकांनी चांगली वागणूक असल्याकारणाने विनंती करून त्याला सोडवले ; मात्र राजूच्या मनातून झालेल्या घटनेचा विपरीत परिणाम झाला होता. त्याच्या अभ्यासावर लक्ष उडाले होते. मात्र त्या मुलींनी त्याच्या खोडी काढणे . त्याला डिवचणे . शेवटी राजू मनाने खचल्यामुळे चित्रविचित्र वागू लागला .एकदा समोर शालेय वस्तूंची खरेदी करीत असताना टारगट मुलीने त्या दुकानातून काही वस्तु चोरल्या व नकळत त्याच्या बॅक मध्ये टाकून दिल्या आणि दुकानातून बाहेर पडताना . दुकानदारांना सांगितले. तुमच्या काही वस्तु चोरल्या आहेत. त्याच्या बॅगमध्ये सापडतील . दुकानदाराने ताबडतोब पोलिसांना खबर दिली व राजुला परत पोलीसात जावे लागले. अशाप्रकारे महिन्यामध्ये दोन तीन घटना घडल्या त्यामुळे राजू एक सराईत गुन्हेगार वाटू लागला. आणि राजुच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुन्हा करण्याचा हेतू नसला तरीही त्यावर आरोप केले जातात. असाच एकदा सुट्टीच्या कालावधीमध्ये राजू एका गार्डनमध्ये सायंकाळी अभ्यास करीत बसला होता. तेथेही या टारगट मुली स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बाजूला येऊन बसल्या . व त्याच्या खोडी काढू लागल्या . राजूने एक दोन जागा बदलून बसला तरीही काही फरक पडत नव्हता . म्हणून तो जायला निघाला. अचानक काही मुलींनी आरडा ओरडा सुरु केला. आणि राजू आमच्या खोडी काढून पळाला असं म्हणून ओरडू लागल्या जवळच सिक्युरिटी गार्ड असल्याने त्यांनी ताबडतोब पोलिसांना वर्दी दिली आणि काही मिनिटात पोलिसांनी राजुला पकडले. आता मात्र सार्वजनिक ठिकाणी खोडी काढल्या कारणाने त्याच्यावर विशिष्ट कलम लावण्यात आले व त्याला काही दिवसांची कोठडी झाली. याचा परिणाम मात्र राजु च्या जीवनावर झाला. त्याने त्याच्या आयुष्यात रंगवलेली स्वप्न, भविष्य, आईवडिलांची स्वप्न या साऱ्या गोष्टींवर पाणी फिरले होते. कारण आठवडाभराची पोलीस कोठडी झाल्यामुळे त्याचे करिअर बरबाद झाले होते. त्यामुळे राजुच्या मनामध्ये झालेल्या घटनेचा सूड घेण्याचे ठरवले. एक आठवड्यानंतर राजुची सुटका झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट येत होती ती म्हणजे झालेल्या घटनेचा सूड घेणे.
त्यासाठी तो वेगवेगळ्या मनामध्ये प्लॅनची आखणी करू लागला. राजूची कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याकारणाने त्याने केलेले प्लॅन कळणार नव्हते. अशा पद्धतीने त्याने त्या मुलींचा पत्ता शोधला! आणि कारवाई करायला सुरुवात केली. त्या मुलींपैकी एका मुलीला त्याने फोन केला. फोनवर सांगितले की तुझ्या घरच्या ,जवळच्या व्यक्तीचा एक्सीडेंन्ट झाला आहे .व एका हॉस्पिटल चे नाव सांगितले. जेंव्हा मुली हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तेंव्हा मात्र राजू त्यांच्या घरी पोहोचला. आणि त्यांच्या घरी जाऊन चौकशीच्या बहाण्याने त्यांच्या घरात विविध प्रकारची पाकिटे, चिठ्ठ्या टाकून निघून गेला. त्याचा परिणाम असा झाला. त्या चिठ्ठी चा परिणाम त्या मुलींच्या पालकांवर झाला व त्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हळूहळू कमी झाला. अशा पद्धतीने विविध प्रकारचे प्लॅन करून सर्वप्रथम त्या मुलींच्या त्यांच्या पालकांच्या मनातून त्यांच्याविषयी असणारा विश्वास , प्रेम , आपुलकी या हळूहळू कमी केल्या. परिणामी त्यांनी घरी कोणतेही कारण सांगितले ती.खरी पटत नव्हती. एक दिवस मात्र राजूने त्या मुलींची ट्रिप गेली होती. त्या ठिकाणी पोहोचला व नकळतपणे त्याने वेटर चे काम केले. आणि त्या पार्टी मध्ये व्यसन करीत सामील होत्या. त्याने क्या पार्टीमध्ये विविध प्रकारच्या पुड्या त्या पार्टीच्या ठिकाणी विशेषता त्या मुलींचे बॅग मध्ये ठेवल्या व एक निनावी फोन करून पोलिसांना कळवले या हॉटेलमध्ये रेव पार्टी चालू आहे. काही कालावधीमध्ये हॉटेलमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी ताबडतोब छापा टाकून पोलीस स्टेशन मध्ये नेले. तोपर्यंत राजू ने विविध प्रकारच्या रिपोर्टर , पत्रकार; यांना अशा प्रकारचे फोन करून काही कालावधीमध्ये प्रसार माध्यमाद्वारे ताबोडतोप सर्व बातम्या माध्यमा द्वारे घटनेची हकीकत कळाली . त्यामुळे पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे प्रकरण मिटवता आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना दखल घ्यावीच लागली. ड्रग पार्टी असल्याने त्या सर्व विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. 24 तासापेक्षा जास्त कोठडी झाल्याने कॉलेजमधून त्या विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आले. स्वतःची ज्याप्रमाणे करिअर नष्ट झाले . त्याच पद्धतीने राजूने त्याच शहरांमध्ये त्यांची कोठडीत रवानगी झाली. इकडे मात्र राजूचे करियर बरबाद झाल्या कारणाने त्याने घर सोडले !आणि अशा प्रकारचे छोटी मोठी गुन्हे तो करू लागला. गुन्हे करत असताना. त्याला विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेला व ती भागवण्यासाठी तो एक सराईत गुन्हेगार झाला. छोटी-मोठी गुन्हे करता करता त्याच्या हातून खून झाला. त्यामुळे त्याला आता सात वर्षाची जेल झाली होती.
तो पूर्वीचा राजू नव्हता. तो आता एक मोठा सराईत गुडं झाला होता. जेल मधून तो संधी मिळेल तेंव्हा बाहेर पडत आणि अनेक प्रकारचे गुन्हे करून परत जेलमध्ये हजर होत. त्यामुळे खरा गुन्हेगार कोण ? तो सापडत नव्हता. कारण दोन वर्षे झाली राजू याच जेलमध्ये होता.. साधारण दोन-तीन वर्षे झाली असतील मात्र त्याच्या मनामध्ये झालेल्या घटनेचे पडसाद व परिणाम नेहमी त्याला आठवण करून देत होते. असाच एकदा राजू मध्यरात्री जेल मधील असणारे बाथरूम च्या खिडकितून बाहेर पडला. आणि बाहेर गेल्यानंतर उभे असणाऱ्या गाडींचा आधार घेऊन तो त्या शहरात पोहोचला. व त्याच्यावर ही वेळ ज्या व्यक्तीने आणली होती. त्या व्यक्तीला संपवणे फक्त एवढा एकच विचार ! त्याच्या मनामध्ये सदा येत होता. आणि त्यासाठी तो आज जेल मधून फरार झाला होता. त्याने त्या शहरांमध्ये ज्या व्यक्तीमुळे मी जेल मध्ये पोहोचलो त्याच घरामध्ये त्याने त्या मुलींचा खून केला. व काही कालावधीमध्ये परत जेलमध्ये आहे त्या जागी पोचला. पोलिसांनी खुनाचा तपास करण्याचा भरपूर प्रयत्न केला . मात्र कोणत्याही प्रकारचा पुरावा सापडला नाही. व जेलमध्ये असणाऱ्या राजू वर शंका करू शकत नव्हते. अशा पद्धतीने राजूने आत्तापर्यंत चार मर्डर केली होती. तरीही तो एकाही गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला नाही. आता राजुने मनामध्ये खूणगाठ बांधलेली होती. कि एक खुण केल्यानेही आठ वर्षाची जेल भोगत आहोत .अजूनही गुन्हे केल्यानंतर हिच शिक्षा होणार त्यामुळे तो बिनधास्त पणे वागत होता. यावरून गुन्हा कसा घडतो. किंवा केला जातो. याविषयी राजूने जेलमध्ये एक आत्मचरित्र लिहिले . आजही त्याच्या असंख्य प्रति विकल्या जातात. ज्या आई-वडिलांनी राजू विषयी.बघितलेली स्वप्न बघितलेली होती . त्याचे भविष्य आणि घडलेला गुन्हेगार त्याच्या स्वतःच्या आत्मचरित्राला त्याने एक नाव दिले "न घडलेला गुन्हा " आजही राजू जेलमध्ये आपला जीवन काळ व्यतीत करीत आहे एक गुन्हेगार म्हणुन.
