स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Fantasy

3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Fantasy

गरमा गरम भजी

गरमा गरम भजी

3 mins
265


      जुलै महीना म्हटलं की पावसाची संत धार सतत चालूच असते. पावसाची धार एवढी जोराने पडत होती की थांबायचे नाव नव्हते काढत. मी विरार स्टेशन ला उतरलो.स्टेशनच्या बाहेर आलो आणि घड्याल्यात बघितले संध्याकाळचे साडेपाच वाजलेले. आधीच ट्रेन खूप उशीर झालेली. मी माझी छत्री उघडली आणि घरचा मार्ग पकडला. एक शेरींग वाला म्हणाला कुठे जाणार मनवेल पाडा की कारगिल नगर मी म्हटलो नाही, जवळच जातोय. तसे माझे घर मनवेल पाड्यातच आहे पण मी नेहमी चालतच जायचो. रिक्षाचे भाडे वीस रुपये असल्यामुळे ते किष्याला परवडण्यासारखे नव्हते. एखादा सामान्य माणूस हाच विचार करील की त्याच वीस रुपयाचे मी भाजी घेऊन घरी जाईन आणि हेच मनात ठेऊन मी सकाळी आणि संध्याकाळी घरी चालतच जायचो.

       छत्री असून देखील बहुदा मी अर्धा भिजून गेलेलो मग जास्त भिजू नये म्हणून एका दुकानाच्या छपराखाली थांबतो नाही तोच एक खमंग भजीचा वास आला.बाजूला बघतोय तर एक मस्त पैकी रस्त्याच्या कडेला वयस्कर व्यक्ती गरम गरम कढईत भजी तळत होता. त्या गाडीच्या बाजूला त्या लोकांची भजी खाण्यासाठी झुंबड चालू होती. एक माणूस भजी खात असताना त्या भजीचा कुर कुर आवाज ही येत होता.आता तर धीरच नव्हता.कधी खायला मिळते असे झालेले.त्याच्या बाजूला चहावाला चहा बनवत होता. माझ्या पण जिभेवरती अलगद पाणी आले.हाताला खाज सुटते तशी भजीची चव आली. भजी आणि चहा सोबत म्हणजे मनसोक्त आनंद घ्यायचा यात काही शंकाच नव्हती.लगेच शर्टच्या वरच्या कप्यात हात टाकला. मोजून शंभरची हिरवी नोट निघाली. ओ काका मला पण एक कांदा भजी प्लेट द्या.खायला की पार्सल असे ते बोलले.लगेच घरची आठवण आली.अरे हो घरी पण घेतली पाहिजे.मग त्यांना बोललो आधी खायला द्या.हातामध्ये प्लेट येताच मी भजीचा आस्वाद घ्यायला सुरवात केली. तब्बल दहा मिंटानी माझ्या हातात भजीची प्लेट आली.भजी एवढी गरम होती की जिभेला चटके बसत होते. लगेच माझे लक्ष त्या हिरव्या मिरचीवर गेले. बहुतेक शेवटच्या दोन तळलेल्या मिरच्या शिल्लक होत्या. पटकन पुढे आलो आणि हातात घेतल्या. खरं सांगू भजी आणि वडापाव सोबत मिरचीची चवच निराळी. मी खाता खाता बाजूला एक चहाचा कटींग हातात घेऊन सुस्कारे मारत बसलो.आता कुठे पाऊस ओसरला होता. पण काळोख खूप झाले होते. तेवढ्यात आमच्या घरवालीचा फोन आला. काय ओ कुठे आहात? बस दहा मिनटात येतोय मी,अहो पाऊस खूप आहे ओ, अगदी लाडात म्हणाली भजी आना ना, गरमा गरम.मी बोलायच्या आधीच तिने बोलून टाकले. आणि येताना तुमच्या वाटणीची पण आना. नाय मी हिथे खाल्ले. तरीही घेऊन या, कितीही खाल्लात तरी तुम्ही घरात भजीवर ताव मारणार. तशी तुम्हाला सवय आहे. तसा फोन मधून आवाज कमी येत होता म्हणून मी लाऊड स्पीकर वर ठेवलेले. पण हे बोलतच मी बंद केले. समोर एका बाईला हे ऐकू आले तेव्हा ती माझ्याकडे बघून हसत होती. मी त्या काकांना अजून एक प्लेट पार्सल द्या बोलालो.समोरच एक वयस्कर आजी आली. थोडी कमरेत वाकलेली, आणि हातात लांब काठी होती. तिने ते पार्सल बघून मला बोलली, बाबा थोडे खायला मिळेल का? जाऊदे आपल्यासारखे तिचे पोट. पण वयस्कर काका जरा खराब निघाला. ये काय आहे चल निघ म्हातारे. सारखे सारखे येतात डोक्याला ताप. मी त्या काकाला बोललो निदान द्याचे नाही तर बोलू नका. अहो साहेब सारखे येतात. ठीक आहे मी पैसे देतो. द्या त्या आजीला भजी पाव. ती आजी हळूच मला बोलली भले करो देवा तुझे. बस मी एवढे ऐकले आणि मनाला खूप बरे वाटले. आणि मी तिथून निघालो. मी थेट घरी पोहचलो. किती उशीर? ती बोलली,

एवढा पाऊस तर उशीर होणारच, मी बोललो.

नाय मला वाटले कोण चांगली भजीवालीन भेटली. ती बोलली,🧐🧐

काय पण हा बोलतेस तू. मी बोललो

अहो मजाक केली.बॅगेतून भजी काढली. आणि सुरेखाच्या म्हणजे माझ्या अर्धागिनीच्या हातात दिली. खूप थंड झाले आहे भजी,मी म्हणालो

नाय आता तव्यावर गरम करतो. तुमची जीभ भाजली ना मग राहूदे.ती वैतागून बोलली

मी काहीच न बोलता ती खाता खाता एक भजी उचलली आणि बाहेर पळालो.

भजीवर तिने ताव मारून रागाने ऊ ऊ ऊ करत ,संपेपर्यंत येऊ नका...... असे ती बोलली 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy