कवी स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy

2  

कवी स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy

26 जुलै

26 जुलै

6 mins
100


           गेले दोन तीन दिवस पावसाची रिमझिम सरत होती. असे वाटले नव्हते की एक मोठे संकट मुंबापुरीवर येणार आहे. हो तीच तारीख 26 जुलै 2005 बद्दल बोलतोय मी. असा थरारक आणि अंगावर शहारा आणणारा दिवस म्हटले तर आपल्या मुंबईचा काळा दिवस तो. नुकसान फक्त माणसाची नाय तर गुर,ढोरं, कुत्रा, मांजर गाड्या त्याच्यासोबत माणूस.काही बुडाले तर काही नशीबवान वाचले.मुंबईच्या मिठी नदीने तर रौद्र रूप धारण केले होते.

    जेमतेम मला मूसरुड फुटायला लागली होती. कोवळे येन तारुण्य वयात मी एका श्रीमंताच्या घरी काम करत असताना फिरायची इच्छा खूप असायची पण काम जास्त असल्यामुळे मला बाहेर पडायला जमायचे नाही. माझ्या गावच्या काकी खालच्या मजल्यावर धूनी भांडी करायला यायच्या. ते मावशीच्या बाजूलाच राहायच्या. मी दुसऱ्या मजल्यावर काम करायचो. बेल वाजली रिंग... रिंग..

 मी डस्टिंग करता करता दार उघडायला गेलो. 

बगितले तर काकी.

कसे आहात?

मजेत ना!

तू कसा आहे?

बस ठीक चालले आहे काकी.

मी आधी पाणी दिले.

नंतर विचारले काही काम होते का?

तुझ्या मावशीने तुला उद्या बोलवले आहे...

उद्या भेटून ये...

मी काकीना हो बोललो. मी मनातल्या मनात म्हटले चल उद्या मावशीला भेटायला जातो. 

        संध्याकाळी जेऊन झाल्यावर मी माझ्या शेठ ना बोलो उद्या मला मावशीने बोलावले आहे भेटायला, 

जाऊ का?

तर शेठ बोले ठीक आहे थोडे काम करून निघून जा पण संध्याकाळी राहू नको माघारी ये.काम खूप आहे.मी त्यांना हो बोललो.

      मी दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठलो आणि काम करून 12 च्या सुमारास निघालो. पाऊस थोडे कमी झालेले. पण पावसाचे सावट आणि जास्त अंधार आभालाने केलेले होते. असे थोडे मनात आले जर का जोरात पाऊस आले तर मग काय खरे नाही.दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठलो आणि काम करून 12 च्या सुमारास निघालो. पाऊस थोडे कमी झालेले. मी निघालो.

      मी सांताक्रुझ ला काम करत होतो आणि मावशी गजधरबांध ला राहायची आम्ही सर्व त्या एरियाला बांध म्हणून बोलायचो. मावशीच्या घरी गेलो.मावशी जेवण बनवत होती.मस्त जेवणाचे सुगंध आले. माझी मावशी जेवण खूप छान बनवते. त्या दिवशी चिकन वडे शिजत होते. मला तर जिभेला चव सुटली अर्थात पाणी सुटले. मावशीला बोलो लवकर जेवण बनव भूक लागली आहे. ती बोली हो बनवते. बस टीव्ही बघ आणि काकांशी गप्पा टप्पा मार. काका आणि मावशीला एक मुलगा. आम्ही सर्व जेवलो आणि सहज मावशीला विचारले काय काम होते सहज ना.

अरे तू गुजराती कडे काम करतो ना मग असे जेवण मिळते का? 

मी म्हणालो नाही, जास्त प्रमाणत गोड जेवण. मग म्हणून तुला बोलावले जेवायला.

अच्छा ठीक आहे. मी खूप जास्तच जेवलो आणि जोपलो . मी संध्याकाळी 5 वाजता उठलो. बाहेर खूप आरडा ओरडा होता. लोकांची गडबड चालू होती.काही तरी मोठे कारस्थान झाले असे मनाला वाटले. मावशीला बोलो मी जातो कामाला. ती बोली नको जाऊ पाऊस खूप पडले आहे.तिला माझी खूप काळजी पण मी ऐकले नाही आणि घरातून निघालो. जिन्यावरून खाली गल्लीत उतरलो तर गुडघ्याइतके पाणी होते. पहिले माझी प्यांट गुंडाळली आणि वरती घेतली.सर्व चाळीतले घरातून पाणी काढत होते.माझ्या कानावर एका वयस्क पुरषाचा आवाज आला तो म्हणजे

काय मेला आज चार महिन्याचे एकदाच पडला. सर्व घराची नासधूस केली रे देवा. अशा लोकांकडे बघून मला पण वाईट वाटले. मी कसातरी तरी रोडवर आलो. तर बगतोय तर सरविकडे पाणीच पाणी. जो तो पाण्यातून वाट काढत निसटत होता. काही लहान मुले पाण्यात उड्या मारत होते. जणू काही नदीमध्ये पोहत आहेत.सर्विकडे आरडा ओरडा चालू होता. आणि बघतोय तर एकाच्या दुकानात टीव्ही वर बातम्या चालू होत्या. मी थोडा थांबलो आणि बगत राहिलो.चक्क लोक पट्रिवर घुडघ्याभर पाण्यातून चालत होते. प्लॅटफॉर्म वर सर्विकडे बसून तोंडामध्ये बोटे टाकून तर कोण घाबरलेल्या आणि भुकेल्या अवस्थेत. गाड्या पूर्ण गायब झालेल्या.त्यांच्या चेहरा रडवेला होता.भुकेने व्याकूळ होते.गाड्या तर बहुतेक बुडालेल्या.गाडीवरचा छप्पर फक्त दिसत होता. जणू आपण गणपती बाप्पाला नदीमध्ये विसर्जन करताना शेवटच्या क्षणी आपल्याला बुडताना दिसतात तसेच गाड्यांचे झालेले. लोकांचे हाल तर झालेच तर काही निष्पाप लोकांचे प्राण ही गेले. सुरवातीला गाड्यांमध्ये पाणी शिरू नये म्हणून फौरविलरचे काचा पूर्ण पणे बंद केले. गाडीतले लोक अडकले. त्यात गाडीमध्ये पाणी शिरून काही लोकांना प्राण गमवावे लागले होते. जसे डोंगरावरून पाण्याला उपिल सुटते तसे माझ्या कपाळाला घाम फुटलेले. मी अस्वस्थ झालो बातम्या ऐकून.

      थोड्या वेळाने मी निघालो कामावर्ती जायला. पहिले एक मोठी काठी हातात घेतली. कारण गटाराची झाकणे पूर्ण उघडलेली. पाण्यातून खड्डे गटारे काही दिसत नव्हते.मग मी एक भली मोठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत निघालो. पाण्यामुले गटारे फुटले होते. गटारात जाण्याची शक्यता होती. जो तो घरी कधी पोहोचण याच विचारात होते. आणि साहजिकच प्रत्येकाला आपले प्राण महत्त्वाचे असते. त्यात आपला परिवार डोळ्यात तेल टाकून वाट बघणारा. सर्वांची घाई घाई झालेली.रस्त्यावरून जाताना एका ठिकाणी सर्व जमा होते.अरे बापरे! मी तोंडाला हात लावला.गटारात एक इसम मृत झालेला होता पाण्यात बुडून प्राण गेले होते. तिथून मी निघालो. असे बरेच लोकांचे प्राण गेले होते. हाहाकार झाला होता त्या दिवशी. मी कसे बसे घरी पोहोचलो. पण माझे शेठ ओरडले.अरे!नाही आला असता तरी चालले असते. जा जरा गॅलरीमध्ये पाणी साचलय ते दिण्या आणि तू साफ करून घे.मग मी काही न बोलता गॅलरी मध्ये गेलो. माझ्या सोबत एक दिण्या (दिनेश) मुलगा काम करायचा. त्याने मला बघताच ओरडला..

अरे! तुला समजत नाही का? 

काय गरज होती एवढ्या पाण्यातून यायची.

काही झाले असते तर..

मग मी बोललो माफ कर मला. चल चल शेठ ओरडेल फटाफट साफ करून घेऊ. गॅलरी साफ करून झाल्यावर आम्ही दोघे ते बाहेरचे दृश्य बघत होतो. कोण डोक्यावर बॅग घेऊन, तर कोण आपल्या मुलाला खांद्यावर , तर एक जोडपे अगदी म्हटले तर तरुण एकमेकांना जपून पाण्यातून जात होते. सर्व दृश्य दोघेजण बघत थक्क झालो. तेवढ्यात एक आजी जेमतेम पासष्ट सत्तर वर्षाची रस्त्यावरती बाजूला भिंतीला धरून थांबली होती. जणू घाबरलेली. मला आणि दिण्याला वाईट वाटले,

मी बोललो जाऊ या का?

दिण्या, चल त्या आजीला मदत करूया! 

घरी आणुया!

हो रे चल बिचारी,

पण शेठ ला बोलावे लागेल,

हो ते मी बोलतो.

शेठला सर्व त्या आजीबद्दल बोललो,

जावा घेऊन या, शेठ बोलले.

आम्ही दोघेजण पटकन त्या समुद्र सारख्या दिसणाऱ्या रोड वर आलो. सरविकडे पाणीच पाणी दिसत होते. आजी जवळ

त्या गोंधळात,"आजी तुम्हाला कुठे जायचे आहे,;

खूप गोंधळून त्या आजीच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. मी आजीचा हात पकडला. खूप थंड पडलेले हात तिचे.

अहो! आजी,

तेव्हा कुठे बोलली.

मला खारला जायचे आहे.

आजी आता घरी चला आमच्या," खूप पाणी रस्त्यावर भरले आहे". काही काळजी घेऊ नका.

"दिण्या, त्या साईटने पकड,

"चला आजी,

आजी सावकाश हा! चला, दिण्या बोलला.

घरी घेऊन आलो.

अरे स्वप्नील, आजीला टॉवेल दे, आणि खुर्ची दे बसायला 'शेठ बोलले.

हो देतो शेठ,

'हे घ्या टॉवेल;

आजीने थोडा आराम केला. नंतर 

मस्त पैकी सर्वांना चहा बनवली. आजीला थोडे बरे वाटले. नंतर आजी बोलायला लागली.

'माझ्या लेकरांनो तुम्ही आलात बरं झाले;.

माझे काय खरे नव्हते,

अहो!आजी असे का बोलता, पाण्यातून घरी कसे गेला असता. आणि हो ते आमचे कर्तव्यच ना!

व्हा! व्हा !...खूप छान काम केले.शेठ बोलले!.

सर्वांनी मस्त चहा घेतला.

ह्या पावसानी आज कहरच केली बाबा, असा पाऊस कधी बघितला नाही रे बाबा, बरं झालं वेळेत आलात आणि तुमच्या शेठ चे आभार.

मी थोड्या वेळाने शेठ कडे गेलो. आणि बोललो शेठ पाणी काही आज ओसरणार नाही . आजीला आज राहूदे आपल्याकडे.

शेठ बोलले हो राहूदे.

मग दिण्या कडे गेलो.

'दिण्या, आज आपल्याला आजीचे पण जेवण बनवायचे आहे.आजीला उद्या सोडू घरात.

'हो हो चल,...

आजी आज इकडेच रहा. उद्या सोडतो घरी.

आम्ही चहा घेत गप्पा टप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी आजीला घरी सोडले.

      मित्रांनो खरोखर झोप उडऊन टाकणारा प्रसंग. तो दिवस आज ही आठवला की पहिले देवाशी प्रार्थना करतो आणि म्हणतो असा कधी दिवस येऊ नये. एक श्रद्धांजली कविता. जेणे करून प्राण गमावलेल्या बंधूंना, बघिनिंना आत्म्यास शांती लाभेल.🙏

       

          26 जुलै

     

    दिवस येवढा भयानक तो 

    आजही मला कापरा भरतो

    देवा पाया पडतो तुझ्या आधी 

    26 जुलै नको कधी

    रस्त्यावर  पाणी 

    पटरीवरती पाणी

    चाळीत पाणी

    सर्वांना हैराण केलेस तू

    सर्वांना बेचैन केलेस तू

    वरून राजा एव्हढा भडकलास 

    निष्पाप लोकांचे प्राण घेतलेस 

    कोण बंद गाडीत

    तर कोण मेनहोलात जाऊन

    बुडून गुदमरून 

    निष्पाप गेले सोडून  

    देवा पाया पडतो तुझ्या आधी 

    26 जुलै नको कधी


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy