स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

4.3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

स्वामी तिन्ही जगाचा आईविना

स्वामी तिन्ही जगाचा आईविना

4 mins
320


ऑफिस मधून घरी जाण्यासाठी खरे तर आज खूप उशीर झाले होते. विरार स्टेशन ला अगदी ठीक बारा वाजता ट्रेन मधून उतरलो. तोच रिक्षा पकडली आणि मनवेल पाडा बोललो. रिक्षातून जाताना अगदी थोडेच लोक चालत होते. घड्याळात जास्त वाजल्यामुले लोक जरा रस्त्यावरती थोडे कमीच होते.मी मनवेल पाड्याला कधी आलो कळलेच नाही. मी त्या रिक्षावाल्याला पाकिटमधून वीस रुपये दिले. आणि माझी घरची वाट पकडली. तसे तर मनवेल पाडा रिक्षास्टँड पासून माझे घर अगदी नाही म्हटले तर मोजून दहा मिनिटे. मी पावले टाकायला चालू केले. रस्ता तसा सामसून दिसत होता. कुत्रे जोराजोराणे भुंकत होती.अंधार खूप असल्यामुळे थोड्या वेळासाठी मोबाईल ची बॅटरी चालू केली. रात्रीच्या अंधारात किर्र किर्र किड्यांचा आवाज कानावर पडत होता.एक सुसाट बाईक वाला असा बाजूने गेला माहीतच पडले नाही. खूप अंधार असल्यामुळे त्या गाडीची हेडलाईट माझ्या डोळ्यावर पडली.आणि मी तेवढ्यात ती हेडलाईट डोळ्यावर पडू नये म्हणून लगेच माझ्या चेहऱ्यासमोर हात घेतला.माझे डोळे थोडे चमकले. मी मनातल्या मनात म्हटलो की ह्या बाईक वाल्यांना रस्ता मोकळा दिसला की यांना काहीच दिसत नाही. अगदी सुसाट पळतात.

रस्त्यावर चालत असताना एका सोसायटीच्या बाजूला एक वयस्क काष्ठी पातळ नेसलेली, थोडी कमरेत वाकलेली, केस पांढरे, कपाळाला भले मोठे कुंकू, चेहऱ्यावर सुरकुत्या आलेली,डोळ्यांवर जाड्या काचेचा चश्मा आणि तो दोरीने गळ्यात बांधलेला अशी वयस्क आई म्हणजे जेमतेम साठ वर्षांची ती होती. तिच्या डोळ्यातून अश्रू असे वाहत होते जसे की डोंगरातून पाण्याचा धबधबा वाहतोय. तिच्याच बाजूला एका सिमेंटच्या रस्त्याच्या कटादड्यावर असा पाय पसरून एक जेमतेम पस्तिशितला मुलगा दारूच्या नशेत बसलेला होता.त्याने जास्त प्रमाणात मदिरा घेतल्यामुळे त्याला काही होश नव्हते.तो आपल्या धुंदीत गप गप गप असे त्याच्या आईला ओरडुन बोलत होता.ती आई त्याला बोलत होती."अरे ,माझ्या वासरा चल घरी,बारा वाजून गेले आहेत.काय हा तुझा अवतार केला आहेस.अरे आयुष्याची वाट लावलीस तू. शरीराचा पूर्ण खुळखुळा केलास रे, हे देवा मी काय करू, अरे ईश्वरा मला हे दिवस बघायला कशाला ठेवलेस. निदान मला तरी लवकर घेऊन जायचे.मला घरी जायला खूपच उशीर होत होता.पण माझे मन घरी जायला बोलत नव्हते. मला त्या केविलवाण्या आईची खूपच दया आली होती. मी त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर एका बाजूला उभा होतो. आणि हे सर्व दृश्य मी उभा राहून बघत होतो. माझ्या मनात आले की चल जाऊन त्या नशेतल्या मुलाची समजूत काढावी.पण एक मन असे पण बोलत होते की जर तिथे त्या मुलाला समजवायला गेलो तर उलटा आपल्यालाच काही तरी अपशब्द बोलेल. कारण नशेतल्या मनुष्याला काय चांगले काय वाईट हे कळतच नाही. तरी पण त्या साठीच्या वर गेलेली आईची मला द्या आली. तिच्या डोळ्यातले अश्रू आपण जाऊन पुसावे. आता ह्या भयाण अंधारात कोणच मदतीला येणार नाही तिच्या. तर आपणच तिचा आधार व्हावा. हे विचार करून मी आई कडे गेलो. अहो,आई असे रडू नका. आधी तुमचे डोळे पुसा पहिले. मी समजवतो तुमच्या मुलग्याला घरी घेऊन जाऊया. हे ऐकताच ती आई माझ्याकडे बघून आणखीच रडायला लागली.

तिला तिचे अश्रू अनावर झाले नाही. ती म्हणाली मला; माझ्या बावा, लेकरा या माझ्या पोटच्या गोळ्याला जरा समजव रे. अरे कधीपासून मी त्याला विनवणी करत आहे. पण याने एवढी ढोसली आहे की त्याला शुध्दच नाही. रोज बाप लेक संध्याकाळी पितात आणि माझे मरण करतात. काय यांना बोलावे कळतच नाही. एकाला शांत केले आहे.घरात झोपला आहे आणि हा एवढ्या रात्री पिऊन बाहेर तमाशा करतोय. खरोखर त्या आईचे विव्हळणे मला अजिबात सहन झाले नाही. हे सर्व तिचे वाक्य एकूण मी थोडा वेळ निशब्द झालो आणि लगेच त्या मुलाला बोललो, अरे कशाला त्या आईला त्रास देतो. जा घरी आणि झोप. नशा करून तुला काय मिळते. त्यावर तो लगेच बोलला. तुझ्या पदर ची पियालो आहे का. मी माझ्या खिशातली पितो. तेवढ्यात ती आई मुलाला बोलली. ये काहीही बोलू नको. एक कानशिलात देईन. मुकाट्याने घरी चल. मी पण बोललो, अरे त्या आईकडे बघ कशी अवस्था झाली आहे. एवढ्या अपरात्री तुझ्या पाठीमागून भर रस्त्यावर तुला समजावत आहे. त्या जन्मदात्या आईची तरी कदर कर. नऊ महिने तुला गर्भात वाढवले. जन्म देऊन तुला लहानाची मोठी केली. तुला नको ते आईने दिले. तिच्या पदराने तुझे तोंड पुसले. आणि आज तिलाच तू त्रास देत आहेस. तू तिला संभाळली पाहिजे होती. एव्हढा मोठा झालास आणि आज तुलाच ती संभाळते. थोडी तरी तिची कदर कर. माझा पण आता पारा चढलेला. मी बोललो, आई तुम्ही घरी जावा तो येईल. पण त्या आईच काळीज मुळीच तयार नव्हते होत घरी जाण्यासाठी. नाय नाय याला रात्रीचे असे सोडले तर कोण तरी मारेल. नायतर कुठेतरी असाच पडून झोपून जाईल. हे सर्व त्या आईचे मुलावरचे प्रेम बघून माझे डोळे पण पाण्याने पाणावले. मी लगेच त्या मुलाला बोललो, अरे बाबा मी तुझ्या पाया पडू का. का तू समजत नाही. त्या आई कडे तरी बघ तेवढ्यात तो घरी जाण्यासाठी तयार झाला. आई ने त्याचा हात पकडला मी पण त्याचा खांद्याला धरले आणि त्याच्या घराबाहेर सोडले. घराचा दरवाजा असाच उघडा होता. त्या मुलाचे वडील असेच लादीवर मदीरा घेऊन सुस्त झोपलेले. मी मनातल्या मनात विचार केला ही आई रोज किती या दोघांचे सहन करत असेल तिचे तिलाच माहिती. लगेच माझ्या घरची आठवण आली आणि मी आईच्या पाया पडून निघालो. तेवढ्यात आई बोलली अरे असे काय करतो. खरं तर मी तुझ्या पाया पडायला पाहिजे. नको आई, तुझ्यामुळे आज मला आईचे प्रेम बघायला मिळाले चला येतो. मी भराभर पाऊले टाकली आणि घर गाठत एकच स्वतःशी पुटपुटलो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational