गोष्ट माधुरीची ...
गोष्ट माधुरीची ...
कोल्हापूर जिल्ह्यात नांदनी नावाचं एक गाव होते. त्या गावामध्ये अनेक वर्षांपासून हत्तीपूजनाची परंपरा चालू होती. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी त्या गावात एका हत्तीणीचं जन्म झाला. तिचं नाव ‘माधुरी’ (महादेवी) असं ठेवण्यात आलं.माधुरी ही अतिशय हुशार, प्रामाणिक आणि लोकजीवन जपणारी हत्तींनी होती. लहानपणापासूनच तिला माणसांमध्ये राहण्याचं एक वेगळंच आपलेपण वाटत असे. गावातील लोक तिच्यावर खूप प्रेम करत असत. तिच्याविना गावाची यात्रा व महोत्सव पूर्ण होत नसे. अशी ही माधुरी गावातील सगळ्यांची लाडकी आणि सर्वानाच भावुक करणारी होती.ऐके दिवशी ‘वनतारा’ नावाच्या उद्योजकांने माधुरीला गावातून वंनतामध्ये नेण्याचा निर्णय घेतला. वनतारा हे एक सर्वात मोठं उद्योजकांनी स्थापित केलेल अभयारण्यच जणू. वनताराने माधुरीसाठी मोठी रक्कम ठरविली. पण झाले असे गावच्या लोकांनी वनतारा कडे माधुरीला देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र वनतारा विभागाने हे काही मान्य केलं नाही आणि कोर्ट-कचेरीचा मार्ग अवलंबला. त्यांनी सरकारलाही आपल्या बाजूने वळवलं आणि न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लावला आणि माधुरीला ते घेऊन गेले. पण गावकरी एकनिष्ठ होते. त्यांनी सरकार व न्यायालयासमोर ठामपणे आपली बाजू मांडली आणि अखेरीस तो निकाल रद्द करण्यात आला. माधुरीला पुन्हा गावात परत आणण्यात आलं.
गावकऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की, पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते. (म्हणतात ना - “हम खडे तो सरकार से भी बड़े”)
— शुभांगी शिंदे
