घनचक्कर - एक सत्य भयकथा
घनचक्कर - एक सत्य भयकथा
माधाकाका कालच गावाकडे आला होता ....
आणि गावात मयत यात्रा निघाली होती , ती म्हणजे गावातल्या सर्वात खुंखार बाईची ......
माधा काका मिल्ट्री मध्ये भरती झाला होता , वयाच्या विसाव्या वर्षी ..........
त्यामुळे माधा काका आणि त्या बाईची काही मुलाखत झालीच नव्हती .......
एकदा माधा काका लहान असताना त्या बाईकडे त्याला नेण्यात आले होते ......
ते म्हणजे पाणी भारून घ्यायला .......
जेव्हा म्हणतात ना की माणूस बिमार असला किंवा त्याला काही भूत बीत लागले की पाणी भारून घेतात .......
माधा काकांचे सुद्धा तेच हाल झाले होते , जेव्हा काका आपल्या म्हशी घेऊन रानात गेले होते .......
तेव्हा अचानक जंगलात सगळ्या म्हशी हरवल्या , माधा काका लहान होते , म्हणून ते सरळ जंगलात म्हशी शोधायला गेले .....….....
अचानक काका रस्ता चुकले ........
काका हिंडत होता , अगदी वेड्या सारखा .….......
रात्र झाली , म्हशी घरी आल्या ......
पण माधा काका काही घरी आला नाही , म्हणून सारा गाव जंगलात शोधायला निघाला ........
रात्रभर शोधून झाले ,तरी काका काही सापडला नव्हता ......
सगळे गाव परेशान झाले होते ........
कारण काका त्यांना सापडलाच नव्हता ........
सकाळ झाली ,
गावातल्या विहिरीजवळ एक पिंपळाचे झाड होते ...
सकाळी सकाळी विहिरीवर गावातली एक बाई पाणी आणायला गेली ..........
तिने पाणी काढले ......
हंडा भरला ..........
अजूनही कुणीच विहिरिवर पाणी आणायला आले नव्हते .......
म्हणून तिला नवलच वाटले .....
पण तिला हे कळायला उशीर लागला नव्हता की , आपणच आज लवकर उठून पाणी आणायला आलो होतो ......
कारण सकाळी सकाळी खूप गर्दी व्हायची , कारण गावात पाण्याचा बराच तुटवडा होता ......
तसे गावची विहीर थोडी वेशी बाहेरच होती ........
वातावरणात एकदम शांतता होती , सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज कानाला गोडवा देऊन जात होता .......
सुर्यनारायण अजूनही फारसे प्रगटले नव्हते .....
त्यामुळे उजेड पडायचा बाकी होता ..…….
तिने डोक्यावर चुंबळ लावली आणि हंडा उचलला .....
ही खेप रिचवून पुन्हा दुसऱ्या खेपेला यायचे असा तिचा विचार होता ..........
तिने हंडा डोक्यावर घेऊन समोर कूच केले ........
ती पिंपळाच्या झाडाच्या थोडी अलीकडेच होती ......
एकदम ते शांत वातावरण भंग पावले .......
कारण पाखरांचा चिवचिवाट खूप वाढला होता .......
तिचे लक्ष त्या पाखरांनी वेधून घेतले होते .......
तिने सहज पिंपळाच्या झाडाकडे वर बघितले ......
तिने जोराचा आक्रोश केला ........
डोक्यावरचा हंडा तिने खाली आपटला ......
आणि ओरडत गावच्या दिशेने पळाली .........
तिचा आक्रोश बघून चार चौघे .....
गावातले लोक धावत तिच्या जवळ आले ......
तिची बोबडीच वळली होती .......
तिला लोक विचारत होते की काय झाले ???
पण ती सांगण्याच्या अवस्थेत नव्हती ......
तिच्या तोंडातून भीतीने एक शब्द सुद्धा फुटत नव्हता .......
सकाळच्या गारव्यात सुद्धा तिला दरदरुन घाम फुटला होता .........
तिने फक्त एकच बोलणे चालू ठेवले .....
"" झा…....झाड .......
झा ...…..झाड ...... ""
लोक बावचालले होते , कारण तिची ही अवस्था बघून त्याना काहीच सुचत नव्हते .....
ते विहिरीकडे गेले ,
आणि झाडाकडे बघू लागले .....
त्यात एका माणसाचे लक्ष झाडाकडे गेले , त्याची पाचावर धारणच बसली ......
कारण पिंपळाच्या झाडावर माधा काका एका फांदीला उलटा लटकलेला होता ........
त्याने जोराची आरोळी ठोकली , गावातील आणखी दहा बारा लोक त्याच्या दिशेने धावले .........
कुणाची सुद्धा झाडावर जाण्याची हिम्मत होत नव्हती ......
कारण माधा काकाचे डोळे सताड उघडे होते ,
त्याचे पाय फांदीला अडकले होते .......
तो मेला की जीवन्त आहे हे सुद्धा त्यांना कळत नव्हते .....
सगळे गाव हे भयानक दृश्य बघून हादरले होते .......
काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते ,
माधा काकाच्या घरच्यांनी तिथे रडापड सुरू केली ......
शेवटी दोन हिंमतवान तरुण झाडावर गेले ......
माधा जीवन्त आहे , असे त्यांनी सांगितले तेव्हा कुठे तिथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांच्या जीवात जीव आला होता .........
माधाला खाली आणण्यात आले ,
त्याचे डोळे सताड उघडे होते ........
पण त्याचे श्वास चालू होते , त्याला तोंडावर पाणी मारून जागे करण्यात आले ........
पण सर्वांना प्रश्न पडला होता की माधा झाडावर उलटा लटकलाच कसा ???
सगळे जण घाबरलेले होते , कारण भुताटकीचा हा प्रकार या अगोदर असा घडला नव्हताच .......
माधा काकाला त्या बाईकडे म्हणजे गंगू म्हातारी कडे नेण्यात आले ......
माधा आता चांगलाच शुद्धीवर आला होता , त्याला लोक काय बोलत आहे हे कळतच नव्हते ......
गंगू बाई समोर काळ्या साडीत बसली होती , गंगू बाईचा मुलगा म्हणजे कडूबा काका बाजूला आपल्या हातात चामड्याच्या पट्टा घेऊन बसला होता .......
माधा तिला बघून घाबरलाच ........
कारण तिने तोंडावर पदर घेतलेला होता .......
असे म्हणतात की कडूबा मोठा झाल्यानन्तर ,
गंगू बाईने आपला पदर हटवून आपला चेहरा गावच्या कुणालाच दाखवला नाही ......
तिने असे का केले ?
तिलाच माहीत .......
पण माधाला बेशुद्ध होईपर्यंत पट्ट्याने मारहाण करण्यात आली होती ........
आणि माधाच्या अंगातील भुत काढण्यात आले होते ........
ते भूत त्याच पिंपळाच्या झाडात ,
हाथोड्याने भला मोठा खिळा ठोकून कैद करण्यात आले होते ........
आजही आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा , त्या झाडाला असे पाच सहा तरी खिळे ठोकलेले दिसतात .......
ही नेमकी अंधश्रद्धा आहे की आणखी काही हे विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे .......
कारण असे म्हणतात की ते खिळे काढले ,
तर ते भूत बाहेर निघते ........
आणि गावात कुणालाही लागू शकते ........
म्हणून ते खिळे काढण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही ........
खऱ्या अर्थाने ......
काही खिळे खोडाच्या वाढीमुळे बुजले देखील .......
अशा प्रकारे गंगू बाईने बऱ्याच भुतांना कैद केले होते .......
गंगू बाई उत्कृष्ट वैद्य सुद्धा होती , बऱ्याच बिमाऱ्या तिने दूर केल्या होत्या .......
पण तिला काळी जादू सुद्धा येत होती .....
म्हणून सारे गाव तिला घाबरत होते .........
आणि आज त्याच गंगू म्हतारीने आपला प्राण सोडला होता ..........
गावच्या चिंतेत भर पडली होती ...…...
कारण काळ्या जादूची पुजारी गंगू म्हातारी .........
आता या जगात नव्हती ...…....
ती परत येईल असा सर्वाना अंदाज होता ......
पण तिने आपल्या मुलाला सांगितले होते की मला जेव्हा जाळण्या साठी नेण्यात येईल ........
तेव्हा ........
माझ्या सर्व बांगड्यांचा चुरा ...........
इभूती मध्ये भारून टाका ......
आणि माझ्या प्रेत यात्रे पासून गावच्या वेशीबाहेर ......
दूर तो चुरा टाकत आणा ........
तिचा मुलगा रडत रडत तो चुरा .......
खाली टाकत होता .......
कुणालाच याबद्दल काहीच कळत नव्हते .......
तीच प्रेत यात्रा निघाली होती ......
माधा काका बर्याच दिवसांनी गावात आला होता .....
आपल्याला ज्या बाईने वाचवले , तिच्या प्रेत यात्रेत तो सामील झाला होता .......
अशी जगावेगळी प्रेतयात्रा संपली ......
पण म्हातारीच्या सांगण्या वरून .....
म्हातारीचा चेहरा कुणीच बघू शकले नाही ..........
कारण ......
तिची तशी अट होती ..........
आणि गावाने जड अंत करणाने तिला शेवटचा निरोप दिला ........
त्यांनतर ठीक दुसऱ्या दिवशी ........
माधा काका शेतात रोही नावाचे जांनवर .......
पिकांची नासाडी करतात म्हणून ......
शेतात पाहणी करण्या साठी .…........
जेवण आटोपून रात्री दहा वाजता एकटाच निघाला होता ....…........
माधा काका घरी आला की सुटीचा आनंद आपल्या शेतात घालवायचा ...........
माधा काका शेतात पोहोचला ........
शेतात रात्री रातकिड्यांची किर्रर्र किरकिर ऐकू येत होती .............
वारा शांत वाटत होता ...........
सगळे वातावरण जणू गोठले होते .........
त्याला एकही रोही शेतात दिसला नाही .......
रोही म्हणजे एक घोड्या सारखा दिसणारा पण बैलासारखे धड असणारा .........
डोक्यावर शिंगे असलेला जनावर ..........
जो शेतकऱ्यांचा खरा शत्रू असतो ......
रोह्याच्या कळपाची नजर एखाद्या शेतावर पडली तर समजा ..........
शेताच्या पिकांचा विनाश पक्कका ....
माधा काकाला वाटले की साला एक पण रोही दिसला नाही ...........
काकाने बॅटरी लावून सर्व शेतात चक्कर टाकली ........
शेतात सोयाबीनचे पीक सुद्धा त्या रम्य अशा राती गाढ झोपले होते .............
काका फोनवर आपल्या ड्युटीवर असलेल्या मित्रांना बोलत बसला .........
बघता बघता साडे अकरा वाजले ..…......
काकाने फोन ठेवला आणि परतीचा मार्ग पकडला ........
गावापासून दिन किलोमीटर वर काकांचे शेत होते .......
काका बॅटरी चमकवत ...........
मस्त गाणे म्हणत गावाकडे चालू लागला .........
काका आपल्याच गाण्यात मग्न होता ..........
काकाने गाणे म्हणत तोंडाने आपली शिट्टी गाण्याच्या तालात वाजवली ..........
ती शीळ त्या रम्य वातावरणात आणखीनच सुरेल वाटत होती ........
काका आणखी चांगल्या तालात शीळ फुकत होते ......
काका चालता चालता अचानक थांबले ......
कारण काकाने शीळ बंद केली होती ........
तरीही वातावरणात शीळ घुमत होती ............
काका बावचाळले ....…...
काकांना धक्काच बसला ......
कारण काकाने तर शीळ बंद केली ........
तरीही शीळ कोण वाजवत होते ..........
"""काकाने गाणे कोणते म्हटले होते ......???
तर ......
"" ती वनबाला म्हने नृपाला हे तर माझे घर .....
पाहत बसते मी तर येथे जल लहरी सुंदर ........
शीळ घालून राणपाखरू माझ्याशी बोलते ....……......"""
बापरे ........
काकाने हे गाणे म्हटले होते .........
आणि तसेच झाले ...........
काका तोंड बंद करून इकडे तिकडे पाहत होता .........
तरीही शीळ वाजत होती ........
काका आता चांगलेच हादरले होते ........
कारण त्याच चालीत ती शीळ वाजत होती ...........
आणि थांबतच नव्हती .........
काका थोडे घाबरले ..........
त्यांनी गाणे बदलले ......
कारण त्यांना भास नाही ना झाला हे पक्के करायचे होते ............
त्यांनी दुसरे गाणे म्हटले पण यावेळी त्यांनी शीळ वाजवली नाही ...........
काका हसले ......
आता बघू ........
काय होते तर .......
साल कोण म्हणतं गाणं .........
पण काका हसल्या हसल्या ......
काकाने म्हटलेले गाणे शीळेच्या तालावर ऐकू येत होते ........
काकांच्या अंगावर काटे उभे राहिले .........
काकाला भीतीने दरदरून घाम फुटला ........
काका आता जाम घाबरला होता ........
काका झाप झाप पावले उचलत ,
निघाला होता ......
काका भीतीने थरथरत होते .......
काकांच्या चालता चालता लक्षात आले की याच जागेवर ,
गंगू म्हातारीचे प्रेत जाळले होते ..........
काका तिथून वेगाने चालत गावच्या थोडा जवळ येत होता ............
काका वेगाने गाव जवळ करत होता ........
त्यात आणखी भर म्हणजे शीळ ..….....
थांबत नव्हती .......
काकाच्या वाटेत आणखी एक संकट उभे राहिले .......................
ते म्हणजे ..........
एक म्हातारी ........
काहीतरी वाटेवर वेचत होती ........
काका एकदम थांबला ......
त्याने बॅटरी त्या म्हातारीवर दाबली ............
म्हातारी आपल्या डोक्यावर पदर घेऊन काहीतरी वेचत होती ...........
काकाला चांगलाच धक्का बसला होता .........
कारण ती गंगू म्हातारी होती ..........
काका स्वतःशीच म्हणाला ......
""छे ही तर मेली आहे ......
कुणीतरी दुसरेच आहे हे .........????""
असे म्हणून काका समोर गेले ......
आणि मोठ्या हिमतीने त्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले .......
""" काय करत आहे ????
कोण आहे तू ........???
भु भूत समजून मी घा घाबरणार नाय तुला ????""
असं म्हणून काकाने त्या म्हातारीच्या तोंडावर बॅटरी दाबली ............
काका वेगाने मागे झाला ..........
""" कारण ती म्हातारी कडूबा होता .........
काळी साडी नेसून ........
डोक्याला टिकली लावून .............
भसमम लावून ........."""
काका चांगलाच चिडला ..........
कडूबा तुम्हाला लाज नाही वाटत का ??? ????
मला घाबरवायला ...................
त्या म्हातारीच्या वेशात असलेल्या कडूबाने एक नजर फिरवली ...........
आणि बाईच्या आवाजात जोरात म्हटले ..............
''" माध्या माय काम करू दे ..........
दिसत नाय का ??????
मी इतका बारीक भुगा वेचत हाय म्हणून ?????"""
माधा काकाला नवल वाटले ........
काका हसून म्हणाला .....
""वा रे वा ..........
कडूबा मानले तुला .......
बाईचे कपडे घालून बाई सारखा बोलतो ......
हुबेहूब .........
मी नाय घाबरणार तुला .........."""
कडूबा जोरात ओरडला ......
त्याचा आवाज ऐकून माधा काका हादरलाच ......
""" माध्या डोक्स फिरल्य का तुया ........
मले माय काम करू दे ......
सकाळ व्हायच्या आत ........
मले हा समदा चुरा येचायचं हाय ........जर आता काय बी बोलला तर हिथच मारून टाकील .........""""
माधा काका कडूबा ला म्हणाला ......
"" जा मला धमकी देतो का ???
थांब तुह हे सोंग साऱ्या गावाला सांगतो ........""
असे म्हणून गावच्या दिशेने झपाझप पावले टाकत माधा काका गावात पोहोचला .........
गावात आत शिरताना कडूबाचे घर लागत होते ..........
माधा काका मोठ्या एटीने तिथून निघाला होता .........................
पण कडुबाच्या घरासमोर ,
तो अचानक थांबला ................
""" बापरे ........
असे म्हणून तो जागेवरच गोठल्यागत उभा राहिला ....................
कारण घरासमोर बसून कडूबा रडत होता .......
त्याचा चुलत भाऊ त्याची समजूत घालत होता ........
काकाचे डोके गरगरत होते ..........
कडूबा तर गावच्या बाहेर बाईचे काळे कपडे घालून ........
काहीतरी वेचत होता .........
आणि इथे हा कसा काय ?????????
माधा काकाला काय बोलावे हेच सुचत नव्हते .......
माधा काकाने घडलेला प्रकार त्याच्या चुलत भावाला सांगितले .......
कडूबा आणि त्याचा चुलत भाऊ त्याच्याकडे बघत थक्क होऊन उभे राहिले ..........
कडूबा रडू लागला .......
तो रडत रडत म्हणाला .......
"" शाम्या माईने सांगितले तसेच झाले ......???""
माधा काका म्हणाला .......
""" काय झाले ....???"""
कडूबा बोलायला लागला .....
""""माईने सांगितले होते की तिच्या बांगड्याचा चुरा प्रेत यात्रेच्या वाटेत टाक ................
मी टाकला सुद्धा .............
कारण माय म्हणत होती .........
मी मरून गेल्यावर बी .........
माय भूत गावाकडे परत येईल .........
आणि तेबी रातच्याला ........
पण तू टाकलेल्या भारलेल्या बांगड्याचा चुरा ते भूत आडवेल ........
ते बांगड्याचा चुरा एचता एचता ...........
पहाट होईल ...........
आणि माय गावात येणार नाय ...............
तू नशीब वाण हेस माध्या .........
तुला तीन काय केलं नाय .........."""
असे म्हणून कडूबा रडायला लागला ..........
माधा जोरात ओरडला .......
"""ती तुही माय होती हे कशावरून .........???
तो तूच होतास कडूबा ......... '""
शामराव म्हणजे कडुबाचा चुलत भाऊ .....
मधेच म्हणाला ......
"" माध्या कडूबा ची माय हुबेहूब त्याच्या सारखीच दिसत होती ..........""""
म्हणून तर ती आपले तोंड पदराच्या खाली झाकून ठेवत होती ................
हे ऐकून माधा काकाचे डोके गरगर फिरत होते .............
हे काय घनचक्कर आहे त्याला कळतच नव्हते .........
ती बाई कडूबा नसून ..............
ते त्याच्या मायचे भूत होते.............
हे समजल्या मुळे ..............
माधा काकाला चक्कर आली ..........
माधा काका धाडकन जमिनीवर कोसळला .......
कडूबा आणि शामराव मात्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते ...........
पण काकांचा डोळा तेव्हाच उघडला जेव्हा .........
सकाळ झाली होती ...........
गावातील लोक माधा काकाला बघायला गर्दी करत होते ...............
माधा काका उठून बसला ........
आणि कडूबा अन शामराव कडे डोळे वासून पाहत बसला .......................
त्याला हे घनचक्कर काय आहे तेच कळत नव्हते ..........................
कडूबा मात्र त्याच्या म्हातारीची काळी साडी गुंडाळून ,
शामराव ला बाजूला बसवून त्याच्या आईच्या जागी बसला होता ..........
शामराव हातात काळा पट्टटा घेऊन ,
माधा काकाच्या अंगातील भूत काढण्यास सज्ज होता ......................
त्याच्या हातात एक भला मोठा टोकदार खिळा होता ..................
जो पिंपळाच्या झाडात ठोकल्या जाणार होता ............................
कारण हे खरंच एक घनचक्कर होते ...........

