प्रदीप फड

Horror Thriller

4.2  

प्रदीप फड

Horror Thriller

चकवा -द मिरॅकल

चकवा -द मिरॅकल

8 mins
476


       शरद मस्त पैकी एकटाच शेतात बसला होता , आज तो खूप आनंदी होता ......

कारण आज त्याचा वाढदिवस होता ...

 

वाढदिवस म्हणजे शेतात आपल्या मित्रांना बोलावून मस्त चिकन च्या पार्टीचा बेत आखायचा ....

झाले ,मग काय ?

त्याने चिकन आणि मसाल्याच्या पुड्या आणल्या ....

चिकन पार्टी मध्ये जवळपास सात जण बोलावले होते ,

अमोल आणि गोट्या च फक्त मदतीसाठी आले ,होते बाकीचे मात्र आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे होते .........

              नाही नाही म्हणता सगळा बेत , माळावरच्या आंब्याच्या झाडाखाली आखला गेला ......

शरद ने चिकन आणून , धुवून घेतले ........

त्यात हळद मीठ कालवून ,

आता ते उकडायला ठेवायचे होते .....

पण काल पाऊस पडून गेल्या मुळे काड्या , लाकडे भिजून ओलमट झाली होती .......

     त्यामुळे , सरळ रायभान काकांच्या गोठ्यात काड्या आहेत ,म्हणून त्यांनी तिकडून काड्या आणायच्या ठरवल्या ...........

      आता काड्या कोण आणणार ?

हा प्रश्न होता ......

शरद उठला ...

"" मी आता रायभान काकांच्या गोठ्या मधून चूल पेटवण्यासाठी काड्या आणतो .....""

असे म्हणून तो निघाला .......

      अमोल आणि गोट्या नुसता झाडाखाली बसून होते ......

शरद रायभान काकांच्या कोठ्याच्या दिशेने चालू लागला , ऊन थोडे कमी झाले होते........

शरद फोन लावून लावून कंटाळला होता ,

पण मित्र काही कॉल उचलत नव्हते ......

भर दुपार झाली होती , शेत एकदम माळरानात असल्या कारणाने शेतात कोणी दुसरे नव्हते सुद्धा .......

          शेतात शांत वातावरण पसरले होते , मध्येच झाडांच्या पानाचा सळसळ आवाज त्या शांत तेचा भंग करत होते .......

शरद एक एक पाऊल टाकत रायभान काकांच्या गोठ्या कडे निघाला ......

      आज त्याला वातावरणात थोडा बदल जाणवत होता , एवढी शांतता त्याने शेतात असताना प्रथमच अनुभवली होती ......

     मान्य आहे दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात सहसा कुणी जास्त लोक येत नाहीत ,पण ......

कुणीतरी असतेच की हो ......

पण आज त्याला साधे काळे कुत्रे सुद्धा शेतात दिसले नाही ...

आंब्याच्या झाडाखाली गोट्या आणि अमोल , निपचितपडून विश्रांती करत होते ......

      ते सुद्धा आज वेगळेच वागत होते , जास्त काही बोलले नाही .......

      शरद गोठ्या जवळ आला ,

गोठ्याला पत्राचा दरवाजा होता ........

गोठ्यात निदान रायभान काका तरी असतील , असे त्याला वाटले .......

त्याने आवाज दिला , कारण दरवाजा आतून बंद होता ....

"" रायभान काका .........

काका आत हे का तुम्ही ???""'

आतून काहीच आवाज आला नाही ,

त्याला नवल वाटले .....

शरद पुन्हा आवाज दिला ....

""" काका काड्या आहेत का गोठ्यात ?

झोपले वाटते तुम्ही .........."""

आतून या वेळी सुदधा काहीच आवाज आला नाही .....

शरद ने काररकन दरवाजा उघडला ..……..

पत्र्याचा दरवाजा असल्या मुळे त्याच्या आवाजाने , त्या रम्य अशा शांततेचा भंग झाला होता ........

          शरद चकित झाला ........

कारण गोठ्यात कुणीच नव्हते ..........

शरद सरळ आत घुसला आणि गोठ्यातून काड्या घेतल्या ..…....

आपल्या खिशातील रुमाल काढला .......

आणि त्यात त्या काड्यांचा ढीग गुंडाळला .......

आणि सरळ तो पत्र्याचा दरवाजा लावून घेतला ..........

तो पाठमोरा झाला खरा ,

पण समोर बघितल्यावर त्याला एकदम धक्काच बसला ..............

                कारण समोर रायभान काका उभे होते ,

बनियान घातलेली , खाली धोतर ,

काम करून करून बनलेले त्यांचे पिळदार असे शरीर .......

ओठावर मर्दाणी मिशी ,त्यावर मिशीचा आकडा ........

शरद त्यांना म्हणाला ....

""" काहो काका गोठ्यात तुमी नव्हते ??

आसपास पण दिसले नाही ......

तुम्ही होते तरी कुठे .........???"""

रायभान काका मिशकिल्पने हसले ....

"" काम करत हुते रे खालच्या वावरात ........""

शरद हसला ,

"" ठीक हे काका भाकरी आणल्या का घरून ???

नाहीतर सांगतो ,

पोट्ट्यांले फोन करून ,

मस्त पैकी चिकन आणलंय .........

या थोड्या वेळाने जेवायला , म्हणून तर या काड्या चालवल्या """शरद त्यांना प्रेमाने म्हणाला

रायभान काका मान हलवत म्हणाले ,

आणि शरद आंब्याच्या दिशेने निघाला .....

मागूम थोडा वारा आला .....

वाऱ्याचा सु सु आवाज आला ......

आणि एक थंड असा आवाज त्याच्या कानाला जाणवला ............

"""शरद .....….....

शरद .......""

शरदने मागे वळून बघितले ,

मागे कुणीच नव्हते .......

त्याने पुन्हा दोन तीन पावले टाकली ,

पुन्हा वाऱ्या सोबत तोच आवाज .......

""" शरद ,

शरद .........."""

शरद ला वाटले कुणीतरी मस्ती करत असेल , नाहीतर रायभान काकांनी आवाज दिला असेल ????

म्हणून तो जोरात म्हणाला ....

"" रायभान काका ......

तुम्ही आवाज दिला का ????""

पण गोठ्या कडून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही .........

शरदला पुन्हा नवल वाटले , कारण आता एक मिनीटा पूर्वी तर रायभान काका होते ?

मग गेले कुठे ?????

शरद हातात काड्या घेऊन तसाच गोठ्या कडे पुन्हा माघारी फिरला ........

"" काका , रायभान काका .....

काय मजाक लावली यार तुम्ही ????

एक तर आवाज देता ,

आणि लपून बसता ............"""

शरद खूप चिडला होता , कारण ही मजाक त्याला सहन होत नव्हती . .....

आधीच पार्टीला लेट झाला होता .....

       शरद पुन्हा गोठा उघडून बघू लागला ,

पुन्हा त्याला रायभान काका दिसले नाही .........

त्याला काहीच कळत नव्हते .......

तो पुन्हा गोठ्याला पाठमोरा झाला , आणि पुन्हा समोर रायभान काका उभे होते  ..…....

तो चिडून रायभान काकाला बोलणार होता पण , त्याला एकदम काहीतरी विसरल्या सारखे झाले .....

 कारण समोर रायभान काका उभे होते ,

बनियान घातलेली , खाली धोतर ,

काम करून करून बनलेले त्यांचे पिळदार असे शरीर .......

ओठावर मर्दाणी मिशी ,त्यावर मिशीचा आकडा ........

शरद त्यांना म्हणाला ....

""" काहो काका गोठ्यात तुमी नव्हते ??

आसपास पण दिसले नाही ......

तुम्ही होते तरी कुठे .........???"""

रायभान काका मिशकिल्पने हसले ....

"" काम करत हुते रे खालच्या वावरात ........""

शरद हसला ,

"" ठीक हे काका भाकरी आणल्या का घरून ???

नाहीतर सांगतो ,

पोट्ट्यांले फोन करून ,

मस्त पैकी चिकन आणलंय .........

या थोड्या वेळाने जेवायला , म्हणून तर या काड्या चालवल्या """शरद त्यांना प्रेमाने म्हणाला

रायभान काका मान हलवत म्हणाले ,

आणि शरद आंब्याच्या दिशेने निघाला .....

शरद पावलावर पावले टाकत निघाला ,

पण यावेळी सुदधा त्याला ...

वाऱ्या सोबत थंड असा आवाज आला ,

""" शरद ........

शरद ............."""

आता मात्र त्याला खरच राग आला .....

""" काय काका ?

काय मजाक लावली राव ............"""

म्हणून तो पुन्हा हातातील काड्या घेऊन , गोठ्या कडे निघाला ........

"" रायभान काका आता बस झाले .....""

म्हणून त्याने पुन्हा गोठ्याचा दरवाजा उघडला आणि आत कुणीच नव्हते म्हणून ......त्याने दरवाजा बंद केला ......

पुन्हा रायभान काका उभे होते .....

तो परत तेच वाक्य रायभान काकाला म्हणाला ........

आणि आंब्याच्या दिशेने निघाला .......

आता पुन्हा वाऱ्या सोबत थंड असा आवाज आला .....

"" शरद ......

शरद ........"""

त्याला यावेळी मात्र घाम फुटला .......

कारण तीच तीच गोष्ट पुन्हा त्याच्या सोबत घडत होती ,

तो हुशार होता ,

म्हणून उशिरा का होईना त्याच्या लक्षात आले .....

त्याने यावेळी ठरवले .......

की मागे बघायचे नाही , कारण हे आपल्या सोबत काहीतरी वेगळेच होत आहे ......

कारण मी गोठ्या कडे जातोय खरा ,

पण रायभान काका कुठेच दिसंत नाही........

मग अचानक ते समोर येत आहे ..........

आणि मी पुन्हा आंब्याकडे जातो ,तेव्हा परत त्याना रागाने बोलायला जातो .......

पण काहीच न बोलता , तेच बोलून

परत येतो .........

आता मागे जायचे नाही ......

सरळ चालत राहायचे ........

शरद आता थोडा घाबरला होता ,

कारण या माळावर घडलेल्या भुताच्या बऱ्याच गोष्टी त्याने ऐकलेल्या होत्या ....

       वातावरणात त्या रम्य अशा शांततेने गंभीर असे रूप धारण केले .......

झाडांच्या पानांची सळसळ , आणि वाहणारा सु सु करनारा वारा आता त्याच्या कानाला बोचत होता ......

त्याला कधी त्या आंब्याच्या झाडाखाली जातोय असे झाले होते ........

तिथे पोहोचण्या करिता त्याचे मन कासावीस झाले होते ...........

            शरदला आंबा दिसला .......

गोट्या आणि अमोल त्या झाडाखाली , भर उन्हात असलेल्या सावलीत मस्त पैकी पहुडले होते ........

शरद हातात काड्या घेऊन झपाझप पावले टाकत ...........निघाला .......

तो त्याच्या मित्रांना घडलेला प्रकार सांगणार होता ........

पण अजून सुद्धा वाऱ्या सोबत येणारा ....

"" शरद शरद .....""

असा आवाज मात्र कमी होत नव्हता ........

     झाले तो आंब्याच्या झाडाजवळ पोचणार तोच ,

जोराचा वारा आला .......

आणि त्याच्या डोळ्यात कचरा गेला असे त्याला वाटले ...............

त्याने हाताच्या मुठीने दोन्ही डोळे चोळले .........

कचरा निघाला ,

म्हणून त्याने डोळे उघडले .........

आणि आंब्याच्या झाडाकडे बघितले ..…........

आणि त्याला मोठा धक्काच बसला ........

का नाही बसणार ?????.

कारण आंब्याच्या झाडाखाली गोट्या आणि अमोल झोपलेले होते .........

आणि आता ते झाडाखाली नव्हते .….........

तेच काय ???.

आणलेले सामान सुद्धा झाडाखाली नव्हते ............

शरद आता पार घाबरला होता .…......

त्याने भीत भीत खिशातला मोबाईल काढला , आणि अमोल ला फोन लावला .......

अमोलने कॉल उचलला .........

""" हा बोल शरद , काय म्हणतो ?

कस काय कॉल केला ???"""

शरद च्या तोंडून शब्द फुटत नव्हते ......

"""साल्या तू आणि गोट्या कुठं गेले बे .........???

कमी मजाक करा ना ......"""

अमोल हसून म्हणाला .....

""" आबे मी आणि गोट्या नाही ,

मी आणि रायभान काका सोबत आहोत ,

रायभान काकांनी गाडी नव्हती म्हणून , माझी गाडी सोबत नेली ......."""

शरदला धक्काच बसला ......

"" आबे सध्या कुठे तू ?????""

अमोल म्हणाला ...

""रायभान काकांच्या लेकीच्या इथे .......वडगावात ....."""

"""बापरे , रायभान काका कुठे ???""

शरद पुन्हा म्हणाला ....

अमोलने रायभान काकांना फोन दिला .....

आता फक्त शरद ची पॅन्ट ओली व्हायची राहिली होती ,

कारण एवढा भयानक प्रकार त्याच्या सोबत घडत होता ..............

       आता शेवटचा पर्याय म्हणून गोट्याला फोन लावला ........

""" गोट्या आबे , या ना लवकर ,

काय मजाक करून रायले बे ??????"""

फोनवर गोट्या म्हणाला  ..

""" काय झालं बे """

"""आबे म्याड एक तर कुठी गायब झाले आणि वरून विचारतो पण का ?????"""

शरद भीत भीत पण रागाने म्हणाला .....

गोट्या म्हणाला ....

"" आबे मी पेरायचे बी आणायला ,

आलेलो आहे गणपूर ला ......"""

हे ऐकून शरद पुन्हा बावचाळला .......

शरदला वाटले ,

हे पुन्हा माझ्या सोबत खोटे बोलत आहेत ......

म्हणून त्याने चिडून म्हटले .....

""" जाऊ द्या गेली मग पार्टी खड्ड्यात .......मले काही घेणं देणं नाही .........""

मग गोट्या फोन वर म्हणाला .......

""" म्हणजे वाढदिवसाच्या आधीच पार्टी देतो का तू ?????

शरद ..........""""

आता मात्र शरदचे हातपाय कापत होते .........

"""म्हणजे ??????"""

तिकडून गोट्या म्हणाला .....

""" आबे वाढदिवस उद्या हे न तुहा .........., मग उद्या करू न पार्टी ........?????""""

शरदने कानाचा फोन हातात घेतला , आणि फोन मध्ये बघून सरळ गावाच्या दिशेने धावत सुटला ....…......

वाऱ्याच्या वेगाने तो धावत होता ,

त्याचा पाय एका दगडात अडकला आणि दणकन तो तोंडावर आपटला ...............

मागून कुणीतरी आपल्या मागे लागले आहे , असे त्याला वाटले .........

म्हणून पुन्हा तो उठून लंगडत लंगडत धावत पळू लागला .............

त्याने जेव्हा फोन वर बघितले होते , तेव्हा अक्षरशः त्याची पॅन्ट ओली झाली.........

खरच त्याचा वाढदिवस उद्या होता ............

धावता धावता त्याच्या लक्षात आले , की रायभान काका जेव्हा गोठ्या समोर उभे होते ...........

तेव्हा त्यांच्या पायाकडे त्याचे लक्ष गेले होते ........

"""त्यांचे पाय उलटे होते ......"""

ते रायभान काका नसून चकवा होता , अमोल , गोट्या सुद्धा चकवाच असणार ...….

म्हणून त्याने आणखी वेग पकडला ........

पण मागून वाऱ्याच्या , गारव्या सारखा""शरद शरद ""

असा आवाज जेव्हा त्याच्या कानावर येऊन आदळला तेव्हा .........

शरदच्या अंगातील शक्ती जणू नाहीशी झाली होती , असे त्याला वाटले ...........

आणि डोळे पांढरे करून तो गावाच्या वेशीवर .....पडला .............

त्याची शुद्ध हरवली होती ,

तोंडाला फेस आला होता.......

त्याला एक नाही तर तीन तीन चकव्यानी झपाटले होते .................


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror