STORYMIRROR

Neelima Deshpande

Inspirational

4  

Neelima Deshpande

Inspirational

एका लग्नाची गोष्ट

एका लग्नाची गोष्ट

1 min
453

"अरे ही बघा कविता लाडच मिळाली आपल्या सचिनला! हा गोरागोमटा प्रशांत दामलेसारखा वाटायचा ना आपल्याला मग त्याची जोडीदार त्याला साजेशी! हिचं नाव लग्नानंतर आपण कविता ठेवणार का विचारु सचिनला!" लग्नमंडपात जमलेल्या सासरच्या घोळक्यातून आवाज आले आणि आपली मुलगी नव्या घरी सगळ्यांना आवडल्याचा आनंद पसरताच लग्नाच्या धावपळीचा शीण कमी झाल्यासारखे छान उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


किती छोट्याछोट्या गोष्टी अगदी सहजच कुणीतरी करुन जातं आणि एक नवं नातं सुरु होतं. त्यांनतर आजवर अनेकांनी तुम्ही दोघे 'एका लग्नाची गोष्ट' नक्की पाहा त्यातल्या जोडीसारखे दिसता," असे म्ह्टल्यावर आनंद व्हायचा पण लग्नाच्या दिवशी मला पाहताच मला बोलतं करण्यासाठी दिलेलं हे आवडत्या अभिनेत्रीचं नाव माझी सगळ्या सासूंशी मैत्री जोडून गेलं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational