Kishor Gaikwad

Comedy

3  

Kishor Gaikwad

Comedy

एक वेगळंच ऑडिशन

एक वेगळंच ऑडिशन

2 mins
4.2K


आजपासून तू मला भेटायचं नाहीस आणि मला फोनसुद्धा करायचा नाहीस. तुझ्याजवळ असणारे माझे सगळे फोटो डिलीट करून टाक. यापुढे आपला कसलाही संबंध राहिला नाही, असं म्हणून ती निघुन गेली. मागे वळूनसुद्धा नाही पाहिलं मला काय बोलायचं होतं ते ऐकूनसुद्धा न घेता...

 

हे कसलं प्रेम? कुठे गेली ती सगळी वचने? आणि आयुष्यभर सोबत राहायचं, असं म्हणत होतीस ना? एवढ्यातच सोडून गेलीस? वाह, भारी हा कसं काय जमलं हे सगळं तुला? भारी खेळलीस म्हणजे कालच्या मॅचमध्ये जसा कोहली खेळला ना एकदम तशीच तू पण खेळलीस तो 3 तास बॅटिंग करत होता तू 3 महिने करत होतीस मी काय तुला खेळणं वाटलो की काय? तुला पाहिजे तसं खेळायला?


खूप प्रेम होतं ग तुझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम मी तुझ्यावर केलं होतं. तशी आपली भेट कमी व्हायची पण जेव्हा पण व्हायची ना आपण आकंठ प्रेमात बुडालेले असायचो. रोज फोनवर तासनतास बोलत बसायचो. तसा मला वेळही कमीच मिळायचा पण जसा मिळेल तसा मी तुझ्यासाठी राखून ठेवायचो. पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तू असं काही करशील. किती किती स्वप्नं पाहिली होती मी. बस्स झालं आता तिचा विषय कायमचाच सोडायचा. ठरलं तर सगळं डिलीट करून टाकायचं आठवणींसकट...

 

हुश्श... एकदाचं पाठ झालं सगळं... कितीवेळ प्रयत्न करत होतो. काही ना काहीतरी राहतच होतं. आता सगळं पाठ झालंय. तिथं जाऊन विसरायला नको. 11 वाजलेत, चला लवकर निघायला हवं. खूप झाली प्रॅक्टिस तास झाला असेल आता... उशीर होईल आधीच जाताना काय कमी ट्रॅफिक लागत का?


ऑडिशनला वेळेवर जायला हवं नाही तर खूप गर्दी होते नंतर... मग काय तर सांगितल्याप्रमाणे स्क्रिप्ट पाठ करून चाललोय बघुयात आता काय होतंय... झालो सिलेक्ट तर दिसेलच तुम्हाला टीव्हीवर लवकरच..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy