ती,बाग आणि मी
ती,बाग आणि मी
तू इतकी छान का दिसतेस अस त्याने विचारलं
मान डोलवत नाही मी छान नाही दिसत
मला तर नाही वाटत
मग काय वाटत तुला
तीन विचारलं, त्याला
तो म्हणाला,
मला तर वाटत तू खूप छान दिसतेस !!
त्या उडणाऱ्या फुलपाखराकडे पाहून तो म्हणाला,
इश्श ती लाजली
एका पायान दुसऱ्या पायाच बोट मोडलं स्वतः च.
तो पण लाजला..
इतका वेळ नजरेला नजरा जुळविणारे दोघे ही आता मात्र
नजरा चुकवत होते
गालातल्या गालात हसत होते
आता मात्र शांतता पसरली होती बराच वेळ गप्पच होते दोघेही.
अशी शांतता सगळ्यांना हवी असते.
तस हळूहळू सूर्य डोक्यावरून थोडा पुढे चालला होता वेळ ही निघून चालली होती घड्याळाचा काटा सरकत होता.
मला निघायला हवं घरी आई एकटीच आहे,
ती न राहवता बोलली.
त्याच्या डोळ्यात स्पष्ट जाणवतं होत की तिने नाही जाव इथेच थांबावं. खूप गप्पा माराव्या इकडच्या तिकडच्या...
हसावं, लाजाव, रुसाव
पण वेळ निघाली होती तस तिला ही जावं लागणार होतं.
आणि दोघेही वेगळे झाले पुन्हा भेटण्यासाठी त्याच बागेत त्याच बाकावर आणि त्याच गर्दीपासून एकांतात
वेळ मात्र निमित्त होती वेगळं होण्यासाठी बाकी निसर्गाची किमया.