Vrushali Sungar

Fantasy Others

3  

Vrushali Sungar

Fantasy Others

एक उनाड दिवस

एक उनाड दिवस

3 mins
9.2K


आज खूप दिवसांनी भारतीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. जणू काही एक अदभूत शक्तीचा संचार तिच्या अंगात भरलेला मला दिसला. एकदमच तरुण झाल्यासारखं तिला वाटत होते. तिचा तो उत्साह वाखाण्याजोगा होता. रोज सकाळी आम्ही दोघी  walk ला जात असू. आमची भेट जवळ जवळ एक आठवड्यानंतर होत होती. तिला विचारले मी, “कि ,नक्की काय झाले आहे”? एवढं तेज कसले आले आहे चेहऱ्यावर? बळंच हसून तिने काही नाही गं. कसलं तेज आणि काय. तिच्या चेहऱ्यावरून काही केल्या हसण्याची छटा जात नव्हती. हातात असलेला juice चा ग्लास खाली ठेवत ती बोलू लागली त्याची एक गंमत आहे. मी विचारले, ”कसली गंमत?” "मागचा एक आठवडा मी तुझ्या सोबत walk ला नव्हते माहिती आहे का ? मी एकटीच एका long holidays वर गेले होते. सोबत कुणीच नाही . नाही नवरा, नाही मुले. खूपच मस्त अनुभव होता. मी नेहमीच कुटुंब , मित्र-मैत्रिणी यांच्या सोबत फिरायला गेले आहे. यावेळेस ठरवलं कि एकटीने जायचं."

Jab we met मधली करीना कपूर डोळ्यांसमोर आली. स्वतःवरच प्रेम करणारी, मन मोकळं करून हसणारी, मनाला वाटेल ते करणारी , चिल्लर पैश्यांसाठी दुकानदारासोबत हुज्जत घालणारी. अगदी फिल्मी style सारखं नाही पण कधी तरी आपल्या मुरड मारलेल्या भावनांना एक वाट मोकळी करून द्यावीशी वाटली. आपण आपल्याच भाव विश्वात इतके मग्न होती कि आपल्या मधल्या एका खोडकर ,खट्याळ आणि बालिश मुलीचा आपल्याला विसरच पडतो. लग्न झाले कि सर्व जबाबदाऱ्या एकदम अंगावर पडतात. सासू , सासरे , नवरा आणि त्यात जर नोकरी असेल तर तारेवरची कसरत असते. लग्न झाल्यावर हळू हळू आपण settle होता असतो तोवरच ‘good news’ आपल्याला समजते. मग काय मुलं चांगलं ३-४ वर्षांचं होइपर्यंत सर्वच गोष्टीला रामराम करावा लागतो. नात्यांच्या गुंफलेल्या जाळ्यात आपण गुरफटत जातो आणि आपल्यालाही स्वतःचा एक आयुष्य आहे हे विसरतो. कदाचित आपण यागोष्टी बद्दल कधी विचारच करत नाही. आपल्या डोक्यात नेहमीच नवरा , मुलं , काम, आज कोणती भाजी, मग उद्या काय करायचं ह्या सर्व शुल्लक गोष्टी चालू असतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलेली धावपळ तर कधी दुसऱ्याच्या सुखासाठी वाहून दिलेले आपले आयुष्य हेच काय ते आपले विश्व. शर्यतीत घोडा सुसाट पळतच असतो घोडेस्वार जोपर्यंत रस्सी घेचात नाही तोपर्यंत तो घोडा थांबत नाही. आपलंही तसेच झाले आहे. नकळतच आपण आपल्या आयुष्याची रस्सी दुसऱ्याच्या हातात देऊन मोकळे झालो आहोत. कुठे न कधी थांबायचे हे आपणच ठरवायला हवे. 

संसार, मुलं, नोकरी हे सर्वतर आहेच पण या सगळ्यांमध्ये वास्तविक जीवनाच्या अनुभवाला सामोरे जाण्याची मज्जा काही औरच.

अशोक सराफ यांचा 'एक उनाड दिवस' हा चित्रपट आठवला. एक मोठाउद्योगपती   पासून ते अगदी सामान्य माणूस माणसांचा त्यांचा प्रवास रेखाटला गेला आहे. आयुष्यातील वास्तविक अनुभवाला सामोरे कसं जायचे .पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही ह्याची जाणीव त्यांना होते. 'कुठला रस्ता सांग खरा वळणाचा कि सरळ बरा' हे गाणे आपल्याला वास्तवाशी ओळख करून देते. आपणही आपल्याला वाटेल तसे जगावे, मुक्त संचार करावा आणि शांत एकांतात निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला विसरून जावे. पक्षांच्या किलबिलामध्ये रममाण व्हावे.त्यासाठी एक उनाड दिवस हवाच. मनामध्ये चाललेल्या कैक विचारांची घडी घालून गाठोड्यात बांधून त्याला तिलांजली द्यावी. एक आई, बहीण, पत्नी, मुलगी आयुष्याच्या रंगमंचावर आपण स्त्रिया अश्या एक न अनेक भूमिका बजावत असतो. एखादे संकट घरावर आलेच तर न डगमगता सर्वांना खंबीरपणे आधार देत आपण उभ्या असतो. आपल्या स्वप्नांसाठी आपण लढत असतो कधी स्वतःशी तर कधी दुसर्याशी. अशी लढाई जी कधी संपणारी नसते. स्वप्नपूर्तीचा ध्यास, निर्णय आणि स्वत:ची निर्माण केलेली ओळख या सर्व गोष्टीं टिकून ठेवण्यासाठी आपण एका machine सारखे वागायला लागतो.

स्वतःसाठी काढलेला हा दिवस म्हणजे असा दिवस कि फक्त विश्रांतीसाठी नसून आपल्यातल्या स्त्री शक्तीची पारख करण्यासाठी घेतलेला श्वास असतो. बुरसटलेल्या या समाजात खरचं स्त्रीला तिचं स्वतंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी समाज मदत करत आहे का ? २१ व्या शतकात स्वतःचे विचार निर्भीडपणे तिला मांडता येत आहेत का ? कि '७ च्या आत घरात' हे विधान आज पण तिच्या स्वप्नांना घालून दिलेली लक्ष्मण रेषा आहे? आपण कुणाचे हि बांधील नाही आणि आपल्याला हि आपले आयुष्य जगण्याचा हक्क आहे. चूलं आणि मुलं हे आणि एवढेच काय ते आयुष्य नसून त्या पलीकडे हि एक निखळ आणि स्वच्छ मनाचा झारा वाहत आहे हे तपासण्याची वेळ आहे.

भारतीकडून हे सर्व कधी अश्या स्वरूपात बाहेर येईल असं मला कधीच वाटले नव्हते. भारतीचे सर्व बोल मला आठवत होते जेव्हा मी सहा महिन्यांनी long holiday वर आले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy