Prakash Chavhan

Romance

4  

Prakash Chavhan

Romance

एक ती नजर सैनिकाच्या प्रेमात

एक ती नजर सैनिकाच्या प्रेमात

2 mins
255



ती नजर तिथूनच पहात होती बसल्या जागेवरून त्याला रूप देखणं मजबूत पोलादी बांधा वर्दी सैनिकांची घालून बसला होता, त्याच नाव संजय होत खूप दिवस झाले होते. ट्रेनिंग पूर्ण करून गावाकडे आज चालला होता, नजरेत एक जोश उत्साह होता, तो दिल्लीहुन सरळ मुबंईसाठी बसला होता, रेल्वे स्टेशनवरूनच एका मुलीची नजर त्याला ताडत होती. त्या दोघी जणी होत्या उच्च घराण्याच्या दिसत होत्या ती मुलगी ही खूप सुंदर असल्यामुळे सहज संजयची नजर पण तिला न्याहळत असता, अशीच दोघांची नजरानजर होत होती आणि आपल्या सखीच्या कानात म्हणत होती, की बघ किती सुंदर दिसतो हा जवान. देशासाठी एवढं सुंदर जीवन अर्पण केलेलं आहे तो आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि देश सेवेसाठी सदैव तत्पर असतो. अश्या जवानाच्या एक वेळ प्रेमात पडलेलं बरं म्हणून ती त्याच्या एवढं जवळ आली होती की जसे ते पहिल्या जन्माचे एकमेकांना खूप प्रेम करणार जोडपं खूप दिवसांनी भेटले आहे. असचं त्यांच्या हावभावावरून दिसत होत.

 ती तिच्या सखीला बोलली की तु त्याच्या जागेवर जा आणि त्याला सांग की माझ्या जवळ येऊन बस म्हणून मला त्याला बोलायचं आहे. तिची सखी ती बोलल्या प्रमाणे संजयला सांगितलं, तसच तो उठून उभा राहून तिला बसायला जागा दिली. अन, तो तिच्या जवळ बसायला निघाला होता, अंगात रोमांच संचारल होत की हे चालतं बोलतं प्रेम एवढं जवळ येऊन प्रेमाच सोनेरी क्षण अनुभवायला येईल वाटलंच नव्हतं. तिला पण ती गुदगुल्यासारखं मुळू मुळू लाजली होती दोघे जवळ आले होते आणि एकमेकांच्या स्पर्शानं कवेत येऊन तहानलेला माणूस जसा पानी पितो तसच ते दोघे प्रेमाच पानी पीत होते, तसं राहून संजय तिला चोंभाळत तुझं नाव काय म्हणून विचारलं, ती ही त्याच्या डोळयात पहात सुमन नाव आहे म्हणून सांगितलं "किती गोड आहे तुझं नाव, नावाच्या फुलासारखीच देखणी सुंदर आहेस ". असं संजय नी तिला सांगितल्यावर ती खूप खुश झाली होती, दोघांना बाकीचं काही भानच नव्हतं रात्र झाली होती, रेल्वेच्या डब्यात लाईट लागली होती दोघे आता प्रेमाचं पानी पिऊन शांत झाली होती सुमनला वडोदरा ला उतरायचं होत, वडोदरा यायला अजून दोन चार तास वेळ लागणार होत, ती एकमेकांना एकमेकांविषयी माहिती सांगत सुमन मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असल्याच बोलतं होती तीच बी डी एस कोर्स चालू आहे म्हणून असं ती संजयला सर्व पत्ता सांगत स्वतःच कॉन्टॅक्ट नं दिला होता. ज्यामुळे आपण कधीही एकमेकांची विचारपूस करू शकतो व सुमन कोर्स पूर्ण झाल्यावर आपण नक्कीच जीवनसाथी बनू म्हूणन ती संजयला वचन देत होती, तो घरून परिस्थितीनं गरीब मुलगा होता. त्याने पण आपण जीवनात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटतं जाऊ म्हणून सांगत असं दोघे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून आपली प्रेमाची स्वप्न रंगवत होती पण संजयला आपल सैनिकांचं जीवन अन ही डॉक्टर दोघांचं ताळमेळ जमेल की नाही या विचारात विचार करतं होता........


क्रमश: 



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance