Prakash Chavhan

Romance

4  

Prakash Chavhan

Romance

बीज प्रेमाचं पावसात अंकुरले

बीज प्रेमाचं पावसात अंकुरले

2 mins
281


दररोज कंपनीत जाऊन तिला बघणं मला खूप आवडायचं, आज तर मला चक्क तीच स्वप्न पडलं होत, ती मस्त मला निहारत गालावरून हात फिरवत ती मला म्हणत होती " तु दररोज मला पहात असतो आज मला पाहूदे "

"तु किती छान दिसतोस "एवढंच ऐकलं होत की अलार्म वाजला त्यामुळे मी जागा झाला होतो व त्या स्वप्नाच्या धूंदीत मी कधी कंपनीत जायाला तयार झालो हे कळलं सुद्धा नाही, मी बस थांबते त्या जागी बस ची वाट पहात उभा होतो, ती बसच्या कोणत्या सीटवर बसली असेल या माझ्या विचारात बस आली होती, आणि तीची नजर पण खिडकीतून मला न्याहळत होती गालात मुखरी हसत होती, मी तिला तिरछा बघतं बस मधी चढत तिच्या मागच्या सीटवर जाऊन बसलो होतो पण तिला कसं बोलाव हे सुचत नव्हतं, ह्र्द्य आधीच धडधडून जायचं, कंपनीत गाडी थांबली होती आम्ही सर्व ज्याच्या त्यांच्या कामावर हजरी लावून काम सुरु केले होते पण माझ्या मनात तिला एकदा प्रेमाचं बोलाव असं वाटतं होत पण कसं? ते समजतं नव्हतं परत कंपनीची शिप संपून बस मध्ये बसून घरा कडे निघालो होतो तेवढ्यात ढगाच्या सरी धो धो बरसत होत्या खिडकीतुन पाणी येतं असल्यामुळे खिडकी सर्वांनी बंद केल्या होत्या, थंड गार वाऱ्यामुळे अंगावर शहारे आले होते, मी तिला बोलण्याचा बहाणा बघतं होतो बस थांबली होती, मी आज मुद्दाम तिच्या स्टॅन्डवर उतरायचं ठरवलं होत, ती गाडीतून उतरली होती व मी ही तिच्या मागोमाग उतरलो होतो पानी सुरु असल्यामुळे तीही पत्राच्या आडोश्याला माझ्या जवळ आली होती, नजरा नजरेनं आम्ही बोलतं तर होतो पण असं निशब्द पाणी थांबण्याची वाट बघतं, पण मनात पानी असचं चालू राहवं व ती अशीच माझ्या समोर बसलेली असावी तर मि तिला पहातच राहावं वाटतं होत तसं एक एक कंपनीची माणसं छत्री उघडून घराकडे निघाली होती, ती अन मी दोघेच तिथं उरलो होतो ह्रदयाचे ठोके वाढले होते तीच ही तेच हाल पहायला मिळत होत पण आज पावसानं आम्हा दोघाला प्रेमाच्या रंगात जवळ आणलं होत, ती राहून बोललीच " भिजलास का रें " ?

मी नाही म्हणत एकटक तिला बघतं उभा होतो तसं अचानक विजेचा कडकडाट झाला व ती मला येऊन मिठ्ठी मारत बिलगली होती, अन मला माझ्या अंगात जवानीची ताकत संचारली सारखी वाटतं होती मी तसाच तिच्या मिठ्ठीत उभा होतो व तिच्या मुखातून दोन शब्द निघालेच. ती आय लव्ह यु म्हणतं घट्ट मिठ्ठी करतं मी ही तिला प्रतिसाद द्याला लागलो होतो असं आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती पाऊस कधी बंद झाला होता हे कळालं नव्हतं पण आज या पावसात आमचं प्रेमाचं बीज अंकुरले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance