Prakash Chavhan

Romance

4  

Prakash Chavhan

Romance

एक ती नजर भाग :-3

एक ती नजर भाग :-3

4 mins
261


संजयचं जीव ओढत होता प्रेमात तिला भेटण्यासाठी पण भेटावं कसं या विचारात त्यानं सुमनला फोन केला होता, सुट्टी अजून दोन चार दिवस बाकी होती, गावाकडे त्याला पंधरा, सोळा दिवसं झाले होते, त्यानं खरी सुट्टी वीस दिवसाची काढली होती पण घरी तो आपल्या आई वडिलांना सुट्टी संपल्याचं सांगत उदया जायचं म्हणून सांगत होता, इकडे सुमनही त्याला भेटू म्हणून होकार दिला होता, मग काय संजयला दमच निघत नव्हता कधी कधी भेटू तिला असं झालं होत, संजयनं तिला विचारून अर्पणा हॉटेल मध्ये तिनं दिवासा करिता सिंगल रूम बुक केलं होत, सकाळचे आठ वाजले होते संजय घरून निघाला होता, रस्त्यामधी त्यानं एका दुकानात तिच्यासाठी एक गिफ्ट घेतला होता पहिल्या भेटीची आठवण राहावी म्हणून सोन्याची अंगठी आणि गणपती बाप्पाची सुंदर लहानशी मूर्ती घेतली होती जी तिला त्याची दररोज पूजा करतानी आपण सोबत असल्याचं भास आणि देवाचं आशीर्वाद सदैव आपल्या पाठसी राहिलं म्हणून घेतली होती, या प्रेमाच्या विचारात वडोदरा स्टेशन आलं होत संजय रेल्वेतून उतरून आपली बॅग घेऊन आटो मध्ये बसून अर्पणा हॉटेल मध्ये आला होता, बुक केलेल्या रूमची चाबी घेऊन रूम उघडली होती, आपली बॅग बाजूला ठेऊन खिडकीमधून तो बाहेरचा नजारा बघतं होता, लहान मुलं खेळत होती, ते बघून त्याला ही बालपणाची आठवण आली होती, तेवढ्यात सुमनचा फोन आला होता हॉटेलवर आला का म्हणून विचारत होती, पण संजय तिला "तु मला कधी भेटायला येणार?" म्हणत होता तिनं ही " एक तासात आलेच " म्हणून रूमचा नं विचारत फोन ठेवला होता, तसं संजयचे ह्र्द्याचे ठोके वाढले होते, आपलं प्रेम आता भेटणार म्हणून तो खुर्चीवर बसून वाट बघतं बसला असता दरवाज्याची बेल वाजली होती, त्याला वाटलं सुमन असेल म्हणून त्यानं दरवाजा उघडला होता पण संजय पहातो तर दुसरीच एक सुंदर मुलगी दरवाज्या मध्ये उभी होती त्यानं तिला विचारलं " तु कोण आहेस, अन काय काम आहे तुझं या हॉटेल मध्ये " ती हसतच, डोळा मारत बोलते "सेल्स गर्ल आहे, तुम्हाला काही आवडलं तर बघा " दुपट्टा सरकवत थोडी छाती दाखवत, अशील चाळे करतं ती बोलतं होती, संजय दरवाज्याच्या बाहेर डोकावत सुमन दिसते का म्हणून पाहत होता पण सुमन काही दिसत नव्हती, संजय थोडं गोधंळला होता, हे काय झालं, ही कोण? असेल, माझ्याच रूमची बेल हिनं चुकीने तर नाही वाजवली , म्हणून त्यानं तिला सांगितलं "मी तुला नाही बोलावलं ये सुंदरी, दुसरा कोणी तरी असेल, फोन करून तु रूम नं विचार ज्यांनी तुला बोलावलं असेल, " मी तो नाही तु जा "म्हणत संजय दरवाजा बंद करतं होता तोच तिनं त्याला थांबवल, "काय झालं तुम्ही ते नाही तरी, मी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझं शरीराच उपभोग घेऊ शकता", असं ती सोंदर्याचं जाळं फेकून त्याला पटवण्याचं प्रयत्न करतं होती, पण संजय काय पटत नव्हता, तो सुमनचाचं विचार करतं होता ती का? आली नसेल, या विचारात त्यानं तिला जा म्हणत दरवाजा बंद केला होता, अन तो आता सुमनला फोन लावणार तोच दरवाज्याची परत बेल वाजते, संजय दरवाजा पुन्हा उघडतो आणि बघतो तर काय सुमन आणि तिच्या पाठीमागे तीच सुंदर मुलगी त्याला दिसते, आता संजयला सुमनला बघून खूप आनंद झालेला असतो, अन सुमन त्याहून संजयवर खुश झालेली असते, कारण त्यानं तिच्या मैत्रिणीला काहीच भाव दिलेला नसतो, सुमन तिच्या मैत्रिणीची त्याला ओळख करून देत "ही माझीच मैत्रीण आहे सुनीता " मग संजय हसत म्हणजे " तुम्ही माझी परीक्षा घेत होता व्हयं "

सुमन "नाही रें हे माझं विचार नव्हता " "पण सुनीतानेचं मला मागे थांबवत मुद्दामहून तुझी मजा घेतली " बोलता बोलता संजयनी दोघी जनीला बसायला सांगितलं होत, दोघी जणी बसल्या होत्या, संजय "तुम्ही काय घेणार? चहा की नास्ता माघू?" सुमन सुनीताला विचारत चहाचं माघव म्हणून संजयला सांगितलं, वेटर चहा आणून देत असतो, दोघी चं चहा पिऊन झाल्यावर, सुनीता "मला आता निघावं लागले", तिला आईचा फोन आला होता त्यामुळे ती दोघांना बाय बाय करतं, भेटीचा आनंद घ्या म्हणून दरवाजा लावत निघाली होती, आता हे दोघेचं जन रूम मध्ये राहिले होते, सुनीता रूमच्या बाहेर जाताच सुमन संजयच्या गळ्यामधी पडली होती, आय लव्ह यु म्हणत घट्ट मिठ्ठी मारत "तु खरंच माझा आहेस अन मी तुझीचं तुझी झाले रें"   


"धुंद या प्रेमात 

बेधुंद मी झाले 

सख्या सावर मले 

ह्र्द्यात तुफान आले


उडवत भाव शांतीचे 

लावून आग तनामधी 

रक्त पळते नसानसात 

भरून उरु खुललें रें


खोलत दार स्वर्ग हर्षाचे 

वाटून गोड निवांत मी 

स्वप्नात बघितलं घर आपलं 

ते करू साकार प्रिया रें


असुदे जन्माची साथ अशी 

संसार वृक्ष बहरण्यास

मी नीर बरसवत ममतेत 

तु किरण प्रेमाचे पाडत जा


असं फुलवा फुलवू 

बाग ही जीवत्त्वाची 

माणुसकीची धारा वाहत

मग मिळून करू देश सेवा 


            ......... क्रमशः       



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance