Pallavi Patil

Romance Inspirational

3.9  

Pallavi Patil

Romance Inspirational

एक सुरुवात❤️

एक सुरुवात❤️

3 mins
369


वेदू आणि श्रेयस खूप हैप्पी जोडपं, कारण सगळ्यांना मदत करून ते आनंदी राहायचे, सर्वाना जमेल तशी मदत करणे.

दोघे हि ऑफिस सांभाळून घर आणि मित्रमंडळ असा त्यांचा परिवार.

घड्याळाच्याया काट्याप्रमाणे दोघांच आयुष्य पळत होत. मुंबई सारख्या ठिकाणी एका खोली मध्ये राहून प्रवास सुरु केला होता. 2 वर्षा नंतर वेदश्रीला एका multinational company मध्ये जॉब साठी interview कॉल आलेला असतो. दोघे हि यावरून नेहमी प्रमाणे आवरून निघतात....


श्रेयस... "वेदा बेस्ट लक"

वेदा.."हम्म,thank you,"

श्रेयस तिच्याकडे बघून विचारतो...काय झालंय?


वेदा..." काही नाही रे ..तुला माहित आहे ना मला interview च्या आधी अस दडपण येतं."


श्रेयस:-"आच्छा! अस झालंय तर.....

(वेदू कडे एक भुवई उंचावत)अगं वेदाबाई पण मग तूच म्हणतेस ना कि मला टेन्शन आलं की interview चांगला होतो"

"नको टेन्शन घेऊ मस्त होईल interview"....


वेदू:- "हो रे, पण तरी"


श्रेयस वेदू ला स्टेशन ला ड्रॉप करतो आणि ऑफिस साठी निघतो....

श्रेयस तिला थोड्यावेळाने मेसेज ड्रॉप करतो फ्री झाली की कॉल कर, वेटिंग फॉर युअर कॉल

वेदश्री चा काही कॉल येत नाही,...


कामात राहून राहून त्याला तिची काळजी लागून राहते, 5 वाजतात आणि हा बाहेर पडायला निघतो.... कॉल करायला घेतो, तेव्हा त्याला message दिसतो,

ऑल done, आणि मी घरी वाट बघतीये लवकर ये. गाडी सावकाश चालव....

कामाच्या घाईत श्रेयस मेसेज चेक करायचा विसरून जातो.


श्रेयस:- "काय ग कसा झाला interview"


वेदू:-"जसा तू म्हणालास तसाच ,एकदम मस्त, ऑल done"


श्रेयस:-"wow मस्तच,congrats बायको"

वेदू:-"खुश ना?"


श्रेयस:-"हे काय विचारणं झालं,एकदम खुश, आज मी चहा करतो... मस्त पैकी, आलोच, फ्रेश होऊन येतो.

दोघे मस्त चहा घेतात व जोइनिंग च्या तयारीला लागतात.


दुसऱ्या दिवशी श्रेयस फ्रेंड्स सोबत surpriseपार्टी प्लॅन करतो,आणि कॉल करून तिला मार्केटमध्ये बोलावतो.


तिथून दोघेही मस्त फिरून येतात,वेदुला मारिन ड्राईव्ह ला।शांत बसायला फार आवडायच, दोघेही तिथे बसून राहतात.

वेदू:- "आज खूप छान वाटत आहे रे हि संद्यकाळ, आता खरी life सुरु होईल."


श्रेयस:- तिचा हात हातात घेत"तू खुश आहेस ना मग मला आजून काही नको,तुझी स्वप्न ती माझी स्वप्न आहेत आणि हे दोघांनी मिळून पूर्ण करायची आहेत"


आणि दोघं हि शांत बसतात.....त्या खळखळत्या लाटाना शांत होताना पाहत,अंगावर गार वाऱ्याचा स्पर्श होत दोघेही मनातून खुश असतात,या अश्या वातावरणामुळे मन अजूनच प्रसन्न होत.

तेवढ्यात रीमा चा कॉल येतो,अरे कुठे अहात दोघे? आम्ही आम्ही पोहचलोय या लवकर...श्रेयस त्याच घाईत चल निघूया असं डोळ्यांनीच वेदुला ईशारा करतो व दोघं तिथून निघतात....हो ग पोहचतोय.


असं म्हणत सिग्नल पडल्यावर तिचा हात लहान बाळासारखा घट्ट पकडून रोड क्रॉस करतो आणि दुसऱ्या बाजूला यांचा मित्रमंडळ वेदुला आणि श्रेयस ला पाहून एकदमच ओरडतात..."काँग्रेटसंस्स्सस्स्स"

वेदुला हा आनंददाई धक्का असतो आणि ती अजूनच खुश होते.


हे guys thank you...


शौनक:-फॉर्मलिटी नको करू....you deserve it!


मनू:- आणि तुझं स्वप्न होत ते तू जगणार आहेस आता याचा आनंद दिसतोच आहे आम्हाला.

चला रे खूप भूक लागलीये....नेहा

हो हो चला अस म्हणत श्रेयस सगळ्यांना त्यांच्या favourite हॉटेल मध्ये घेऊन जातो....

श्रेयस आणि वेदू च routine चालू होतं, मस्त मज्जेत दिवस जात असतात.

वेदू ला कधीलधी उशीर होत होता....श्रेयस खूप ऍडजस्ट करून घ्यायचा.

शनिवारी तिला सुट्टी असल्यामुळे ती आठ्वड्याची उणीव भरून काढायची...


त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ आणि बरच काही.

असं करत करत 7-8 महिने उलटून जातात.

नेक्स्ट मंथ श्रेयस चा वाढदिवस असतो, काही तरी मस्त गिफ्ट द्यायचं असा ती ठरवून काहीतरी आपल्या मनात पैश्यांची सांगड घालते.....

श्रेयस च्या वाढदिवसाच्या एक आठवड्या आधी ती त्याच्या फ्रेंड्स ची मदत घेऊन सगळं काही करून घेते,

लोन फॉर्मलिटी, प्रोसेस सगळं काही.....


आणि ज्या दिवसाची ती वाट पाहत होती तो दिवस उजाडतो......योग योगाने रविवार होता

वेदू ने त्याला हळूच birthday wish केलं होतं जेव्हा ती उठली होती.....9 वाजले तरी श्रेयस काही उठला नव्हता,...थोड्यावेळात डोर बेल मुळे श्रेयस उठतो,बघतो तर सकाळी सकाळी सगळं गँग घरी जमा...


शौनक:- "अरे अजून नाही आवरलं याचं असा करत श्रेयस ला बाथरूम मध्ये ढकलतो"

चला चला करत सगळे घाईतच नाश्ता आवरून ,बाहेर पडतात, वेदू पण त्याला म्हणते तू लॉक करून ये मी आलेच....


आणि सगळे गाडीत बसतात...श्रेयस ला सांगतात रीमा कडे जायचं आहे , त्याला काहीच कळत नसतं.... सगळे डेस्टीनेशन ला पोहचतात..


रीमा त्यांना आवाज देते आणि वरती यायला सांगते..लिफ्ट मधून श्रेयस आणि वेदू बाहेर येताच सगळे एकदमच विश करतात हैप्पी बर्थडे श्रेयस.... 

वेदू एक गिफ्ट बॉक्स हातात देते.....त्यात त्या फ्लॅट ची चावी असते...श्रेयस एकदम शॉक होतो....आणि दोघे एकदम गृहप्रवेश करतात!Rate this content
Log in