Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pallavi Patil

Children Stories


4.6  

Pallavi Patil

Children Stories


काहीतरी हरवलंय....❤️

काहीतरी हरवलंय....❤️

3 mins 323 3 mins 323

सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला जाणं म्हणजे एक वेगळाच आनंद. ज्याला कशाची हि सर नाही,अगदी आताच्या so called summer tour s ना तर अजिबात नाही.आमच्या लहानपाणी हा ठरलेला उपक्रम.अगदी मग शेवटच्या पेपरची वाट बघत बसायची कि आईने सर्व तयारी केलेलीच असायची.

 आम्ही कोकणात राहत होतो त्यावेळी गावाकडे जाणारी एकच एस टी असायची,तेव्हाची गंमतच न्यारी हे मधेच संगतीये कारण सुट्टया आल्या की,गर्दी आली, गर्दी म्हंटलं की reservation आलं आणि या धांदल गडबडीत जर ते रिजर्वेशन राहिलं तर मग बाबांना बिचार्याना त्रास खूप असायचा, आम्ही जसा अभ्यास करायचो उद्या च्या पेपरचा तस बाबा न चुकता तेवढं काम करायचे.तेव्हा स्वतःची अशी गाडी असणं म्हणजे बडेजाव म्हणाव लागेल....


अभ्यासात हुशार असल्याने पेपर झाल्यावर पास नापास च टेन्शन नसयचं कुणालाच, कारण त्यावेळी अभ्यासाच्या व्यतिरिक्त अस काही नसायचं हल्ली सारखं,....

मोबाईल,हा क्लास तो क्लास...अजिबात नव्हते,फार फार तर खेळ आमचे मैदानी ते तर आवर्जून खेळायचो.पण वेळेची मर्यादा ठरवून.


त्यामुळे पेपर झाला की घर गाठायचं आणि मामाच्या गावाला जायचं म्ह्णून त्या आनंदात असलं तरी या वर्षी ची पुस्तक मात्र आवर्जून एकत्र करुन ठेवायचो,परीक्षा झाल्यावर हे काम का ?...असं मनात आला असेल ना..त्याच कारण म्हणजे पुढच्या वर्षी आपली पुस्तकं कुणा गरजू मुलांना देण्यासाठी ती लागणार हे आईने पहिलाच बाजावलेलं असायचं, ती वापरताना देखील कुठे कानाकोपऱ्यात घडी पडू नये,फाटू नये याची पूर्ण खबरदारी घ्यायला लावायची.


पुस्तकं जरी जुनी असली तरी ती देताना खूप आनंद होत असे कारण आपल्या पुस्तकांवर कुणी अजून शिकू शकतं हि गोष्टच मनाला खूप सुखावणारी होती, घेणारा पण खूप खुश का तर तेवढे काबाडकष्ट आपल्या आईवडिलांना कमी लागणार होते,कुठे तरी त्यांचे पैसे वाचले याचा आनंद असायचा.आशीर्वाद मिळायचा यात आम्ही दांडगे खुश....आम्ही काही तरी चांगलं करतोय एवढंच काय ते काळात होत तेव्हा...


याहून जास्त काहीच नको असायचं....माझ्या पुस्तकांवर आमच्या घरी काम करणाऱ्या मावशीची मुलं शिकली त्यामुळे ती खूप खुश असायची आमच्यावर.

हे झालं पुस्तकांचं...


चला आता मामाच्या गावाला... रात्री एस टी पकडली कि पहाटे पोहचायचो, पण रात्री काही झोप यायची नाही कारण मनात कधी एकदा पोहचू आणि भावंडाना भेटू एवढच असायचं.... पहाटेच्या गारव्याने मस्त वाटायचं,मोहून टाकणारा सुगंध,सकाळ प्रसन्न वाटायची...गावची गोष्टच न्यारी...


घरी पोहचतोय न पोहचतोय आजी आजोबांना बघून आई खुश ,भावंडाना भेटून आमची चांगळ ,आम्ही जाम खुश का तर मामा मामी म्हणजे लाड पुरवणारे यंत्रच जणू.सगळ्यांची गट्टी जमायची, मोठ्यांची वेगळी आणि लाहानांची वेगळी पण कसलेही क्लेश मात्र नसायचे...

गेल्याच्या पहिल्या रात्री जेवणावळी झाल्या की आजी सगळ्यांना अंगणात घेऊन दृष्ट काढायची...अम्ही मात्र तिच्या चेहऱ्याकडे बघून तोंडावर हाथ दाबून हसायचो...पण ती डोळ्यांनीच गप्प बसा म्हणत दृष्टीची टिकली लावायची मग आम्ही मोकळे...मस्त गचीवर चांदण्या मोजत आजोबांची गोष्ट मात्र ठरलेली असायची त्याशिवाय झोप अजिबात येणे नाही.हा आमचा रोजचा उपक्रम...


सकाळ मस्त चिमण्यांच्या चिवचिव आणि मोगऱ्याच्या सुगंधाने होत असे...तोपर्यंत आजोबा यायचे morning walk करून.....मग आजी देवघरात मस्त धूप आरती करतच आम्हाला आवाज द्यायची,या रे अभिषेक घाययला...कि लगेच आम्ही एका रांगेत उभे एकसाथ गायत्री मंत्र,गणपती स्तोत्र ठरलेलं असायचं,मग सर्वांना वाकून नमस्कार आणि आशीर्वाद तेव्हा कुठे आजी अभिषेक द्यायची...

बागेतली सुंदर फुलं, त्यावरचे फुलपाखरू,कुठे चिमण्यांची घरटी,कुणाच्या झाडाला लागलेली फळं... आंब्याच्या पारावर बसून बैठे खेळ यात दिवस कसे जायचे याच काही गणित नव्हतं.कंटाळा हा शब्द नसायचा आमच्या डायरीत...किंबहुना पुस्तकात नसायचा,आता तोच डायरीत आहे..


एक दिवस आज्जी सकाळीच उठवून फुलं आणायला न्यायची का तर मला गजरे फार आवडायचे,सगळ्या प्रकारच्या फुलांची ओळख ती करून द्यायची,जी फुल आमच्यात नव्हती ती पलीकडच्या आजीच्या दारात असली तरी ती एक दिवस त्यांची ओळख करून द्यायची...हो फुलांची ओळख,कारण प्रत्येक फुल हे एक वेगळ्या पद्धतीने तोडलं जायचं,त्यांना हि इजा होते असं आज्जी सांगायची,नाजूक असतात ती फार...पण त्यामुळे त्यांची आणि माजी वेगळी गट्टी असायची.


असं करत निकालाचा दिवस येऊन उभा असायचा कि आजोबा नेहमी प्रत्येकाला एकत्र घेऊन सगळ्यांचे निकाल सांगायचे.गमंत म्हणजे त्या वेळी प्रत्येकाला एक एक गिफ्ट असायचं हो त्यावेळी गिफ्ट म्हणजे आमच्या साठी खूप खूपच मोठं अस काहीतरी होतं... आता त्याच सुख नाही कारण आता मागणीच्या आधी ती वस्तू हजर असते सो त्याचं इतकं मोल राहत नाही...

पण त्यावेळी कुणी डावंउजवं नव्हतं सगळे एका तराजू मधले असायचे....

स्वावलंबी होते स्वार्थी नव्हते

एकत्र होते एकाकी नव्हते

असं हे लहानपण खूप छान होतं

 मनात साठवलेलं माझं एक गाव होतं.


Rate this content
Log in