Nilesh Bamne

Inspirational

3  

Nilesh Bamne

Inspirational

एक शापित राजपुत्र

एक शापित राजपुत्र

14 mins
1.8Kट्रिंग - ट्रिंग दारावरची बेल वाजली. एका साठीतील स्त्रीने दरवाजा हळूच उघडला . समोर एक सुंदर गोरीपान तरुणी उभी होती. दरवाजा उघडतात ती तरुणी म्हणाली, नमस्कार मावशी ! मी यामिनी तुमच्या समोरच्या घरात नव्याने राहायला आलेय, हल्लीच माझ्या वडिलांनी ते घर विकत घेतलंय ! तुमच्याकडे उंच टेबल आहे का ? त्यावर ती स्त्री म्हणाली , आहे ना मी देते तू नेशील का ? नाहीतर पाठव ना कोणाला तरी न्यायला ! त्यावर ती म्हणाली नाही ! मी पाठवते कोणाला तरी थँक्स हां ! तुमचं नाव काय मावशी ! नावात काय आता तू मला मावशीच म्हण ! आणखी काही लागलं तर हक्काने पाठव मागायला !! ये आत बसतेस का ? मी चहा बनवू का तुझ्यासाठी ? यामिनीने हळूच घरात पाऊल टाकलं आणि म्हणाली मावशी मला चहा नको ! एक ग्लास थंड पाणी द्या !! ती समोरच्या सोफ्यावर हळूच बसली. मावशी पाणी आणण्यासाठी आतल्या खोलीत गेली. यामिनीने समोरच्या टेबलावरचे एक पुस्तक उचलून वाचायला घेतले तेवढ्यात मावशी पाणी, चहा आणि बिस्किटे घेऊन आल्या आणि यामिनीच्या समोर टिपॉय वर ठेवलं त्यावर काहीही न बोलता यामिनीने चहाचा कप ओठाला लावला आणि मावशींना म्हणाली, मावशी तुम्ही एकट्याच राहत का ? त्यावर मावशी म्हणाली नाही मी आणि माझा मोठा मुलगा राहतो, आमचे हे गावी कोकणात राहतात हवा पालटण्यासाठी ! मला आणखी एक मुलगा मुलगी आहेत ते दुसरीकडे राहतात येतात अधून - मधून ! तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न नाही झालं का ? त्यावर मावशी मानेनेच नाही म्हणाल्या, ती पुढे काहीतरी म्हणणार इतक्यात एक कामगार आला आणि म्हणाला, मॅडम टेबल आहे का यांच्याकडे त्यावर मावशी टेबलाकडे बोट दाखवत म्हणाल्या तो आहे ! घेऊन जा !! त्यावर यामिनी मावशीला म्हणाली, मावशी मी पण निघते, नंतर येते चहा छान होता हा ! आणि हो ! हा कथासंग्रह छान आहे मी घेऊन जाऊ का ? वाचून झाला की आणून देते...त्यावर मावशीने मानेनेच होकार दिला ...यामिनी मावशीला बाय करून निघून गेली...मावशीने दरवाजा बंद केला आणि दाटून आलेले डोळे पुसत एक टक समोरच्या पुस्तकांच्या कापाटाकडे पहात असताना आतल्या बंद बेडरुममधून आवाज आला आई जरा चहा देतेस का ? त्यावर आई म्हणाली,माझ्या राजपुत्राच्या नाकात चहाचा वास गेला वाटतं...

मावशी चहा घेऊन आतल्या खोलीत गेल्या त्यांचा पाठमोरा मुलगा संगणकावर काहीतरी टाईप करत होता मावशीच्या पावलांची चाहूल लागताच तो वळला तर त्याचे अर्धवट पिकलेले केस खांद्यापर्यत वाढले होते, अर्धवट पिकलेल्या दाढी - मिश्या बऱ्यापैकी वाढल्या होत्या म्हणजे त्याचा चेहरा म्हणजे त्यावरील दोन नाजूक तपकिरी रंगाचे एखाद्या साधुसारखे डोळे दिसत होते. त्याने चहाचे एकामागून-एक चारपाच झुरके मारले आणि कप मावशीच्या हातात दिला आणि पुन्हा आपल्या कामात गुंग झाला...मावशींनी दरवाजा ओढून घेतला आणि बाहेर येऊन टीव्ही सुरु करून त्यावर मालिका पाहण्यात गुंग झाल्या.

असेच चार - पाच दिवस गेल्यावर पुन्हा ट्रिंग ट्रिंग दारावरची बेल वाजली. मावशींनी दरवाजा उघडला दारात यामिनी उभी होती तिच्या सोबत एक कामगार टेबल घेऊन आला होता त्यान तो टेबल आत ठेवला आणि तो निघून गेला. मावशींनी यामिनीला प्रश्न केला झाली का घराची आवराआवर ? त्यावर यामीनी म्हणाली हो झाली, या ना एकदा आमच्या घरी ! त्यावर मावशी म्हणाली, हो नक्की ! बस मी तुझ्यासाठी चहा ठेवते ! त्यावर यामिनी म्हणाली, नको ! मावशी मी थोडी घाईत आहे नंतर येईन वेळ काढून मग तुमच्यासोबत चहा ही पिते आणि गप्पा ही मारते मग झालं ! ती निघून गेल्यावर मावशी स्वतःशीच म्हणाली, किती गोड मुलगी आहे एक काळ होता जेव्हा अशाच राजकुमारीसारख्या दिसणाऱ्या मुली माझ्या राजकुमारला भेटण्यासाठी ताटकळत बसायच्या आणि आज माझा राजपुत्र एखाद्या शापित राजपुत्रासारखा स्वतःला बेडरूम नावाच्या खुराड्यात बंदिस्त करून बसला आहे. देवजाणे कधी तो या खुराड्यातून बाहेर मोकळ्या हवेत येईल...

असाच आणखी एक आठवडा गेला एक दिवस संध्याकाळी यामिनी मावशींना भेटायला आली तिच्या हातात एक केकचा बॉक्स होता यामिनीला पाहताच मावशींना खूप आंनद झाला ती आत येताच मावशीला म्हणाली, मावशी सुरी घेऊन या आज माझा वाढदिवस आहे मी इकडे एकटीच राहते ना ! आपण माझा वाढदिवस साजरा करू या ! त्यावर मावशी आत जाऊन ओवाळणीचे ताट आणि इतर साहित्य घेऊन आल्या. यामिनीला ओवाळून झाल्यावर त्यांनी मिळून केक कापला आणि एकमेकींना भरवला यामिनीने मावशीच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. मावशी यामिनीला म्हणाली, अगं पण तुला भेट दयायला सध्या माझ्याकडे काहीच नाही. त्यावर यामिनी म्हणाली तुमचा आशीर्वाद मला खूप आहे. उरलेला केक यामिनीने त्यांच्या मुलासाठी ठेवला. ती पुढे काहीतरी बोलणार इतक्यात तिचा फोन आला आणि ती फोनवर बोलत निघून गेली. मावशी प्लेटभर केक घेऊन आपल्या मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या आज माझ्या छोट्या मैत्रिणीचा वाढदिवस होता आताच आम्ही मिळून साजरा केला हा घे केक ! केक बकाबक खाऊन झाल्यावर तो एक कव्हर बंद पुस्तक आईच्या हातात देत तो म्हणाला आई ! हे पुस्तक तुझ्या मैत्रिणीला भेट दे तिला नक्की आवडेल. त्यावर मावशीने ते आनंदाने हातात घेतले. दुसऱ्या दिवशी यामिनी पुन्हा आली ती घेऊन गेलेले पुस्तक परत करायला. ते पुस्तक मावशीच्या हातात देत ती म्हणाली, मावशी छान पुस्तक होत मी अक्क पुस्तक पुन्हा पुन्हा वाचलं तरी मन भरलं नाही. ही सर्व पुस्तके तुम्ही वाचता का ? त्यावर मावशी म्हणाल्या, तुला खरं वाटणार नाही पण मी फक्त सही करण्याइतपतच शिकलेय पण शिकली असते तर बरं झालं असत निदान मला या पुस्तकात मन रमवता आलं असतं माझ्या मुलाला वाचनाचं भयंकर वेड आहे त्याने तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक पुस्तक भेट दिले आहे. मावशीने ते त्यांच्या मुलाने दिलेले पुस्तक यामिनीच्या हातात दिले. तुमचा मुलगा आहे का घरी मी त्याला थँक्स म्हणाले असते. नाही ! तो घरात नाही मावशी खोटंच बोलल्या...काही हरकत नाही माझा थँक्स सांगा तुम्ही त्याला, कधी ना कधी आमची भेट होईलच. यामिनी निघून गेल्यावर मावशी आपल्या मुलाच्या खोलीत जाऊन त्याला म्हणाल्या, अजून किती वर्षे लोकांपासून लपून राहणार आहेस मी जिवंत आहे तोपर्यत ठीक आहे पण नंतर कधी ना कधी तुला या जगाचा सामना करावाच लागेल ना ? आई त्याची काळजी तू करू नकोस मी तुझ्यासाठी जिवंत आहे जगासाठी मी स्वतःला कधीच मारलय ! मी मरेन पण माझा हा विद्रुप चेहरा घेऊन मी जगासमोर कधीच जाणार नाही. तुझ्या चेहऱ्यानेच तुझा घात केला. माझ्या राजकुमाराला कोणाची नजर लागली देव जाणे ! आपले ओलावले डोळे पुसत आई त्याच्या खोलीच्या बाहेर पडल्या.

एक - दोन दिवस आड करून यामिनी मावशीला भेटायला येतच असे दोघीची चांगलीच गट्टी जमली होती. मावशीचा उत्साह वाढला होता तिच्या निमित्ताने मावशी खायला गोड धोडही करू लागल्या होत्या. बोलता - बोलता मावशी यामिनीला म्हणाल्या यामिनी तु लग्न का नाही केलंस ? त्यावर यामिनी म्हणाली खरं सांगू मावशी मला समाजासाठी काहीतरी भरीव कार्य करायचे आहे जगापेक्षा काहीतरी वेगळे जेणे करून माझ्या नंतर ही लोकं माझं आदराने नाव काढतील ते कुत्र्या मांजरासारखं जगणं मला मान्य नाही. तुमचा मुलगा लग्न का करत नाही ! तुम्हाला मदत झाली असती. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे पण ते मी तुला देणार नाही का? ते विचारू नकोस ! त्यावर विषय बदलत यामिनी म्हणाली तुमचा मुलगा कोणी पत्रकार वगैरे आहे का ? मावशी नाही का ? काही नाही त्यांनी माझ्या वाढदिवसाला भेट दिलेला कथासंग्रह (एन. डी.)चा माझ्या आवडत्या लेखकाचा ! त्यावर त्यांची सहीही आहे ते पुस्तक तेव्हा बाजारातही आलं नव्हतं मग तुमच्या मुलाकडे कोठून आलं ? ते ओळखतात का एन. डी. ला ? त्यावर मावशी म्हणाल्या कदाचित ओळखत असेल तो बऱ्याच लेखकांना ओळखतो ! या एन. डी. ची बरीच पुस्तके मी वाचली आहेत पण त्यांचा फोटो कधीच कोठेच पहिला नाही. विषय बदलावा अथवा टाळावा म्हणून मावशी तिला म्हणाल्या तू बस मी तुझ्यासाठी छान कोकम सरबत बनवून आणते...त्यादिवशीचा विषय आटपला.

त्यांनतर काही दिवसांनी यामिनी मावशीकडे आली असता मावशीला म्हणाली, काल रात्री मी तुमच्या बेडरूमच्या खिडकीत एक दाढीवाला माणूस पहिला तोच तुमचा मुलगा होता का ? त्यावर मावशी म्हणाली हो ! त्यांनी इतकी दाढी का वाढवली आहे ? विषय टाळायचा म्हणून मावशी म्हणाल्या हल्ली दाढी वाढवायची फॅशन आली आहे ना ? तुमच्या घरात त्याचा एकही फोटो नाही ? असे कसे ? नाही आवडत त्याला फोटो लावायला ! मावशी म्हणाली, त्याला सुट्टी असते की नाही कधी आपण एकत्र बाहेर कोठेतरी जेवायला गेलो असतो. त्यावर मावशी लगेच म्हणाल्या,तो बाहेरच काहीच खात नाही ! तसं असेल तर मी घरीच स्वयंपाक करेन मला उत्तम स्वयंपाक करता येतो, त्यावर मावशी म्हणाल्या नको त्याची गरज नाही तसाही तो कधी मोकळा नसतोच ! हा ! पण तू म्हणत असशील तर तुझ्यासाठी मी माझ्याच घरी छान जेवणाचा बेत तू म्हणशील तेव्हा करेन ! मावशी मी या पुस्तकाच्या कपाटातील पुस्तके पाहू का ? त्यावर मावशी म्हणाल्या अगं विचारतेस काय ? बघ ना ? त्या कपाटात एन. डी. ची सर्व पुस्तके होती त्यासोबत विजय जाधव या लेखकाची काही पुस्तके आणि इतर लेखकाची आणि इंजिनिअरींग, ज्योतिष्य, अध्यात्म आणि काही विनोदी पुस्तके होती. विजय जाधव हे नाव यामिनीला अगदीच अनोळखी नव्हते त्याचा कवितासंग्रह तिने वाचला होता. विजय जाधवचा एक कथा संग्रह यामिनीने वाचायला घेतला आणि ती निघून गेली. चार - पाच दिवसांनी ती मावशीला भेटली तेव्हा तिने मावशीला प्रश्न केला तुम्ही विजय जाधवला कधी भेटला आहात का ? त्यावर मावशी म्हणाल्या हो ! तो आमचा नातेवाईक आहे . का ग पण हे तू का विचारतेस ? काही नाही मला वाटत विजय जाधव आणि एन. डी. हे एकच आहेत कारण दोघांच्याही कथेतील नायक नायिकेची नवे सारखी आणि भाषाशैलीही सारखीच आहे. मावशी , असेलही तसे पण मला काही त्यातलं कळतं नाही मी माझ्या मुलाला विचारते मावशी तुमच्या मुलाचं नाव काय ? त्यावर मावशी म्हणाल्या, माझ्या मुलाचं नावही योगायोगाने विजय जाधवच आहे. अरे हो तुमच्या मुलावरून आठवलं काल रात्री मी त्यांना हात दाखवला पण त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी खिडकी बंद केली कदाचित त्यांनी पहिले नसेल. यामिनी निघून गेल्यावर मावशी बराच वेळ डोक्याला हात लावून बसल्या आणि रागाच्या भरात त्या विजयच्या खोलीत गेल्या आणि त्याला म्हणाल्या विजय ! आता मला खोटं बोलण्याचा कंटाळा आलाय त्यावर विजय म्हणाला तू खोटं का बोलतेस कोणी विचारलं तर खरं का नाही सांगत की माझा मुलगा मानसिक रुग्ण आहे म्हणून आमच्या बेडरूममध्ये कायम बंद असतो. असं बोलताना माझी जीभ झडणार नाही का ? म्हणत मावशी बाहेर येऊन टीव्ही पाहण्यात गुंग झाल्या

एक दिवस अचानक एका सकाळीच विजयला थंडी वाजून खूप ताप भरला मावशीने त्याला नेहमीच्या गोळ्या वगैरे दिल्या पण ताप कमी होण्याऐवजी वाढत गेला त्यामुळे मावशी घाबरल्या त्यांनी रात्री दहा वाजता विजयच्या डॉक्टर मित्राला फोन लावला पण तो बाहेर असल्यामुळे त्याने मी दुसऱ्या डॉक्टरला पाठवतो सांगितले मावशी विजयच्या डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवत होत्या इतक्यात दारात यामिनी डॉक्टरच्या वेशात समोर उभी होती. मावशीने दरवाजा उगडताच यामिनी म्हणाली, हे काय मावशी तुमच्या घरात डॉक्टर असताना तुम्ही बाहेरच्या डॉक्टरला बोलावता, कोठे आहे आमचा पेशन्ट ? मावशी ला क्षणभर काय बोलावे सुचत नव्हते तरीही बेडरूममध्ये मावशीच्या ओठातून शब्द फुटले. मावशी यामिनीला घेऊन विजयच्या बेडरूममध्ये गेल्या समोरच्या बेडवर भयंकर साधुसारखी दाढी वाढलेला विजय आडवा पडला होता त्याच्या डोक्यावर पाण्याची घडी होती, यामिनीने ती घडी काढली, डोक्याला हाताने स्पर्श केला आणि तोंडात थर्मामीटर धरून ताप तपासला आणि इंजेक्शन देऊन थोडावेळ ती तेथेच सोफ्यावर बसली आणि तिने आपली नजर बेडरूममध्ये चोहीकडे फिरवली नक्की रम सन्मानचिन्ह, मानपत्र, आणि वेगववगल्या वर्तमानपत्रातील फ्रेम केलेल्या कात्रणांनी भरली होती समोरच्या भिंतीवर एका अतिशय सुंदर पुरुषाचा फोटो होता त्या फोटोतील पुरुष परिकथेतील राजकुमारसारखा दिसत होता... यामिनी त्याच्याकडे एक तक पहात होती इतक्यात मावशी तिच्यासाठी लस्सी घेऊन आल्या यामिनी मावशीला म्हणाली यांच्यासाठी पेज बनवा आणि जरा सावरला कि ती पेज भरावा आणि मी दिलेल्या गोळ्या द्या सकाळ पर्यत बरं वाटेल मी सकाळी पुन्हा येईन ! तरीही रात्री गरज पडली तर मला फोन करा मी येईन, बाहेरच्या डायरीत माझा फोन नं लिहून जाते. यामिनी निघून गेल्यावर मावशीला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं होत आता यामिनीचा सामना कसा करावा हाच मावशीसमोरचा मोठा प्रश्न होता...दुसऱ्या दिवशी यामिनीने बेल वाजवताच मावशीने दरवाजा उगडला मावशीने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा यामिनी म्हणाली मावशी तू आता काहीही बोलू नकोस जे काही बोलायचं आहे ते आपण नंतर निवांत बोलू ! यामिनी सरळ विजयच्या बेडरूममध्ये गेली तो गाढ झोपला होता यामिनीने त्याच्या डोक्याला

हात लावला ताप उतरला होता तिने मावशीला काही सूचना दिल्या आणि ती निघून गेली. संध्याकाळी यामिनी पुन्हा आली तेव्हा विजय बऱ्यापैकी सावरून बसला होता तिने पुन्हा ताप तपासला तर नव्हता मावशीने विजय आणि तिला चहा बिस्किटे आणून दिली. विजय तिच्यापासून नजर चोरत होता पण यामिनीच त्याच्याकडे पहात म्हणाली, सुप्रसिद्ध लेखक एन. डी. उर्फ विजय जाधव इतका लाजाळू आहे मला माहीतच नव्हते. इतका मोठा लेखक, इतक्या जवळ असताना त्याची भेट ही अशी व्हावी ! बरं आता काय नवीन लिहिताय ? त्यावर स्वतःला सावरत विजय म्हणाला, ते प्रकाशित झाल्यावर कळेलच की त्यावर यामिनी विनोदाने म्हणाली, निदान तुमच्यावर केलेल्या उपचाराची फी म्हणून तरी सांगा ! त्यावर विजय दाढीतल्या दाढीत हसत म्हणाला एक विनोदी कथासंग्रह लिहितोय ! मी एक सेल्फी काढू का तुमच्यासोबत फेसबुकवर टाकायला त्यावर विजय म्हणाला नको ! माझा जो चेहरा मलाही पहावत नाही तो चेहरा तू जगाला दाखवणार एक शापित राजकुमाराचा ! माझा हा विद्रुप चेहरा जगाच्या नजरेत पडू नये म्हणून मी गेली पाच वर्षे या बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलंय. बरं नाही काढत पण एक डॉक्टर म्हणून नाही पण मैत्रीण म्हणून मी तुला भेटायला येऊ शकते का तुझ्याशी गप्पा मारू शकते का ? त्यावर विजय म्हणाला, येऊ शकतेस पण हे कोणाला कळता कामा नये. गेली पाच वर्षे मी माझ्या प्रकाशकालाही भेटलो नाही. वाचक मला भेटण्यासाठी वेडे आहेत पण गेली पाच वर्ष मीे त्यांना भेटणे टाळतोय ! माझ्या साहित्याला मिळालेले शेकडो पुरस्कार मी स्वीकारले नाहीत, तितक्यात यामिनीचा फोन आल्यावर ती बाय करून निघून गेली...यामिनी निघून गेल्यावर आई विजयला म्हणाली, गेल्या का डॉक्टरीन बाई ? त्यावर विजय म्हणाला ही का तुझी छोटी मैत्रीण ! हो मैत्रीण होती पण आता कदाचित आमच्यातील मैत्री धोक्यात आली आहे कारण मी तुझं सत्य तिच्यापासून लपवल म्हणून ! त्यावर विजय म्हणाला, तसं काही होणार नाही ती खूप हुशार आणि समजदार आहे ती नक्कीच तुला आणि मलाही समजून घेईल...

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यामिनी पुन्हा विजयच्या घरी आली तेव्हा विजय चक्क हॉल मध्ये पेपर वाचत बसला होता आणि त्याची आई उत्साहात टीव्ही पहात होती कारण आज पाच वर्षाच्या बंधीवासातून तिचा मुलगा घरातल्या घरात का होईना बाहेर आला होता. यामिनीची चाहूल लागताच दोघेही सावरून बसले त्या दोघांनाही काय बोलावं काही सुचत नव्हतं विजयच्या आईकडे पहात यामिनी म्हणाली, मावशी कशाला उगाच वाईट वाटून घेताय तुम्ही माझ्यापासून विजयच रहस्य दडवून ठेवलत याबद्दल माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात राग नाही मी विजयाच्या डॉक्टर मित्राशी बोलले त्याने सांगितले सारे मला...मला खरं म्हणजे राग विजयचा आलाय! जगाला आपल्या साहित्यामधून लढायला शिकविणारा स्वतः न लढताच हरून बसला. ज्या आजाराचा त्याने बाऊ केला त्या आजाराने जगभरातील दोन टक्के लोक ग्रस्त आहेत ते लढता आहेत ना त्या आजाराशी आणि सामान्य जीवन जगता आहेत ना त्यात तो आजार संसर्गजन्य नाही आणि त्याचा रुग्णाच्या आयुष्यावरही काही विशेष परिणाम होत नाही योग्य आहार विहार आणि काही पथ्य पाळल्यास हा आजार नियंत्रात नाही तर बऱ्यापैकी बराही होतो. मला माहित आहे विजयचा आजार हे एकमेव कारण नव्हतं विजयच जगापासून दूर जाण्याला पण विजय तूच तुझ्या प्रत्येक कथेतून हे सुचविण्याचा प्रयत्न करतोस की माणसाच्या आयुष्यात जे काही होत ते पूर्वनियोजित असतं त्यात कोणालाही बदल करता येत नाही. मग तुझ्या आयुष्यात आलेल्या आणि गेलेल्या मुलीबद्दल तू इतका विचार का करतोस ? माझ्या माहितीप्रमाणे तुला भविष्याचे ज्ञान आहे तरी तू असा का वागलास ? तुझा आजार कधीच बरा झालाय ! मग तुला कोणाची प्रतीक्षा होती ? त्यावर विजय शांतपणे म्हणाला , तुझी ? मी तुझीच वाट पहात होतो ! माझ्या आयुष्यातून अनेक मुली आल्या आणि गेल्या पण मी दुःखी नाही झालो पण एका क्षणाला मला प्रश्न पडला माझ्या आयुष्यात अशा विलक्षण गोष्टी का घडतात तू म्हणालीस तसं या आजारातून मी बरा होणार हे मला माहित होत त्या दिवशी तू आईसोबत तुझा वाढदिवस साजरा केलास आणि मला तुझी जन्म तारीख मिळाली कारण बोलता - बोलता तू आईला तुझा कितवा वाढदिवस आहे तेही सांगितलेस त्यावरून मी तुझी जन्मकुंडली तयार केली आणि गेल्या पाच वर्षात मी मिळविलेल्या ज्योतिष्य शास्त्रातील माझ्या ज्ञानाची परीक्षा घेतली तू डॉक्टर असावीस हे मला त्याच दिवशी लक्षात आले. तुझ्या वडिलांनी बरोबर आमच्या समोरचं घर विकत घेणं आईशी तुझी मैत्री होण, तू माझ्याच मित्राच्या दवाखाण्यात डॉक्टर म्हणून रुजू होणं, मी आजारी पडल्यावर तो नेमका बाहेर असणं आणि त्याने तुला मला तपासायला पाठवणं, तुला माझ्या कथा वाचायला आवडणं आणि माझ्या खोलीतील माझा फोटो पाहून तू माझ्या प्रेमात पडणं ! बस इतकाच योगायोग नाही...दहा वर्षपूर्वी माझ्या पहिल्या कवितासंग्रच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी तू माझ्या कवितासंग्रहावर माझी सही घेतली होतीस तेव्हाच तू माझ्या प्रेमात पडली होतीस तेव्हा माझ्या आयुष्यात एक मुलगी होती पण तरीही माझ्या मनात सहज विचार येऊन गेला होता माझ्या आयुष्यात जर कोणी नसती तर नक्कीच ही असती. त्यांनतर विजय जाधवचा ( एन. डी.) झाला तुला आतून कोठेतरी सारखं वाटत होतं की ( एन. डी.) आणि विजय दोन नसून एकच आहेत. गेल्या दहा वर्षात तुझ्या आयुष्यात अनेक पुरुष आले पण त्यातील एकाशीही तुझी जवळीक होऊ शकली नाही कारण तुझं अंतर्मन तुला सांगत होत तुझी आणि माझी भेट होईल ! माझ्या आयुष्यातून ती गेली त्यांनतर अनेक जणी माझ्या प्रेमात पडल्या पण त्यातील एकीचीही माझ्यासमोर प्रेम व्यक्त करण्याची हिंमत झाली नाही. माझा आजार बळावला आणि माझा ओढा अध्यात्माकडे वाढला अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मी शोधू लागलो त्याचा शोध घेता - घेता मला भविष्यात तुझी चाहूल लागली. माझे आजारपण हे त्या अनुत्तरीत प्रश्नच्या उत्तरांची शोध घेण्याची संधी होती. मी त्या संधीचा फायदा घेतला आणि भविष्यात डोकावून पाहण्याची क्षमता माझ्यात जागृत झाली. योगायोगाने काहीच घडत नाही , जेव्हा जे घडायचं तेव्हाच ते घडत, त्यात बदल करता येत नाही. त्यावर यामिनी उगाच काहीही बरं मला सांग मला लग्नानंतर पहिला मुलगा होईल की मुलगी त्यावर विजय म्हणाला, दोन्ही नाही कारण तू मुलांना जन्म देण्यास सक्षम नाहीस. हे ऐकून यमुनेचे डोळे पाणावले त्यावर विजय म्हणाली, अगं वेडे रडतेस कशाला आपल्या दोघांना मिळून खूप मुलांचे आई- बाबा व्हायचे आहे. तुमच्या दोघांना ?

आई मध्येच म्हणाली. त्यावर विजय म्हणाला हो ! आई मी यमिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तसा तिचा निर्णयही झालेला आहे . त्यावर यामिनी गालात गोड हसली आणि म्हणाली आणखी काय आहे माझ्या भविष्यात त्यावर विजय म्हणाला , ते नको विचारुस कारण पुढील भविष्य मला माहित आहे पण मी ते तुला सांगणार नाही कारण त्यामुळे तुझा जगण्यातील रस कमी होईल जो मला करायचा नाही मी भविष्य जाणून घेण्याचा अट्टहास केला पण खरं तर त्यामुळे भविष्यात मी कोणत्याच चांगल्या वाईट गोष्टीला प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. मला वाटत तू तुझं आयुष्य भरभरून जगावं ! तू तुझं भविष्य जाणून न घेतले बरे ! एका शापित राजकुमारला शापमुक्त करून त्याच्याशी तुझं लग्न होणं तुझं नशीब होत पण त्याची योजना भविष्यात आपल्याकडून होणाऱ्या एका फार मोठ्या दैवी कार्यासाठी झालेली आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या भौतिक सुखाचा त्याग करावा लागणार आहे पण एक सांगतो आपल्या हातून अस कार्य होणार आहे की आपण गेल्यावर कित्येक वर्षे लोक आपले नाव आदराने घेत राहतील...त्यावर आई म्हणाली, चला आता मी तीर्थ यात्रेला जायला मोकळी त्यावर विजय म्हणाला, आई तुला तसे नाही करता येणार कारण तुला तुझ्या नातीला खेळवायच, तीच लग्न होताना डोळेभरून पहायचय ! हे ऐकून आईचे डोळे भरून आले पण ! विषय बदलत यामिनी म्हणाली, चला मग आपण आज एकत्र बाहेर जेवायला जाऊ ! मी तयारच आहे तुम्ही तयार व्हा ! विजय आत गेला आपला शापित राजकुमाराचा मुखवटा उतरून चकाचक होऊन बाहेर आला त्याच सौंदर्य आता पूर्वीपेक्षाही अधिक खुळल होत. यामिनी तर एक टक त्याच्याकडे पाहत राहिली. काहीदिवसांनंतर वर्तमानपत्रातील बातमी प्रसिद्ध लेखक विजय जाधव ( एन. डी.) डॉ.यामिनी कदम यांच्याशी विवाहबद्ध !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational