सुमित बारी

Comedy

5.0  

सुमित बारी

Comedy

एक गंमत...

एक गंमत...

1 min
198


     मागील वर्षी म्हणजे २०२०च्या ऑगस्ट महिन्यात माझे शिर्डीला ऑपरेशन  झाले. ऑपरेशन ६ ते ६:३० तास चालले होते व ऑपरेशन नंतर मला १५ दिवस आय.सी.यु.मध्ये ठेवण्यात आले. १५ दिवसानंतर मला आय.सी.यु. मधून बाहेर काढले व तीन दिवसातच डिस्चार्ज मिळाला. माझे ऑपरेशन मोठे असल्याने माझी आई मला घरी आल्यावरही जास्त हालचाल करू देत नसे. जवळ जवळ ३ महिने झाले मी घरी उडी मारली व माझी आई मला रागावून म्हणाली "वल्ल हे न ते" म्हणजे ऑपरेशनची जखम अजून ओलीच आहे. तेव्हा मी आईला म्हणालो "दुसऱ्यांचा फोन आला तर त्यांना सांगते काही नाही आता सर्व व्यवस्थित आहे, टाकेदेखील कोरडे निघाले व मी थोडस काय जोरात चाललो मला म्हणते वल्ल हे न ते" तेव्हपासून मला सर्व तेच म्हणून चिडवू लागले व आता ऑपरेशनला एक वर्ष झाले मी आता जरी काही तेव्हासारखे केले तर मला म्हणतात "वल्ल हे न ते". हा विषय एक गंमत म्हणून राहून गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy