एक चुकलेली वाट - भाग ६
एक चुकलेली वाट - भाग ६
"का सारखं सारखं बोलवताय मला पोलीस स्टेशनला... आधीच ह्या प्रकरणात खूप बदनामी झालीय माझी ते ही फुकट फाकट... याचे परिणाम खूप वाईट होतील... सांगून ठेवतोय.." दीपक नाईक पिसळल्यासारखा पोलीस स्टेशनमध्ये जोरजोरात ओरडत होता. आधीच वर्तमानपत्रांतून त्यांच्या अतिशोयक्तीच्या नियमांप्रमाणे बऱ्याच गोष्टी छापून आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत त्याच्यासमोर झुकणारे लोक, त्याच्याच तोंडावर त्याच्याच विरुद्ध चर्चा करत होते. आजवर पुष्कळ गोष्टी त्याने राजरोस केल्या होत्या पण ह्या कानाची खबर कधी त्या कानाला गेली नाही. पण आता मात्र उगाचच तो पोळला जात होता.
" एकदाच सगळं खरं सांगून टाक.. नाही बोलवणार परत.." अनिकेत शांतपणे उत्तरला.
पोलीस स्टेशनच्या त्या दहा बाय दहाच्या कोंदट चौकशीच्या खोलीत बसून दीपकला कससच वाटत होत. आधीच्या वेळी फक्त नॉर्मल चौकशी झाली होती. पण आता... ती कुबट वासाने गुदमरून टाकणारी खोली, पिवळट रंगाचा जेमतेम तग धरून असलेला आणि नाईलाजास्तव प्रकाश फेकणारा बल्ब, प्रकाशाला गिळंकृत करू पाहणारा मिट्ट काळोख, जुनाट लाकडी खुर्च्या, कधीच न उघडले गेलेले आणि धूळ माखलेले खिडकीचे गज आणि समोर प्रचंड अंगार भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहणारा अनिकेत हे पाहून दीपक आतून घाबरला होता. नसत लचांड मागे लागण्यापेक्षा सगळ सांगून मोकळं व्हावं असं वाटलंही एका क्षणाला... पण त्याची ती धमकी त्याला बोलू देईना.
" दीपक, पण जर ही गोष्ट बाहेर पसरली तर... तर.... काय होईल....??" हातातील कागदं नाचवत अनिकेत त्याच्यावर नजर रोखून बोलला.
" काय आहे हे...?" दीपकला टेंशन आता पुढे काय वाढून ठेवलं असेल त्याच.
" तू स्वतःच बघ.." हातातील कागदाची पुंगळी एखादा महत्त्वाचा ऐवज समोर ठेवावा त्या आविर्भावात अनिकेतने उलगडून त्याच्यासमोर ठेवली.
" माद@*#....." कागदावरची नाव बघून दिपकचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. इतके दिवस जी भीती त्याला झोपू देत नव्हती ती सत्यात उतरली होती. जे स्वप्नातही पाहु नये ते प्रत्यक्ष पाहिल्याने त्याच्या सर्वांगाला कापरी भरली होती. हातापायातील ताकद जणू कोणी खेचून घेतली होती. मणक्यातून भीतीची लहर सरसरत पार मेंदूपर्यंत जात होती. कानशिल तप्त होऊन गरम वाफा निघू लागल्या. भयंकर संतापाने त्याच्या कपाळाच्या आठ्या ताणल्या गेल्या. कोणत्याही क्षणी धरतीने दुभंगून पोटात घ्यावं असं त्याला वाटत होत. पण त्याच्या पापांचा पाढा बराच होता. त्या कर्मगतीतून इतक्या लवकर सुटका नव्हती. अनिकेत दीपकमधील बापाची अवस्था समजू शकत होता. त्याने आपला आश्वासक हात दीपकच्या थरथरत्या पाठीवरून फिरवला.
" हे बघ दीपक... जे काही असेल ते सगळं आणि खरं खरं सांग... कदाचित तुझ्या मुलीचा जीवही धोक्यात असू शकतो.."
" हं.. सांगतो सगळ.." दीपकमधील जागा झालेला बाप भानावर आला.
______________________________________________
सारिका अस्वस्थपणे घरी येरझाऱ्या घालत होती. तिचा उतरलेला चेहरा आणि भरून आलेले डोळे, तिच्या मनातील द्वंद्व दर्शवत होते. पोलीस स्टेशन प्रकरणानंतर... अर्थात तिच्या डोक्यात एकच विचार होता... अनिकेतने तिला काहीतरी वेगळीच माहिती दिली होती... ज्यापासून ती अनभिज्ञ होती... कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे कळेना तिला... बरं कोणाला बोलून दाखवाव तर तसंही कोणी जवळच नव्हतं... मैत्रिणी पण थोड्याच होत्या... त्याही केवळ तिच्या पैशावर मौज करायला मिळते म्हणून भोवती जमायच्या. तिलाही सत्य माहित होते पण फुकटची प्रसिद्धी कोणाला नको असते... मात्र हृदयातील सल बोलून दाखवायला कोणीच जवळ नव्हतं...ज्याला ती आपला मानत होती त्याच्याच आपलेपणावर प्रश्न उपस्थित झाला होता....
______________________________________________
खिडकीतून निशा टक लावून बराच वेळ बाहेर बघत कसल्याशा विचारांत गुंतली होती. वातावरण बरचसं दमट होत. आभाळ भर दुपारी उगा अंधारून आल होत. भकास वाहणाऱ्या वाऱ्यावर डोलणारी झाडं केवळ आपला सजिवपणा अधोरेखित करत होती. सोनिया गेल्यापासून त्यांचं घरटच नाही तर आजुबाजूच वातावरणदेखील उजाड झाल होत. सगळेच एकमेकांपासून तोंड लपवत दुःखाचे घोट गिळत राहायचे. लोकांच्या सततच्या टोमण्यांमुळे बाहेर जाणही नकोस वाटायचं. रोज रोज तेच कडवट बोलणं... बिचारी रोज चातकासारखी वाट पाहायची पोलिसांच्या कॉलची की आजतरी काहीतरी कळेल.... स्वतः कॉल करून विचारलं तरी निराशाच पदरी पडायची... बाकी इतक्या दुःखातही केवळ अनिकेत एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे तिच्याच नाही तर.. अख्ख्या फॅमिलीच्या पाठीशी उभा होता.
आज सकाळपासून तिच्या मनाची नुसती चलबिचल चालू होती. का कोण जाणे आज काहीतरी होईल अस वाटत होत... तीच मन नुसत उचंबळून येत होत.
तिच्या हातातील फोन वाजत होता. सोनिया गेल्यापासून तो फोनही कायमचा सायलेंट मोडवर गेला. स्क्रीनवर अनिकेतच नाव होत..
" हॅलो..." निशा हळू आवाजात उत्तरली.
" हॅलो अनिकेत बोलतोय.."
" हम्म..."
" उद्या सकाळी पोलीस स्टेशनला ये. काहीतरी महत्त्वाचं दाखवायचय तुला..."
उद्याच्या विचाराने तिला आज रात्रभर झोप येणार नव्हती. मनात उमटणारे तरंग नक्की काय सांगू इच्छित होते... सोनियाचा खुनी तर नसेल ना मिळाला... उद्यापर्यंत धीर धरायचा होता.. खुनी मिळाला असेल तर कोण असेल तो... सोनियाशी काय संबंध असेल त्याचा... का केलं असेल त्याने अस..
______________________________________________
" हॅलो..." तिच्या मादक आवाजाने तो जागीच घायाळ झाला. खरतर आता त्याची उनाडक्या करत फिरायची वेळ.. पण नाही... गावभर बोंबलत फिरण्यापेक्षा तिच्या मादकतेत डुंबून जाणं त्याचास्त महत्त्वाचं होत.
" ह.. हॅलो.." तिच्या नुसत्या विचारानेच आवाजानेच तो गडबडून गेला. त्याची कानशील तापली. अंगभर गहिरे रोमांच उठले.
" तुझी खूप आठवण येतेय..." ती पलीकडून खूपच मधाळ बोलत होती. साखरेच्या पाकात घोळल्यासारखा तिचा एकेक शब्द फुटत होता.
" मलाही... पण.. भेटू नाही शकत ना..." तो चुकचुकला.
" भेटू शकतो ना.. सर्वांच्या नकळत..."
" कुठे... कधी..???" त्याच्याही नकळत तो उत्तेजीत झाला.
" मेसेज करते.. ये... नक्की... अजुन नाही राहवत..." आपल्या आवाजाची मोहिनी त्याच्यावर टाकून तिने फोन कट केला. तो मात्र तिच्या विचारांत गढला. तिचा तो आवाज... त्यातून तिची जाणवणारी व्याकुळता... तिची भेटीसाठीची तडफड.. तिची मदमस्त आकृती त्याच्या डोळ्यांसमोर साकारत होती. त्याचे हात त्याच्याच सर्वांगावरून फिरत होते. त्याचे श्वास जड झाले. अर्धवट मिटल्या डोळ्यांसमोर दिसणारा तिचा अर्धनग्न देह पाहून त्याच्या छातीची धडधड वाढली. त्याच्या हातांनी फिरत फिरत वेग पकडला...आता तो रिता रिता होत होता....
______________________________________________
पोलीस स्टेशनच्या अंधाऱ्या खोलीत तो मान खाली घालून बसला होता. त्याचे लांब कुरळे केस अस्ताव्यस्त विखुरले होते. गळ्यातील जाडजूड चांदीची चेन पुढे मागे हेलकावे खात होती. त्याची कमावलेली देहयष्टी पिवळट दिव्याच्या अंधुक प्रकाशात डबडबल्या घामाने चमकत होती. परंतु चेहऱ्यावर मात्र प्रचंड भीतीचे भाव होते. आयुष्यात जणू प्रथमच त्याने पोलीस स्टेशनची पायरी चढली होती.
" रामा..." अनिकेत त्याच्या ठेवणीच्या आवाजात गरजला.
" अं...." त्या नुसत्या आवाजानेच त्याच्या अंगाच पाणी पाणी झाल. देहाने तो जेवढा भयानक वाटत होता त्याहीपेक्षा जास्त आतून फाटका होता.
" अंजली लॉज... रूम नं. १०३.. " अनिकेतच्या नुसत्या बोलण्यानेच तो चमकला. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव अनिकेतच्या अनुभवी नजरेने सहज टिपले. " नाव बदलून का जातो बर..?"
" कशाबद्दल बोलताय तुम्ही..." त्याच्या चेहऱ्यावर उगाचच साळसूदपणाचा भाव होता.
" चोर तो चोर.. वर शिरजोर.." त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. अनिकेतच्या राकट हाताचा ठसा त्याच्या डाव्या गालावर उमटला. इतक्या वेगाने अनिकेतने हालचाल केली की त्याच्या हालचालीपूर्वी वेदना मेंदूपर्यंत पोचली. " भ@&#.. तुला काय वाटतं.. नाव बदललं तर चेहरा पण बदलतो का... कसलही ओळखपत्र मागत नाही म्हणून जातो ना रे 'अंजली लॉज ' वर... पण तुला हे माहितेय का... तुझ्या कारनाम्यांच्या सीडी बनल्यात... जिकडे तू तुझी ओळख लपवतो तिकडे तुझ हे बेढब नग्ननग्न अंग कोणीतरी बघतंय ह्याची जाणीव आहे का तुला भा@#*.... रजिस्टरवर काहीही नाव असुदे पण माद@#* सीडीमध्ये तर तुझाच चेहरा दिसतोय ना..." शिव्या देत अनिकेतने टीवीवर व्हिडिओ स्टार्ट केला. स्वतःलाच अशा अवस्थेत पाहून त्याने लज्जेने आपले डोळे बंद केले. अश्या काहीतरी अवस्थेत आपण पकडले जाऊ ह्याची त्याला कल्पनाच नव्हती.
" बर आता सांगण्याची कृपा कराल का जरा... ह्या व्हिडिओमधला चेहरा तर आपला आहे मात्र रजिस्टरवर एन्ट्रीसाठी नाव वेगळं ते का बरं..?"
" त..ते... नाही...." अश्या प्रकारचा कोणताही प्रसंग समोर येईल ह्याची कल्पनाच नसल्याने तो बावचळून गेलेला होता. त्यात एकावर एक अनपेक्षित धक्के...
" सारिका तर त्या मुलासोबत तुझ्या घरी असायची.. अर्थात हे सारिकानेच सांगितलंय बरं.... मग त्याच दिवशी त्या दोघांचं नाव ह्या लॉजच्या रजिस्टरमध्ये कसं..?"
" सारिका...तिने..तुम्हाला... सर्व...सांगितलं..." तो विचारत होता की स्वतःच्या मनाला पटवून देत होता त्यालाच माहीत.
" उत्तरं द्यायची सोडून का टाईमपास.... करतोय माझ्या हाताचा दणका तर बघितलाय... माझे अजुन एक मित्र आहेत देसाई म्हणून, त्याच्या हातचा प्रसाद घेशील तर बोलायलाही उरणार नाहीस... म्हणून सांगतो पटकन बोल..." अनिकेत हात घासत पुन्हा मारण्याच्या तयारीत होता.
" त्यानेच सारिकाचं नाव वापरायला सांगितलेलं.."
" त्याचा आणि सारिकाचा काय संबंध..?"
" बराच वेळ ते सोबत आहेत.. म्हणजे खूपच जवळ आहेत... तो फक्त तिचा वापर करतोय पण ती लग्नासाठी त्याच्या मागे रोज तगादा लावते... त्याला तिच्यापासून सुटका पाहिजे... जर कधी काही झालं तर तिला ब्लॅकमेल करता येईल म्हणून... मग उगाच मी कशाला अडकायला म्हणून मी ही त्याचंच नाव वापरायचो.. तो लॉजवाला ओळखीचा होता म्हणून कधी आय डी वगैरे मागायचा नाही... पण तो साला....इतका मतलबी असेल अस वाटल नव्हत...."
" अच्छा तो मतलबी.. आणि तू...ह्या असल्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये काय चालतं ते माहित नाही का तुला ?" अनिकेतने अत्यंत तुच्छतेने त्याच्याकडे पाहिलं.
" म.... मी.." आता अजून काय बाकी आहे ह्या चिंतेत त्याचा चेहरा पांढराफटक पडला. एव्हाना भीतीने त्याला दरदरून घाम सुटला होता.
" सरळ विचारतो आता.... कोणत्या कारणस्तव तू सोनियाचा खून केलास..?" अनिकेत मुद्द्यावर आला.
" सोनिया.." त्याच्या तोंडून कसंबसं निघाल.
" यार.... सारखे सारखे माझेच शब्द का रिपीट करतोयस.. उत्तर दे ना विचारलेल्या प्रश्नाचं..." अनिकेत वैतागला.
" माझा काय संबंध त्याच्याशी...?" तो ही चिडला. अनिकेतने त्याचा पुरता पिच्छा पुरवला होता. त्याच्या प्रश्नांना उत्तर देता देता त्याची पळता भुई थोडी झाली होती त्यात अनिकेतची संशयी नजर त्याच्या उरात धडकी भरवत होती.
अनिकेत आता अजुनच वैतागला. एकतर चेहऱ्यावर सगळ स्पष्ट दिसत असूनही किती तो कॉन्फिडन्स खोटं बोलायचा.... निदान निरागस असल्याची अॅक्टींग तरी करायची...सरळ विचारून तो काहीही बोलणार नाही हे तर कळलंच होत. त्याच तोंड उघडण गरजेचं होत...
अनिकेतने शिंदेंना हाक मारली... " शिंदे... जरा ती थैली आणा.." थैलीतून एक रक्ताने माखलेला शर्ट काढत त्याने रामाच्या चेहऱ्यासमोर पकडला..." हा शर्ट तर तुझाच आहे ना.. दिपकने फार मेहनतीने शोधून दिलाय... " शर्ट पाहताच त्याच अवसान पारच गळून गेले. आपण पुरते फसलोय हे त्याच्या ध्यानात आल. पण भयाने जणू त्याची दातखिळी बसली होती...
अनिकेतच्या राकट हाताचा तडाखा त्याच्या दुसऱ्या गालावर पडला. त्याचा जोर एवढा होता की खुर्चीसहीत तो भेलकांडून खाली पडला. ह्यावेळी इतका जबरदस्त मार होता की गालावर त्याची केवळ पाचही बोटं उमटली नव्हती तर पूर्ण जबडा हलला होता. जोराने खाली आपटल्याने डोक्याला बऱ्यापैकी दुखापत झाली. त्याला तशाच अवस्थेत मानगुटीला पकडुन पुन्हा त्याच खुर्चीवर बसवत अजुन एक लगावली. परंतु ह्यावेळी त्याचे केस अनिकेतने आपल्या हाती गच्च पकडून ठेवल्याने तो पडायचा तेवढा वाचला. लागोपाठच्या माराने सर्वांगातुन वेदनेची सणक उमटली होती. तो काही निर्ढावलेला सराईत गुन्हेगार नसल्याने एवढाच हिसका त्याच्यासाठी पुरेसा होता.
"त्यानेच मारली सोनियाला... मला खरंच त्याचा प्लॅन माहित नव्हता.. नाहीतर मी पडलोच नसतो ह्या फंदात... पण... पण त्याच्या नादात अडकलो मी...चूक झाली माझी... पार फसलो मी.." कदाचित त्याला पश्चात्ताप होत असावा. आपल्या ओंजळीत चेहरा पकडुन तो स्फुंदू लागला. एखाद्या गुन्हेगाराला अश्या रीतीने रडताना अनिकेत प्रथमच पाहत होता. त्याच्या पश्चात्तापाचा आता काहीच फायदा नव्हता. जे काही घडून गेलं होत त्यात एका निष्पाप व्यक्तीने आपला जीव गमावला होता... एक सर्वसाधारण सुखी कुटुंब वादळात सापडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे फरफटून गेले होते.... त्यांची चूक अक्षम्य होती...
क्रमशः