देव शोधायचा कुठे?
देव शोधायचा कुठे?


हल्ली भोंदूबाबांचे खूप पेव फूटले आहे. ते स्वताला देव मानून जनतेची फसवणूक करत आहे. आर्थिक,मानसिक, यौन शोषण करत आहे. मग देव शोधायचा कुठे? खरच दुसऱ्याचे चांगले पाहणारा,त्यांचा आंनद द्विगुनीत करणारा खरा माणूस म्हणजे देव. दुसऱ्याचा तिरस्कार, वाईट चिंतनारा दैत्य असे म्हणावे लागेल. वैयक्तिक सेवा, कुटुंबाची सेवा, देशसेवा ही देवपणास पात्र आहे.
जीवंत मनाशी आचार, विचार प्रणाली ,त्यांना आकार देणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी माणसे देवपदास पोहचतात. हाव, तृष्णा, लोभ, द्वेष बाळगनारी माणसे स्वार्थी असतात. ती स्वार्थापुरती नाते ठेवतात. काही माणसे मनात शुद्ध हेतू ठेवून समाजकार्य करतात. ते निःस्वार्थ मनाने काम करतात. अशा चांगल्या माणसाना काही स्वार्थी मंडळीकडून त्रास होतो. पण चांगले काम करणाऱ्याला आयुष्य निरोगी लाभते. निसर्ग त्यांना साथ देतो. ज्यांनी परमार्थात सुख मानले ती सर्व देवपणाला लायक आहेत. काही लोक दुसऱ्याचे भले करण्यास टाळा टाळ करतात व स्वताचे पोट भरतात ते अनेक व्याधीनी त्रस्त असतात. आपले सुख मिळण्यासाठी इतरांना त्रास देतात ते लोक लोकांचे कधीच भले करत नाही. वरवर भक्तीचा आव आणून आपल्याच रक्ताच्या नात्यांवर हल्ले करतो तो कसला संत आणि देव.
वास्तव जीवन जगून जे जगासाठी जगले ते देव. देवाला जात, धर्म नाही. देव चांगले सत्कर्म करणाऱ्याच्या हृदयात वसलेला आहे. देव ही संकल्पना तीनही काळात लागू आहे. अशा प्रकारची महापुरुष, देशसेवक, क्रांतिकारक, समाजसुधारक देव आहेत. त्यांना इतिहास साक्षी आहेत.